Maharashtra

Nagpur

CC/12/522

Rajesh Radhakisan Kesharwani - Complainant(s)

Versus

Chief Manager, Shriram General Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Aakare

04 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/522
 
1. Rajesh Radhakisan Kesharwani
Suryanagar Juna Pardi Naka,
Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. Chief Manager, Shriram General Insurance Co. Ltd.
F-8,FPIP RIICO,Sitapur,Jaypur,Rajasthan
Jaypur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. Aakare, Advocate
For the Opp. Party:
ORDER

तक्रारकर्त्‍या तर्फे अधिवक्‍ता        :     ऍड. उज्‍वल आकरे.

विरुध्‍द पक्षांतर्फे अधिवक्‍ता     :           ऍड. सचिन जैस्‍वाल, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 तर्फे

                              ऍड. रवि. पाल, विरुध्‍द पक्ष क्र.3 तर्फे.

                              विरुध्‍द पक्ष क्र.4 एकतर्फी.                             

 

        (मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

                          -  आ दे श  -

                    (पारित दिनांकः 04/09/2014)

 

  1.       तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे...            

           

            तक्रारकर्त्‍याने MH-31-DS-824 MODEL LPK 2516 TC/38 HYVA CHASSIS NO.3969522LUZ214439 ENGINE NO. 50L62436447 हा दहा चाकी ट्रक राजकुमार बाबूराव सेलोकर , 47 वैशाली नगर नागपूर यांचेकडून विकत घेतला. सदर ट्रक आरटीओ नागपूर यांच्‍याकडे तक्रारकर्त्‍याचे नावाने नोंदला असून एचडीएफसी बॅक लि. नागपूर यांच्‍या नावाने हॉयपोथीकेटेड आहे. सदर ट्रकची पॉलीसी रु.8,00,000/- विमाकृत रकमेसाठी मुळ ट्रकमालकाने वि.प.क्र.2 व्‍दारे वि.प.क्र. 1 कडे काढली होती तिचा क्र.215034/31/12/003799 असा होता. आरटीओ रेकार्डमध्‍ये ट्रकची नोंदणी तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याकडून रु.2,515/- घेवून वि.प.क्र. 1 ने दि. 29.09.2011 रोजी सदर पॉलीसी तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने दि.29.09.2011 ते 23.08.2011 या कालावधीसाठी ट्रॉन्‍सफर केली आहे. त्‍याबाबत एन्‍डार्समेंट शेडयूल दस्‍तावेज यादी सोबत अनुक्रमांक 1 वर तक्रारकर्त्‍याने दाखल केला आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने असलेले ट्रकचे नोंदणी प्रमाणपत्र अ. क्र. 2 वर दाखल केले आहे.

 

2.          तक्रारकर्त्‍याचे वरील वाहन घाटातून रेती आणण्‍यासाठी सिंदेवाही ते मुल रोडवर जात असता दि.06.03.2012 रोजी रात्री वाहन चालक अर्जून दिलचंद चौधरी याने सिंदेवाही, जिल्‍हा चंद्रपूर येथे दसरा चौका जवळ रात्री रस्‍त्‍याच्‍या कडेला लावून कॅबीनमध्‍ये झोपला होता. रात्री 1.00 वा.चे सुमारास एक अनोळखी इसम त्‍याच्‍या जवळ आला आणि साहेब बोलवत आहेत असे सांगून वाहन चालकास उठविले. वाहन चालक उठला आणि त्‍या व्‍यक्तिच्‍या सांगण्‍याप्रमाणे 100 फुट अंतरावर उभ्‍या असलेल्‍या इंडिका कार कडे गेला. कारमधील अनोळखी व्‍यक्‍ती वाहन चालकासोबत बोलत असतांना अन्‍य अनोळखी इसमाने ट्रक चालू करुन पळवून घेवून गेला. ट्रक चालक ट्रक मागे धावत असतांना व आरडाओरड करित असतांना इंडिका कारवाला इसम सुध्‍दा विरुध्‍द दिशेने पळून गेला, त्‍यावेळी ट्रकवर क्लिनर नव्‍हता. घटनेची तक्रार ताबडतोब सिंदेवाही पोलीस स्‍टेशनला देण्‍यांत आली व त्‍यावरुन चोरीचा गुन्‍हा नोंविण्‍यात आला.  पोलीसांनी तपास केला परंतु ट्रक मिळाला नाही. तक्रारकर्त्‍याने चोरीच्‍या घटनेची माहिती वि.प.क्र. 1 व 4 ला ताबडतोब दिली व वि.प.क्र. 1 व 2 च्‍या हेल्‍पलाईनवर चोरीची तक्रार क्र. 87250 वर नोंदविली.

 

3.          त्‍यानंतर  तक्रारकर्त्‍याने सर्व आवश्‍यक दस्‍तावेजासह वि.प. कडे दि. 20.03.2012 रोजी विमा क्‍लेम नं. 10000/31/12/C/066630 आहे. वि.प. 1व 2 यांनी दि. 23.03.2012 चे पत्र पाठवून तक्रारकर्त्‍याचा विमा क्‍लेम नाकारल्‍याचे कळविले आहे.  वि.प.ची ही कृती बेकायदेशीर, अयोग्‍य  व नैसर्गिक न्‍यायाच्‍या विरुध्‍द असून विमा ग्राहकांप्रती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.

 

1) वि.प. 1 व 2 यांनी  तक्रारकर्त्‍यास ट्रकचे विमाकृत मुल्‍य रु. 8,00,000/- इतकी नुकसान भरपाई वाहन चोरीचे दिनांकापासून प्रत्‍यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

2) बेकायदेशीर कारणाने क्‍लेम नाकारल्‍याबद्यल विमा क्‍लेम दाखल तारखेपासून म्‍हणजे दि. 20.03.2012 पासून दररोज रु. 3,000/- प्रमाणे 132 दिवसांची नुकसान भरपाई रु. 3,96,000/- देण्‍याचा वि.प. 1 व 2 विरुध्‍द आदेश व्‍हावा. सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळावे.

 

3) तक्रार दाखल तारखेपासून प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यतच्‍या काळासाठी दररोज रु. 3,000/- प्रमाणे नुकसान भरपाई व त्‍यावर द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याज देण्‍याचा वि.प.1 व 2 विरुध्‍द आदेश व्‍हावा.

 

4)    वि.प.क्र. 3 एचडीएफसी बॅक यांना निर्देश द्यावे कि, त्‍यांनी ट्रक चोरीच्‍या दिवसांपासून तक्रारकर्त्‍याच्‍या कर्जावर व्‍याजाची आकारणी करु नये व कर्जाची रक्‍कम एकमुस्‍त वसुलीसाठी तक्रारकर्त्‍याविरुध्‍द कोणतीही कारवाई करु नये.

 

5) वि.प.क्र. 4 स्‍टेट बॅक ऑफ जयपूर अँड बिकानेर, नागपूर यांना निर्देश द्यावे कि, त्‍यांनी वि.प.क्र. 3 ला मासिक  कर्जफेडीच्‍या हप्‍त्‍याबाबतचे ईसीएस थांबवू नये.

 

6) वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रु. 1,00,000/- द्यावी.

 

7) वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यास नोटीस खर्च रु. 4,500/- आणि तक्रार दाखल करण्‍याचा खर्च रु. 40,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

4.          विरुध्‍द 1 ते 3 यांनी  लेखीउत्‍तर दाखल करुन तक्रारीतील मागणीस   सक्‍त विरोध केला. वि.प.क्र. 4 ला नोटीस बजावणी होवूनही गैरहजर राहिल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यांत आले.

 

5.          वि.प.क्र.1 व 2 ने आपल्‍या लेखी जबाबात वि.प. 1 व 2 यांचेकडून सेवेत कोणताही तृटीपूर्ण व्‍यवहार झाला नसल्‍याने तसेच तक्रारीतील मागणी  आ‍धारहिन व अवास्‍तव असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे नमुद केले आहे.

 

6.    वि.प.क्र. 3 यांनी आपल्‍या लेखी जबाबात म्‍हटले आहे कि, तक्रारीत नमुद ट्रक विकत घेण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडून  करार क्र.19555196 प्रमाणे कर्ज घेतले असून तक्रारकर्त्‍याने कर्ज रकमेचा भरणा केला नाही म्‍हणून त्‍याचे कर्ज खाते एनपीए झाले आहे व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याकडून सदर कर्जाची रक्‍कम एकमुस्‍त वसुल करण्‍यास वि.प.क्र.3 कायदेशीररित्‍या पात्र आहे. वि.प.क्र. 3 शी तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या कर्जव्‍यवहाराचा त्‍याला विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याशी कांही संबंध नाही, आणि त्‍यामुळे वि.प.क्र.3 ला तक्रारकर्त्‍याविरुध्‍द कर्जवसुलीची कारवाई करण्‍यापासून प्रतिबंध करण्‍याचा आदेश मंच पारित करु शकत नाही. तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 3 ला या तक्रारीत विनाकारण गोवले असल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

 

7.          तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍या परस्‍पर विरोधी विधानांवरुन खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...

 

            मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा         होय.

         अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?   वि.प.1 व 2 यांनी

     

2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्‍यांस

         पात्र आहे काय ?                                 अंशतः

 

3) अंतिम आदेश काय ?                          अंतिम आदेशाप्रमाणे

                             

               

- कारणमिमांसा  -

 

8.          मुद्या क्र.1 बाबतः- सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मालकीच्‍या ट्रक क्र. MH 31 DS 0824 चा  विमा विरुध्‍द पक्ष क्र. 1 श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि. कडे काढला असल्‍याबाबत PACKAGE POLICY ENDORSEMENT SCHEDULE  ची प्रत दस्‍तावेज यादी  सोबत दस्‍त अ.क्र.1 वर दाखल केली आहे. सदर पॉलिसीमध्‍ये पॉलीसीधारक म्‍हणून तक्रारकर्ता राजेश पिता राधाकिसन केशरवानी  याचे नांव नमुद आहे. सदर पॉलीसीत ट्रक कर्जासाठी एचडीएफसी बॅकेकडे नजरगहाण (Hypothicated) असल्‍याचे नमुद  आहे.

तक्रारकर्त्‍याचे पुढे म्‍हणणे असे की, त्‍याच्‍या मालकीचा वर नमुद ट्रक घाटातून रेती आणण्‍यासाठी सिंदेवाही ते मुल रोडवर जात असता दि.06.03.2012 रोजी रात्री वाहन चालक अर्जून दिलचंद चौधरी याने सिंदेवाही, जिल्‍हा चंद्रपूर येथे दसरा चौका जवळ रात्री रस्‍त्‍याच्‍या कडेला लावून कॅबीनमध्‍ये झोपला होता. रात्री 1.00 वा.चे सुमारास एक अनोळखी इसम चालका जवळ आला आणि साहेब बोलवत आहेत असे सांगून वाहन चालकास उठविले. वाहन चालक उठला आणि त्‍या व्‍यक्तिच्‍या सांगण्‍याप्रमाणे 100 फुट अंतरावर उभ्‍या असलेल्‍या इंडिका कार कडे गेला व कारमधील अनोळखी व्‍यक्‍ती वाहन चालकासोबत बोलत असतांना अन्‍य अनोळखी इसमाने ट्रक चालू करुन पळवून घेवून गेला. घटनेची तक्रार ताबडतोब सिंदेवाही पोलीस स्‍टेशनला देण्‍यांत आली. तक्रारकर्त्‍याने एफआयआर ची प्रत यादीसोबत अनुक्रमांक 6 वर दाखल केली आहे. त्‍यांत अपराध घडल्‍याची वेळ 06.03.2012 रोजी रात्री 1 वा.चे दरम्‍यान आणि पोलीस स्‍टेशनला माहिती मिळाल्‍याची वेळ 06.03.2012 रोजी स. 10 वा. नमुद असून अज्ञात इसमाविरुध्‍द भा.द.वि.चे कलम 379 प्रमाणे अपराध क्र.16/12 नोंदविला आहे. स्‍थळ दसरा चौका जवळ सिंदेवाही ते मुल रस्‍त्‍यावर दर्शविले आहे. पोलीसांनी तपास केला परंतु ट्रक मिळाला नाही. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे कि, त्‍याने चोरीच्‍या घटनेची माहिती वि.प.क्र. 1 व 4 ला ताबडतोब दिली व वि.प.क्र. 1 व 2 च्‍या हेल्‍पलाईनवर चोरीची तक्रार क्र. 87250 वर नोंदविली. वरील प्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत ट्रकची चोरी झाली, ट्रक चालकाने त्‍याबाबत सिंदेवाही पोलीस स्‍टेशनमध्‍ये ताबडतोब तक्रार दिली आणि पोलीसांनी तपास करुनही ट्रक मिळून आला नाही हे सिध्‍द होते.

 

9.          तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍ता यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक सर्व दस्‍तावेजांसह वि.प.क्र. 1 व 2 कडे दि. 20.03.2012 रोजी विमा क्‍लेम दाखल केला परंतु विमा कंपनीला चोरीची घटना 15 दिवस उशीरा कळविल्‍याचे कारण देवून दि. 23.03.2012 च्‍या पत्राप्रमाणे क्‍लेम नामंजूर केला.  तक्रारकर्त्‍याचा वाजवी विमा क्‍लेम नामंजूर करणे ही विरुध्‍द पक्षाची कृति विमा ग्राहकाप्रती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा  अवलंब आहे.

 

10.        वि.प.चे अधिवक्‍ता श्री सचिन जैस्‍वाल यांनी आपल्‍या युक्तिवादात असे प्रतिपादन केले कि, सदर प्रकरणांत ट़्रक ड्रायव्‍हरने  केबीन मध्‍ये क्लिनर/कंडक्‍टर नसतांना कोणी ति-हाईत इसमाच्‍या सांगण्‍यावरुन ट्रक मध्‍ये चावी ठेवून ट्रक सोडून  गेल्‍याने ट्रक ड्रायव्‍हरचे निष्‍काळजीपणामुळे चोराला ट्रक चोरीची संधी मिळाली. ट्रक चालकाचा ट्रकच्‍या सुरक्षेकडे दुर्लक्ष करुन ट्रक सोडून जाण्‍याचा निष्‍काळजीपणा ही विमा पॉलीसीच्‍या अट व शर्त क्र. 5 चा भंग आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही.

      यावर  तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्तिवाद असा कि, ट्रक चालक केबीनमध्‍ये झोपला असतांना अनोळखी इसमाने साहेब बोलावत आहेत असे सांगितल्‍यामुळे ट्रक चालक ट्रक मधून उतरुन त्‍या अनोळखी इसमाने दाखविलेल्‍या इंडिका कार कडे गेला. ट्रक चालकाची ही कृती सर्वसामान्‍य व्‍यक्ति जशी वागेल तशीच होती, व म्‍हणून याचा दोष ट्रक चालकास देता येत नाही.

 

11.         सर्व परिस्थितीत वाहनामध्‍ये चाबी ठेवून चालकाचे वाहन सोडून जाणे हे विमा दावा नामंजूर करण्‍यासाठी पुरेसे कारण आहे काय या प्रश्‍नावर निर्णय करतांना Shri Sukhavinder Singh - Vs- Cholamandalam MS General Insurance Com. Ltd. and Anr.  Rev.Peti.No. 375 of 2013  (Decided on 13th Aug.2013)  या प्रकरणातील मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांच्‍या न्‍यायनिर्णयातील अभिप्राय विचारात घेणे उपयुक्‍त ठरेल.  मा. राष्ट्रीय  आयोगाने खालील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

“ 10. This condition in our considered view requires insured to take reasonable steps for protection of the insured vehicle from any loss or damage. The leaving of the key in the ignition of the car on all occasion cannot be termed as so serious breach so as to disentitle the insured from seeking claim under the insurance policy. Whether or not there is breach of condition will always depend upon the facts of the case.  The car is said to have been stolen when the driver parked the vehicle at road side and went to ease himself, forgetting to remove the keys from ignition. This lapse on the part of the driver cannot be treated as wilful breach of condition No.5 on the part of the driver. If in the hurry to answer the call of nature  the driver forgot to remove the key from ignition switch he cannot be said to have committed wilful breach violation of the terms of the above condition No.5. In our aforesaid view we are supported by judgment of Punjab & Haryana High Court in the matter of Bajaj Allianz General Insu.Co.Ltd. Vs. Sagar Tour & Travels & Anr.  PLR  Vol.CLX IV – (2011-14)” 

 

12.        आमच्‍या समोरील प्रकरणांत ट्रक ड्रायव्‍हर रस्‍त्‍याच्‍या बाजूला ट्रक उभा ठेवून झोपला असतांना अनोळखी इसमाने साहेब बोलावत आहेत असे सांगितल्‍यामुळे ट्रक चालक ट्रक मधून उतरुन त्‍या अनोळखी इसमाने दाखविलेल्‍या इंडिका कार कडे गेला. ट्रक चालकाची ही कृती अनैसर्गिक आहे असे म्‍हणता येत नाही. म्‍हणून ट्रक चालक किंवा तक्रारकर्त्‍याकडून पॉलीसीची अट क्र. 5 चा भंग झाला व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍याची वि.प.ची कृती समर्थनिय ठरत नाही.

 

13.         वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांचा त्‍यांचा पुढे युक्तिवाद असा कि, ट्रक चोरीची घटना दि.06.03.2012 रोजी रात्री 1 वा. घडली त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या ट्रक चालकाने सदर घटनेचा रिपोर्ट पो.स्‍टे. सिंदेवाही येथे त्‍याच दिवशी सकाळी 10.00 वा. दिला आहे, मात्र वि.प. विमा कंपनीला ट्रक चोरीच्‍या घटनेची माहिती त्‍वरीत न देता ती क्‍लेम दाखल केला तेंव्‍हा पहिल्‍यांदा दि. 20.03.2012 रोजी  15  दिवसानंतर दिली आहे. ट्रक चोरीची माहिती विमा कंपनीला त्‍वरीत न देणे हा पॉलीसीच्‍या अट क्र. 1 चा भंग केला आहे व म्‍हणून तक्रारकर्ता विमा क्‍लेम मिळण्‍यास अपात्र आहे. सदर अट खालील प्रमाणे आहे.

 

      “1.Notice shall be given in writting to the  Company immediately upon the occurrence of any accidental loss or damage and in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the Company shall require. Every letter claim writ summons

and/or process or copy thereof shall be forwarded to the Company immediately on receipt by insured.Notice shall also be given in writing to the Company immediately the insured shall have knowledge of any impending prosecution. Inquest or Fatal Inquiry in respect of any occurance which may give rise to a claim under  this policy. In case of theft or criminal act which may be the subject of a claim under this policy the insured shall give immediate notice to the police and co-operate with the company in securing the conviction of the offender.”

 

 

14.         त्‍यांच्‍या युक्तिवादाच्‍या पुष्‍टयर्थ वि.प.चे अधिवक्‍ता यांनी खालील न्‍यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

 

1) National Consumer Disputes Redressal Commission , New Delhi.

   F.A.No. 321 Of 2005

   New India Assurance Com. Ltd. Vs. Trilochan Jane

   (Delivered on 9.12.2009)

 

सदर प्रकरणांत मा. राष्‍ट्रीय आयोगाने खालील प्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“In the case of theft where no bodily injury has been caused to the insured, it is incumbent upon the respondent to inform the Police about the theftimmediately, say within 14 hours, otherwise, valuable time would be lost in tracing the vahicle, Similarly, the insurer should also be informed within a day or two so that the insurer can  verify as to whether any theft had taken place and also to take immediate steps to get the vehicle traced. The insurer can coordinate and cooperate with the Police to trace the car. Delay in reporting to the insurer abour the theft of the car for 9 days, vould be violation of condition of the Policy as it deprives the insures of a valuable right to investigate as to the commission of the theft and to trace/help in tracing the vehicle.”

 

 

2) Supreme Court of India

   Civil Appeal No. 1375 of 2003

M/s Suraj Mal Ram Niwas Oil Mills (P) Ltd. Vs. United India Insu. Co.Ltd. & Anr.

 

सदर प्रकरणांत मा. राष्‍ट्रीय आयोगाने खालील प्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

 

“Thus it needs little emphasis that in construing the terms of a constract of insurance, the words used therein must be given paramount importance, and it is not open for tyhe Court to add]delete or substitute any words.It is also well settled that since uipon issuance of an insurance policy, the insurer undertakes to indemnify the loss suffered by the insured on account of risks covered by the policy, its terms have to be strictly construed to determine the extend of liability of the insurer. Therefore, the endeavour of the court should always to be interpret the words in which the contract is expressed by the parties.”

 

15.         याउलट तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍त्‍याने असा युक्तिवाद केला कि, ट्रक चोरीच्‍या घटनेचा रिपोर्ट त्‍याच दिवशी सिंदेवाही पोलीस स्‍टेशनला दिल्‍यावर त्‍याबाबतची माहिती वि.प. क्र. .1 व 2 यांना त्‍यांच्‍या  हेल्‍पलाईनवर तक्रार क्रमांक 87250 नोंदवून दिली आहे आणि त्‍यानंतर आवश्‍यक दस्‍तावेजांसह दि. 20.03.2012 रोजी क्‍लेम फॉर्म सादर केला त्‍यावरुन क्‍लेम नं. 10000/31/12/C/066630  नोंदविण्‍यांत आला आहे. सदरची बाब तक्रारकर्त्‍याने वि.प.ला दिलेल्‍या दि. 11.06.2012 च्‍या नोटीसमध्‍ये तसेच तक्रारीत शपथेवर सांगितली आहे. वि.प.ने आपल्‍या लेखी जबाबात देखिल तक्रारकर्त्‍याने हेल्‍पलाईनवर तक्रार क्रमांक 87250 नोंदविल्‍याचे कबूल केले आहे, मात्र हेतुपुरस्‍सर ती दि. 20.03.2012 रोजी मिळाल्‍याचे नमुद केले आहे. क्‍लेम नामंजूरीच्‍या दिनांक 23.03.2012 च्‍या पत्रात देखिल हेल्‍पलाईनवरील तक्रार कधी नोंदविण्‍यांत आली हे हेतुपुरस्‍सर नमुद केले नाही. सदर पत्रातील उशीराच्‍या क्‍लेमचा उल्‍लेख तक्रारकर्त्‍याने दि. 20.03.2012 रोजी लेखी स्‍वरुपात दाखल केलेल्‍या क्‍लेमबाबत आहे. हेल्‍पलाईनवर दाखल केलेल्‍या तक्रारीची लेखी नोंद तक्रारकर्त्‍याकडे उपलब्‍ध राहू शकत नाही व म्‍हणून तक्रारकर्त्‍याकडून ती दाखल करणे अपेक्षित नाही. तक्रारकर्त्‍याने घटनेची तक्रार त्‍वरीत पोलीस स्‍टेशनला व वि.प. 1 व 2 यांना दिली असल्‍यामुळे पॉलीसीतील अट क्र. 1 ची पूर्ण पुर्तता केली आहे, परंतु तक्रारकर्त्‍याचा वाजवी क्‍लेम बुडविण्‍यासाठी वि.प. विमा कंपनीने खोटा बचाव घेतला आहे.

 

16.         सदर प्रकरणांतील उपलब्‍ध दस्‍तावेजांवरुन तक्रारकर्त्‍याने दि. 06.03.2012 रोजी 1.00 वाजताचे सुमारास झालेल्‍या ट्रक चोरीची तक्रार दिवस उजाडताच सकाळी 10.00 वाजता सिंदेवाही पोलीस स्‍टेशनला दिली आणि त्‍यावरुन पोलीसांनी प्रथम खबरी नोंदून ट्रकचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही हे निर्विवाद सिध्‍द होते. ज्‍या तक्रारकर्त्‍याने ट्रक चोरीची तक्रार सिंदेवाही पोलीस स्‍टेशनला ताबडतोब दिली त्‍याचा वि.प. विमा कंपनीला सदर चोरीची माहिती त्‍वरीत न देण्‍याचा कोणताही हेतू असू शकत नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीच्‍या हेल्‍पलाईनवर ट्रक चोरीबाबत माहिती ताबडतोब कळविली व त्‍याप्रमाणे तक्रार क्र.87250 वर नोंदण्‍यांत आली हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोटे ठरविण्‍याचे कांही कारण दिसत नाही. हेल्‍पलाईनवर अशी तक्रार नोंदविल्‍यानंतर दि. 20.03.2012 रोजी वि.प.विमा कंपनीकडे आवश्‍यक दस्‍तावेजांसह लिखित क्‍लेम सादर केल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे. तक्रारकर्त्‍याचा लिखित क्‍लेम क्र.10000/31/12/C/033330 या क्रमांकावर नोंदण्‍यांत आला आणि तो घटनेनंतर 15 दिवस उशीराने सादर केला म्‍हणून दि. 23 मार्च 2012 च्‍या पत्राप्रमाणे नामंजूर करण्‍यांत आला. सदरच्‍या पत्रात तक्रारकत्‍याने हेल्‍पलाईनवर नोंदलेल्‍या तक्रार क्र. 87250 चा कुठेही उल्‍लेख नाही किंवा हेल्‍पलाईनवरील तक्रार दिनांक 20.03.2012 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे देखिल सदर पत्रात वि.प.ने नमुद केलेले नाही. यावरुन चोरीच्‍या घटनेनंतर ताबडतोब त्‍याबाबतची तक्रार विमा कंपनीकडे नोंदण्‍यांत आली आणि त्‍यानंतर एफआयआर व अन्‍य कागदपत्रांसह लेखी क्‍लेम  वि.प.कडे  सादर करण्‍यांत आला या तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याला पुष्‍टी मिळते. त्‍यामुळे ट्रक चोरीच्‍या घटनेची माहिती तक्रारकर्त्‍याने वेळीच न देता ती पहिल्‍यांदाच 20.03.2012 रोजी लिखित क्‍लेम सादर केला तेंव्‍हाच दिली आणि पॉलीसीच्‍या अट क्र. 1 चा भंग केला म्‍हणून वि.प.चा ट्रक चोरीचा विमा क्‍लेम नाकारण्‍याची वि.प.ची कृती कायदेशिर व नियमाला धरुन असल्‍याने सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे हा बचाव स्विकारणे अशक्‍य आहे.

 

17.         वरील विवेचनावरुन मंच या निष्‍कर्षाप्रत आले आहे कि, दिनांक 06.03.2012 रोजी झालेल्‍या ट्रक चोरीच्‍या घटनेची तक्रार तक्रारकर्त्‍याने त्‍वरीत पोलीस स्‍टेशनला दिली असून वि.प. विमा कंपनीच्‍या हेल्‍पलाईनवर देखिल ताबडतोब तक्रार नोंदविली आ‍हे आणि त्‍यानंतर कागदपत्रांसह दि. 20.03.2012 रोजी रितसर लेखी स्‍वरुपात विमा क्‍लेम दाखल केला असल्‍याने विमा अट क्र. 1 चा भंग झालेला नाही. विमा शर्तीचा कोणताही भंग झाला नसतांना लेखी स्‍वरुपात विमा क्‍लेम 15 दिवसांनी दाखल केल्‍याचे कारण देवून दि. 23.03.2012 च्‍या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्‍याचा वाजवी विमा क्‍लेम नाकारण्‍याची वि.प.क्र.1 व 2 ची कृती निश्‍चीतच विमा ग्राहकाप्रती सेवेतील न्‍युनता आहे.

 

18.         वि.प. क्र. 1 व 2 यांच्‍या वतीने युक्तिवाद करतांना दाखल केलेल्‍या न्‍यायनिर्णयात तक्रारकर्त्‍याने पोलीस स्‍टेशनला विलंबाने तक्रार दिली होती तसेच विमा कंपनीला देखिल ब-याच उशीरा वाहन चोरीची माहिती दिली होती. मात्र आमच्‍या समोरील प्रकरणांत तक्रारकर्त्‍याने ट्रक चोरीची तक्रार पोलीस स्‍टेशनला त्‍याच दिवशी अविलंब दिली असून विमा कंपनीकडे देखिल हेल्‍पलाईनवर तक्रार क्र. 87250 नोंदविली आहे. त्‍यामुळे सदर न्‍यायनिर्णयातील निर्णय मुलाधार (Ratio)  प्रस्‍तुत प्रकरणांत लागू पडत नाही. म्‍हणून मुद्या क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

19.         मुद्दा क्र.2 बाबतः- सदरच्‍या प्रकरणात चोरी गेलेल्‍या ट्रकचे विमाकृत मुल्‍य रु. 8,00,000/- विमा पॉलीसीत नमुद असून त्‍याबाबत उभय पक्षांत वाद नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता चोरी गेलेल्‍या ट्रकबद्यल नुकसान भरपाई रु. 8,00,500/-  व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याज आणि शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि या तक्रारीचा खर्च रु.5,000/- वि.प.क्र. 1 व 2 कडून मिळण्‍यास पात्र आहे. वि.प.क्र. 3 व 4 यांचा तक्रारकर्त्‍याचा विमाक्‍लेम नाकारण्‍याशी कांहीही संबंध नाही, तसेच वि.प.क्र.3 व 4 यांचेकडून सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार घडला नसल्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍यांच्याविरुध्‍द मागणी केलेली दाद मिळण्‍यास पात्र नाही. म्‍हणून वि.प. 3 व 4 विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून  मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

 

      वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

           

                              आदेश -

 

            तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या खालिल प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

 

1.    विरुध्‍द पक्ष 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास त्‍याच्‍या चोरी गेलेला ट्रक क्र.

      MH 31 DS 0824  च्‍या  विमाकृत मुल्‍या इतकी नुकसान भरपाई रु.8,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्‍याजासह अदा करावी.

2.    वरील रकमेशिवाय विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावे.

3.    आदेशाची पूर्तता आदेशाच्‍या तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावी.

4.    वि.प.क्र. 3 व 4 यांचे विरुध्‍द तक्रार खारीज.

5.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

6.    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.