DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/262/2020 | ( Date of Filing : 31 Jul 2020 ) |
| | 1. SHRI MANOHAR TULSHIRAM MESHRAM | H.I.G. B 11, 40 BLOCK, HIGH INCOME GROUP, NAGPUR MHADA COLONY, SUGAT NAGAR, JARIPATKA, NAGPUR 14. | NAGPUR | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. CHIEF OFFICER, NAGPUR HOUSING AND AREA DEVELOPMENT BOARD AND 2 OTHERS | GRUHNIRMAN BHAVAN, NEAR NEW AMDAR NIWAS, CIVIL LINES, NAGPUR 440001 | NAGPUR | Maharashtra | 2. ESTATE MANAGER, NAGPUR HOUSING AND AREA DEVELOPMENT BOARD | GRUHNIRMAN BHAVAN, NEAR NEW AMDAR NIWAS, CIVIL LINES, NAGPUR 440001 | NAGPUR | Maharashtra | 3. EXECUTIVE ENGINEER, NAGPUR HOUSING AND AREA DEVELOPMENT BOARD | GRUHNIRMAN BHAVAN, NEAR NEW AMDAR NIWAS, CIVIL LINES, NAGPUR 440001 | NAGPUR | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
PRESENT: | SHRI GUNRATNA T. RAMTEKE, Advocate for the Complainant 1 | | ADV. KASTURE, Advocate for the Opp. Party 1 | |
Dated : 20 Jul 2023 |
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, वि.प. यांनी नारी इंदोरा नागपूर येथे बांधण्यात येणा-या गाळयांच्या वाटपाकरिता अर्ज मागविण्याकरिता जाहिरात प्रसिध्द केली होती. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने प्रसिध्दी केलेल्या जाहिरातीप्रमाणे नारी इंदोरा (सुगत नगर ) नागपूर येथील उच्च उत्पन्न गट ( कोड क्रं. 040) योजने अंतर्गत बांधकाम करण्यात येणा-या 44 बैठे गाळे एकूण क्षेत्रफळ 448.515 चौ.मी. (522.02 चौ.फु)(गाळयाच्या बाजुला अतिरिक्त जागा) गाळयाची अंदाजी किंमत रुपये 1,97,000/- करिता अर्ज आवश्यक दस्तावेजासह केला. तक्रारकर्त्याला अर्जासोबत रुपये 5000/- इतकी रक्कम करावयाची होती व गाळाचा ताबा घेण्यापूर्वी रुपये 67,000/- व अतिरिक्त जागेसाठी गाळयाचा ताबा घेण्यापूर्वी रुपये 3,66,000/- भरावयाचे होते. जाहिराती मध्ये भाडे खरेदीचा कालावधी 13 वर्षे 9 महिने नमूद केला होता तसेच व्याजा दर 16.5 टक्के नमूद होता. पुरविण्यात येणा-या गाळया मध्ये झोपण्याची खोली, स्वयंपाकाची खोली, संडास-बाथरुमचा समावेश होता. तसेच त्या सोबत इमारतीच्या ठिकाणी पुरविण्यात येणा-या सोयी, बाहय रस्ते, पाणीपुरवठा, विजेचे खांब, खड्डीचे रस्ते इत्यादीचा समावेश होता. अर्जा सोबत दिलेल्या माहिती पत्रकामधील कॉलम क्रं. 15 (अ) नुसार दर्शविलेल्या गाळयाची किंमत अंदाजित आहे. भविष्यात गाळयाच्या किंमती मध्ये वाढ होऊ शकते आणि वाढ झाल्यास फरकाची किंमत अर्जदारास भरावी लागेल असे माहितीपत्रकात नमूद आहे.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, विरुध्द पक्षाने संपूर्ण कागदपत्राची तपासणी केल्यानंतर तक्रारकर्त्याला पत्र क्रं. 1251/99 ई.एम. दि. 25.02.1999 नुसार बी-टाईप गाळयामधील गाळा बी-11 चे नियत वाटप पत्र दिले. वि.प. 3 यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं. 175/1999 / का.अ.1, कार्यालय नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ नागपूर यांचे दि. 21.06.1999 अन्वये उच्च उत्पन्न गट योजनेतील गाळे धारकाच्या सूचनेनुसार गाळयाच्या संरक्षणाकरिता प्रस्तावित कुंपणाबाबत पत्र देऊन जाहिरातीत दिलेल्या जागेचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन नकाशा तयार करण्यात आला असल्याचे कळविले. सदर पत्रानुसार ब टाईपच्या गाळयांना 210 चौ.मी. (48.515 चौ.मी + खुली जागा 161.455 चौ.मी. ) दिल्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत येण्याकरिता प्रति माळा 16.44 चौ.मी. जास्तीची शिल्लक जागा ब– टाईप गाळे धारकांना द्यावी लागेल व त्यानुसार नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारकर्ते ब-टाईप गाळयामधील गाळयांचे क्षेत्रफळ 210 +16.44 चौ.मी.असलेली जास्तीची जागा मिळण्यास पात्र आहे.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्याने दि. 24.06.2020 रोजी वि.प. 2 यांना पत्र पाठवून वाटप करण्यात आलेल्या गाळयांचा / जमिनीचा भाडेपट्टा व विक्रीपत्र एकूण क्षेत्रफळ 226.44 देण्याची विनंती केली. वि.प. यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं. 3534/2020 दि. 29.06.2020 नुसार गाळयांचे विक्रीखत / जमिनीचा भाडेपट्टा करुन देण्यापूर्वी गाळे/ भूखंडधारकांनी पूर्ण करावयाच्या बाबीचे पत्र देऊन त्यात नमूद भूखंडाचे क्षेत्रफळ 222 चौ.मी. असून रुपये 93,100/- एवढी रक्कम भरण्याचे नमूद केले आहे. वि.प. 2 यांनी दि. 29.06.2020 रोजी दिलेल्या पत्रात जमीनीचे व गाळयाचे एकूण क्षेत्रफळ 222 चौ.मी. नमूद करुन त्रुटी पत्र दिले आहे. वि.प. 1 ते 3 यांनी त्रुटीपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला गाळा क्रं. बी-11, बांधकाम क्षेत्रफळ 48.515 चौ.मी. एकूण क्षेत्रफळ 226.44 चौ.मी. माहितीपत्रक व दि. 21.09.1999 चे पत्र क्रं. 175 प्रमाणे भाडेपट्टा / विक्रीपत्र नोंदणी करुन द्यावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 ने आपला लेखी जबाब दाखल केला असून त्यात नमूद केले की, सदर प्रकरणातील व्यवहार हा सन 1999 च्या दरम्यान असल्याने व वादातील गाळा हा तक्रारकर्त्याच्या ताब्यात असल्याने तक्रारकर्त्याने वादातीत गाळयाबाबत विक्रीपत्र किंवा भाडेपट्टा नोंदणी हेतू विहित मुदतीत म्हणजेच तक्रार अर्ज दाखल करण्यास प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आंत दाखल करणे आवश्यक होते. परंतु सदर तक्रार विहित मुदतीत दाखल न केल्यामुळे खारीज करण्यात यावे. सदरच्या प्रकरणातील वाद हा गाळयाच्या क्षेत्रफळाशी संबंधीत असल्याने सदर वादाकरिता सविस्तर साक्षी पुराव्याची गरज असल्याने प्रस्तुत तक्रार आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार दिवाणी न्यायालयात दाखल करणे न्यायोचित आहे.
- विरुध्द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याला प्राप्त होणा-या क्षेत्रफळाच्या अनुषंगाने रक्कमेचा भरणा करावयाचा असून वादातीत गाळा संबंधी अंतिम मुल्यनिर्धारण झाले असल्याने त्या रक्कमेचा भरणा करणे आवश्यक आहे. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कमी जागेचे विक्रीपत्र करण्याचे दर्शवून रक्कमेचा भरणा करण्याचे पत्र दिले ही बाब खोटी आहे. तक्रारकर्त्याने स्वतः वादातीत गाळयाची किंमती अंदाजित असल्याचे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात गाळयाच्या किंमतीत वाढ होऊ शकते व वाढ झाल्यास फरकाची किंमत तक्रारकर्त्यास भरावी लागेल ही बाब सुध्दा तक्रारकर्त्याने मान्य केली आहे. तक्रारकर्त्याला वादातीत गाळा संदर्भात अंतिम मुल्याप्रमाणे रक्कम भरावयाची आहे ही बाब माहिती आहे. उपरोक्त नमूद मौजा- नारी, इंदोरा नागपूर येथील जागेवर 24 मीटर रस्ता लगत 40 उच्च उत्पन्न गट योजना राबविण्यात आली आहे. सदर योजना 24 मीटर रस्ता लगत असल्याने या योजनेतील भूखंडाचे क्षेत्र स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार 600 चौ.मी. क्षेत्रा पेक्षा जास्त असल्या कारणाने या योजनेतील भूखंड 32 X 25 =800 चौ.मी. क्षेत्राचा ठेवण्यात आला आहे. सदर योजना बैठा गाळाचे असून एका भूखंडावर 4 गाळे बांधण्यात आले आहे. सदर गाळे 24 मीटर रस्ता लगत असल्यामुळे स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार गाळयाच्या भूखंडाचे विभाजण करता येणार नाही. अ-टाईपचे गाळे 24 मीटर रस्ता लगत असल्यामुळे या गाळयांना रस्त्यावरुन प्रवेश उपलब्ध होतो व ब - टाईपचे गाळे मागील बाजुला असल्यामुळे या गाळयांना जाण्याकरिता 3 मीटर रुंदीचा पाथवे भूखंडाचे दोन्ही बाजुने दर्शविण्यात येऊन 800 चौ.मी. क्षेत्राचे ( नॅशनल डिव्हीजन) करिता मंजुरी प्राप्त झाली आहे व त्या अनुषंगाने या योजनेतील अ- टाईपच्या गाळेधारकांना भूखंडाचे क्षेत्र 178.00 चौ.मी. करिता व ब - टाईपच्या गाळेधारकांना गाळयाची मागील बाजू असल्यामुळे रस्त्यावरुन पोहच मार्गासह भूखंडाचे क्षेत्र 222.00 चौ.मी. करिता विक्रीखत करुन देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रार अर्जामधील नमूद 226.44 चौ.मी. क्षेत्रफळाचे भाडेपट्टा किंवा विक्रीपत्र नोंदवून देण्याचा आग्रह न करता 222.00 चौ.मी. करिता अंतिम मुल्य प्रदान करुन विक्रीखत नोंदवून घ्यावे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा न दिल्यामुळे सदर प्रकरण खारीज करण्यात यावे अशी विनंती केली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्या मौजा- नारी, इंदोरा (सुगत नगर) नागपूर येथील उच्च उत्पन्न गट (कोड नं. 040) करिता माहितीपत्रकानुसार विरुध्द पक्षाकडे आवश्यक दस्तावेजासह विहित मुदतीत अर्ज केल्यानंतर तक्रारकर्त्याच्या नांवे बी-11 या गाळयाचे दि. 25.02.1999 रोजी नियत वाटप पत्र दिले होते, हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तवेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. गाळयाचे विक्रीखत / भाडेपट्टा करुन देण्यापूर्वी तक्रारकर्त्याला गाळयाचे भूखंड क्षेत्रफळ 222 चौ.मी. पोटी रुपये 93,100/- वि.प. कडे जमा करावयाचे असल्याबाबतचे दि. 19.06.2020 रोजी पत्र दिल्याचे सुध्दा दिसून येते. तक्रारकर्त्याने स्वतः वादातीत गाळयाची किंमती अंदाजित असल्याचे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात गाळयाच्या किंमतीत वाढ होऊ शकते व वाढ झाल्यास फरकाची किंमत तक्रारकर्त्यास भरावी लागेल ही बाब सुध्दा तक्रारकर्त्याने मान्य केली आहे. त्यानुसार तक्रारकर्त्याने दि. 22.07.2020 ला रुपये 93,100/- डिमांड ड्राफ्ट नं. 512440 अन्वये भरले असल्याचे दिसून येते. सदर योजना बैठा गाळाचे असून एका भूखंडावर 4 गाळे बांधण्यात आले आहे. सदर गाळे 24 मीटर रस्ता लगत असल्यामुळे स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार गाळयाच्या भूखंडाचे विभाजण करता येणार नाही. अ-टाईपचे गाळे 24 मीटर रस्ता लगत असल्यामुळे या गाळयांना रस्त्यावरुन प्रवेश उपलब्ध होतो व ब - टाईपचे गाळे मागील बाजुला असल्यामुळे या गाळयांना जाण्याकरिता 3 मीटर रुंदीचा पाथवे भूखंडाचे दोन्ही बाजुने दर्शविण्यात येऊन 800 चौ.मी. क्षेत्राचे ( नॅशनल डिव्हीजन) करिता मंजुरी प्राप्त झाली आहे व त्या अनुषंगाने या योजनेतील अ- टाईपच्या गाळेधारकांना भूखंडाचे क्षेत्र 178.00 चौ.मी. करिता व ब-टाईपच्या गाळेधारकांना गाळयाची मागील बाजू असल्यामुळे रस्त्यावरुन पोहच मार्गासह भूखंडाचे क्षेत्र 222.00 चौ.मी. करिता विक्रीखत करुन देण्याचे काम सुरु आहे. तक्रारकर्त्याने बी- 11 या गाळयाचे भूखंड क्षेत्रफळ 222 चौ.मी. करिता रक्कम रुपये 93,100/- भरली असल्यामुळे तक्रारकर्त्याची भूखंड 226 चौ.मी. चे विक्रीपत्र / भाडेपट्टा करुन देण्याची विनंती अमान्य करण्यात येत असून प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येते.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. ATUL D. ALSI] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | |