निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/07/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 27/07/2011
तक्रार निकाल दिनांकः- 18/04/2013
कालावधी 01 वर्ष 08 महिना 22दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शाहुबाई भ्र.नामदेवराव कांबळे, अर्जदार
वय वर्षे. धंदा.घरकाम. अड.ए.जी.पेडगांवकर.
रा.शिवराम नगर,परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
मुख्य अभियंता, गैरअर्जदार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड,परभणी.ता.जि. परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बील देवुन सेवेत त्रुटी केली आहे व विद्युत मीटरचे रिडींग प्रमाणे बील देण्यात यावे,म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.अर्जदाराची थोडक्यांत तक्रार अशी आहे की,
अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून अर्जदाराने गैरअर्जदारांकडून घरगुती वापरासाठी विद्युत कनेक्शन घेतले, ज्याचा ग्राहक क्रमांक 530010338947 असा असून सदरच्या मीटरचा वापर घरगुती कामासाठी अर्जदार करतो.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, विद्युत मीटरच्या रिडीग प्रमाणे जे कांही बील आतापर्यंत गैरअर्जदार देत होते ते सर्व बील अर्जदाराने विनाविलंब गैरअर्जदाराकडे भरलेले आहेत.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मार्च 2011 मध्ये गैरअर्जदाराने दिनांक 31/01/2011 ते 28/02/2011 या कालावधीचे रिडींग 3437 दर्शवुन रु.21,659/- बील दिले,वास्तविक तेव्हढे युनीट विद्युत मीटर प्रमाणे दर्शवित नाही,अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, मागील बिलापैकी कोणत्याही प्रकारचे डिफॉल्टर नसतांना दिनांक 31/01/2011 ते 28/02/2011 या कालावधीचे बील रुपये 21,659/- हे एकदम चुकीचे आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने नविन मीटर बसवल्यानंतर रिडींग न घेता सदरच्या कालावधी मध्ये चुकीचे बील देवुन मानसिकत्रास दिला आहे. अर्जदाराने सदरची तक्रार गैरअर्जदाराच्या कार्यालयात वारंवार जावुन दिली,परंतु गैरअर्जदारांनी कसल्याही प्रकारची मीटरची पाहनी केली नाही वा बील दुरुस्त करुन दिले नाही, या उलट गैरअर्जदारांनी मीटर बंद करण्याची धमकी दिली, त्याच्या नंतर अर्जदाराने दिनांक 15/06/2011 रोजी वकिला मार्फत सदरच्या तक्रारी संबंधात कायदेशिर नोटीस गैरअर्जदारास दिली,परंतु नोटीस प्राप्त होवुनही गैरअर्जदाराने काहीही केलेले नाही, म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की,अर्जदाराच्या मीटर रिडींग प्रमाणे दिनाक 31/01/2011 ते 28/02/011 या कालावधीचे बील रिडींग प्रमाणे दुरुस्त करुन द्यावे व तसेच त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदाराने 25,000/- रुपये नुकसान भरपाई म्हणून व तक्रारीचा खर्च 5,000/- रुपये अर्जदारास देण्याचे आदेश करावेत.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर व तसेच नि.क्रमांक 8 वर चार कागदपत्रे यादीसह दाखल केलेले आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास नोटीस पाठवल्यावर नि.क्रमांक 20 वर गैरअर्जदाराने आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे, त्याचे असे म्हणणे आहे की, अर्जदारास कसल्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही व जे बील दिलेली आहे ते प्रत्यक्ष मीटर रिडींग प्रमाणे आहे, म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यात यावी, तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने जानुण बुजून खरी माहिती मंचापासून लपवलेली आहे व तसेच त्याचे असे म्हणणे आहे की, विज कंपनीने अर्जदारास रुपये 21,659/- चे बील दिलेले आहे ते योग्य आहे त्याचे कारण म्हणजे अर्जदाराचे नावे पुर्वी एकुण 3 मिटर होते व विज कंपनीने ते तीन मिटर काढून त्याच्या जागी एकच मीटर अर्जदाराच्या घरांत बसवलेले आहे. सदरील बील हे तीन मीटरचे साकाळलेल्या युनीटचे तसेच नविन मीटर बसवलेल्या पासून 10 महिन्याचे आहे म्हणून मंचास अशी विनंती केली आहे की, सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 21 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकिलांनी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैंरअर्जदाराने माहे मार्च 2011 चे बील जे की,
31/01/2011 ते 28/02/2011 या कालावधीसाठीचे आहे
ते 21,659/- रुपयांचे चुकीचे बील अर्जदारास देवुन त्रुटीची
सेवा दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराने दाखल केलेल्या बीलांचा अभ्यास केले असता असे दिसते की, दिनांक 31/07/2010 ते 31/12/2010 पर्यंतचे मीटर रिडींग आर.एन.ए. (घेत आले नाही) असा शेरा गैरअर्जदाराने देवुन 31/07/2010 ते 31/08/2010 यासाठी फक्त 26 युनीटचे बील दिले व तसेच 30/09/2010 ते 31/12/2010 पर्यंत जो बील गैरअर्जदाराने अर्जदारांस दिले आहेत ते पण आर.एन.ए. असा शेरा देवुन फक्त 100 युनीट प्रतिमहा असे बील दिलेली आहेत.
नंतर दिनांक 31/01/2011 ते 28/02/2011 या कालावधीसाठीचे बील जे की, माहे मार्च असे दाखवले आहे सदरील बिलांत मीटर रिडींग घेतल्याचे दिसते त्या रिडींग प्रमाणे चालु रिडींग हि 3438 असे दर्शविलेले आहे व मागील रिडींग 1 असे दर्शविलेले आहे व 3437 युनीटचे बील दिले आहे ह्याचाच अर्थ वरील नोव्हेंबर 2010 ते फेब्रुवारी 2011 पर्यंत 3438 युनीटचा वापर झाला आहे,हे मीटर दर्शवित आहे.अर्जदाराचे म्हणणे की, मीटर रिडींग प्रमाणे बील द्यावे याच्या पुष्टयर्थ अर्जदाराने ते मीटर रिडींग बरोबर नाही ह्याच्या पुष्टयर्थ कुठलेही कागदपत्र किंवा मीटरची फोटोकॉपी दिली नाही,म्हणून मंचास असे वाटते की, अर्जदाराने सदरचे विवादीत बील चुकीचे आहे हे सिध्द करण्यास अर्जदार असमर्थ ठरला आहे.
वरील उल्लेखित बील हे नि.क्रमांक 4/1 पासुन 4/7 वर दाखल केलेली आहेत. सदरील बिलांवरुन हे निष्पन्न होते की, जमा झालेल्या युनीटचे बील माहे मार्चच्या बिलात समाविष्ट झालेले आहे.म्हणून मंच वरील मुद्याचे नकारार्थी उत्तर देवुन पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यांत येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष