तक्रार दाखल दिनांक - 10/02/2009 गैरअर्जदार हजर तारीख – 16/03/2009 निकाल तारीख - 11/08/2010 कालावधी:- 01 वर्ष, 04 महिने, 25दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद. तक्रार क्रमांक - 104/2009 कपिल पि.परमेश्वर भार्गव, रा.14, विराज रेसिडेन्सी, युथ होस्टेल लेन, स्टेशन रोड, औरंगाबाद. अर्जदार विरुध्द 01. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, व्दारा मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग सारथी, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 93 02. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद, स्टेशन रोड, औरंगाबाद, व्दारा विभागीय अधिकारी. गैरअर्जदार. ------------------------------------------------------------------------------------अर्जदारांतर्फे - अड.एस.टी.अग्रवाल गैरअर्जदारांतर्फे - अड.एस.एस.दंडे ----------------------------------------------------------------------------------- समक्षः- 1) श्रीमती अंजली देशमुख अध्यक्षा 2) श्रीमती रेखा कापडिया सदस्या. ------------------------------------------------------------------------------------ निकाल (घोषित दि.11.08.2010 व्दारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्षा) तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे. तक्रारदार हे मे.कामा प्रिंट अण्ड पॅक प्रा.लि. चे डायरेक्टर आहेत. गैरअर्जदारांनी एका पब्लीक नोटीस व्दारे बंद निविदा, औद्योगिक, व्यापारी, ...2... तक्रार क्र.104-09 घरगूती प्लॉट साठी मागविल्या होत्या. दि.05.05.2006 च्या 01.00 वाजेपर्यंत बंद निविदा गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे पाठविण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार तक्रारदारांनी कोटेशन भरले होते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी या कोटेशनचे कमीत कमी किंमत (minimum upset price) निश्चित केली होती. ही किंमत औद्योगिक प्लॉट क्र.एल-11/5 साठी रु.330/- चौ.मी. ज्याचे क्षेञफळ 4308 चौ.मी असे होते. त्यानुसार तक्रारदारांनी 20% अपसेट किंमत गैरअर्जदार क्र. 2 यांच्या ऑफीस मध्ये भरली. कोटेशन नोटीस मध्ये असे स्पष्टपणे लिहिले होते की, ज्याचे बिडिंग उच्च किंमतीचे आहे त्यांना हे प्लॉट मिळतील. ज्यांचे कोटेशन अपसेट किंमतीपेक्षा कमी असतील ते नाकारल्या जातील. (All other conditions being equal those bidding highest price would get preference. Quotations lower than the upset price would be rejected.) तसेच अट व शर्त क्र.12 नुसार प्लॉटच्या सर्वाधिक किंमतीस प्राधान्य देण्यात येईल. आणि जे कोटेशन अपसेट किंमतीपेक्षा कमी किंमतीचे असतील ते नाकारल्या जातील. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, त्या अटी शर्ती मध्ये असे कोठेही नमुद केलेले नव्हते की, अपसेट किंमती एवढयाच किंमतीचे कोटेशन असतील तर त्यास प्राधान्य दिले जाणार नाही. अथवा नाकारले जातील. त्या कोटेशन मध्ये तक्रारदाराने रु.330/- चौ.मी. ही अपसेट किंमत लिहिली होती. व तक्रारदारांनी त्याची 20% रक्कम म्हणजे रु.2,85,120/- डिमांड ड्राफ्ट ने दि.29.04.2008 रोजी गैरअर्जदारांकडे भरली. दि.25.05.2006 रोजी सकाळी 20.30 वा. निविदा उघडल्या गेल्या. निविदा उघडण्याच्या दिवशी तक्रारदार हजर होते. तक्रारदारांनी एकटयानेच या प्लॉट साठी निविदा भरलेली होती. त्यावेळेस गैरअर्जदारांनी तक्रारदारांचे नाव प्लॉट नं.एल-11/5 एम.आय.डी.सी.वाळूज, औरंगाबाद यासाठी यशस्वी बिडर म्हणून पुकारले होते. त्यानंतर तक्रारदार गैरअर्जदारांकडून अलौटमेंट पञाची वाट पाहत होते. परंतू दि.04.02.3006 रोजीच्या पञाने गैरअर्जदारांनी तक्रारदारास असे कळविले की, निविदेमध्ये त्यांनी त्यांचे बिडींग किंमत अपसेट किंमतीएवढीच दिलेली असल्यामुळे ती स्विकारली गेली नाही. म्हणून तक्रारदारांचा डी.डी. रक्कम रु.2,85,120/- आणि रु.550/- परत केले. तक्रारदारांनी बिडिंग किंमत रु.330/- चौ.मी. प्रमाणे लिहिली होती. ती अपसेट किंमतीपेक्षा कमी नव्हती. तरीसुध्दा गैरअर्जदारांनी त्यांची निविदा नामंजूर केली. गैरअर्जदारांनी त्यांचे नाव यशस्वी बिडर म्हणून पुकारले गेल्यानंतरही तक्रारदारांची निविदा त्यांनी नामंजूर केली ही त्यांच्या सेवेतील ञूटी ठरते. यासाठी तक्रारदारांनी मा.उच्च न्यायालयात रीट पिटिशन क्र.6548/06 दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी गैरअर्जदारांचे हे नामंजूरीचे पञ रद्द करावे अशी मागणी केलेली आहे. ..3... तक्रार क्र.104-0 व सदरील प्लॉट त्यांना देण्यात यावा अशीही मागणी केली आहे. सदरील रिट पिटिशन मध्ये मा.उच्च न्यायालयाने नोटीस काढलेल्या होत्या. परंतू तक्रारदारांनी नंतर पुढे कोणताही अर्ज दिला नाही कारण गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारदारास असे आश्वासन दिले की, गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे त्यांचा क्लेम पुन्हा एकदा विचारासाठी ठेवला जाईल. म्हणून तक्रारदारांनी हे रिट पिटिशन काढून घेतले. रिट पिटिशन प्रलंबित असतांना तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे मुंबई येथील कार्यालयात तक्रारदारांचे म्हणणे मांडावे अशी मागणी केली. गैरअर्जदारांनी डिसेंबर 2008 मध्ये एम.आय.डी.सी.वाळूज येथील औद्योगिक प्लॉट साठी, ज्यामध्ये प्लॉट क्र.एल-11/5 चा समावेश होता, टेंडर मागविले होते. त्यातील अटी शर्ती मध्ये गैरअर्जदारांनी स्पष्टपणे असे लिहिलेले आहे की, अपसेट किंमतीपेक्षा कमी किंमत अथवा अपसेट किंमतीएवढयाच किंमतीची जर निविदा भरलेली असेल तर त्या नामंजूर करण्यात येतील. याचाच अर्थ असा होतो की मागील निविदेमधील अटी शर्ती मध्ये गैरअर्जदारांनी सुधारणा केल्या होत्या. त्यामुळेच तक्रारदारांची निविदा नामंजूर करण्याचा त्यांना कोणतेही कारण दिसून येत नाही. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदारांनी एल-11/5 हा प्लॉट अजूनही मोकळा असल्यामुळे, आणि तो त्यांना पूर्वीच देण्यात आलेला असल्यामुळे, त्यांना देण्यात यावा. गैरअर्जदारांनी दि.12.07.2007 रोजी तक्रारदारास पञ पाठविले. त्यामध्ये तक्रारदारांचा प्रस्ताव फेर आदेशासाठी मुख्यालयास पुनश्च सादर करण्यात आल्याचे नमुद केले होते. त्यामुळे सदरची तक्रार मुदतीमध्येच दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी शपथपञ व कागदपञे दाखल केली आहेत. गैरअर्जदारांनी त्यांचा लेखी जवाब मंचात दाखल केला. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्येच निविदेमध्ये अपसेट किंमतीएवढीच किंमत लिहिली होती हे मान्य केले आहे. त्यामुळे सदरील तक्रार ही ग्राहक वाद होवू शकत नाही. तक्रारदारांनी हा प्लॉट औद्योगीक वापरासाठी घेतलेला होता. त्यामुळे सुध्दा ते ग्राहक होवू शकत नाहीत. लिलाव नोटीसच्या अटी व शर्ती नुसार गैरअर्जदारास टेंडर फॉर्म स्विकारायचा किंवा नामंजूर करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार त्यांनी तो नामंजूर केलेला आहे. गैरअर्जदारांनी केवळ तक्रारदारांचा टेंडर फॉर्म नामंजूर केला. तो सुध्दा टेडर नोटीसच्या अटी व शर्तीनुसार केलेला असल्यामुळे यामध्ये गैरअर्जदारांची कोणतीही सेवेतील ञूटी नाही असे गैरअर्जदार म्हणतात. टेंडर नोटीसच्या अटी व शर्तीप्रमाणे अपसेट किंमतीपेक्षा कमी किंमत असलेल्या निविदा नामंजूर केल्या जातील असे लिहिलेले असल्यामुळे तक्रारदारांचा टेंडर फॉर्म नामंजूर ...4... तक्रार क्र.104-09 केला गेला. कुणीही कोटेशन भरतांना अपसेट किंमतीपेक्षा जास्तीची किंमत त्यामध्ये नमुद करतात. परंतू तक्रारदारांनी तसे केलेले नाही. त्यामध्ये अपसेट किंमती एवढीच किंमत लिहू नये असे लिहिलेले नाही. त्याचा गैरफायदा तक्रारदारांनी घेतला आहे. सर्वाधिक किंमतीस प्राधान्य देण्यात येईल असे लिहिलेले होते. परंतू सदरील लिलावामध्ये तक्रारदाराशिवाय कुणीही टेंडर भरलेले नव्हते. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारदारांच्या या निविदेबाबत फेर विचार करण्यात येत आहे असे कधीही सांगितले नाही. या संदर्भातील रिट पिटीशन मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे एकाच विषयाची दोन ठिकाणी प्रकरणे चालू शकत नाहीत. सदरील प्लॉट चा 2008 च्या टेंडर मध्ये समावेश नव्हता. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपञांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्यासमोरील रीट पिटीशन क्रमांक 6548/2006 मधील आदेश दाखल केला. त्यामध्ये मा.न्यायालयाने तक्रारदाराने त्यांची तक्रार योग्य त्या ऑथॉरिटीकडे दाखल करावी असे नमुद केले आहे. त्यानुसार, रीट पिटीशन क्रमांक 6548/2006 बंद करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार, मंच तक्रारदारास असा आदेश देते की, त्यांनी एमआयडीसी चा प्लॉट मिळण्यासाठी पुन्हा एकदा एमआयडीसी कडे प्रस्ताव ठेवावा. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराने एमआयडीसीचा प्लॉट मिळण्यासाठी पुन्हा एकदा एमआयडीसीकडे प्रस्ताव ठेवावा. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्या अध्यक्षा. युएनके |