Maharashtra

Nagpur

CC/235/2017

Shri Ritesh Eshwardas Kadbe - Complainant(s)

Versus

Chief Executive Officer, Fuxora Infrastructure Pvt. Ltd.. Ensaara Metropark - Opp.Party(s)

Adv. Nandeshwar

31 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/235/2017
( Date of Filing : 30 May 2017 )
 
1. Shri Ritesh Eshwardas Kadbe
R/o. Plot No. 18, Road No. 6, Bajrang Nagar, Manewada Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Smt. Mohini Ritesh Kadbe, Through Power of Attorney Holder
R/o. Plot No. 18, Road No. 6, Bajrang Nagar, Manewada Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chief Executive Officer, Fuxora Infrastructure Pvt. Ltd.. Ensaara Metropark
Regd.Office- 6th floor, Sun Plaza, Hari Om Nagar, Off-E-E, Highway, Mulund (E), Mumbai 440081
Nagpur
Maharashtra
2. Chief Executive Officer, Fuxora Infrastructure Pvt. Ltd.. Ensaara Metropark
Nagpur Office- 305, Shri Swami Arcade, WHC Road, Dharmapeth, Nagur 440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 31 Jan 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्षाचा विकसनाचा आणि ईमारत बांधण्‍याचा व्‍यवसाय आहे. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्ता क्रमांक १ व २ यांना मौजा पिपळा, तहसिल जिल्‍हा नागपूर येथील ऐन्‍सारा मेट्रो पार्क फेस १, बिल्‍डींग नंबर ३ ब विस्‍ता अपार्टमेंट मधील सदनिका क्रमांक ५०४/A चे वाटप दिनांक १५/०४/२०१५ रोजी केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी दिनांक ३१/१२/२०१४ रोजी रुपये १,००,०००/-, ५/१/२०१५ रोजी ४,४६,३७७/-, ३/२/२०१५ रोजी रुपये १,५०,०००/-, ५/३/२०१५ रोजी रुपये १,५०,०००/-, ७/७/२०१५ रोजी रुपये २,५०,०००/- असे एकूण रुपये १०,९६,३७७/- अदा केले. परंतू ऐन्‍सारा मेट्रो पार्क युनिट काही कारणास्‍तव रद्द झाले व त्‍यामुळे दिनांक ६/१/२०१६ रोजी तक्रारकर्त्‍याने वैयक्‍तीक कारणास्‍तव ऐन्‍सारा मेट्रो पार्क फेस १ विस्‍ता अपार्टमेंट मधील वाटप केलेली सदनिका ५०४/A चे वाटप रद्द करण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला पञ दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी सदनिका खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला दिलेली रक्‍कम Allotment Cancellation Charges वजा करुन उर्वरीत रक्‍कम मिळणेबाबत विरुध्‍द पक्षाला विनंती केली. परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक ६/१/२०१६ ला पञ दिल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम चार महिण्‍यांत (माहे मे २०१६) परत करण्‍याचे आश्‍वासन दिले परंतू एक वर्ष होऊनही विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही.  तक्रारकर्त्‍याने दिनांक १६/०५/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीस ला महत्‍व दिले नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ६/९/२०१७ ला विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात मिटींग करीता बोलाविले आणि पूर्ण रक्‍कम परत देण्‍यास तयारी दर्शविली. विरुध्‍द पक्ष अटी व शर्ती नुसार कोणतेही रद्द शुल्‍क न आकारता संपूर्ण रक्‍कम परत करण्‍यास तयार झाला. विरुध्‍द पक्षाने रुपये १,००,०००/- पहिल्‍या  हप्‍त्‍याच्‍या रुपाने देण्‍याची तयारी दर्शविली आणि उर्वरीत रक्‍कम लवकरच देण्‍यास तयार झाला. विरुध्‍दपक्ष ऑक्‍टोबर २०१७ पासुन ३१/०३/२०१८ पर्यंत हप्‍त्‍याहप्‍त्‍याने संपूर्ण रक्‍कम देण्‍यास तयार झाला. विरुध्‍द पक्षाने दिनांक २१/०९/२०१७ चे पञान्‍वये दिलेल्‍या वचनाचे पालन केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रुपये १०,९६,३७७/- परत करावे व त्‍यावर द.सा.द.शे. २४ टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
  2. मानसिक व शारिरीक ञासाकरीता तसेच तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानुसार तक्रारकर्त्‍याने वाटप पञासोबत अॅनेक्‍सचर ऐ ते अॅनेक्‍सचर ई सादर केले नाही. कारण अॅनेक्‍सचर ऐ मधील क्‍लॉज ६ प्रमाणे रकमा (Payment Schedule) द्यावयाचा तारखा (Stages) दिले आहेत. अॅनेक्‍सचर ऐ मध्‍ये उशीरा प्राप्‍त होणा-या देयकाकरीता व्‍याज आकारण्‍यात येईल असे नमुद केले आहे. तसेच युनिट रद्द केल्‍यास रद्द पोटी अदा करावयाची रक्‍कम नमुद आहे. विरुध्‍द पक्षकार यासोबत अॅनेक्‍सचर ऐ ते अॅनेक्‍सचर ई च्‍या प्रती सादर करीत आहेत. या तक्रारकर्त्‍याने वाटप पञासोबत सादर केलेल्‍या नाहीत. क्‍लॉज ई मध्‍ये नमुद असलेल्‍या  शर्तीनुसार जर तक्रारकर्ता हप्‍ता भरण्‍यात अपयशी ठरला तर तक्रारकर्त्‍याला हप्‍त्‍यापोटी द्यावयाची रक्‍कम १८ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावी लागते. जर तक्रारकर्ता हप्‍त्‍याने द्यावयाची रक्‍कम देण्‍यात अपयशी ठरला तर तक्रारकर्त्‍याला दिलेले वाटप पञ रद्दबातल होते व संपूर्ण रकमेच्‍या ५ टक्‍के रक्‍कम प्रशासकीय खर्च विरुध्‍द पक्षाकडे जमा होतो आणि उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍याला बिनव्‍याजी परत करण्‍यात येते. तक्रारकर्त्‍याने घेतलेल्‍या युनिट ची किंमत रुपये ५३,००,०००/- होती व त्‍या रकमेच्‍या ५ टक्‍के रक्‍कम रुपये २,६५,०००/- ही कमी करुन उर्वरीत रक्‍कम सर्व कर लागल्‍यानंतर परत करावयाची होती. परंतू तक्रारकर्ता सदर रक्‍कम घेण्‍यास तयार नव्‍हता. जेव्‍हा सदर बाब तक्रारकर्त्‍याच्‍या निर्दशनास आणून देण्‍यात आली त्‍यानंतर तक्रारकर्ता पुन्‍हा विरुध्‍द पक्षाकडे परतला नाही.
  2. विरुध्‍द पक्ष सदर सदनिकेचा ताबा देण्‍यास तयार होता परंतू मा. जिल्‍हाधिकारी यांनी क्‍लॉज ११ नुसार दिनांक २७/७/२०१५ ला आदेश पारित करुन बांधकाम बंद केले त्‍यानंतर मा. जिल्‍हाधिकारी यांनी दिनांक ११/८/२०१७ ला पुश्‍नच आदेश देऊन बांधकाम करण्‍यास परवानगी दिली त्‍यानंतर बांधकाम पुनश्‍य सुरु करण्‍यात आले.
  3. उभयपक्षाने दाखल केलेले दस्‍ताऐवज तसेच त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                      मुद्दे                                                                   उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                      होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?           होय
  3. काय आदेश ?                                                               अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्ता क्रमांक १ व २ यांना मौजा पिपळा, तहसिल जिल्‍हा नागपूर येथील ऐन्‍सारा मेट्रो पार्क फेस १, बिल्‍डींग नंबर ३ ब विस्‍ता अपार्टमेंट मधील सदनिका क्रमांक ५०४/A चे वाटप दिनांक १५/०४/२०१५ रोजी केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी दिनांक ३१/१२/२०१४ रोजी रुपये १,००,०००/-, ५/१/२०१५ रोजी ४,४६,३७७/-, ३/२/२०१५ रोजी रुपये १५०,०००/-, ५/३/२०१५ रोजी रुपये १५०,०००/-, ७/७/२०१५ रोजी रुपये २,५०,०००/- असे एकूण रुपये १०,९६,३७७/- अदा केले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक आहे. ऐन्‍सारा मेट्रो पार्क चे बांधकाम मा. जिल्‍हाधिकारी यांनी क्‍लॉज ११ नुसार दिनांक २७/७/२०१५ ला आदेश पारित करुन बांधकाम बंद करण्‍यात आले तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वैयक्‍तीक कारणांस्‍तव विरुध्‍द पक्षाला दिनांक ६/१/२०१६ ला पञ पाठवुन ऐन्‍सारा पार्क फेस १ विस्‍ता अपार्टमेंट मधील विरुध्‍द पक्षाने वाटप केलेली सदनिका ५०४/A चे वाटप पञ रद्द करण्‍याबाबत कळविले व सदनिका खरेदीपोटी दिलेली रक्‍कम रुपये १०,९६,३७७/- मधुन वाटप रद्द करण्‍याचे शुल्‍क कापुन उर्वरीत रक्‍कम परत करण्‍याबाबत कळविले. परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही.करारातील क्‍लॉज g सदर प्रकरणात लागु होत नाही त्‍यामुळे संपूर्ण सदनिकेच्‍या खरेदी किंमतीचा ५ टक्‍के रक्‍कम कमी करुन उर्वरीत रक्‍कम देण्‍याचा विरुध्‍द पक्षाचा बचाव हा चुकीचा आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याला वाटप करण्‍यात आलेली सदनिकेचे वाटप रद्द करण्‍याबाबतचे पञ विरुध्‍द पक्षाला दिनांक ६/१/२०१६ ला पाठवुनही विरुध्‍द पक्षाने कराराप्रमाणे संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्त्‍यास अदा करावयास पाहिजे होती. त्‍यामुळे तक्रारकर्ता करारानुसार देय असलेली रक्‍कम व्‍याजासह घेण्‍यास पाञ आहे असे मंचाचे मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडुन वादातील सदनिका ५०४/A विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये १०,९६,३७७/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व त्‍या रकमेवर दिनांक ६/१/२०१६ पासुन द.सा.द.शे. ७ टक्‍के व्‍याज दराने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम व्‍याजासह प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.