तक्रारदारातर्फे :- अँड.सयद इस्माईल.
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांना सामनेवाला यांनी रक्कम रु.20,344/- चे असेंसमेट बिल दिले. त्या विरुध्द तक्रारदाराची तक्रार आहे.
तक्रारदारांनी तक्रारीसोबत अंतरिम आदेशासाठी अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराचे आजोबा गूलाब शब्बीर खान यांचे नांवाने विज जोडणी होती व तक्रारदार सदर विज जोडणी द्वारे विज वापरुन नियमित विज देयके भरीत आलेले आहेत.
सामनेवाला यांनी तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक तक्रारदाराचे घरी येऊन मिटर घेऊन गेले. मिटरमध्ये बिघाड असल्याचे सांगितले व वरीलप्रमाणे असेसंमेट बिल सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिले आहे. त्या बाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांची भेट घेतली, त्यांनी बिल भरण्यास सांगितले, न भरल्यास विज जोडणी रदद करुन टाकू व अधिक वाढीव बिल तुम्हास देऊ असे सांगितले अशा तक्रारदाराच्या प्रमुख तक्रारी आहेत.
या संदर्भात सदरची तक्रार तक्रारदारांनी तक्रार दि.16.5.2012 रोजी दाखल केली. तक्रारदार ग्राहक आहेत या प्राथमिक मुददयावर आज दि.5.6.2012 रोजी तक्रारदाराचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारदाराने तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, विज जोडणी ही आजोबांचे नांवाने आहे आणि ते मयत झालेले आहेत. त्यांचे मृत्यूनंतर तक्रारदार सदर विज जोडणीचा वापर करुन विज बिले भरीत आहेत. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 2 (1)(डी) (ii) संज्ञेचा विचार करता सदर प्रकरणात विजेचा करार हा तक्रारदाराच्या आजोबांनी केलेला होता. सदरचा करार हा वैयक्तीक करार आहे व तो त्यांचे मृत्यूनंतर आपोआप संपूष्टात आलेला आहे. त्यांचे हयातीत त्यांचे घरातील घटकांना विज वापराचा लाभ घेता येत होता परंतु त्यांचे मृत्यूनंतर सदरच्या लाभाचा फायदा संपूष्टात आलेला आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत किंवा लाभार्थी होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारदार सदर संज्ञेत येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार प्राथमिक मुददयावरच रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड