::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. तक्रारकर्ता हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावर जिल्हा परिषद चंद्रपूर येथे कार्यरत होते. दिनांक ३०.०४.२०१३ रोजी निवृत्त वयोमानानुसार तक्रारदार निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचे वेतन व इतर लाभ सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा न केल्याने तसेच संबंधीत कागदपत्रे ए. जी कार्यालयाकडे न पाठविल्याने ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने दिनांक ०१.०४.२०१३ पासून संपूर्ण रक्कम व्याज व लाभांषासह तक्रारदारांस सामनेवाले यांनी अदा करावी, तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे
२. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले यांनी मुदतीत उत्तर न दिल्याने लेखी उत्तराशिवाय तक्रार चालविण्याचे आदेश पारित झाले. सामनेवाले यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदार व सामनेवाले यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
३. तक्रारदार यांची तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र, लेखी युक्तिवाद व सामनेवाले यांचा लेखी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? नाही
२. आदेश तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १
४. निवृत्तीनंतरचे वेतन व इतर लाभ सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा न केल्याने तसेच संबंधीत कागदपत्रे ए. जी कार्यालयाकडे न पाठविल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहेत किंवा नाही ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. मा. सर्वोच न्यायालयाने दिनांक ११.०७.२०१३ रोजी Jagmittar Sain Bhagat (DR) V/s Dir. Health Services, Haryana and Others 2013 (6) Mh.L.J. 923 या न्यायानिणर्यात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार, तक्रारदार यांचा निवृत्तीनंतर देय असलेल्या रक्क्मेबद्दलचा वाद, शासकीय कर्मचारी “ग्राहक” या संज्ञेत येत नसल्याने, त्याबाबत आदेश करण्याचे अधिकारक्षेत्र मंचास नसल्याने, ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ड) अन्वये ग्राहक या संज्ञेची व्याप्ती पाहता निवृत्तीनंतरचे वेतन व इतर लाभ याबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येणार नाही, असे न्यायतत्व स्पष्ट केले आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदारांनी निवृत्तीनंतरचे वेतन व इतर लाभ याबाबतची तक्रार मंचाकडे दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने प्रस्तुत तक्रारीतील वादकथनाविषयी न्यायनिर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मंचास नसल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २
६. मुद्दा क्रं. १ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ७०/२०१४ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)