तक्रार क्रमांक – 513/2006 तक्रार दाखल दिनांक – 09/10/2006 निकालपञ दिनांक – 30/08 /2008 कालावधी - 1 वर्ष 10 महिना 21 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर
श्री. मोतिलाल गुप्ता चे मुखत्यार श्री. शाम सुदर गुप्ता रा. कल्याण, कचोरे, कल्याण, जिल्हा - ठाणे 421301. .. तक्रारदार विरूध्द
1. मा. श्री. मुख्य अभियंता कल्याण विभाग कल्याण. 2. मा. श्री. उपअभियंता कचोरे विभाग, कल्याण, जि. ठाणे. .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल वि.प तर्फे वकिल आदेश (पारित दिः 30/08/2008 )
मा. अध्यक्षा सौ. शशिकला पाटील, यांचे आदेशानुसार 1. तक्रारदार श्री. मोतिलाल गुप्ता हे वयस्कर असल्याने सदरची तक्रार वडिलांच्या वतीने मुलगा शाम सुंदर गुप्ता यांनी मुखत्यार या नात्याने दाखल केलेली आहे. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना विद्युत पुरवठा केला असुन दिनांक 17/08/1995 रोजी 10 एच.पी विद्युत पुरवठा मंजुर केला आहे. ग्राहक क्रमांक 020150650641 असा असुन वर्कशॉप करिता दिलेले आहे. वर्कशॉपच्या उत्पादनावरच सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. .. 2 .. जानेवारी 2001 नंतर तक्रारदार यांना 45 एच.पी विद्युत वापराचे बिल दर्शवुन मोठी रक्कम वसूल करणे सुरवात केली. तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर तुर्त आहे तसे बिल भरा नंतर अडजेस्ट करु असे विरुध्दपक्षकार यांनी वेळोवेळी सांगितलेने विश्वास ठेऊन 29 महिन्याचे बिल 45 एच.पी ने रु. 1,050/- भरले. परंतु तदनंतरही 10 एच.पी एवजी 45 एच.पी चेच देयके दिल्याने अशी देयके चुकीची असल्याने व विरुध्दपक्षकार हे तक्रारीची दखल घेत नसल्याने देयके रक्कम भरणा केली नाही. दिनांक 04/06/2003 रोजी विद्युत पुरवठा खंडीत केला त्यावेळी कोणतीही नोटिस दिली नाही दर महाचे उत्पन्न थांवले. विरुध्दपक्षकार यांना लेखी व तोंडी तक्रार बिल दुरुस्त करुन देण्याकरिता देऊनही कोणतीही दखल घेतलेली नाही. तक्रारदार हे बिल दुरुस्त करुन दिल्यास होणारी रक्कम भरण्यास तयार आहेत. विरूध्दपक्षकार यांना बिल दुरूस्त करून न देता उलट 100 रुपयाच्या स्टॅप पेपर वर मजकुर लिहुन दिल्यास दखल घेऊ असे सांगितले तसे लिहुन घेतले परंतु बिल दिले नाही व विद्युत पुरवठा पुरवरत सुरू केला नाही. दि. 25/06/2006 रोजी विरुध्दपक्षकार यांना कायदेशीर नोटिस दिली त्याचीही दखल घेतली नाही म्हणुन सदर तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले म्हणुन विनंतीः- 1. तक्रारदार यांचा 10 एच.पी विद्युत मिटर जोडुन देण्याबाबत आदेश व्हावेत. 2. तक्रारदार यांनी 45 एच.पी प्रमाणे भरलेल्या एकुण रक्कमेतुन 10 एच. पी
.. 3 .. बिलाची रक्कम वजा जाता योग्य तो हिशोब होण्याबाबत आदेश व्हावेत. 3. अर्जातील कलम 7 मध्ये नमुद केल्याप्रमाणे व्याजासह नुकसान भरपाई रक्कम मिळावी.
2. विरुध्दपक्षकार यांना मंचामार्फत नोदिस मिळाल्याने दि.18/12/2006 रोजी निशाण 9 प्रमाणे लेखी जबाब दाखल केला त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- तक्रारदार यांची तक्रार खोटी चुकीची व दिशाभुल करणारी असल्याने खर्चासह नामंजुर व्हावी. विरुध्दपक्षकार यांनी सेवेत कोणतीही त्रृटि केलेली नाही. तक्रारदार यांनी बेकायदेशीररित्या विद्युत कनेक्शन घेतले आहे हि बाब इन्स्पेक्शनच्या वेळी निदर्शनास आली म्हणुन तक्रारदार यांचेवर कार्यवाही केलेली आहे. ग्राहक क्र. 020150650641 या मिटर व अंदाजे रु.37397/- या रक्कमेचे थकीत देयक राहिले होते. तक्रारदार यांनी हि रक्कम भरना न केल्याने फेब्रुवरी 2004 मध्ये कायमचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. दिनांक 23/02/2006 रोजी वादाचे निराकरण व्हावे म्हणुन एक रक्कमेचे देयक तक्रारदार यांना देण्यात आले. फेब्रुवरी 2005 मध्ये तक्रारदार यांचा नातु मोहन गुप्ता यांनी दुसरे मिटर 020152097001 या क्रमांकाचे दुसरे विद्युत कनेक्शन घेतले त्यामध्ये चुकीचे प्रतिज्ञा लेख लेखी दिले होते डिसेंबर2005 मध्ये मोहन गुप्ता यांनी राहण्याचा पत्ता बदलला आहे म्हणुन घरगुती वापराचे विद्युत कनेक्शन व्यवसायीक कनेक्शन मध्ये रुपांतर होऊन बदलून मिळावे अशी मागणी केली त्याप्रमाणे विरुध्दपक्षकार .. 4 .. हे पहाणी करण्यास गेले असता पुर्वीचे 020150650641 हे मिटर थकित रक्कमेकरिता बंद केले आहे हे निदर्शनास आले. तक्रारदार यांनी याच मंचात तक्रार क्र. 139/2006 हि नातु यांनी दाखल केलेली आहे. विरुध्दपक्षकार हे प्रकरणात तडजोड करण्यास प्रामाणिकपणे तयार होते परंतु तक्रारदार यांनी त्यास सहा य न कल्याने दखल घेण्यात आलेली नाही म्हणुन सदर तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी असे नमुद केले आहे.
3. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला अर्ज विरूध्दपक्षकार यांचा लेखी जबाब उभयतांचे कागदपत्रे प्रतिज्ञालेख्ा लेखी युक्तीवाद दाखल केले आहेत त्यांची पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देवून आदेश करण्यात आले आहेत त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः
3.1 सदर तक्रार अर्जात मुळ तक्रारदार श्री. मोतीलाल यांचे मृत्यु पुर्वी त्यांचेकडे दिनांक 17/08/1995 पासून 10 एच.पी चे विद्युत कनेक्शन होते ग्राहक क्र. 020150650641 असा होता. तक्रारकर्ता यांना 10 एच.पी मंजुर भार मंजुर झाला होता व त्याचे नियमित देयक येत होते तथापी जानेवारी 2001 नंतर 45 एच.पी प्रमाणेच देयक मिळू लागले म्हणुन विरुध्दपक्षकार यांचे कडे तक्रार अर्ज दाखल केला असे कथन केले .. 5 .. आहे तथापी सन 2001 मध्ये व त्यावेळेपासुन तक्रारदार यांनी वादा करिता सतत पाठपुरावा केला होता या बाबत मंचापुढे कोणताही पुरावा स्पष्टपणे दाखल नसल्याने सिध्द झालेला नाही म्हणुन या ठिकाणी या मुद्दयाची दखल घेतली असता सदर तक्रार मुदत बाहय असल्याने चालणेस पात्र नाही असे स्पष्ट मत आहे.
3.2 तक्रारदार यांचा विद्युतपुरवठा चुकीच्या भारा मुळे जास्त देयक आलेने थकीत देयक राहिल्याने अखेर 04/06/2003 मध्ये कायमस्वरुपी विद्युत पुरवठा बंद केलेला आहे. असा पुरवाठा बंद करतांना विरुध्दपक्षकार यांनी नोटीस दिली नव्हती व नाही व अचानक विद्युतपुरवठा बंद केला असे हि नमुद केले आहे. तथापी तक्रारकर्ता यांनी तक्रार दाखल करतांनाचा थकीत बिल रक्कम भरणा केलेली नाही हे ही स्पष्टपणे मान्य व कबुल केले आहे. विरुध्दपक्षकार हे रु. 37397/- रुपयाची थकीत बाकी भरणेची आहे असे म्हणणे आहे तथापी तक्रारकर्ता यांनी आपली थकबाकी नेमकी किती रक्कमेची थकबाकी, केव्हा पासुन, कशी, का आहे याचा उल्लेख केलेला नाही व देयकेही दाखल केलेली नाहीत तर विरुध्दपक्षकार यांनीही थकीत बाकी बाबतचा अहवाल, स्टेटमेंट व अन्य आवश्यक कागदपत्रे पुराव्याकरिता दाखल केली नसल्याने नेमकी किती थकबाकी होती व आहे व कशी, का आहे याबाबत उभयपक्षकारांनी आपली बाजु सिध्द न केलेने या मुद्दयाची जरी मंचाने दखल घेण्याचे ठरविले असते तरी नेमकी .. 6 .. कागदपत्रे दाखल नसल्याने कोणतेही आदेश पारित करणे अशा स्थीतीत अश्ाक्य व अडचणीचे आहे म्हणुन त्याबाबत आदेश केलेले नाहित तथापी विरुध्दपक्षकार यांनी तक्रारकर्ता हे तडजोड करण्यास तयार असतील तर तडजोड करण्यास तयार आहेत अशी तयारी लेखी युक्तीवादातही दर्शवली असल्याने अखेर याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही. याठिकाणी सर्व परिस्थीतीजन्य घटलेवर स्पष्ट होते की उभयपक्षकार समप्रमाणात दोषी आहेत. म्हणुन उभयतांनी तडजोड करुनच विषयवाद मिटवणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक राहणार आहे.
3.3 तक्रारकर्तायांनी सदर अर्जास कारण दिनांक 04/03/2003 रोजी घडले असे नमुद केले आहे तथापी तक्रारदारयांनी विरुध्दपक्षकार यांना पुन्हा विद्युत पुरवठा करणे करीता अर्ज दाखल करणे हे कारण अर्जदाखल करण्यासाठी कायदेशीर व योग्य आहे असे म्हणता येणार नाही व ग्राहय धरता येणार नाही. दिनांक 09/03/2006 रोजी स्टॅम्प विरुध्दपक्षकार यांनी लिहून घेतलेला पण पुन्हा दखल घेतली नाही म्हणुन दिनांक 25/03/2006 रोजी कायदेशीर नोटीस दिली ही कारणेही अर्जास कारण घडले हे दर्शविण्यास व गृहीततेस योग्य, कायदेशीर नाहीत. म्हणुन तक्रार मुदतीत आहे असे गृहीत धरता येणार नाही. तथापि जेव्हा उभयपक्षकार हे समदोषी आहेत व हे सिध्द होते, सिध्द झाले आहे तेव्हा योग्य न्यायोचित मार्ग काढून प्रकरण/वाद मिटवणे हे ही मंचाच .. 7 .. आद्यकर्तव्य, कायदेशीर हक्क व अधिकार आहे म्हणुन पुढील आदेश पारित केले आहेत व ते उभयतांवर बंधनकारक आहेत म्हणुन आदेशः- अंतीम आदेश 1. उभयपक्षकारांनी उभयतांमधील 'मंजूर भार' व त्याप्रमाणे देयक थकबाकी रक्कम यांची आपआपसात चर्चाकरुनच तडजोड करणे उचित आहे. प्रामाणिकपणे व इगो बाजुला ठेवून एकमेकांचे उणे गुणे न काढता योग्य माफक निर्णय घेणे आवश्यक असल्याने तडजोडीने निर्णय घ्यावेत 2. उभयपक्षकारयांनी आपआपला खर्च स्वतः सोसावा. 3. उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी. 4. तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 30/08/2008 ठिकान - ठाणे (श्री. पी. एन. शिरसाट) (सौ. शशिकला श. पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|