(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 19.09.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये पगारातून कपात झालेली गट विम्याची रक्कम सेवा निवृत्ती नंतर व्याजासह परत मिळण्याबाबत दाखल केली. सदर तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 2. सदर तक्रार न्यायमंचात न्यायप्रविष्ठ असतांना, आपसी समझोता होऊन गैरअर्जदार यांनी गट विम्याच्या रक्कमेचा चेक क्र.0797409 रुपये 10,529/- दिला. अर्जदार व गैरअर्जदार तसेच त्याचे वकील हजर होऊन, मामला परत घेण्यासंबंधी संयुक्त पुरसीस निशाणी क्र.14 नुसार दाखल केली. तसेच, अर्जदार व त्याचे वकील यांनी नि.15 नुसार प्रकरण बंद करण्याबाबत पुरसीस दाखल केली. अर्जदाराला, गैरअर्जदाराकडून काहीही घेणे नाही, तक्रार विनार्शत मागे घेत असल्याची पुरसीस दाखल केली. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांना, निशाणी क्र.14 व 15 मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, बरोबर असल्याचे मान्य केले. अर्जदाराने तक्रार परत घेतली असून, प्रकरण पुढे चालवू इच्छित नसल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे खारीज. (By way of withdrawal ) (2) अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |