Maharashtra

Jalna

CC/144/2011

Sandeep Fakirba kad - Complainant(s)

Versus

Chief Engineer,MSEDCL,Jalna - Opp.Party(s)

Adv.A.B.Bhise

25 Nov 2011

ORDER

 
CC NO. 144 Of 2011
 
1. Sandeep Fakirba kad
At-Barad,Tq-Jafrabad,Dist-Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chief Engineer,MSEDCL,Jalna
Jalna
Jalna
Maharashtra
2. Superintending Engineer(Gramin)MSEDCL,Jalna
Jalna
Jalna
Jalna
3. Asst.Engineer MSEDCL,Jalna
Jafrabad
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 25.11.2011 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
      गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      थोडक्‍यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्‍याने गैरअर्जदार विज वितरण कंपनीकडून स्‍टोन क्रेशनसाठी वित जोडणी घेतलेली आहे. गैरअर्जदार विज वितरण कंपनीने सन 2009 ते 2011 या कलावधीमध्‍ये 9,433 युनिट बाबत अतिरिक्‍त व अवाजवी देयक दिले. त्‍याबाबत वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार देवूनही त्‍यांनी दखल घेतली नाही. तसेच त्‍याचे स्‍टोन क्रेशन मशीन बंद असतांनाही त्‍यास रुपये 1,06,660/- चे देयक दिले. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून त्‍याने अशी मागणी केली आहे की, त्‍यास देण्‍यात आलेल्‍या देयकामधून 9,433 युनिट बद्दल आकारण्‍यात आलेली रक्‍कम कमी करावी. तसेच वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई द्यावी.
तक्रारदाराच्‍या कैफीयतीवरुन तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) मधील ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसतो काय ? असा प्राथमिक मुद्दा उपस्थित झाला आहे.
      तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून स्‍टोन क्रेशरसाठी वीज जोडणी घेतलेली आहे. याचाच अर्थ तक्रारदाराने गैरअर्जदाराची सेवा व्‍यापारी कारणासाठी घेतलेली आहे. व्‍यापारी कारणासाठी सेवा घेणारी व्‍यक्‍ती अथवा संस्‍था ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) (ii) नुसार ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसत नाही. तक्रारदाराने गैरअर्जदाराची सेवा व्‍यापारी कारणासाठी घेतलेली असल्‍यामुळे तो ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसत नाही. म्‍हणून तक्रारदाराची ही तक्रार या मंचात चालू शकत नाही.
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
  1. तक्रारदाराची तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारदारास आदेश कळविण्‍यात यावा.         
 
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.