(घोषित दि. 23.01.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे
तक्रारदार वैद्यकीय व्यवसाय करत असून गैरअर्जदार यांचेकडून विमा पॉलीसी क्रमांक 021379124 रक्कम रुपये 1,00,000/- घेतलेली असून त्याची मुदत दिनांक 28.03.2011 रोजी संपलेली आहे. गैरअर्जदार यांच्या दिनांक 10.05.2011 च्या पत्रानूसार तक्रारदारांना पॉलीसी मॅच्यूरीटी रक्कम रुपये 3,69,900/- देय असून कर्जाची रक्कम वजा केली असता रुपये 2,28,375/- एवढी रक्कम तक्रारदारांना मिळाणार होती. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 1,50,575/- दिनांक 10.05.2011 रोजीचा चेक पाठवला. तक्रारदारांना गैरअर्जदार यांनी रक्कम रुपये 67,800/- कमी रकमेचा चेक पाठवल्यामुळे दिनांक 25.05.2011 रोजीच्या पत्रान्वये परत पाठवला. गैरअर्जदार यांनी पून्हा रुपये 1,50,575/- रकमेचा चेक तक्रारदारांना दिनांक 02.06.2011 रोजीच्या पत्रान्वये पाठवला. तक्रारदारांनी सदरचा चेक स्विकारला असून उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 25.10.2011 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांनी “Convertible whole life policy”Plan No.27 (New) घेतलेली असून पॉलीसीतील शर्ती व अटी नूसार पॉलीसी घेतल्यानंतर 5 वर्षानी विमा धारकाच्या इच्छेनूसार सदर पॉलीसी जास्त प्रिमीयम देवून ती पूर्ण जिवनाच्या लाभा करिता रुपांतरीत केली जाते. तक्रारदारांची पॉलीसी रक्कम रुपये 1,00,000/- ची असून मूदत दिनांक 28.03.2011 रोजी संपली आहे. संगणकाच्या तांत्रिक चूकीमुळे तक्रारदारांना चूकीचे पत्र पाठविण्यात आले. तक्रारदारांनी सदर पॉलीसी मार्च 1986 मध्ये घेतली असून मार्च 1986 ते मार्च 1989 पर्यंत पॉलीसीचा प्रिमियम रुपये 9,200/- असून व्याजाची रक्कम रुपये 1,350/- आहे. तक्रारदारांनी पॉलीसीच्या नियमानूसार दिनांक 28.03.1990 रोजी जास्त प्रिमीयम भरणा करुन “Whole Life With Profit” मध्ये रुपांतर करण्यात आले. तक्रारदारांनी दिनांक 21.05.1991 रोजी रक्कम रुपये 1,00,000/- चे कर्ज घेतले असून पॉलीसीची मूदत संपल्यानंतर रक्कम रुपये 30,975/- एवढे व्याज असून, तक्रारदारांना पॉलीसीचा बोनस पॉलीसी इश्यू झाल्यानंतर 5 वर्षानंतर देय असूनही संगणकातील चूकीच्या सॉफ्टवेअरमूळे बोनस पॉलीसी इश्यू झालेल्या तारखेपासून घेण्यात आले. पॉलीसीच्या नियमानूसार रक्कम रुपये 1,79,900/- Vested bonus रक्कम रुपये 90,000/- Final addl. bonusदेय नसून अनुक्रमे रक्कम रुपये 1,59,100/- व रक्कम रुपये 33,000/- बोनस देय होते. तक्रारदारांना एकूण रक्कम रुपये 2,92,100/- देय असून रक्कम रुपये 1,41,525/- कर्जाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रुपये 1,50,575/- गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना चेकद्वारे पाठवली असून गैरअर्जदार यांनी सेवेत त्रूटी केलेली नाही.
तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्र व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री एन.एस.अलीजार व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री शेख इकबाल अहेमद यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रुपये 1,00,000/- ची विमा पॉलीसी नंबर 21379124 दिनांक 28.03.1981 रोजी घेतलेली असून सदर पॉलीसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी विमाधारकाच्या इच्छेनूसार जास्त प्रिमीयमची रक्कम भरणा करुन “Whole life Assurance”मध्ये Convertकरण्याची सुविधा पॉलीसी अंतर्गत दिलेली आहे. या संदर्भात पॉलीसीवर खालील प्रमाणे नमूद केल्याचे दिसून येते.
“ on the written request of the Proposer or his Assigns made at the end of 5yrs from the date of Commencement of the policy before Payment of the premium falling the immediately thereafter provided the policy is then in full force the Corporation will convert the policy into un Endowment Assurance policy with profits or without profits payable at the end of the term specified in written request at the rate & terms specified in Convertible whole life Assurance scheme of the Corporation’s prospectus or table of rates in force on the date of the policy”
पॉलीसीच्या वरील अटी व शर्ती नूसार तक्रारदारांनी दिनांक 28.03.1986 रोजी पॉलीसी Convertकरणे आवश्यक होते. परंतू तक्रारदारांनी दिनांक 28.03.1990 रोजी पॉलीसी जास्त प्रिमियम भरणा करुन बदल केल्याचे दिनांक 22.07.1990 रोजीच्या पावतीवरुन दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी दिनांक 28.03.1986 ते 28.03.1989 या कालावधीचा प्रिमियम रक्कम रुपये 9,200/- व त्यावरील व्याज रुपये 1,350/- तक्रारदारांच्या पॉलीसी रकमेतून वजा केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांना पॉलीसीचा बोनस पॉलीसी इश्यू झाल्यानंतर 5 वर्षानंतर म्हणजेच दिनांक 28.03.1986 पासून देय असून संगणकातील दोषामूळे पॉलीसी इश्यू झाल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 28.03.1981 पासून बोनस रक्कम देण्याबाबतचे पत्र दिनांक 10.05.2011 रोजी तक्रारदारांना चूकीने देण्यात आले.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांच्या पॉलीसीतील नियमानूसार पॉलीसीची रक्कम रुपये 1,00,000/-, व्हेस्टेड बोनस रक्कम रुपये 1,59,100/-, अंतिम बोनस रक्कम रुपये 3,300/- अशी एकूण रक्कम रुपये 2,52,100/- देय असून रुपये 1,000/-, त्यावरील व्याज रक्कम रुपये 30,975/- तसेच प्रिमियमीची रक्कम रुपये 9,200/- व त्यावरील व्याज रक्कम रुपये 1,350/- असे एकूण रुपये 1,45,525/- वजा केल्यानंतर तक्रारदारांना गैरअर्जदार कंपनीने रक्कम रुपये 1,50,575/- देणे आवश्यक आहे. गैरअर्जदार यांनी सदरची रक्कम चेकद्वारे तक्रारदारांना अदा केल्याचे मान्य आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार रक्कम रुपये 67,800/- गैरअर्जदार यांनी त्यांना कमी दिली आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 10.05.2011 रोजीच्या पत्रानूसार मॅच्यूरीटी रक्कम देणे बंधनकारक आहे. सदर प्रकरणात बोनसच्या रक्कमेबाबत Calculation कशा प्रकारे केले आहेत. तसेच तक्रारदाराला गैरअर्जदाराने पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केल्या प्रमाणेच रक्कम मिळण्यास तक्रारदार कसा पात्र ठरतो याबाबत तक्रारदाराने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. वास्तविक प्रस्तुत प्रकरणातील वाद हा सेवेतील त्रुटीशी संबंधित नसून हिशोबा बाबतचा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वाद केवळ दिवाणी न्यायालयातच चालू शकतो. म्हणून तक्रारदाराने रक्कम वसूली बाबत व हिशोबा बाबत दिवाणी न्यायालयातच दाद मागणे योग्य राहील असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही