ग्राहक तक्रार अर्ज क्र.252/2011 ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.18/11/2011 अंतीम आदेश दि.27/02/2012 नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक सौ.वंदना संजय शिंदे, तक्रारदार रा.एन.32/अरी-1/9/1, (अँड.ए.आर.आंधळे) राणाप्रताप चौक, सिडको, नाशिक. विरुध्द 1.चिफ मॅनेजर, सामनेवाला कोटक महिंद्रा ओल्ड म्युचल लाईफ इन्शुरन्स कं.लि. (अँड.एम.एम.धोपावकर) पत्ताः गोदरेज कॉलीझम,9 मजला, , एवरर्ड नगर, सायन(इस्ट) मुंबई-22. 2. मॅनेजर, कोटक महिंद्रा ओल्ड म्युचल लाईफ इन्शुरन्स कं.लि. नाशिक शाखा, पत्ता शरणपूर रोड, राजीव गांधी भवन शेजारी, नाशिक. (मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून पॉलिसी नं.0524041 पोटी भरलेली रक्कम रु.1,00,000/- परत मिळावेत, पॉलिसीचे सर्व बेनिफिटस मिळावेत मानसिक, आर्थीक त्रासाबाबत रु.4,00,000/- व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला मंचाचे नोटीस लागून हजर झाले. परंतु त्यांनी मुदतीत म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द दि.01/02/2012 व दि.18/02/2012 रोजी म्हणणे दाखल नाही असे आदेश करण्यात आले. अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः तक्रार क्र.252/2011 मुद्देः 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे चालण्यास पात्र आहे काय? -- नाही. 2. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांनी पान क्र.22 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. या कामी अर्जदार यांनी सामनेवालाकडून पॉलिसीपोटी भरलेली रक्कम रु.1,00,000/- परत मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रार अर्ज कलम 5 इ मध्ये अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द “अर्जदाराच्या पैशाचा अपहार केलेला आहे. सदरचे सामनेवाला यांचे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे असून अर्जदारांना फसवणारे व अर्जदारावर फ्रॉड करणारे असे आहे.” असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच अर्जदार यांचे वरील कथनाचा विचार होता, अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द फसवणूक व फ्रॉड याबाबत दाद मागितलेली आहे हे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांचे तक्रार अर्जातील व विनंती कलमातील संपुर्ण कथनाचा विचार करता, अर्जदार यांनी सामनेवाला विरुध्द विमापॉलिसी मधील सेवेतील कमतरतेबाबत कोठेही दाद मागितलेली नाही हे स्पष्ट होत आहे. तक्रार अर्जामध्ये अर्जदार यांनी प्रिमीयमचा चेक सामनेवाला नं.2 यांचे एजंट श्री.संजय कांबळे यांचेकडे दिलेला होता. परंतु तो चेक श्री. कांबळे यांनी अर्जदार यांची फसवणूक करुन दुस-या व्यक्तीच्या नावे भरलेला आहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच श्री.संजय कांबळे यांनी अर्जदार यांचे पैशाचे बाबतीत व चेकचे बाबतीत जी अफरातफर केलेली आहे त्याबाबत अर्जदार हे दाद मागत आहेत. परंतु अर्जदार यानी श्री.संजय कांबळे यांना आवश्यक पक्षकार म्हणून या कामी सामील केलेले नाही. तसेच विमा कंपनीचे बाबतीत अर्जदार यांनी प्रिमीयमचा चेक विमा कंपनीचे नावे काढून विमा कंपनीस देणे गरजेचे होते. विमा कंपनीचे बाबत एजंट ही संज्ञाच अस्तित्वात नसते. अर्जदार यांनी श्री.संजय कांबळे यांचेकडे प्रिमीयमचा चेक देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. तक्रार अर्जातीत संपुर्ण कथनाचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून प्रिमीयमची रक्कम परत मागत आहेत. सेवेतील कमतरतेबाबत कोणतीही दाद अर्जदार यांनी मागितलेली नाही. अर्जदार हे या तक्रार अर्जाचे कामी दिवाणी स्वरुपाची पैसे परत मागण्याची मागणी करत आहेत. तक्रार क्र.252/2011 वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे चालण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे. जरुर तर अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द योग्य त्या दिवाणी कोर्टात दाद मागावी असेही या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. 1) 2008 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 338. जयसिंग विरुध्द एल.आय.सी. 2) 1(2011) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 55. दयाराम भिका अहिरे नाशिक विरुध्द कोटक महिंद्र बँक लि. 3) 2011 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 25 एल.आय.सी. विरुध्द शोभा राणी शहा अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, वर उल्लेख व आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. (आर.एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी) अध्यक्ष सदस्या ठिकाणः- नाशिक. दिनांकः-27/02/2012 |