जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार अर्ज क्रमांक - 475/2015
तक्रार अर्ज दाखल तारीखः- 08/10/2015
तक्रार अर्ज निकाल तारीखः- 04/04/2016
श्री.राजेश शंकरलाल उपाध्याय, .....तक्रारदार
उ वय 41 वर्षे धंदा वकीली,
रा. कैलाश प्रिंटीग प्रेस,
शिवाजीनगर,भुसावळ जि.जळगांव.
विरुध्द
1. मुख्य कार्यकारी अधिकारी एवंम संचालक एवम कंपनी ... .सामनेवाला.
डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु,इएमआय बाजार कॉम/एचडीएफसी,
(सीआयएन-यू 52100 टीएन 20011 पीटीसी 082893)
रा.आसान रिटेल प्रा.लि.दरेन ट्रीट प्लेस, 2 बी नविन नं.7,
एमसी निकोलस रोड,चेडपेट चेन्नई 600031.
नोंदणीकृत पत्ता – आसान रिटेल प्रा.लि.
अल्फा रेजेंन्सी 165, एल्डमस रोड,अलवर पेठ,चेन्नई -600018.
कोरम
श्री.व्हि.आर.लोंढे. अध्यक्ष.
श्रीमती.पुनम नि. मलिक. सदस्या.
तक्रारदार तर्फे अड.राजेश एस उपाध्याय
सामनेवाला तर्फे कोणी नाही.
नि का ल प त्र
द्वारा – मा.श्रीमती पुनम नि मलिक,सदस्या
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मोबाइल न देवून सेवेत त्रुटी केली नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीला भेट देण्यासाठी मोबाईल खरेदी करण्याचे ठरवले सामनेवालेचे जाहीरातीने आकर्षीत होऊन भुसावळ येथील सामनेवाला कंपनीला मोबाईल खरेदीसाठी दि.18/05/2015 रोजी मोबाईल मायक्रोमॅक्स कॅनव्हस कोड एम 1273 किंमत रु.6,978/- ऑन लाईन बुकींग केलेले होते. तक्रारदार यांनी रक्कम रु.6,978/- द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे रक्कम भरायची होती. मोबाईलची खरी किंमत रु.6,740/- अशी होती. सदरील रक्कम तक्रारदाराने एच.डी.एफ.सी.बॅकेने दि.18/05/2015 रोजी दिलेले आहे. सदरील मोबाईल बुकिंग झालेनंतर मोबाईल 7 ते 10 दिवसांत मिळेल असे सामनेवाले यांनी तक्रारदाराला सांगीतले. मुदत संपल्यानंतर मोबाइल दिलेल्या पत्यावर मिळाले नाही. तक्रारदाराने कंपनीला संपर्क केला तेंव्हा कंपनी तक्रारदाराला सांगीतले की, मोबाईल विक्रेता उपलब्ध नसल्याने तक्रारदार यांचा मोबाईल बुकिंग आदेश एकतर्फी रद्य करणेत आला आहे. मोबाईलची किंमत तक्रारदारांच्या खात्यात 15 दिवसांत करणेत येईल यानंतर एच.डी.एफ.सी बॅकेने तक्रारदाराला मोबाईल बुकींगचे बिल पाठविले सदरील रक्कम भरणेसाठी दि.22/06/205 पर्यंत मुदत दिली. सदरील रक्कम मासिक हप्ते भरण्याची सुवीधा दिली. दि.18/05/2015 पासुन प्रतिक्षा काळ संपलेनंतर सामनेवाले यांनी सांगीतल्याप्रमाणे तक्रारदारांना मोबाईल मिळाला नाही. तक्रारदार यांनी वरील रक्कमेचा बिलासाठी दि.21/06/2015 रोजी रक्कम रु.1,200/- एच.डी.एफ.सी.एटीमद्वारे एच.डी.एफ.सी.बँकेच्या खात्यात वर्ग केली. पण सामनेवाला कंपनी यांचे सदरील करार रद्य करण्याचे एकतर्फी कृत्य हे बेकायेशिर नैसर्गीक न्यायतत्वाचे विरुध्द आहे. सामनेवाले यांनी रक्कम मिळाल्यावरही वस्तु न पाठवीणे करार एकतर्फी रद्य करुन सेवेत कसुर केलेला आहे. म्हणुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मोबाईलची किंमत रु.6,970/- व्याजासह परत देणेचे आदेश व्हावेत. तसेच नुकसान भरपाई पोटी व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,00,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी मंचासमोर विनंती केलेली आहे.
सामनेवाला यांना मंचाची नोटीस मिळाली त्यांनी हजर होऊन आपला लेखी खुलासा दाखल केला नाही सबब त्यांचे विरुध्द एकतर्फी आदेश पारीत करण्यात आले.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेला पुरावा शपथपत्र कागदपत्र तसेच सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र याचे अवलोकन केले असता न्याय निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर.
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसूर केला आहे काय?
त्रुटी केली आहे काय ? होय. 2. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे व शपथपत्र, यांचे अवलोकन केले तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकले असता, सामनेवाला कंपनी ही ऑनलाईन ग्राहक उपयोगी वस्तु विक्रीचा व्यवसाय करीत असून सदरील कंपनी ही ऑनलाईनद्वारे अनेक ग्राहकाना वस्तु विक्री करीत आहे. तक्रारदाराने आपली पत्नीला लग्नाचे वाढ दिवसाला भेट देण्यासाठी मोबाईलची दि.18/05/2015 रोजी बुकींग केली. सदर मोबाईलची किंमत रु.6,978/- होती. सदरील ऑडरचे बुकींग नं.510065957 असा होता. तक्रारदाराने सदरची रक्कम एचडीएफसीचे क्रेडीट कार्डमार्फत सामनेवाले यांना दिली व सामनेवाले यांनी सदरची रक्कम स्विकारली. सदरचे मोबाईल तक्रारदाराला साते ते दहा दिवसात मिळणार होते. परंतु सदरची मुदत संपुन गेल्यावरही तक्रारदाराला मोबाईल मिळालेले नाही. सामनेवाले यांना याबद्यल विचारणा केली असता वरील मोबाईलचा विक्रेता उपलब्ध नसल्याने तक्रारदाराचा मोबाईलचे बुकिंग एकतर्फी रद्य करण्यात आले असे सामनेवालेकडुन सांगण्यात आले व सदरील मोबाईलची रक्कम तक्रारदाराचे खात्यात जमा करण्यात येईल असे तक्रारदाराला सांगण्यात आले. त्यानुसार दि.26/06/2015 रोजी तक्रारदार यांच्या खात्यात रक्कम रु.6,740/- सामनेवाले यांनी वर्ग केली. सामनेवाले यांनी सेवेत कसुर केल्यामुळे तक्रारदार आपली पत्नीला वेळेवर भेट वस्तु देऊ शकले नाही व पती-पत्नीचे भावनीक संबंधाना ठेस लागली असे मंचाचे होत आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी मोबाईल बुकिंग केल्यावरही मोबाईल पाठवलेले नाही व करार एकतर्फी रद्य करुन सेवेत कसुर केला या मतास मंच आले आहे. म्हणुन तक्रारदार सामनेवालाकडुन शारिरीक व मानसिक त्रासाबद्यल रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चा पोटी रक्कम रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसांच्या आंत अदा करावे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसांच्या आंत अदा करावे. वरील रक्कम मुदत अदा न केल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन तक्रारदार द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र राहील.
3. तक्रारदार व सामनेवाला यांना निकालाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
दि.04/04/2016
जळगांव. (श्रीमती.पुनम नि. मलिक) (श्री.विनायक आर.लोंढे)
सदस्या अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.