जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 272/2011 दाखल तारीख :14/11/2011
निकाल तारीख :10/02/2015
कालावधी : 03वर्षे 02म.26 दिवस
1) श्रीमती सत्यभामाबाई माणिक बारबोले,
वय 60 वर्षे, धंदा घरकाम,
2) श्रीमती बारकुबाई माणिक बारबोले,
वय 55 वर्षे, धंदा घरकाम,
रा. आखरवाई ता. जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) महाव्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि;
प्रादेशीक कार्यालय,अंबिका भवन, क्र. 19, तिसरा मजला,
धरमशेट एक्सटेंशन, शंकरनगर चौक, नागपुर 440010.
2) व्यवस्थापक / अध्यक्ष,
कबाल इंशुरन्स सर्व्हीस प्रा.लि.
राज अपार्टमेंट, प्लॉट नं. 29, जी सेक्टर, रिलायन्स फ्रेशच्या
पाठीमागे, चिस्तीया पोलीस चौकी जवळ, एम.जी.एम.रोड,
सिडको टाऊन सेंटर, औरंगाबाद 431003.
3) तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, लातूर जिल्हा लातूर.
4) जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी ,
प्रशासकीय इमारत, लातूर.
5) युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि.
शाखा गोरक्षण समोर, मेन रोड, लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.व्ही.बी.धुळे.
गै.अ.क्र.1 व 5 तर्फे :अॅड. एस.व्ही.तापडीया.
गै.अ.क्र. 2 व 3 : स्वत:
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हे मौजे आखरवाई ता. जि. लातूर येथील रहिवाशी असून मयत माणिक राम बारबोले यांचे पत्न्या असून कायदेशीर वारसदार आहेत. अर्जदाराचे पती हे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विम्याचे लाभार्थी होते. अर्जदाराच्या पतीस गट क्र 8,10,12,208 मौजे आखरवाई येथे 6 हे. 49 शेतजमीन असून, त्याच्या विमा पॉलिसीचा कालावधी दि. 15.08.2009 ते 14.08.2010 असा आहे. दि. 29.07.2010 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास भोई समुद्रा येथे लातूर ते कळंब रोडवर टेलीफोन ऑफिसच्या समोर थांबले असता मोटार सायकल क्र. एम.एच.25 टी 1937 च्या चालकाने त्याच्या ताब्यातल मोटार सायकल वाहन अतिशय भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन रोड लगत थांबलेल्या तक्रारदाराच्या पतीस जोराची धडक दिल्यामुळे ते रोडवर पडल्यामुळे डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांच्या औषध उपचारासाठी लोकमान्य अतिदक्षता केंद्र लातूर येथे शरिक केले असता, उपचारा दरम्यान ते बेशुध्द अवस्थेत दि. 31/07/2010 रोजी मरण पावले सदरील अपघाती घटनेची नोंद 170/10 अन्वये 304 (ए), 279 भा.द.वि. प्रमाणे करण्यात आलेली आहे. अर्जदाराने सदर महाराष्ट्र शासनाच्या योजने प्रमाणे शेतकरी जनता अपघात विमा योजने नुसार क्लेम फॉर्म भरुन दिला व सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर दि. 24.03.2011 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम अर्ज फेटाळला म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे. म्हणुन गैरअर्जदाराने रु. 1,00,000/- अपघात तारखे पासुन 15 टक्के व्याजाने दयावेत, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याच्या खर्च रु. 7000/- देण्यात यावा.
गैरअर्जदाराने कबाल इंशुरन्स कंपनीने म्हणणे दिले, त्या प्रमाणे अर्जदाराच्या पतीचा माणिक रामराव बारबोले याचा अपघाती मृत्यू दि. 29.07.2010 रोजी झाला, अर्जदाराने बँक पास बुक, शपथपत्र, 6 क, एफ.आय.आर. ही कागदपत्रे जोडली नाहीत म्हणुन स्मरणपत्रे दि. 02/11/2010, 06/12/2010 या रोजी पाठवलीदि. 21/12/2010 रोजी विमा कंपनी नागपुर याच्याकडे सदरचा क्लेम अपुर्ण क्लेम म्हणुन पाठवण्यात आला, म्हणुन विमा कंपनीने सदरचा क्लेम बंद केला. गैरअर्जदार विमा कंपनीने सदरचा क्लेम 90 दिवसात आला नाही म्हणुन बंद केलेला आहे. त्यांच्या पॉलिसीचा कालावधी हा 15 ऑगष्ट 2009 ते 14 ऑगष्ट 2010 असा होता. तसेच अर्जदाराने 90 दिवसात कागदपत्रांची पुर्तता करुन दिलेली नाही, तसेच अर्जदारचा पती हा अपघाती मृत्यूने मृत्यू पावला ही बाब सुध्दा सिध्द करावी, म्हणुन अर्जदाराचा क्लेम हा फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय सून, अर्जदाराचा पती हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदाराला मान्य आहे. अर्जदाराचा दि. 29.07.2010 रोजी रस्त्यावर उभा असतांना अपघाती मृत्यू झाला याची नोंद एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 170/2010 अन्वये केलेली आहे. तसेच मृत्यू पुर्वी अर्जदाराच्या पतीस आखरवाई येथे गट क्र.8,10,12 व 208 मध्ये 6 हेक्टर 49 आर जमीन होती, म्हणुन तो शेतकरी होता ही बाब सिध्द होते.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराने स्वत: महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकातील अट क्र. 9 चे Intimate असे शब्द वापरलेले आहेत, या नुसार सदरचा क्लेम अर्जदाराने दि. 22/10/2010 रोजी कबाल इंशुरन्स कंपनीकडे मिळाला याचा अर्थ अर्जदाराने हा क्लेम मुदतीपुर्व दाखल केलेला दिसून येतो. अर्जदार हे दोन्ही विधवा व वयस्क अशा स्त्रीया असल्यामुळे त्यांनी क्लेमचे कागदोपत्री पुरावा गोळा करावयास वेळ लागला असावा, तरीही अर्जदारानी सदरची गैरअर्जदाराची पुर्व कल्पना अर्जदाराचा क्लेम दाखल करुन आली होती, तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाती दि. 29.07.2010 रोजी टेलीफोन ऑफिसच्या समोर उभा टाकला असता, सकाळी 8 वाजताच्या सुमारास वाहन क्र. एम.एच.24 टी 1937 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल वाहन अतिशय भरधाव वेगाने चालवुन अर्जदाराच्या पतीस धडक दिला, त्यामुळे अर्जदाराचा पती जागीच बेशुध्द झाले. दि. 31.07.2010 रोजी मरण पावले. या घटनेची नोंद एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 170/2010, कलम 304(ए), 279 भा.द.वि. प्रमाणे करण्यात आलेली आहे. यामुळे अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता हे सिध्द करण्यासाठी एफ.आय.आर. ची प्रत दाखल केलेली आहे. तसेच त्याच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याच्या डोक्यास जखमा झाल्या होत्या ही बाब मयताचे मृत्यूचे कारणात नोंद केलेली आहे. म्हणुन सदर केस मध्ये अर्जदारांनी आपली सर्व कागदपत्रे अर्जदाराला पाठवली असल्याचे त्यांनी न्यायमंचात दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. म्हणुन गैरअर्जदारानी 90 दिवसानंतर क्लेम आला म्हणुन सदरचा अर्ज फेटाळला ही अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केलेली आहे. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 5 विमा कंपनीने अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/- दयावेत, तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 3000/- दयावेत.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 व 5 विमा कंपनीने तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 1 व 5 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 1 व 5 यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- ,आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**