अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/366/08
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 05/02/2007
तक्रार निकाल दिनांक : 09/11/2011
श्री. आनंद आग्नू सूर्यवंशी, ..)
रा. बी- 17, तिसरा मजला, ..)
चंद्राई कॉम्प्लेक्स, बी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्या., ..)
स.नं. 34/5/1 ते 6, भारती वि़द्दापीठ रोड, ..)
आंबेगाव बुद्रुक, पुणे – 411 046. ..).. तक्रारदार
विरुध्द
मा. मुख्य व्यवस्थापक, ..)
मुख्य शाखा :- ..)
आय्.सी.आय्.सी.आय्. बँक ..)
क्रेडिट कार्ड विभाग, पोस्ट बॉक्स नं.20, ..)
बंजारा हिल्स पोस्ट ऑफीस, ..)
हैद्राबाद पिन नं. 500 034. ..)
पुणे शाखा :- ..)
आय्.सी.आय्.सी.आय्. बँक ..)
दुसरा मजला, क्रेडीट कार्ड डिपार्टमेंट, ..)
सुमा हाऊस, 870/1, भांडारकर रोड, पुणे – 411 005. ..)... जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2007 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/23/2007 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/366/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांना नोटीस काढली असता तक्रारदारांची नोटीस “N/C” या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजीअभावी काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –09/11/2011