जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 177/2011 तक्रार दाखल तारीख – 01/12/2011
तक्रार निकाल तारीख– 13/02/2013
श्री.ज्ञानदेव संतराम वाघमारे,
रा.शिक्षक सोसायटी समोर लातूर रोड,
पाण्याच्या टाकीजवळ, अंबाजोगाई जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
मा.मुख्याधिकारी,
नगर परिषद अंबाजोगाई जि.बीड. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अड.एल.आर.जगताप,
गैरअर्जदार प्रतिनिधी हजर..
--------------------------------------------------------------------------------------- निकाल
दिनांक- 13.02.2013
(द्वारा- श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदाराने नळ जोडणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे व रु.4,000/- पावती पुस्तक क्र.483, पावती क्रमांक 48287 अन्वये भरले आणि नळ जोडणी करण्यासाठी विनंती केली पण गैरअर्जदाराने नळ जोडणी करुन दिलेली नाही. त्यानंतर अर्जदाराने वारंवार गैरअर्जदाराशी या संदर्भात पत्रव्यवहार केला, परंतू गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही. म्हणून अर्जदाराने सदरचा अर्ज दाखल केला आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले व युक्तीवादही केला. त्यानुसार नळ जोडणीसाठी गैरअर्जदार यांचा माणूस गेला
(2) त.क्र.177/11
असताना मंजूर नकाशाप्रमाणे नळ जोडणी करुन घेण्यास तक्रारदाराने नकार दिला व नकाशातील पाईप लाईन ते त्यांचे घर असा स्वत’ नळ जोडणी करण्याचा भाग त्यांनी पूर्ण केलेला नाही म्हणून नळ जोडणी झालेली नाही. अन्यथा, त्यांची नळ जोडणी देण्यास हरकत नाही.
अर्जदार यांनी शपथपत्र दाखल केले. त्यानुसार अशा प्रकारे नळ जोडणी करण्याबाबत त्यांना लेखी अथवा तोंडी सांगण्यात आले नाही. सुनावणीसाठी अर्जदार गेरहजर आहेत. गैरअर्जदारांचे प्रतिनिधी हजर आहेत, त्यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली करण्याचा निर्णय न्यायमंचाने घेतला.
अर्जदार यांनी त्यांना नळ कनेक्शन न देता दिलेली बिलाची प्रत दाखल केली आहे. तसेच नळ कनेक्शन न मिळाल्यामुळे त्यांना पाणी विकत घ्यावे लागले, त्यांच्या पावत्या जोडल्या आहेत. आणि नळ जोडणी करुन द्यावी व नुकसानापोटी रु.5,00,000/-(अक्षरी रु.पाच लाख) ची मागणी केली आहे.
अर्जदाराने त्याने मागणी केल्याप्रमाणे रु.4,000/- गैरअर्जदारांकडे भरले त्याची पावती दाखल केली आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने त्याच्या घराजवळील नळ जोडणी केली नाही. परंतू अर्जदार यास अशा प्रकारे स्वखर्चाने नळ जोडणीचा काही भाग पूर्ण करायचा आहे असे लेखी अथवा तोंडी कळवल्यासंबंधी कोणतीही कागदपत्रे गैरअर्जदाराने दाखल केली नाहीत. योग्य ती रक्कम भरल्यानंतर देखील नळ जोडणी न देणे ही सेवेतील त्रुटी आहे.
उलटपक्षी, गैरअर्जदारांनी नळ जोडणी न देता अर्जदाराकडे दि.17.2.11 रोजी पाणीपटटी रु.3704/-(अक्षरी रु.तीन हजार सातशे चार) ची अन्याय्य मागणी केली. या सर्व कागदपत्रांवरुन उघडपणे गैरअर्जदार यांनी जळ जोडणीचे पैसे भरुनही नळ जोडणी दिलेली नाही आणि नळ जोडणी न देता पाणीपटटी मागितली आहे. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना तात्काळ नळ जोडणी करुन द्यावी.
3) अर्जदार यांनी, गैरअर्जदार यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरापासून
(3) त.क्र.177/11
नकाशात दर्शवलेल्या पाईप लाइन पर्यंत स्वखर्चाने पाईप लाईन
टाकावी.
4) खर्चाबाबत हुकूम नाही.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड