Complaint Case No. CC/12/126 |
| | 1. CHAYA SHYAMRAO JADE | R/O KURBAN ALI SHA NAGER,DARGA ROAD,PARBHANI | PARBHANI | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. CHIEF ENGINEER,COMERACE MAVETERANE,JINTUR ROAD,PARBHANI | JINTUR ROAD,PARBHANI | PARBHANI | MAHARASHTRA | 2. DEPUTY ENGINEER,MAHAVITERANE | JINTUR ROAD,PARBHANI | PARBHANI | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 25/09/2012 तक्रार नोदणी दिनांकः- 26/09/2012 तक्रार निकाल दिनांकः- 08/05/2014 कालावधी 01वर्ष.07महिने.12दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B. सदस्या सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B. --------------------------------------------------------------------------------------------------------- छाया शामराव जडे, अर्जदार वय वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.ए.डी.खापरे. रा.कुर्बान अली शाह नगर, दर्गा रोड, परभणी. विरुध्द 1 मुख्य अभियंता,वाणिज्य, गैरअर्जदार. महावितरण, जिंतूर रोड, परभणी. अॅड.एस.एस.देशपांडे. 2 कार्यकारी अभियंता, महावितरण, जिंतूर रोड, परभणी. ______________________________________________________________________ कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष. 2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. (निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.) गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे लाईट बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने घरगुती वापरासाठी ग्राहक क्रमांक 530010472261 अन्वये गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला होता. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराच्या मनमानी कारभारामुळे अर्जदारास कुठलीही नोटीस न देता जुने मिटर काढून त्या ठिकाणी नवीन मिटर लावायचे व मिटर मनमानी पध्दीतने मोहीमेच्या नावाखाली बदलले. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अचानक देयक क्रमांक 464 नुसार दिनांक 03/09/2012 रोजी दिनांक 15/07/2012 ते 15/08/2012 पर्यंतचे अर्जदाराचे विज आकार देयक 68 दाखवुन समायोजीत युनीट 7704 दाखविले व एकुण विज वापर 7772 दाखवुन पुर्णांक देयक 65,060/- रु. एवढा दाखविला. त्याच प्रमाणे नवीन मिटर क्रमांक 5801591143 या बिलावरच वरील सर्व दाखवीले गेले आहे. त्यानंतर अर्जदाराने दिनांक 24/09/2012 रोजी गैरअर्जदारास सदरील बाब कळवुन त्यांनी रिडींगचा पडताळा बदललेल्या मिटर बाबत कृपया करावा असा शेरा J.E./ Z-II यांना दिला. गैरअर्जदार कंपनीचे अधीकारी आले व बेकायदेशिरपणे व बेकायदेशिरप्रमाणे नवीन Electronic Meter काढून नेले. व त्या ठिकाणी सुधारीत Electronic Meter बसवीले. अर्जदारास या कृतीने धक्का बसला व शेवटी कंटाळून वरील तक्रार वरील दिनांकास दिली. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने या बिला पूर्वीचे सर्व बिले भरलेली आहेत. अर्जदाराकडे कसल्याही प्रकारची बाकी नाही, अर्जदाराने मिटर बदलण्यास गैरअर्जदाराकडे अर्ज दिलेला नाही. गैरअर्जदार कंपनीच्या अधिका-यांने बेकायदेशिरपणे पहिले मिटर काढून नेऊन दुसरे मिटर बसविले व फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने देयक क्रमांक 464 दिले तसेच अर्जदाराचे मिटर हे बाहेर असल्यामुळे आणि सध्याची रिडींग घेण्याची पध्दत ही कॅमे-याने फोटो काढून घेण्याची असलेमुळे Reading Not Available येण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे अर्जदाराला दिलेले अवास्तव बिल हे चुकीचे आहे ते दुरुस्त होणे गरजेचे आहे. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदारास 84 ते 96 युनीट पेक्षा वापर सरासरी अर्जदारास लागत नाही, चुकीचे बिल देवुन अर्जदारास गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, देयक क्रमांक 464 दिनांक 03/09/2012 चे 65,060/- रु. रद्द करुन दुरुस्त करुन देण्याचे आदेश द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 6 वर 4 कागदपत्राच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये तक्रार अर्ज, देयक 464, देयक 6773, देयक 6552 तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 14 वर 1 कागदपत्रच्या यादीसह 1 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये 2010 ते 2012 पर्यंतचे CPL दाखल केले आहे. तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या. गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रार अर्जावरुन व कागदपत्रावरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदारास देयक क्रमांक 464 व्दारे ऑगस्ट 2012 चे चुकीचे लाईट बिल देवुन अर्जदाराला सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 6/2 वर दाखल केलेल्या ऑगस्ट 2012 च्या लाईट बिलावरुन सिध्द होते. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास ऑगस्ट 2012 चे देयक क्रमांक 464 अन्वये 65,060/- रु. चे चुकीचे बिल दिले. याबाबत नि.क्रमांक 6/2 वरील दाखल केलेल्या सदर बिलाचे अवलोकन केले असता, विद्युत कंपनीने अर्जदारास चालू रिडींग 69 दाखवुन मागील रिडींग -1 युनीट 68 दर्शवुन एकुण विज वापर 7772 दाखवुन 65,060/- रु. चे बिल अर्जदारास दिले होते. हे दिसून येते. याबाबत नि.क्रमांक 14 वर दाखल केलेल्या CPL चे अवलोकन केले असता, मंचास असे निदर्शनास येते की, जुन 2010 पासून ते जुलै 2012 पर्यंत गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या मिटरचे रिडींग न घेताच कधी R.N.A. तर कधी Locked तर कधी In access तर कधी Normal दाखवुन अर्जदाराला अंदाजे Average बिल दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विद्युत बिलाचा भरणा जुलै 2012 पर्यंत वेळेवर केल्याचे सदर C.P.L. वरुन दिसून येते. गैरअर्जदाराने अर्जदाराचे जुने मिटर नं. 76/14692022 काढून नवीन मिटर क्रमांक 58/01591143 ऑगस्ट 2012 मध्ये बसवुन दिले होते, ही बाब देखील सदर C.P.L. च्या कॉपीवरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदारास माहे ऑगस्ट 2012 मध्ये देयक क्रमांक 464 अन्वये एकदम विज वापर 7772 युनीट चा वापर चुकीचे दाखवुन एकदम अर्जदारास 65,060/- रु. चे चुकीचे बिल दिले होते, असे मंचास वाटते. याबाबत गैरअर्जदारास संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न करुन अर्जदाराची तक्रार अप्रत्यक्षपणे मान्य केली आहे, असा याचा अर्थ निघतो. सदरचे बिल दुरुस्त करुन द्या, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 24/09/2012 रोजी लेखी अर्ज केला होता. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 6/1 वरील तक्रार अर्जाच्या कॉपीवरुन सिध्द होते. निश्चित गैरअर्जदाराने अर्जदारास सदरचे बिल दुरुस्त न करुन देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास देयक क्रमांक 464 अन्वये दिलेले माहे ऑगस्ट 2012 चे रु. 65,060/- रु. चे बिल रद्द करण्यात येते. 3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अर्जदाराच्या मिटरचे पूढील एक महिन्याचे अर्जदारा समक्ष Photo Reading घ्यावे व नवीन प्राप्त झालेल्या Reading प्रमाणे Average Bill काढून माहे ऑगस्ट 2012 चे सुधारीत बिल अर्जदारास द्यावेत. 4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा. 5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात. सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर मा.सदस्या. मा.अध्यक्ष. | |