जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 128/2011 दाखल तारीख :19/05/2011
निकाल तारीख :13/02/2015
कालावधी :03वर्षे 08 म.24 दिवस
श्रीमती मंगलाबाई वैजनाथ मल्लीशे,
वय 36 वर्षे, धंदा घरकाम,
रा. चापोली, ता. चाकुर जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) महाव्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि.
प्रादेशीक कार्यालय, अंबीका भवन क्र. 19,
तिसरा मजला, धरमशेट एक्सटेंशन, शंकर नगर चौक,
नागपुर 440010.
2) व्यवस्थापक / अध्यक्ष,
कबाल इन्शुरन्स सर्व्हीस प्रा.लि.
राज अपार्टमेंट, प्लॉट नं. 29, जी सेक्टर,
रिलायन्स फ्रेशच्या पाठीमागे चिस्तीया पोलीस चौकीजवळ,
एम.जी.एम. रोड, सिडको टाऊन सेंटर, औरंगाबाद431003.
3) मंडळ कृषी अधिकारी, चापोली , ता. चाकुर जि. लातूर.
4) तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय , चाकुर जि. लातूर.
5) जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, प्रशासकीय इमारत लातूर.
6) व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि.
मेन रोड, गोरक्षण समोर, लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.पटेल ए.एम.के.
गै.अ.क्र.1 व 6 तर्फे :अॅड. एस.व्ही.तापडीया.
गै.अ.क्र.2 ते 4 : स्वत:
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा चापोली ता. चाकुर येथील रहिवाशी असून, तक्रारदाराच्या पतीच्या नावे सर्व्हे नं. 452 मध्ये 3 हे. 99 आर शेतजमीन आहे. सदर जमीन तक्रारदाराच्या पतीच्या अपघाती मृत्यू नंतर वारसा हक्काने नावे आली आहे. तक्रारदाराचा पती दि. 08.10.2009 रोजी दुपारी 3.30 ते 4.00 च्या सुमारास अॅटोरिक्षा क्र. 24 जे/1884 मध्ये बसुन चापोलीहुन चाकुरकडे जात असतांना चापोली बसस्टँड समोर येणा-या टेम्पो क्रमांक एम एच 24/ 5804 याने हायगाईने व निष्काळजीपणाने वाहन चालवुन तक्रारदाराचा पती बसलेल्या अॅटोरिक्षास धडक दिली त्यामुळे तक्रारदाराचा पती गंभीर जखमी झाला, त्यास औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले, उपचारा दरम्यान तक्रारदाराच्या पतीचा त्याच दिवशी दुपारी 5 वाजता मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद चाकुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 166/2009 अन्वये करण्यात आली.
तक्रारदाराने आपल्या मयत पतीचा शेतकरी अपघात विम्याची रक्कम मिळण्याच्या हेतुने सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे दि. 20.03.2010 रोजी विमा प्रस्ताव व त्यास आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून प्रस्ताव दाखल केला. तक्रारदार सामनेवाला यांच्याकडे वारंवार चौकशी करीत राहीला. सामनेवाला क्र. 1 दि. 24.03.2011 रोजी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- त्यावर अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- तक्रारीचे खर्चापोटी रु. 7000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र. 4 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त झाली असून, त्यांनी आपले म्हणणे दि. 21.07.2011 रोजी दाखल केले असून, सामनेवाला क्र. 5 यांनी दि. 23.12.2010 रोजी जा.क्र. 6122 नुसार तक्रारदाराचा प्रस्तावातील त्रूटी बद्दल कळवले. तक्रारदरास सामनेवाला क्र. 5 यांचेकडून आलेले पत्र दि. 30.12.2010 जा. क्र. 1641 नुसार त्रूटींची पुर्तता करण्या बाबत कळवले. तक्रारदाराने त्रूटीची पुर्तता पुर्ण केली नाही, असे म्हटले आहे.
सामनेवाला क्र.5 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त झाली असून, त्यांनी आपले म्हणणे दि. 22.07.2011 रोजी टपालाद्वारे प्राप्त झाले असून त्यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे दि. 25.11.2009 रोजी पाठवला असल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र.2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त झाली असून, त्यांनी आपले म्हणणे टपालाद्वारे दि. 20.07.2011 राजी दाखल झाले असून, त्यात तक्रारदाराचा विमा प्रस्ताव अपुर्ण मिळाल्याचे म्हटले आहे. सामनेवाला क्र. 5 यांच्याकडे दि. 05.02.2010 , 05.10.2010 , 03.11.2010 , 06.12.2010 नुसार विमा प्रस्तावातील त्रूटी पुर्ण करण्या बाबत कळवले. तक्रारदाराने विमा प्रस्तावातील त्रूटी पुर्ण न केल्यामुळे, सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे दि. 21.12.2010 रोजी अपुर्ण विमा प्रस्ताव असा शेरा देवुन तक्रारदाराचा विमा प्रस्ताव पाठवण्यात आला. सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 24.03.2011 रोजी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा करारानुसार पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिल्यामुळे आम्ही तुमचा विमा दावा देता येत नाही, असे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 1 व 6 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे लेखी म्हणणे दि. 16.01.2012 रोजी दाखल झाला असून, त्यांनी तक्रारदार हा शेतकरी असल्या बाबत सिध्द करावे. तक्रारदाराचा गुन्हा क्र.116/2009 नुसार दाखल झाला आहे , सदर अपघाता बाबत सिध्द करावे असे म्हटले असून तक्रारदाराने त्याचा विमा प्रस्ताव विमा कराराच्या अटी व नियमानुसार पॉलिसी मुदत संपल्या नंतर 90 दिवसाचे आत दाखल केला नाही. म्हणुन दि. 24;03.2011 रोजी तक्रारदाराचा शेतकरी अपघात विमा न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 1 व 6 यांचे लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्र व ट्राय अग्रीमेंट कॉपी दाखल केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे, व दोघांचाही तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाला क्र. 1 व 6 यांनी दाखल केलेले ट्राय अग्रीमेंट करारपत्राची कॉपी यांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू हा दि. 08.10.2009 रोजी झाला असून, तक्रारदाराने विमा प्रस्ताव दि. 20.03.2010 रोजी सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे दाखल केला आहे. तक्रारदाराच्या पतीच्या मृत्यूची तारीख ही ऑगष्ट 2009 ते ऑगष्ट 2010 या कालावधीच्या विमा करारातील आहे , व करारातील नियम व अटी नुसार तक्रारदाराने विमा प्रस्ताव हा विमा कालावधीमध्ये सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे दाखल केला आहे, त्यामुळे सामनेवाला यांनी दि. 24.03.2011 रोजी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारल्याचे दिलेले पत्र हे नियम व अटीला विरोधाभास करणारे असल्याचे दिसून येत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव न देवुन सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हा शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- त्यावर दि. 20.03.2010 पासुन 9 टक्के व्याज व पुढील 90 दिवस संपल्या नंतर दि. 1 जुलै 2010 पासुन 15 टक्के व्याज शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- मिळण्यास पात्र आहे,
शासन परिपत्रक दि.6 सप्टेंबर 2008 च्या परिपत्रकातील 23 (इ) (2) या पुढील नियमानुसार, विमा प्रस्तावात त्रूटी असल्यास त्रूटी बाबतचे पत्र किंवा दावा नामंजुर असल्यास या बाबतचे पत्र संबंधित अर्जदारास पोच करतील व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना देतील , परिपुर्ण प्रस्ताव आल्या पासुन एक महिन्याच्या आत उचित कार्यवाही न केल्यास तीन महिन्या पर्यंत दावा रक्कमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील. याप्रमाणे तक्रारदार व्याज मिळण्यास पात्र असल्याचे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशता मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 1 व 6 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- दि. 20.03.2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने , तसेच दि. 01.07.2010 पासुन द.सा.द.शे. 15 टक्के व्याजाने, आदेशा प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
3)
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**