Maharashtra

Chandrapur

CC/11/115

Shri Kamal Jageshwar Jindal - Complainant(s)

Versus

Chief Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.ltd - Opp.Party(s)

Adv A.R.Bhadke

31 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/115
 
1. Shri Kamal Jageshwar Jindal
R/o Near Gurudwara,Tukum Chandrapur
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Chief Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.ltd
Sub Division No.2 Tukum Chandrapur
Chandrapur
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri Anil. N.Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri Sadik M. Zaweri Member
 HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar MEMBER
 
PRESENT:Adv A.R.Bhadke, Advocate for the Complainant 1
 Adv.Abhay P.Pachpor, Advocate for the Opp. Party 1
ORDER

(मंचाचे निर्णयान्वये, अधि.वर्षा जामदार, मा. सदस्या)

                  (पारीत दिनांक : 31.10.2011)

 

1.           अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.  अर्जदाराने दि.29.11.2007 रोजी श्रीमती व श्री रेड्डी यांचेकडून घर विकत घेतले व तेथे वास्‍तव्‍यास आहे.  हे घर श्री व श्रीमती रेड्डी यांनी श्री आर.एस.दंडारे यांचेकडून विकत घेतले होते.  त्‍यावेळी, श्री आर.एस.दंडारे यांचे नावाने दोन विद्युत मिटर सुरु होते.  अर्जदार हा समाजातील प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती व निष्‍कलंक, स्‍वच्‍छ प्रतिमेचा सभ्‍य व्‍यक्‍ती आहे.  अर्जदाराने श्री रेड्डी यांचेकडून घर विकत घेतले, तेंव्‍हा श्री आर.एस.दंडारे यांचे नावाने ग्राहक क्र.450010169475 असलेला युनिव्‍हर्सल इलेक्‍ट्रीक कंपनीचा मीटर क्र.3410952345 लागलेला होता. तसेच, श्री दंडारे यांचे नावाने दुसरा विद्युत मीटर क्र.7611219251 व ग्राहक क्र.450010194429 हे मीटर लागलेले होते.  अर्जदार हे श्री रेड्डी यांचेकडून घर विकत घेतल्‍यानंतरही दि.29 मे 2009 पर्यंत आपल्‍या जुन्‍या घरी राहात होते.  त्‍यामुळे, घेतलेल्‍या नवीन घरातील वीज वापर फार कमी होते.  अर्जदाराने या घरात येण्‍यापूर्वी दि.16.1.2009 रोजी विद्युत मीटर बदलविण्‍याबाबत गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात अर्ज केला होता व त्‍याप्रमाणे, गैरअर्जदाराने जानेवारी महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवडयात अर्जदाराच्‍या घराचे एक मीटर बदलवून दिले.  दुसरा वीज मीटर तपासण्‍यात आला नाही किंवा बदलविण्‍यात आला नाही.  अर्जदाराला याबाबत कोणतेही लेखी किंवा तोंडी स्‍पष्‍टीकरण गैरअर्जदाराच्‍या कार्यालयाकडून देण्‍यात आले नाही.  गैरअर्जदारा मार्फत दरमहिन्‍यात नियमीतपणे मीटरचे रिडींग घेण्‍यात येत होते व फोटो सुध्‍दा काढण्‍यांत येत होते.  अर्जदार इलेक्‍ट्रीकचे बिल नियमीतपणे भरणा करीत होते व गैरअर्जदार ते विना अडथळा  स्विकारत होते.  अर्जदाराने तक्रार देवूनही गैरअर्जदाराकडून कोणतीही कार्यवाही न झाल्‍यामुळे दि.19.1.2011 रोजी अर्जदाराने मीटर बदलविण्‍याबाबत लेखी तक्रार देवून विनंती केली.  परंतु, गैरअर्जदाराने, अर्जदाराच्‍या अर्जाकडे पूर्णतः दूर्लक्ष केले व दुसरा मीटर बदलवून दिला नाही.  या उलट, गैरअर्जदाराच्‍या भरारी पथक श्री किशोर डिगांबर अडगुळवार, उपकार्यकारी अभियंता व त्‍याचे सहकारी यांनी दि.4.6.2011 रोजी अचानक दूपारी 12-00 ते 1-00 च्‍या दरम्‍यान अर्जदाराच्‍या घरी येऊन, ‘‘तुमचे घरी बसविलेल्‍या विद्युत मीटरची तपासणी करायची आहे.’’ असे अर्जदारास सांगितले.  ‘‘गैरअर्जदारानी तपासणी व पंचनामा केला.  तुमचे मीटरमध्‍ये फेरफार करुन  विद्युत चोरी केल्‍याचे दिसत असल्‍याने तुमच्‍या विरुध्‍द संबंधीत कायद्यातील तरतुदीनुसार एफ.आय.आर. दाखल करण्‍यांत येईल व पोलीस कार्यवाही करण्‍यांत येईल असे सांगितले.  सदर कार्यवाही टाळण्‍यासाठी अर्जदाराला रुपये 59,822/- गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात 3 दिवसाचे आंत भरणा करावा लागतील, अशी तंबी दिली.  या सर्व प्रकरणाने अर्जदार व त्‍याचे कुंटुंबीय घाबरुन गेले व भितीपोटी दबावात येवून दि.6.6.2011 रोजी रुपये 59,822/-  डी.डी. मार्फत गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात भरले.  अर्जदाराने रक्‍कम भरुनही गैरअर्जदाराने नवीन मीटर लावून दिलेला नाही.  अतिआवश्‍यक सेवा असतांना गैरअर्जदाराने पूर्ण 7 दिवसाचे नंतर दि.13.6.2011 रोजी अर्जदाराच्‍या घरी नवीन मीटर लावून दिला.  अर्जदाराच्‍या घरी बसविलेल्‍या श्री आर.एस.दंडारे यांचे दोन्‍ही मीटर सदोष असावे.  अर्जदारास जरी विद्युत चोरी करावयाची असती तर स्‍वतः विद्युत मीटर बदलविण्‍याबाबत गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात अर्ज दिला नसता.  अर्जदाराने, गैरअर्जदाराला लेखी अर्ज देवून सुध्‍दा गैरअर्जदाराने मीटर बदलविण्‍याची कार्यवाही केली नाही, किंवा मीटरची आपले कार्यालयाच्‍या मेकॅनिक मार्फत तपासणी सुध्‍दा केली नाही.  अशाप्रकारे, अर्जदारास उचीत सेवा देण्‍यास न्‍युनता दाखविली आहे.  या व्‍यतिरिक्‍त अर्जदारास कोणतीही सुचना न देता भरारी पथकाच्‍या माध्‍यमातून कार्यवाही केली व अर्जदाराने पूर्वीच तक्रार केलेल्‍या सदोष मीटर बाबत अर्जदारास जबाबदार धरुन त्‍याचेविरुध्‍द पोलीस स्‍टेशनला एफ.आय.आर. दाखल करण्‍याची भिती दाखवून रुपये 59,822/- भरण्‍यास बाध्‍य केले.  अर्जदाराने सदर रक्‍कम भरल्‍यावर दि.14.6.2011 ला लेखी अर्ज देवून संपूर्ण रक्‍कम परत करण्‍याबाबत विनंती केली.  परंतु, सदर अर्जाचे संबंधाने गैरअर्जदाराने अर्जदारास काहीही कळविले नाही व भरणा केलेली रक्‍कम अर्जदारास देण्‍यास टाळाटाळ केली.  त्‍यामुळे, अर्जदाराने सदर रक्‍कमेच्‍या वसुलीसाठी गैरअर्जदाराविरुध्‍द तक्रार दाखल केली.  अर्जदाराने मीटर क्र.3410952345 स्‍वतः फेरफार केलेला नाही व विद्युत चोरी केलेली नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराविरुध्‍द गैरअर्जदाराने केलेली कार्यवाही ही न्‍यायसंगत नसून अर्जदाराच्‍या प्रतिष्‍ठेला हाणी पोहचविणारी व शारीरीक, मानसिक व आर्थिक नुकसान पोहचविणारी आहे. 

 

2.          अर्जदार व त्‍याची पत्‍नी ही सकाळपासून राञी 10-00 वाजेपर्यंत व्‍यवसाय संबंधाने बाहेर राहात असतात.  शिवाय, अर्जदार व त्‍याचे लहान मुलाला चष्‍मा लागलेला असल्‍याने ते टी.व्‍ही. सुध्‍दा पाहत नाही.  अर्जदाराच्‍या दोन्‍ही मुलांना दमा असल्‍याने कुलर असून सुध्‍दा त्‍याचा वापर करीत नाही.  अर्जदाराची दोन्‍ही मुले चंद्रपूर येथील कारमेल अकॅडेमी शाळा येथे शिक्षण घेत असून शिक्षणात प्राविण्‍य प्राप्‍त असल्‍यामुळे ते टी.व्‍ही. पाहत नाही.

 

3.          अर्जदाराने सदर तक्रारीमध्‍ये गैरअर्जदाराने न्‍युनतापूर्ण सेवा दिलेली असल्‍यामुळे, गैरअर्जदाराकडे भरणा केलेली रक्‍कम रुपये 59,822/- ही 18 टक्‍के व्‍याजासह अर्जदारास परत मिळावी, अशी मागणी केली आहे. अर्जदाराची समाजात झालेल्‍या अप्रतिष्‍ठा व शारीरीक, मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी मागणी केली आहे. अर्जदाराने आपले तक्रारीसोबत नि.4 नुसार 13 व नि.11 नुसार 13 दस्‍ताऐवज दाखल केलेले आहे.

 

4.          अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदार हजर होऊन नि.8 प्रमाणे आपले लेखी उत्‍तर दाखल केले.  अर्जदाराचे म्‍हणणे प्रमाणे अर्जदार हा ज्‍या घरी राहातो त्‍या घरातील वीज कनेक्‍शन श्री आर.एस.दंडारे यांचे नावाचा असून अर्जदार ते कनेक्‍शन वापरत असल्‍याचे अर्जदाराने कबूल केले आहे.  तसेच, श्री दंडारे याचे नावाने दोन वीज कनेक्‍शन अर्जदार वापरतो हे सुध्‍दा मान्‍य केले आहे. अर्जदाराने श्री दंडारे यांचे घर विकत घेतले असल्‍याने, त्‍या घरी अस्तित्‍वात असलेल्‍या दोन्‍ही वीज कनेक्‍शन हे त्‍याने गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात नियमानुसार आपले नावाने करुन घेतलेले नाही. त्‍यामुळे, अर्जदाराचा गैरअर्जदाराशी ग्राहक म्‍हणून म्‍हणून नातेसंबंध नाही व नव्‍हता.  अर्जदाराला गैरअर्जदाराकडे विद्युत मीटर बदलवून मागण्‍याचा कोणताही अधिकार नव्‍हता.  अर्जदाराने मीटर बदलवून देण्‍याची मागणी केली असली तरी मीटर कोणत्‍या कारणाने बदलवून पाहिजे याचा खुलासा अर्जात नाही. त्‍यामुळे, अर्जदाराचे दोन्‍ही अर्ज वस्‍तुस्थितीशी विसंगत आहे.  अर्जदाराने वीज चोरीच्‍या असेसमेंटची व कंपाऊंडची रक्‍कम मीटरच्‍या कास्‍ट सोबत दि.6.6.2011 ला बिनाउजर भरले आहे.  परंतु, अर्जदाराने ती रक्‍कम व्‍याजासह व त्‍यासोबत नुकसान भरपाईची मागणी विद्युत कायद्याच्‍या कक्षेत बसत नसल्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार विद्यमान मंचा पुढे चालू शकत नाही.  दि.4.6.2011 ला अर्जदाराच्‍या घरी फिरत्‍या पथकाव्‍दारे वीज मीटरची तपासणी केली, त्‍यावेळी अर्जदाराची प्रतिनिधी हजर होते.  मीटर तपासणी मध्‍ये अर्जदारावर मीटर क्र.10952345 मध्‍ये वीज चोरी आढळून आली व ही बाब अर्जदाराच्‍या प्रतिनिधीला सांगितली.  या तपासणीच्‍या वेळी घटनास्‍थळी घटनेचा स्‍पॉट इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्ट, संयुक्‍त तपासणी अहवाल तयार करण्‍यांत आला व त्‍यावर अर्जदाराच्‍या प्रतिनिधीसह उपकार्यकारी अभियंता, फिरतेपथक व इतर सहका-यांनी सह्या केल्‍या.  त्‍यानंतर, उपरोक्‍त मीटर जप्‍त करण्‍यांत आले व जप्‍ती पंचनामा तयार करण्‍यांत आला.  त्‍यावर, अर्जदाराच्‍या प्रतिनिधीसह सर्वांनी सह्या केल्‍या व या दस्‍तऐवजांची प्रत अर्जदाराच्‍या प्रतिनीधीला सौ.नम्रता कमल जिंदल (पत्‍नी) हीला देण्‍यात आल्‍या.  फिरते पथक यांनी वीज चोरीचे असेसमेंट बिल रुपये 51,097/- कंपाऊंडींग चार्जेसचे बिल रुपये 8000/- व मीटरची कॉस्‍ट रुपये 725/- अर्जदाराच्‍या प्रतिनिधीला देण्‍यात आले.  त्‍यानंतर, दि.6.6.2011 ला अर्जदाराने ते बिनाउजर भरले.  अर्जदाराने ही रक्‍कम भरल्‍यामुळे फिरते पथकाच्‍या अधिका-यांनी अर्जदाराविरुध्‍द वीज चोरीची रिपोर्ट पोलीस स्‍टेशनला दाखल केली नाही.  विद्युत कायद्यात वीज चोरी संबंधाने निर्णय देण्‍याचा अधि हा स्‍पेशल कोर्टाला आहे.  ग्राहक मंच त्‍यात हस्‍तक्षेप करु शकत नाही.  अर्जदार हा खोट्या बाबी नमूद करुन या तक्रारी मार्फत भरलेली रक्‍कम परत मिळण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे.  वीज चोरीच्‍या संदर्भातील भरण्‍यात आलेली रक्‍कम परत मिळण्‍याचा वाद हा ग्राहक वाद होऊ शकत नाही.  त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार ही तथ्‍यहीन असून ग्राहक संरक्षण कायद्या मार्फत ग्राह्य नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.  गैरअर्जदाराने नि.9 नुसार 8 दस्‍ताऐवज दाखल केले आहे.

5.          अर्जदाराने नि.10 नुसार शपथपञ व गैरअर्जदाराने दाखल केलेले लेखी बयान शपथपञाचा भाग समजण्‍यात यावा अशी पुरसीस नि.12 नुसार दाखल केली आहे.  अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ व तोंडी युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष काढण्‍यात येतात.  

 

                        //  कारणे व निष्‍कर्ष //

 

6.          अर्जदाराने निशाणी क्र.10 वरील शपथपञा सोबत निशाणी क्र.11 अ-11 वर विक्रीपञ दाखल केले आहे.  ह्यावरुन, अर्जदाराने मौजा देवई गोविंदपूर रैय्यतवारी येथील भु.क्र.107/48 मधील प्‍लॉट नं.33, कुल आराजी 577.68 चौ.मी. ही जागा श्री उमाकांत प्रभाकरराव घरोटे यांचे कडून रजिस्‍टर्ड विक्रीपञाव्‍दारे विकत घेतली आहे.   विक्रीपञानुसार प्‍लॉट वरील बांधकाम व त्‍यावर चिकटलेल्‍या सर्व चीज वस्‍तुसह, इलेक्‍ट्रीक फिटींग मीटरसह व नळ कनेक्‍शनसह सदर मालमत्‍तेची विक्री खरेदी झाली आहे.  म्‍हणजे अर्जदार हा दि.29.11.2007 पासूल मालक झालेला आहे.  परंतु, अर्जदाराने आजपावेतो इलेक्‍ट्रीक मीटरमध्‍ये मालक म्‍हणून आपले नांव नमूद करण्‍याबाबत एकही अर्ज केलेला नाही.  अर्जदाराने संपूर्ण आवश्‍यक माहितीसह मालकी हक्‍काचे कागदपञ जोडून गैरअर्जदाराकडे नांव बदलण्‍यासाठी अर्ज करायला हवा होता.  परंतु, अर्जदाराने आजपर्यंत तशी तसदी घेतलेली दिसत नाही.  अर्जदार हा दि.29.11.2007 पासून ग्राहक क्र.450010169475 युनिवर्सल इलेक्‍ट्रीक कंपनीचा मीटर क्र.3410952345 हा मीटर वापरीत होता.  तसेच, दुसरे मीटर 4611219251 ह्या क्रमांकाचे व ग्राहक क्र.450010194429 असलेल्‍या मीटरचा ही वापर करीत होता.  त्‍यामुळे अर्जदार हा दि.29.11.2007 पासून सदर मीटरचा वापर कर्ता आहे.  अर्जदाराचे म्‍हणणे आहे की, दि.29.5.2009 पर्यंत अर्जदार जुन्‍याच घरी राहात होता.  परंतु, निश्‍चीत पणे अर्जदार घर खरेदी पासून केंव्‍हा राहायला आला, याबाबतचा काहीच पुरावा दाखल केलेला नाही, आणि दि.29.11.2007 पासून दि.29.5.2009 पर्यंत दुसरा कोणती त्‍या मीटरचा वापर करीत होता असेही अर्जदाराने म्‍हटलेले नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराचाच संबंधीत काळात वापर असल्‍याचे ग्राह्य धरण्‍याजोगे आहे. अर्जदाराने, गैरअर्जदाराला दि.16.1.2009 ला मीटर बदलल्‍याचा अर्ज दिल्‍याचे म्‍हटले आहे.  परंतु, रेकॉर्डवर तसा कुठलाही अर्ज दाखल नाही.  दि.19.1.2011 चा अर्ज दाखल असून, त्‍यामध्‍ये मीटर बदलल्‍याचे कुठलेही कारण दाखल नाही व मीटर अर्जदाराच्‍या नावाने नसल्‍यामुळे मीटर बदलवून मागण्‍याचा अधिकार अर्जदाराला नाही.  अर्जदाराने, आपल्‍या तक्रारीत व शपथपञ निशाणी क्र.10 मध्‍ये दिगंबर अडगुळवार, उपकार्यकारी अभियंता व त्‍यांचे सहकारी यांनी दि.4.6.2011 रोजी दुपारी 12 ते 1 च्‍या दरम्‍यान अर्जदाराचे घरी येऊन अर्जदारास ‘‘तुमचे घरी बसविलेल्‍या विद्युत मीटरची तपासणी करायची आहे.’’ असे सांगितले व तपासणी व पंचनामा केला.  तुमच्‍या मीटरमध्‍ये फेरफार करुन विद्युतची चोरी करण्‍यात आल्‍याचे व एफ.आय.आर. दाखल करण्‍यात येईल असे सांगितले.  अर्जदाराने नि.क्र.4 वर Spot Inspection Report संयुक्‍त तपासणी अहवाल व जप्‍ती पंचनामा दाखल केला आहे.  त्‍यावर अर्जदाराच्‍या प्रतिनिधी नम्रता कमल जिंदल यांची स्‍वाक्षरी आहे.  अर्जदाराचे म्‍हणणे आहे की, त्‍यांच्‍या पत्‍नी ह्या उच्‍च विद्या विभुषित आहेत व B.A.M.S., CCH, C.G.O. असे शिक्षण घेतलेले आहे व समाजातील प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती आहेत.  गैरअर्जदाराने केलेली कार्यवाही ही अर्जदाराच्‍या पत्‍नी समोर झाल्‍याचे अर्जदाराने स्‍वतःच मान्‍य केले आहे.  अर्जदाराची पत्‍नी ही उच्‍च विद्या विभुषित असल्‍याने त्‍यांनी Spot Inspection Report, संयुक्‍त तपासणी अहवाल आणि जप्‍ती पंचनामा ह्यावर गैरअर्जदाराचे म्‍हणणे समजून व वाचून सह्या केल्‍या असतील.  अर्जदारानेही ही कार्यवाही समजली नाही किंवा सांगण्‍यात आली नाही, असा कुठेही आक्षेप घेतलेला नाही.  निश्‍चीतच गैरअर्जदाराना मीटर तपासणीमध्‍ये चोरी होत असल्‍याचे आढळले म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराला तशी माहिती देऊन पैसे न भरल्‍यास एफ.आय.आर. दाखल करण्‍यात येईल, असे सांगितले व निशाणी क्र.4 अ-6, 7, 8 नुसार असेसमेंट बिल दिले.  अर्जदाराने दि.4.6.2011 ला दिलेले बिल दि.6.6.2011 ला लगेच भरले.  परंतु, बिल भरण्‍यापूर्वी कुठलाही आक्षेप (Protest) अर्जदाराने घेतलेला नाही.  गैरअर्जदाराने केलेल्‍या तपासणीवरुन हे सिध्‍द होते की, सदर प्रकरण हे वीज चोरीचे आहे.  गैरअर्जदाराने निशाणी क्र.4 अ-4 व 5 मधील रिपोर्ट मध्‍ये मीटरचे सील तोडल्‍याचे म्‍हटले आहे. “Meter body having 2 no. lead seals found in broken condition. Meter found slow in load test.  Meter opened in front of user of the meter.  Inside the meter turns of currant coil found to be reduced. This is theft of energy under section 135 of I.E.Act 2003.” पंचनाम्‍यावर पंचाच्‍या सह्याही आहेत.  तसेच, त्‍या सह्या व पंचनामा अर्जदाराच्‍या प्रतिनिधी डॉ.नम्रता कमल जिंदल यांच्‍या समोर करण्‍यात आल्‍या.  अर्जदाराने कुठलाही आक्षेप न घेता दि.6.6.2011 ला रुपये 59,822/- चोरीच्‍या बिलाचा भरणा गैरअर्जदाराकडे केलेला आहे.  त्‍यानंतर, विचारपूर्वक दि.14.6.2011 ला ग्राहक क्र.450010169475 ह्या मीटर मधून विज चोरीचे भरलेले पैसे रुपये 59,822/- परत मागित आहे.  अर्जदाराच्‍या मीटरमध्‍ये छेडछाड करण्‍यात आली होती, हे दाखल पंचनामा, अहवाल ह्यावरुन स्‍पष्‍ट होते.  विद्युत कायदा 2003 प्रमाणे प्रकरण चोरीचे असल्‍यास त्‍याला विद्युत कायद्याच्‍या कलम 135 अन्‍वये कार्यवाही करण्‍यात येते. ती कार्यवाही सदर कायद्याने निर्देशीत केलेल्‍या विशेष न्‍यायालयांमध्‍ये केली जाते. विद्युत कायदा 2003 मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाव्‍दारे सुधारणा करण्‍यांत आली असून, ती दि.23.6.2005 पासून महाराष्‍ट्रात लागू आहे.  विद्युत कायदा 2003 चे कलम 153 (5) नुसार कलम 135 अंतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करण्‍याचे अधिकार जिल्‍हा व सञ न्‍यायाधीशांना देण्‍यात आले आहेत.

                        See.  153 (5) Where no special Court for any area or areas has been  constituted under sub section (1), one or more Additional District and Sessions Judges, as may be designated by the High Court, for such area or areas, from time to time, shall exercise the powers of the Special Court under this Act and any Judge so designated shall be deemed to be special court for the purpose of this Act.  

 

7.                     अर्जदाराच्‍या प्रकरणांमध्‍ये सेवेतील न्‍युनता असल्‍याचे घटनाक्रमावरुन दिसत नसून चोरीचा आरोप गैरअर्जदाराने केलेला आहे.  सेवेतील न्‍युनता असल्‍यास ग्राहक मंचाना प्रकरण हाताळण्‍याचे अधिकार आहेत.  परंतु, प्राथमिक दृष्‍ट्या जर तपासणी झाल्‍यावर चोरीची शंका असेल तर सदर न्‍यायमंचाच्‍या अधिकार क्षेञात प्रकरण येत नाही.

 

8.          गै.अ.ने आपल्‍या कथनाचे पृष्‍ठ्यर्थ मा.उच्‍च न्‍यायालय गुजरात यांनी दिलेल्‍या एका Unreported आदेशाचा हवाला दिला आहे.  त्‍यामध्‍ये, सर्व पटीशन मध्‍ये सारखा मुद्दा (Common Issue) असल्‍यामुळे एकञितपणे सुनावणी होऊन एकञित आदेश पारीत करण्‍यांत आला. मा.उच्‍च न्‍यायालय, गुजरात यांनी ग्राहक मंचाच्‍या विद्युत कायद्यातील कलम 135 च्‍या अधिकार क्षेञाबाबत खालील प्रकरणात सविस्‍तर चर्चा करुन निर्णय दिलेला आहे.

 

Consumer Courts/Commission have no jurisdiction to entertain Complaints relating to Electricity Suply, VIZ, Theft of Electricity U/s 135 and un authorised use U/s.126 of Electricity Act 2003. 3 Separate Forums such as Grievance Redressal Forum, ombudsman, and Special Courts are created under the Electricity Act itself Jurisdiction of Consumer Fora/ Commission implied Barred.

 

                        Special Civil application No.8264/2009 & 12 other Civil Applications.

 

                        Deputy Engineer & 1 –Vs.- Jagrut Nagrik & 2

                        Judgment Dated 13.5.2010.

 

9.          मा.उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयाच्‍या बाहेर जाऊन प्रकरणात निकाल देण्‍याचा ह्या मंचाला अधिकार नसल्‍यामुळे, खालील आदेश पारीत करण्‍यांत येत आहे.

 

                       // अंतिम आदेश //

      (1)   अर्जदाराची तक्रार खारीज.

      (2)   अर्जदार व गैरअर्जदारानी आप आपला खर्च सहन करावा.

      (3)   अर्जदार व गैरअर्जदारास आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 
 
[HONORABLE Shri Anil. N.Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri Sadik M. Zaweri]
Member
 
[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.