Maharashtra

Parbhani

CC/12/146

Smt.Jaheda Begum W/o Mo.Doulla - Complainant(s)

Versus

Chief Executive Engineer,MSEDC.Ltd.Jintur Road,Parbhani - Opp.Party(s)

W.S.Waghmare

05 Sep 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/146
 
1. Smt.Jaheda Begum W/o Mo.Doulla
R/o.Roshan Kh Mohlla,Parbhani
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chief Executive Engineer,MSEDC.Ltd.Jintur Road,Parbhani
Jintur Road,Parbhani
Parbhani
Maharashtra
2. DY.Engineer,
M.S.E.D. CO. LTD. Jintur Road,Parbhani
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र

                  तक्रार दाखल दिनांकः-  26/11/2012

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 27/12/2012

                        तक्रार निकाल दिनांकः- 05/09/2013

                                                                               कालावधी  08 महिने. 09 दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

                                              अध्‍यक्ष                                                               श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.

                                                       सदस्‍य

श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.

---------------------------------------------------------------------------------------------------------       

    

      श्रीमती जाहेदा बेगम भ्र.मो.दौला.                               अर्जदार

वय 48 वर्षे. धंदा.घरकाम व व्‍यापार.                              अॅड.वामन.शा.वाघमारे.

रा.रोशन खॉं मोहल्‍ला, परभणी.

               विरुध्‍द

 

1     मुख्‍य कार्यकारी अभियंता.                                 गैरअर्जदार.

   महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.                     अॅड.एस.एस.देशपांडे.

   जिंतूर रोड कार्यालय,परभणी.

2     कार्यकारी उप अभियंता,

      महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.

      जिंतूर रोड कार्यालय,परभणी.

______________________________________________________________________        

     कोरम  -    1)    श्री.पी.पी.निटूरकर.       अध्‍यक्ष.

                  2)    श्री.आर.एच.बिलोलीकर                    सदस्‍य.    

                               

             (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्‍यक्ष.)

         गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्‍या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.

        अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार ही परभणी येथील रहिवासी असून अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून विद्युत कनेक्‍शन घेतले आहे व ज्‍याचा ग्राहक क्रमांक 530010292173 असा आहे. अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, सुरवातीची मिटर संबंधी रिडींग बद्दल आलेल्‍या बिलाचा आक्षेप असल्‍यामुळे अर्जदारास प्रकरणाची मागणी नमुद पहिले मिटर बदलून त्‍या ठिकाणी नविन मिटर क्रमांक 1797281 बसविण्‍यात आले.सदर मिटर बसविल्‍या नंतर अर्जदाराने वेळोवेळी मुदतीत गैरअर्जदाराच्‍या मागणी प्रमाणे विज बिले भरत असतांना देयक कालावधी 19/11/2011 ते 18/12/2011 या कालावधीचे बिल 15750/- गैरअर्जदाराने अर्जदारास दिले व सदरच्‍या बिलावर अर्जदार हीने गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात संबंधीत अधिका-यांना भेट देवुन बिल दुरुस्‍त करुन द्यावे, अशी विनंती केली असता गैरअर्जदारांनी सदर बिलापोटी 9,000/- रुपये जमा करावे असे गैरअर्जदारांनी अर्जदारास लिहून दिले त्‍याप्रमाणे अर्जदाराने 9,000/- जमा केले तसेच अर्जदाराने तीच्‍या मिटरचे रिडींग हे जलद असल्‍यामुळे सदरचे मिटर तपासणी करण्‍यासाठी गैरअर्जदाराने अर्जदारास सुचविले त्‍याप्रमाणे मिटर तपासणी फिस पोटी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 100/- रुपये भरले, परंतु सदर मिटरच्‍या तपासणी वेळी अर्जदारास गैरअर्जदारांनी बोलावीले नाही व काढून नेलेले मिटर क्रमांक 1797281 हे अर्जदारा समक्ष सिलबंद करण्‍यात आले नाही व त्‍यावर अर्जदाराचे कोठेही सही घेतली नाही व अर्जदाराच्‍या गैरहजेरीत 01453486 हे मिटर सिलबंद न करता अर्जदाराच्‍या गैरहजेरीत बसविण्‍यात आले सदर मिटर दिनांक 03/02/2012 रोजी बसविले व सदर मिटर बदल्‍याचा अहवाल अर्जदाराने गैरअर्जदारास मागीतला असता ते दिले नाही व दिनांक 11/06/2012 रोजी गैरअर्जदारांनी डुप्‍लीकेट अहवाल तयार करुन अर्जदारास दिले व त्‍यामध्‍ये मिटर बदलल्‍याची तारीख 11/04/2012 अशी चुकीची दाखवण्‍यात आली अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, 27/08/2012 रोजी अर्जदारास गैरअर्जदारांनी विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याची सुचना व धमकी देणारे गैरअर्जदाराच्‍या कार्यालयाचे पत्र पाठविण्‍यात आले, त्‍यावेळी अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात जावुन विज बिलाची दुरुस्‍ती करुन द्यावी व रिडींग योग्‍य नसल्‍याचा लेखी आक्षेप अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात दिलेला असतांना गैरअर्जदारांनी जाणुन बुजून अर्जदारास खोटी नोटीस दिली व अर्जदाराने गैरअर्जदारास योग्‍य बिल करुन द्यावे अशी विनंती केली असता संबंधीत अधिका-यांनी अर्जदारास बिल दुरुस्‍त करुन देण्‍याचे नाकारले अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, 07/09/2012 रोजी देयक दिनांक नमुद असलेले व देयक कालावधी 15/07/2012, 15/08/2012 असा कालावधी नमुद करुन अर्जदारास 41,980/- रुपयांचे विज बिल देण्‍यात आले.त्‍यामध्‍ये विजेचा वापर पाहता 352 असा उल्‍लेख केलेला दिसतो आणि चालू रिडींग आर.एन.ए. असे नमुद केलेले आहे आणि हस्‍ताक्षरात 33540/- असे देण्‍यात आले.जे दिनांक 01/10/2012 रोजीचे हे देखील अर्जदारास मान्‍य नाही व सर्व बिलांची चौकशी करण्‍यात यावी. कारण मिटर बदलल्‍या नंतर मिटरची रिडींग योग्‍य पध्‍दतीने नोंदविणे आणि त्‍या नोंदणी प्रमाणे बिल अर्जदारास देणे हे गैरअर्जदार कार्याल्‍याचे आद्य कर्तव्‍य आहे, परंतु मिटर रिडींग घेणारे व्‍यक्‍ती अर्जदाराची मिटरच्‍या रिडींग न घेता अर्जदारास बिले देतात. अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, चुकीचे बिले दिल्‍यामुळे सदरच्‍या तक्रार दाखल करणे भाग पडले, म्‍हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्‍हावा की, दिनांक 09/11/2012 रोजी देयक क्रमांक 456 अन्‍वये 37790/- रुपयांचे चुकीचे बिले देवुन मानसिकत्रास दिल्‍यापोटी रु.10,000/- गैरअर्जदाराकडून अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा.व गैरअर्जदारांनी योग्‍य ते कायदेशिर बिल नियमा प्रमाणे दुरुस्‍त करुन कमी करुन अर्जदारास देण्‍या बाबतचा आदेश व्‍हावा, व तसेच तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रु.1,000/-गैरअर्जदाराकडून अर्जदारास मिळणेचा आदेश व्‍हावा.अशी विनंती केली आहे.

              तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 18 कागदपत्रांच्‍या यादीसह 18 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्‍यामध्‍ये 5/1 वर देयक क्रमांक 420 अन्‍वये बिल, 5/2 वर 100/- रुपये भरलेले मिटर टेस्‍टींग पावती, 5/3 वर 100/- रुपये जमा केल्‍या बाबतची पावती, 5/4 वर विज भरणा केल्‍याची पावती,  5/5 वर मिटर रिप्‍लेसिंग रिपोर्ट, 5/6 वर देयक क्रमांक 357 चे बील, देयक क्रमांक 407 अन्‍वयेचे बील,मिटर प्रोसेसिंग युनीट प्रत, 20/06/2012 चा अर्ज, 20/06/2012 चा तक्रार अर्ज, 20/07/2012 चा तक्रार अर्ज,  07/07/2012 चे 34660/- रुपयांचे बिल, 27/08/2012 च्‍या नोटीसची प्रत, 06/09/2012 चे इनस्‍पेक्‍शन केल्‍याची प्रत, 07/09/2012 चे विज बिल, 01/10/2012 चे विज बील, 28/10/2012 चा आक्षेप अर्जाची प्रत, व डिमांड ड्राफ्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

                मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्‍यात आल्‍यावर, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, परंतु  गैरअर्जदारास लेखी जबाब दाखल करण्‍यास अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द विना जबाबाचा आदेश पारीत करण्‍यात आला.

 

            तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व अर्जदाराच्‍या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

 

           मुद्दे.                                            उत्‍तर.

1     गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये

      देयक क्रमांक 456 अन्‍वये रु.37,730/- चे चुकीचे बिल देवुन

      सेवेत त्रुटी दिली आहे काय ?                              होय.

2     आदेश काय ?                                   अंतिम आदेशा प्रमाणे.

 

कारणे.

मुद्दा क्रमांक 1.

          

               अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील दाखल केलेल्‍या बिलावरुन सिध्‍द होते तसेच गैरअर्जदारांनी अर्जदारास ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये बिल देयक क्रमांक 456 अन्‍वये 37,730/- रुपयांचे मिटर रिडींग न घेता बिल दिले ही बाब नि.क्रमांक 5/17 वरील दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन सिध्‍द होते, सदरचे बिलाचे अवलोकन केले असता चालू रिडींग आर.एन.ए. दाखवुन व मागील रिडींग 2012 दाखवून 283 युनिटचा वापर झाला गैरअर्जदाराने अर्जदारास अंदाजे बिल दिले ही बाब देखील नि.क्रमांक 5/17 वरील दाखल केलेल्‍या बिलावरुन सिध्‍द होते तसेच सदरच्‍या बिला मध्‍ये नोव्‍हेंबर 2011 ते सप्‍टेंबर 2012  या महिन्‍या मधील बिल रिडींगचे अवलोकन केले असता नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये 2226 युनिटचा वापर, डिसेंबर 2011 मध्‍ये 460 युनिटचा वापर, जानेवारी 2012 मध्‍ये 401 युनिटचा वापर, फेब्रुवारी 454 युनिटचा वापर, मार्च 2012 मध्‍ये 331 युनिटचा वापर, एप्रिल 331 युनिटचा वापर, मे 2012 मध्‍ये 331 युनिटचा वापर, जुन 2012 मध्‍ये 2063 युनिटचा वापर, जुलै 2012 मध्‍ये 352 युनिटचा वापर, ऑगस्‍ट 2012 मध्‍ये 352 युनिटचा वापर, सप्‍टेंबर 2012 मध्‍ये 755 युनिटचा वापर असे अंदाजे बिले गैरअर्जदारांनी अर्जदारास दिली ही बाब देखील नि.क्रमांक 5/17 वरील बिलावरुन सिध्‍द होते, तसेच गैरअर्जदारांनी डिसेंबर 2011 मध्‍ये अर्जदारास 15670/- रुपयांचे बिल देयक क्रमांक 412 अन्‍वये दिले होते व त्‍या बिला मध्‍ये मागील रिडींग 1765 दाखवुन चालू रिंडींग 2225 युनिट असे दर्शविले व 460 युनिटचा वापर दाखवुन गैरअर्जदारांनी अर्जदारास 4113/- रुपयांचे बिल दिले आहे. मागील बाकी दाखवुन सदरचे बिल 15670/- रुपायांचे दिले होते ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील कागदपत्रावरुन सिध्‍द होते व सदरचे बिलापोटी गैरअर्जदाराने अर्जदारास 9,000/- रुपये तात्‍पुते भरावे असा आदेश केला होता ही बाब देखील नि.क्रमांक 5/1 वरील दाखल केलेल्‍या बिलावरुन सिध्‍द होते, व तसेच गैरअर्जदाराच्‍या आदेशा प्रमाणे अर्जदाराने दिनांक 23/01/2012 रोजी गैरअर्जदाराकडे 9,000/- रुपये भरले ही बाब देखील नि.क्रमांक 5/5 वरील कागदपत्रावरुन सिध्‍द होते व तसेच जुन 2012 चे बिलाचे अवलोकन केले असता चालू रिडींग 1257 व मागील रिडींग 1 असे दाखवून 2063 युनिटचा वापर झाला हे नि.क्रिमांक 5/12 वरील दाखल केलेल्‍या बिलावरुन दिसते, गैरअर्जदारांनी अर्जदारास बिल देयक क्रमांक 456 अन्‍वये ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये रिडींग न घेता व मागील थकबाकी दाखवुन 37730/- रुपयांचे बिल दिले हे चुकीचे आहे असे मंचास वाटते, व तसेच गैरअर्जदारांनी अर्जदाराच्‍या मिटरची रिडींग घेवुन बिल देणे हे त्‍यांचे कर्तव्‍य असतांना देखील तसे केले नाही.व तसेच गैरअर्जदारांनी सदरच्‍या प्रकरणा मध्‍ये अर्जदाराच्‍या तक्रारीस आपले लेखी म्‍हणणे दाखल न करुन एक प्रकारे अर्जदाराची तक्रार मान्‍य केली आहे. त्‍यामुळे बिल क्रमांक 456 दुरुस्‍त होणे आवश्‍यक आहे. असे मंचास वाटते, म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                            आदेश

1     अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2     गैरअर्जदारांनी अर्जदारास देयक क्रमांक 456 अन्‍वये ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये

      दिलेले 37,730/- रुपयाचे बिल आदेश  तारखे नंतर पूढील तीन महिन्‍याचे

      रिडींग घेवुन व प्रतिमहा सरासरी बील काढून त्‍यानुसार ऑक्‍टोबर 2012 चे

      थकीत बील दुरुस्‍त करुन द्यावेत.

3     तक्रारीचा खर्च ज्‍याचा त्‍यांनी सोसावा.

4         आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.

 

 

  श्री.आर.एच.बिलोलीकर.                           श्री. पी.पी.निटूरकर

            मा.सदस्.                                                                      मा.अध्यक्ष.

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.