Maharashtra

Ahmednagar

CC/15/346

Sayyad Javedali Shamsherali - Complainant(s)

Versus

Chief Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd. - Opp.Party(s)

Shaikh

05 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/346
( Date of Filing : 25 Aug 2015 )
 
1. Sayyad Javedali Shamsherali
Tin Batti Chowk,Delhi Naka,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chief Executive Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Station Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Sub-Engineer(उप कार्यकारी अभियंता),Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd.
Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Shaikh, Advocate
For the Opp. Party: Adv.Arvind Kakani, Advocate
Dated : 05 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार हे संगमनेर येथील कायमचे रहिवाशी असून संगमनेर येथे  के.बी.लाहोटी अॅन्‍ड कंपनी चे बी.पी.सी.एल.डिलर्स, दिल्‍ली नाका,संगमनेर येथे पेट्रोल पंप चालवतात. सामनेवाले नं.1 हे अहमदनगर येथील मुख्‍य कार्यकारी अभियंता असून सामनेवाले नं.2 हे उप कार्यकारी अभियंता आहे. सामनेवाले नं.2 हे सामनेवाले नं.1 यांच्‍या अधिपत्‍त्‍याखाली काम पहात आहेत.

3.   तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 कडून रितसर व कायदेशिररित्‍या सर्व परवानगी घेऊन त्‍यांचे के.बी.लाहोटी अॅन्‍ड कंपनी, बी.पी.सी.एल.डिलर्स संगमनेर पेट्रोल पंपच्‍या वापरासाठी विद्युत कनेक्‍शन घेतलेले आहे. व त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारास पेट्रोल पंपच्‍या वापरासाठी विद्युत मिटर दिलेले आहे. तक्रारदार यांचा जुना ग्राहक क्रमांक 1848 होता व त्‍यास नविन ग्राहक क्र.155045551176 असा दिलेला आहे. अशा प्रकारे तक्रारदार हे सामनेवाले यांचे कायदेशिर ग्राहक होते. तक्रारदार व सामनेवाला यांच्‍या दरम्‍यान ग्राहक व उपभोक्‍ता असा नातेसंबंध निर्माण झालेला आहे.

4.   तक्रारदार हे सदर विद्युत कनेक्‍शनचा वापर त्‍यांचे दिल्‍ली नाका, संगमनेर येथे असलेल्‍या पेट्रोल पंपच्‍या वापरासाठी नियमीतपणे करीत होते. इले.मिटरनुसार तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडे त्‍यांना येणारे विज बिल हे नियमीतपणे सामनेवाले नं.2 कडे भरीत होते. व त्‍याबाबत तक्रारदार यांनी कधीही कसुर केलेला नाही.

5.   सन 2013 पासून तक्रारदाराला इले.मिटर प्रमाणे विज बिल हे सुमारे नेहमी येणा-या युनिट पेक्षा जास्‍त युनिट येत आहे व सदरचे युनिट हे जास्‍त असे होते व त्‍यामुळे आमचे अशिलाचे तुमचे संगमनेर येथील कार्यालयात संबंधीत अधिका-यांना वेळोवेळी प्रत्‍यक्ष भेटून व फोन व्‍दारे कळवून वाढीव युनिटबाबत व नेहमी सामनेवाले यांच्‍या अतिरिक्‍त विद्युत पुरवठयामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच त्‍याप्रमाणे आलेले जास्‍तीचे विज बिलासंदर्भात व अति‍रिक्‍त विद्युत पुरवठयामुळे तक्रारदार यास नुकसान होत आहे. याबाबतची तक्रार सुरवातीस तक्रारदार यांनी दिनांक 18.06.2013 रोजी दिली होती. त्‍याची तपासणी देखील सामनेवाले नं.2 यांच्‍या कर्मचा-यांनी केली होती. त्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे दिनांक 16.07.2013 रोजी पुन्‍हा तक्रारी अर्ज दिला. परंतू त्‍याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्‍यानंतर तक्रारदाराने दिनांक 29.07.2013 रोजी पुन्‍हा सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे तक्रारी अर्ज दिला. त्‍यानुसार सामनेवाले नं.2 यांचे कर्मचारी हे तक्रारदार यांच्‍या पेट्रोल पंपावर येऊन पुरवठयाची तपासणी केली तेव्‍हा त्‍यांना प्रमाणापेक्षा जास्‍त पुरवठा होत असल्‍याचे आढळून आले. परंतू असे असतांना देखील सामनेवाले नं.2 यांनी कोणत्‍याही प्रकारची सुधारणा केली नाही. परंतू सामनेवाले नं.2 यांचे अभियंता श्री.साळी यांच्‍याकडे तक्रार केली असता त्‍यांनी 132 के.व्‍ही.वर फॉल्‍ट असल्‍याचे सांगितले व पुढील तक्रार गोसावी साहेब यांच्‍याकडे करा असे सांगितले. अशा रितीने तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे वेळोवेळी त्‍यांच्‍या पेट्रोल पंपावर अतिरिक्‍त विद्युत पुरवठा होत असल्‍याबाबत व त्‍याकारणास्‍तव तक्रारदाराचे खुप मोठे आर्थिक नुकसान होत असल्‍याबाबत दिनांक 14.02.2014, 26.03.2014, 15.03.2014, 15.04.2014, 10.07.2014, 15.07.2014, 16.07.2014, 22.07.2014, 30.07.2014, 11.01.2015, 12.03.2015 असे वारंवार तक्रारी अर्ज व स्‍मरणपत्र पाठविले. परंतू सामनेवाले नं.2 यांनी त्‍याची कुठलिही दखल घेतली नाही व तक्रारदाराच्‍या पेट्रोल पंपाच्‍या मिटरला अतिरिक्‍त विद्युत पुरवठा होत असल्‍याने त्‍याची सुधारणा केली नाही.

6.   तक्रारदार हे स्‍वतः पेट्रोल पंप चालवित असून डिझेल व पेट्रोल विक्रीचा व्‍यवसाय करतात. परंतू सदरच्‍या अतिरीक्‍त विद्युत पुरवठयामुळे सदरचार पेट्रोल पंप प्रत्‍यंक 15-15 मिनीटाला बंद पडत आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास त्‍यांच्‍या ग्राहकास सुरळीत सेवा देता येत नाही व तक्रारदाराने खुप मोठे मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. व तक्रारदाराच्‍या व्‍यवसायावर परिणाम झाला आहे. व मशिनरीचा मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना खुप मोठा मानसिक धक्‍का बसला आहे व सोसावा लागत आहे.

7.   तक्रारदाराने सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे दिनांक 17.07.2013 रोजी रितसर फी भरुन त्‍यांच्‍रूा विद्युत मिटरची तपासणीबाबत फी देखील भरलेली आहे. त्‍यानुसार सामनेवाले नं.2 यांच्‍या कर्मचा-यांनी व अभियंत्‍यांनी पेट्रोल पंपावर समक्ष येऊन पाहाणी केली व सदरच्‍या रिपोर्टमध्‍ये असे नमुद केले की, मिटरचे स्‍टॅबीलाझर हे चांगल्‍या प्रकारे काम करीत आहे. परंतू इनपुट एम.एस.सी.बी. मध्‍ये हाय व्‍होल्‍टेज आहे असा रिपोर्ट दिनांक 17.07.2013 रोजी दिला आहे. असे असतांना देखील सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदाराच्‍या तक्रारीची कोणतीही दखल अद्याप पावेतो घेतलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास खुप मोठा मानसिक त्रास झाला आहे. तसेच त्‍यांच्‍या व्‍यवसायावर आर्थिक परिणाम झाला आहे.

8.   तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 व 2 यांना रजिस्‍टर पोष्‍टाव्‍दारे अॅड.एफ.बी.शेख यांच्‍या मार्फत नोटीस पाठवून तक्रारदार यांच्‍या पेट्रोल पंपावर आपला होणार अतिरिक्‍त विद्युत पुरवठयाची सुधारणा करुन देणेबाबत नोटीस पाठविली होती. परंतू आपण तक्रारदाराने पाठविलेल्‍या नोटीसची कोणतीही दखल घेतली नाही. सबब तक्रारदाराला सदरचा अर्ज या सामनेवाले यांच्‍याविरुध्‍द दाखल करणे भाग पडले आहे.

9.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांचा अर्ज हा खर्चासहीत मंजुर करण्‍यात यावा. सामनेवाला यांनी त्रारदार यांना दिलेले विद्युत मिटरमध्‍ये दुरुस्‍ती करुन द्यावी तसेच 132 के.व्‍ही.वरील फॉल्‍ट दुरुस्‍त करुन द्यावे. तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्‍या हलगर्जीपणामुळे पेट्रोलपंपाच्‍या व्‍यवसायावर परिणाम झाला, मशिनरीचे नुकसान झाले. तसेच रक्‍कम रु.1,00,000/- आर्थिक नुकसान झाले ते देखील देण्‍याचा सामनेवाले यांना हुकूम व्‍हावा. तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रास झाला त्‍याच्‍या नुकसान भरपाईपोटी रक्‍कम देण्‍याचा सामनेवाला यांच्‍याविरुध्‍द आदेश व्‍हावा. वरील रकमेवर तक्रारदार यांना सामनेवाले यांच्‍याकडून क्‍लेम सादर केले पासून रक्‍कम वसुल होईपावेतो द.सा.द.शे.18 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍यात यावे. या अर्जाचा खर्च तक्रारदार यांना सामनेवालाकडून देण्‍यात यावा.

10.  तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी 6 सोबत तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडे अतिरिक्‍त पुरवठा बंद होणेबाबत दिलेलया अर्जाची झेरॉक्‍सप्रत दिनांक 18.06.2013, तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडे जास्‍त व्‍होल्‍टेजबाबत दिलेल्‍या अर्जाची प्रत दिनांक 14.02.2014 व दिनांक 29.07.2013, तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडे अतिरिक्‍त पुरवठयाबाबत दिलेल्‍या अर्जाची प्रत दिनांक 16.07.2013, तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडे जास्‍त व्‍होल्‍टेज बाबत दिलेलया अर्जाच्‍या प्रति दिनांक 26.3.2014, 15.4.2014, 16.7.2004, 22.7.2014, 30.7.2014, 10.7.2014, 15.7.2014, 16.7.2014,  तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे दिलेले स्‍मरणपत्र पत्राची झेरॉक्‍स प्रत दिनांक 22.7.2014, 30.7.2014, 11.1.2015, 15.1.2015, 12.3.2015, तसेच तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडे भरलेले लाईट बिल 10 प्रती व सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार यांना मिटरचे दिलेले रिपोर्ट दिनांक 17.7.2013 इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत.

11.  तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन मे.मंचातर्फे सामनेवाला यांना नोटीस काढण्‍याचे आदेश काढण्‍यात आले. त्‍यानुसार सामनेवाला हे हजर झाले व सामनेवाला नं.1 व 2 यांनी मुळ अर्जास कैफियत निशाणी 14 वर दाखल केली. त्‍यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढली आहे. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराने सदरचा अर्ज सामनेवाले यांनी दुषीत सेवा दिली आहे म्‍हणुन दाखल केला आहे. सदरचा अर्ज हा कायदयाने मेंटेनेबल नाही. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 नुसार ग्राहक होऊ शकत नाही. कारण या सामनेवाले कंपनीने ग्राहक क्रमांक 155045551176 या ग्राहक क्रमांकासाठी वाणिज्‍य वापरासाठीची सेवा दिलेली आहे. संबंधित ग्राहकाने म्‍हणजेच मे.कन्‍हैयालाल बंकटलाल यांनी त्‍याचा वाणिज्‍य कारणासाठी वापर करुन व त्‍यांचे ग्राहकांना सेवा पुरवुन मोठया प्रमाणावर नफा कमविलेला आहे. सदरची बाब तक्रार अर्जातील कथनावरुन स्‍पष्‍ट होत आहे. संबंधीत ग्राहकाने सामनेवाले यांचेकडून होणा-या वीज पुरवठयाचा उपयोग वाणिज्‍य/ औद्योगिक कारणासाठी व नफा मिळविण्‍यासाठी केला असल्‍याने सदरचा अर्ज या मे.मंचात मेंटेनेबल नाही. सदरचा अर्ज हा कंझयुमर डिस्‍प्‍युट या सदराखाली पडणारा नाही. सबब या कारणास्‍तव रद्द होण्‍यास पात्र आहे.    

12.  या सामनेवाले यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरचा अर्ज चालविण्‍याचा या मे.मंचास अधिकार नाही. सदरचा वाद विषय हा ग्राहक संरक्षण कायद्याचे कार्यकक्षेत येत नाही. तक्रारदार यांनी दि इलेक्‍ट्रीसिटी अॅक्‍टचे तरतुदीनुसार या सामनेवाले यांनी स्‍थापन केलेल्‍या Forum For Redressal of Grievances of Consumers यांचेकडे म्‍हणजेच महाराष्‍ट्र सरकार यांनी स्‍थापन केलेल्‍या Maharashtra Electricity Regulatory Commission (Consumer Grievance Redressal Forum & Ombudsman Regulation 2003 ) यांचे समोर तक्रारदारास सामनेवालेकडून मिळालेल्‍या तथाकथित दुषीत सेवा व त्‍या अनुषंगाने नुकसान भरपाई मिळणेबाबत अर्ज दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक होते व आहे व त्‍यामुळे सदरचे फोरम व ओम्‍ब्‍युडसमन यांनाच सदरच्‍या तथाकथत नुकसान भरपाई बाबत निर्णय देण्‍याचा अधिकार असल्‍याने सदरचा अर्ज चालविण्‍याचा या मे.कोर्टास अधिकार नाही. सबब Efficacious Remedy Available असतांनाही तक्रारदार यांनी या मंचात सदरचा अर्ज दाखल केलयाने सदरचा अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे. या सामनेवाले नं.1 व 2 यांनी त्‍यांचे मुळ ग्राहक मे.कन्‍हैयालाल बंकटलाल दिल्‍ली नाका, संगमनेर जि.अहमदनगर या ठिकाणी वाणिज्‍य वापरासाठी विज पुरवठा दिनांक 10.9.1984 पासुन दिलेला आहे. त्‍यानुसार ते या सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार श्री.सय्यद जावेद अली शमशेर अली हे वर नमुद केलेल्‍या ग्राहक क्रमांकासंदर्भात या सामनेवाले यांचे कधीही ग्राहक नव्‍हते व नाही. त्‍यामुळे त्‍यांना स्‍वतःचे वैयक्‍तीक अधिकारात सदरचा अर्ज या मे.कोर्टात दाखल करण्‍याचा अधिकार नाही. अगर मुळ ग्राहकाने सदरचा पेट्रोल पंप चालविण्‍याबाबत अगर हस्‍तातंर करण्‍याबाबत व त्‍यासाठी लागणारा विज पुरवठा तक्रारदार यांनी वापरावा या संदर्भात कोणतीही लेखी परवानगी या सामनेवाले यांचेकडून घेतलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाला नं.1 व 2 यांचे ग्राहक नाहीत. तसेच त्‍यांचे दरम्‍यान ग्राहक व विक्रेता असे नाते निर्माण झालेले नाही अगर होऊ शकत नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

13.  सामनेवाला यांनी कैफियतीसोबत अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले आहे. निशाणी 22 ला तक्रारदाराने सरतपासणीचे अॅफिडेव्‍हीट दाखल केले आहे. तसेच निशाणी 25 ला तक्रारदाराने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.

14.  तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, सरतपासणीचे अॅफिडेव्‍हीट, लेखी युक्‍तीवाद तसेच त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेली कैफियत, त्‍यांनी दाखल केलेला युक्‍तीवाद त्‍यानुसार न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हे सामनेवालाचे “ग्राहक” आहे काय.?                    

 

... नाही.

2.

तक्रारदाराने मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास हक्‍कदार आहेत काय.?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

15.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार यांचे वकील श्री.एफ.डी.शेख यांनी लेखी युक्‍तीवाद निशाणी 25 ला दखल केला आहे. तक्रारदाराचे वकीलांनी लेखी युक्‍तीवादात असे कथन केले आहे की, तक्रारदार हे संगमनेर येथील कायमचे रहिवाशी असून संगमनेर येथे  के.बी.लाहोटी अॅन्‍ड कंपनी चे बी.पी.सी.एल.डिलर्स, दिल्‍ली नाका,संगमनेर येथे पेट्रोल पंप चालवतात. सामनेवाले नं.1 हे अहमदनगर येथील मुख्‍य कार्यकारी अभियंता असून सामनेवाले नं.2 हे उप कार्यकारी अभियंता आहे. सामनेवाले नं.2 हे सामनेवाले नं.1 यांच्‍या अधिपत्‍त्‍याखाली काम पहात आहेत.

16.  तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 कडून रितसर व कायदेशिररित्‍या सर्व परवानगी घेऊन त्‍यांचे के.बी.लाहोटी अॅन्‍ड कंपनी, बी.पी.सी.एल.डिलर्स संगमनेर पेट्रोल पंपच्‍या वापरासाठी विद्युत कनेक्‍शन घेतलेले आहे. व त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारास पेट्रोल पंपच्‍या वापरासाठी विद्युत मिटर दिलेले आहे. तक्रारदार यांचा जुना ग्राहक क्रमांक 1848 होता व त्‍यास नविन ग्राहक क्र.155045551176 असा दिलेला आहे. अशा प्रकारे तक्रारदार हे सामनेवाले यांचे कायदेशिर ग्राहक होते. तक्रारदार व सामनेवाला यांच्‍या दरम्‍यान ग्राहक व उपभोक्‍ता असा नातेसंबंध निर्माण झालेला आहे.

17.  तक्रारदार हे सदर विद्युत कनेक्‍शनचा वापर त्‍यांचे दिल्‍ली नाका, संगमनेर येथे असलेल्‍या पेट्रोल पंपच्‍या वापरासाठी नियमीतपणे करीत होते. इले.मिटरनुसार तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडे त्‍यांना येणारे विज बिल हे नियमीतपणे सामनेवाले नं.2 कडे भरीत होते. व त्‍याबाबत तक्रारदार यांनी कधीह कसुर केलेला नव्‍हता.

18.  सन 2013 पासून तक्रारदाराला इले.मिटर प्रमाणे विज बिल हे सुमारे नेहमी येणा-या युनिट पेक्षा जास्‍त युनिट येत आहे व सदरचे युनिट हे जास्‍त असे होते व त्‍यामुळे आमचे अशिलाचे तुमचे संगमनेर येथील कार्यालयात संबंधीत अधिका-यांना वेळोवेळी प्रत्‍यक्ष भेटून व फोन व्‍दारे कळवून वाढीव युनिटबाबत व नेहमी सामनेवाले यांच्‍या अतिरिक्‍त विद्युत पुरवठयामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच त्‍याप्रमाणे आलेले जास्‍तीचे विज बिलासंदर्भात व अति‍रिक्‍त विद्युत पुरवठयामुळे तक्रारदार यास नुकसान होत आहे. याबाबतची तक्रार सुरवातीस तक्रारदार यांनी दिनांक 18.06.2013 रोजी दिली होती. त्‍याची तपासणी देखील सामनेवाले नं.2 यांच्‍या कर्मचा-यांनी केली होती. त्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे दिनांक 16.07.2013 रोजी पुन्‍हा तक्रारी अर्ज दिला. परंतू त्‍याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्‍यानंतर तक्रारदाराने दिनांक 29.07.2013 रोजी पुन्‍हा सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे तक्रारी अर्ज दिला. त्‍यानुसार सामनेवाले नं.2 यांचे कर्मचारी हे तक्रारदार यांच्‍या पेट्रोल पंपावर येऊन पुरवठयाची तपासणी केली तेव्‍हा त्‍यांना प्रमाणापेक्षा जास्‍त पुरवठा होत असल्‍याचे आढळून आले. परंतू असे असतांना देखील सामनेवाले नं.2 यांनी कोणत्‍याही प्रकारची सुधारणा केली नाही. परंतू सामनेवाले नं.2 यांचे अभियंता श्री.साळी यांच्‍याकडे तक्रार केली असता त्‍यांनी 132 के.व्‍ही.वर फॉल्‍ट असल्‍याचे सांगितले व पुढील तक्रार गोसावी साहेब यांच्‍याकडे करा असे सांगितले. अशा रितीने तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे वेळोवेळी त्‍यांच्‍या पेट्रोल पंपावर अतिरिक्‍त विद्युत पुरवठा होत असल्‍याबाबत व त्‍याकारणास्‍तव तक्रारदाराचे खुप मोठे आर्थिक नुकसान होत असल्‍याबाबत दिनांक 14.02.2014, 26.03.2014, 15.03.2014, 15.04.2014, 10.07.2014, 15.07.2014, 16.07.2014, 22.07.2014, 30.07.2014, 11.01.2015, 12.03.2015 असे वारंवार तक्रारी अर्ज व स्‍मरणपत्र पाठविले. परंतू सामनेवाले नं.2 यांनी त्‍याची कुठलिही दखल घेतली नाही व तक्रारदाराच्‍या पेट्रोल पंपाच्‍या मिटरला अतिरिक्‍त विद्युत पुरवठा होत असल्‍याने त्‍याची सुधारणा केली नाही.

19.  तक्रारदार हे स्‍वतः पेट्रोल पंप चालवित असून डिझेल व पेट्रोल विक्रीचा व्‍यवसाय करतात. परंतू सदरच्‍या अतिरीक्‍त विद्युत पुरवठयामुळे सदरचार पेट्रोल पंप प्रत्‍यंक 15-15 मिनीटाला बंद पडत आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास त्‍यांच्‍या ग्राहकास सुरळीत सेवा देता येत नाही व तक्रारदाराने खुप मोठे मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. व तक्रारदाराच्‍या व्‍यवसायावर परिणाम झाला आहे. व मशिनरीचा मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना खुप मोठा मानसिक धक्‍का बसला आहे व सोसावा लागत आहे.

20.  तक्रारदाराने सामनेवाले नं.2 यांच्‍याकडे दिनांक 17.07.2013 रोजी रितसर फी भरुन त्‍यांच्‍या विद्युत मिटरची तपासणीबाबत फी देखील भरलेली आहे. त्‍यानुसार सामनेवाले नं.2 यांच्‍या कर्मचा-यांनी व अभियंत्‍यांनी पेट्रोल पंपावर समक्ष येऊन पाहाणी केली व सदरच्‍या रिपोर्टमध्‍ये असे नमुद केले की, मिटरचे स्‍टॅबीलाझर हे चांगल्‍या प्रकारे काम करीत आहे. परंतू इनपुट एम.एस.सी.बी. मध्‍ये हाय व्‍होल्‍टेज आहे असा रिपोर्ट दिनांक 17.07.2013 रोजी दिला आहे. असे असतांना देखील सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदाराच्‍या तक्रारीची कोणतीही दखल अद्याप पावेतो घेतलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास खुप मोठा मानसिक त्रास झाला आहे. तसेच त्‍यांच्‍या व्‍यवसायावर आर्थिक परिणाम झाला आहे.

21.  तक्रारदार यांनी सामनेवाले नं.1 व 2 यांना रजिस्‍टर पोष्‍टाव्‍दारे अॅड.एफ.बी.शेख यांच्‍या मार्फत नोटीस पाठवून तक्रारदार यांच्‍या पेट्रोल पंपावर आपला होणार अतिरिक्‍त विद्युत पुरवठयाची सुधारणा करुन देणेबाबत नोटीस पाठविली होती. परंतू आपण तक्रारदाराने पाठविलेल्‍या नोटीसची कोणतीही दखल घेतली नाही. सदरची नोटीस मे.कोर्टात दाखल केलेली आहे.

22.  अर्जदाराचा अर्ज खर्चासहीत मंजूर करण्‍यात यावा. तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या पेट्रोल पंपावर होणारे अतिरिक्‍त विद्युत पुरवठयामध्‍ये सुधारणा करुन द्यावी. तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्‍या हलगर्जीपणामुळे पेट्रोलपंपाच्‍या व्‍यवसायावर परिणाम झाला, मशिनरीचे नुकसान झाले. तसेच रक्‍कम रुपये 5,00,000/- आर्थिक नुकसान झाले ते देखील देण्‍याचा सामनेवाला यांना हुकूम व्‍हावा. तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रास झाला त्‍याच्‍या नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.50,000/- देण्‍याचा सामनेवाला यांच्‍याविरुध्‍द आदेश व्‍हावा. वरील रककम 18 टक्‍के व्‍याजासह सामनेवालाकडून मिळावी. अशा प्रकारे तक्रारदार यांनी त्‍यांचे लेखी युक्‍तीवादात कथन केले आहे.

23.  सामनेवालाचे वकीलांनी दाखल केलेली कैफियतचे अवलोकन केले व त्‍यांनी केलेला युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील असा युक्‍तीवाद केला की,  तक्रारदाराने सदरचा अर्ज सामनेवाले यांनी दुषीत सेवा दिली आहे म्‍हणुन दाखल केला आहे. सदरचा अर्ज हा कायदयाने मेंटेनेबल नाही. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 नुसार ग्राहक होऊ शकत नाही. कारण या सामनेवाले कंपनीने ग्राहक क्रमांक 155045551176 या ग्राहक क्रमांकासाठी वाणिज्‍य वापरासाठीची सेवा दिलेली आहे. संबंधित ग्राहकाने म्‍हणजेच मे.कन्‍हैयालाल बंकटलाल यांनी त्‍याचा वाणिज्‍य कारणासाठी वापर करुन व त्‍यांचे ग्राहकांना सेवा पुरवुन मोठया प्रमाणावर नफा कमविलेला आहे. सदरची बाब तक्रार अर्जातील कथनावरुन स्‍पष्‍ट होत आहे. संबंधीत ग्राहकाने सामनेवाले यांचेकडून होणा-या वीज पुरवठयाचा उपयोग वाणिज्‍य/ औद्योगिक कारणासाठी व नफा मिळविण्‍यासाठी केला असल्‍याने सदरचा अर्ज या मे.मंचात मेंटेनेबल नाही. सदरचा अर्ज हा कंझयुमर डिस्‍प्‍युट या सदराखाली पडणारा नाही. सबब या कारणास्‍तव रद्द होण्‍यास पात्र आहे.

  24.  या सामनेवाले यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरचा अर्ज चालविण्‍याचा या मे.मंचास अधिकार नाही. सदरचा वाद विषय हा ग्राहक संरक्षण कायद्याचे कार्यकक्षेत येत नाही. तक्रारदार यांनी दि इलेक्‍ट्रीसिटी अॅक्‍टचे तरतुदीनुसार या सामनेवाले यांनी स्‍थापन केलेल्‍या Forum For Redressal of Grievances of Consumers यांचेकडे म्‍हणजेच महाराष्‍ट्र सरकार यांनी स्‍थापन केलेल्‍या Maharashtra Electricity Regulatory Commission (Consumer Grievance Redressal Forum & Ombudsman Regulation 2003 ) यांचे समोर तक्रारदारास सामनेवालेकडून मिळालेल्‍या तथाकथित दुषीत सेवा व त्‍या अनुषंगाने नुकसान भरपाई मिळणेबाबत अर्ज दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक होते व आहे व त्‍यामुळे सदरचे फोरम व ओम्‍ब्‍युडसमन यांनाच सदरच्‍या तथाकथत नुकसान भरपाई बाबत निर्णय देण्‍याचा अधिकार असल्‍याने सदरचा अर्ज चालविण्‍याचा या मे.कोर्टास अधिकार नाही. सबब Efficacious Remedy Available असतांनाही तक्रारदार यांनी या मंचात सदरचा अर्ज दाखल केलयाने सदरचा अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे. या सामनेवाले नं.1 व 2 यांनी त्‍यांचे मुळ ग्राहक मे.कन्‍हैयालाल बंकटलाल दिल्‍ली नाका, संगमनेर जि.अहमदनगर या ठिकाणी वाणिज्‍य वापरासाठी विज पुरवठा दिनांक 10.9.1984 पासुन दिलेला आहे. त्‍यानुसार ते या सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार श्री.सय्यद जावेद अली शमशेर अली हे वर नमुद केलेल्‍या ग्राहक क्रमांकासंदर्भात या सामनेवाले यांचे कधीही ग्राहक नव्‍हते व नाही. त्‍यामुळे त्‍यांना स्‍वतःचे वैयक्‍तीक अधिकारात सदरचा अर्ज या मे.कोर्टात दाखल करण्‍याचा अधिकार नाही. अगर मुळ ग्राहकाने सदरचा पेट्रोल पंप चालविण्‍याबाबत अगर हस्‍तातंर करण्‍याबाबत व त्‍यासाठी लागणारा विज पुरवठा तक्रारदार यांनी वापरावा या संदर्भात कोणतीही लेखी परवानगी या सामनेवाले यांचेकडून घेतलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाला नं.1 व 2 यांचे ग्राहक नाहीत. तसेच त्‍यांचे दरम्‍यान ग्राहक व विक्रेता असे नाते निर्माण झालेले नाही अगर होऊ शकत नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्‍यात यावी अशी विनंती केली.    

25.  वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी वाणिज्‍य वापरासाठी सदरची विज वापरलेली आहे. त्‍यामुळे या सदराखाली ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक ठरत नाहीत असे मंचाचे मत आहे. त्‍याच प्रमाणे तक्रारदाराने मे.कन्‍हैयालाल बंकटलाल दिल्‍ली नाका संगमनेर जि.अहमदनगर यांचे बेनिफिशरी असल्‍यासंदर्भात कुठलाही दस्‍तावेज दाखल केलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेली बिज बिले मे.कन्‍हैयालाल बंकटलाल यांचे नावे असल्याचे दिसून येते. मे.कन्‍हैयालाल बंकटलाल यांना तक्रारदारास सदरची तक्रार चालविण्‍यासंदर्भात पॉवर ऑफ अॅटर्नी करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक होत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

26.   मुद्दा क्र.2 – तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होत नसल्‍यामुळे तक्रारार हे तक्रारीत केलेली नमुद मागणी मिळण्‍यास हक्‍कदार नाहीत असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

27.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.