जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/244 प्रकरण दाखल तारीख - 01/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. संतोष पि. नथुजी पञे वय 68 वर्षे, धंदा सेवानिवृत्त अर्जदार रा.सरकारी कर्मचारी,राजेंद्र नगर, नांदेड विरुध्द. 1. मूख्य अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुख्य विद्युत भवन,साठे चौक, नांदेड गैरअर्जदार 2. उप कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, शहरी उपवीभाग क्र.2, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.के.एस.नंदगिरी गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून घरगूती वापरासाठी विद्युत पूरवठा घेतलेला आहे. जूना मिटर क्र.आरसी-00077 असा आहे, व गैरअर्जदार यांनी फेब्रूवारी 2010 मध्ये जूने मिटर काढून त्याजागी नवीन मिटर क्र.6504411967 बसविले आहे. गैरअर्जदार यांनी दि.19.4.2010 रोजी रु.350/- दिलेले बिल अर्जदार यांनी भरले आहे. तसेच दि.2.6.2010 रोजी रु.13,470/-चे बिल देखील भरलेले आहे. गैरअर्जदार यांचेकडून नेलेले मिटर अर्जदार यांचे माघारी काय केले हे अर्जदार यांना माहीत नाही. गैरअर्जदार यांनी एव्हरेज बिल प्रतिमहा 83 युनिट प्रमाणे आजपर्यत दिलेले आहे. अर्जदाराचे घरी फक्त चार रुम मध्ये चार पंचवीस पॉवरचे बल्ब असून दोन पंखे आहेत, तसेच एक टी.व्ही., आहे. गैरअर्जदार यांनी अचानकपणे बोलावून रु.53,320/- चे बिल दिले आहे व ते बेकायदेशीर आहे व तसे तडजोडीची रक्कम बिल रु.12,000/- दिले व ते सुध्दा बेकायदेशीर आहे.वरील बिल कोणत्या आधारे दिले व कोणत्या प्रकारे मूल्यमापन करुन किती महिन्याचे दिले हे कोठेही लिहीलेले नाही. अर्जदाराने ञास देण्यासाठी खोटी बिले तयार करुन दिली, त्यामूळे अर्जदार यांना दिलेले बिल हे रदद करावे, तसेच मानसिक ञास झाला त्याबददल रु.10,000/- दयावेत तसेच दावा खर्च म्हणून रु,2,000/- दयावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारास त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी विज वितरण कंपनीच्या सनदी अधिका-यांनी नियमितपणे कार्यपध्दतीनुसार भेट देऊन तेथील विद्यूत संच मांडणीची पाहणी केली असता तेथे विज चोरी झालेली आढळली. त्यामूळे अर्जदाराचे विरुध्द विज कायदा 2003 च्या कलम 135 आणि 138 अन्वये महावितरण पोलिस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे दि.5.10.2010 रोजी प्रथम वर्दी अहवाल नोंदवल्या गेला आहे. अर्जदाराने दाखल केलेले हे प्रकरण ज्या मागण्या मागण्यासाठी दाखल केले आहे त्या मागण्या मान्य करता येण्याजोग्या नाहीत. अर्जदारास दिलेला विज पूरवठा दि.22.7.2010 रोजी खंडीत करण्यात आलेला आहे. त्यानंतर कित्येक दिवसानंतर हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराने स्वतः कबूल केल्याप्रमाणे स्थळपाहणी अहवालामध्हये त्यांच्या मिटरमध्ये अवरोध सापडल्यामूळे विज चोरीचा गून्हा केला आहे. तसेच असेंसमेट बिल व तडजोडीचे बिल भरण्यास तयार असल्याचे दि.19.5.2010 रोजी कबूल केले आहे. या प्रकरणामध्ये मूळ तपासणी दि.23.2.2010 रोजी अर्जदारासमक्ष झालेली आहे. विज बिल भरण्यास तयार असल्यामूळे त्यांचे विज पूरवठयास कोणताही धक्का लावला नव्हता परंतु नंतर बिल न भरल्यामूळे दि.22.7.2010 रोजी अर्जदाराचे विज पूरवठा खंडीत करण्यात आला.अर्जदाराच्या घरी ग्राहक क्र.550010359899 या क्रमांकाचे एक विज जोडणी होती जिचा मंजूर अधीभार 0.5 किलोवॅट इतका होता परंतु अर्जदाराच्या घरामध्ये या मिटरवर एकूण 150 वॅट क्षमतेचे एक फ्रिज आणि 800 वॅट क्षमतेचे एक ग्राईडर आणि 735 वॅट क्षमतेचे एक पॉवर प्लग अशी 2.61 किलो वॅट क्षमतेची विज जोडणी अनाधिकृत्यरित्या घेतलेली होती. अर्जदाराच्या मिटरची पाहणी केली असता मिटरचे बॉडी सिल उघडलेल्या अवस्थेत सापडले, तसेच मिटरची रिंडीग योग्य आढळून येत नव्हती. दिसत्या परिस्थीतीचा पंचनामा जायमोक्यावर करण्यात आला. अर्जदाराला या सर्व बाबीचा कल्पना आहे व तपासणी अहवालावर सही आहे. मिटर तपासणीसाठी नियमानुसार दि.19.5.2010 रोजी तारीख ठरविण्यात आली त्यादिवशी गैरअर्जदाराच्या कार्यालयामध्ये मिटर तपासले असता अर्जदार देखील तेथे उपस्थित होते व त्यांच्या समक्ष अक्युचेक यंञाद्वारे मिटर तपासले व त्यामध्ये मिटर 83:83 टक्के संथगतीने चालत असलेले आढळले.इतकेच नव्हे तर मिटरमध्ये एक अवरोध टाकलेला आढळला. तपासणी अहवालावर अर्जदाराने अवरोध टाकल्याने मिटर संथ झाल्याचे मान्य करुन अर्जदाराची त्यावर स्वाक्षरी आहे. ही बाब अर्जदाराने तक्रारीमध्ये जाणीवपूर्वक कथन केलेली नाही. अर्जदाराने दि.19.4.2010 व दि.2.6.2010 रोजीची बिले भरली या बाबीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.अर्जदाराने स्वतः कबूल केले आहे की, दिलेले बिल एव्हरेज बिल होते व ते बिल प्रत्यक्ष वापरानंतर आपोआप रदद होते. अर्जदाराचे घरी दि.23.2.2010 रोजी जे नवीन मिटर बदलण्यात आले त्यावरील सूरुवातीची रिंडीग 00001 इतकी होती आणि दि.30.4.2010 रोजी ती रिंडीग 1915 युनिटस इतकी होती यांचा अर्थ 68 दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण 1914 युनिट अर्थात 28.14 युनिट प्रतिदिवस असा अर्जदाराचा विज वापर होता.त्यांना दिलेली दोन्ही बिले बेकायदेशीर आहेत हे म्हणणे चूक आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारांना कार्यालयात बोलावून रु.15,000/- ची मागणी केली हे म्हणणे चूक आहे. अर्जदाराने दि.19.5.2010 रोजी गैरअर्जदाराच्या कार्यालयात येऊन विज मिटर संथ गतीने चालत असल्याचे कबूल करुन विज चोरीची बाब कबूल केली आहे. विज चोरी बाबत भाग्य नगर पोलिस स्टेशन नांदेड येथे गून्हा नंबर60/2010 नोंदविला आहे. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराच्या घरी ग्राहक क्र.550010359899 हि विज जोडणी होती व त्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःच्या नांवे 550011045138 अजून एक विज जोडणी घेतलेली होती. इतकेच नव्हे तर पठारे शैलेंद संतोष या त्यांच्या भाडेकरुच्या नांवाने त्यांच इमारतीमध्ये अजून एक विजेचे मिटर घेण्यात आलेले होते. त्यामूळे अर्जदाराची तक्रार खोटी असून गैरअर्जदार यांनी सेवेत कूठेही कमतरता केलेली नाही त्यामूळे अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार यांचे अधिका-यांनी दि.23.2.2010 रोजी अर्जदार यांचे घरातील विज मिटरची तपासणी केली असता ग्राहक क्र.550010359899 या द्वारे एक विज जोडणी घेतली होती. जोडणीचा मंजूर भार 0.5 किलोवॅट इतका असताना अर्जदाराच्या घरामध्ये एकूण 18 वॅट क्षमतेचे 12 सीएफएल तसेच 150 वॅट क्षमतेचे 04 फॅन, 150 वॅट क्षमतेचा एक टी.व्ही. 150 वॅट क्षमतेचा एक फ्रिज आणि 800 वॅट क्षमतेचे एक ग्राईडर आणि 735 वॅट क्षमतेचे एक पॉवर प्लग अशी 2.61 किलोवॅट क्षमतेची विज जोडणी अनाधिकृतरित्या घेतलेली होती. म्हणजे इतकी अधिक विज ते खेचत होते. दिसत्या परिस्थितीचा पंचनामा केला अर्जदाराला या बाबीची सर्व माहीती दिली व त्यांनी तपासणी अहवाल यावर सही देखील केली, इतकेच नाही तर दिलेले विज बिल भरल्याची तयारी दर्शविले. मिटर तपासणी साठी दि.9.5.2010 रोजी तारीख ठेवण्यात आली. त्यादिवशी अर्जदार यांचे समक्ष लॅबमध्ये मिटर तपासले. तेव्हा 83:83 हे संथ गतीने चालत असल्याचे आढळले. मिटर मध्ये अवरोध टाकून मिटर संथ केले होते. हे सर्व अर्जदाराने मान्य करुन त्यावर सही केली. गैरअर्जदाराने दिलेले बिल हे विज कायदा 2003 कलम 135 अन्वये दिलेले आहे. बिल सोबत तडजोड बिल देखील दिलेले आहे. ते असेंसमेंट बिल रु.53120/- व तडजोडीचे बिल रु.12,000/- अर्जदाराने गेल्या तिन महिन्याचे नंतरही न भरल्याकारणाने दि.5.10.2010 रोजी भाग्य नगर पोलिस स्टेशनला एफ.आय.आर. देण्यात आला. कलम 122 नुसार तडजोडीचे बिल नाही जर भरले तर यांचा अर्थ अर्जदार यांची तडजोड करायाची तयारी नाही असे समजून एफ.आय.आर. दिला जातो. गैरअर्जदाराने या संबंधी तिन महिने वाट पाहिली व मिटर टेस्टींगचे वेळी मिटरचे बॉडी सिल उघडलेल्या अवस्थेत होते. गैरअर्जदाराने जे नवीन मिटर बसवले ते पूर्णतः योग्य असून सूरुवातीची रिंडीग 01 अशी होती. दि.30.4.2010 रोजीला परत रिंडीग घेतली असता 1915 यूनिटचा वापर अर्थात 68 दिवसात दिसून आला यांचा अर्थ प्रतिदिवस 28.14 यूनिट विज वापर होता. म्हणजे दरमहा 444 यूनिट विजेचा वापर होता. यातून मागील सहा महिने जे सरासरी 83 यूनीटचे बिल देण्यात आले ते वजा केले असता दर महिन्यात 444 यूनिटचा विज वापर गृहीत धरुन सहा महिनेसाठी एकूण यूनिट 4566 व दंड म्हणून बिलाचे डबल रक्कम व मिटर कॉस्ट म्हणून रु.700/- असे एकूण रु.53,314/- चे बिल देण्यात आले.एकंदर आम्ही असेंसमेट पाहिले असता मिटर कधी फॉल्टी होते व कधी बंद होते हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून मागील सहा महिन्याचे सूरुवातीचे बिल देण्यात आले याप्रमाणे कलम 138 प्रमाणे सहा महिन्याचे बिल दिले ते योग्य आहे. हे असेंसमेंट बिल मिटर तपासणीचे नंतर जवळपास तिन महिनेनंतर म्हणजे दि.28.5.2010 रोजीला देण्यात आले. तपासणी नंतर अर्जदाराने एकही पैस बिल भरलेले नाही. वादग्रस्त बिल सोडून पूढील बिल जरी अर्जदाराने नियमित भरणे आवश्यक होते. नवीन मिटरवर आलेली रिंडीग या बददल मिटर खराब आहे असा अर्जदार यांनी आक्षेप घेतलेला नाही किंवा गैरअर्जदार यांचे कार्यालयात तक्रार ही केलेली नाही. जून्या मिटरचा पंचनामा करण्यात आलेला आहे. स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट जो गैरअर्जदाराने दाखल केलेला आहे त्यावर रिमार्कस या कलमा खाली I am ready to pay Compounding and assessment charge. असे म्हणून अर्जदाराने सही केलेली आहे. अर्जदाराने यावर आक्षेप घेत ही सही त्यांची नाही असे म्हटले आहे परंतु आम्ही एकंदर स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट वरील सही व तक्रार अर्जातील सही टॅली केली असता ती अर्जदार यांचीच सही आहे हे निष्पन्न होते. यांचा अर्थ अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. अर्जदारांना हे बिल भरण्यासाठी बराच अवधी दिला गेला परंतु अर्जदारानं यासंबंधी स्टेप्स न घेतल्यामूळे गैरअर्जदार यांनी दि.22.7.2010 रोजी त्यांचा विज पूरवठा खंडीत केला. अर्जदाराने अंदाजे किंवा सरासरी यूनिटचे बिल घेतलेले नाही तरी विजेचा वापर बघून तेवढाच विजेचा वापर गृहीत धरुन सहा महिन्याचे बिल दिलेले आहे. यांत विजेचा मिटरवरील रिंडीग प्रमाणे वापर असल्यामुळे वापरा एवढेच बिल आहे कनेक्टींग लोड असेस केल्याप्रमाणे बिल नाही म्हणून आम्ही हे बिल रु.53,320/- योग्य ठरवित आहोत. गैरअर्जदाराने रु.15,000/- ची लाच मागितली असा आरोप केलेला आहे. दि.19.5.2010 रोजी अर्जदार यांनी उप कार्यकारी अभिंयता म्हणजे गैरअर्जदार क्र.2 यांनी कबूली जवाब लिहून दिलेला आहे. यात त्यांने विज चोरीचा गून्हा कबूल केलेला आहे. खाली अर्जदाराची स्वाक्षरी आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात रु.15,000/- लाच मागितल्याचा उल्लेख केलेला आहे परंतु हे सिध्द करण्यासाठी अर्जदाराने साक्षीदार किंवा इतर काही पूरावा मंचासमोर आणलेला नाही म्हणून ही बाब न मानन्या जोगी आहे. एफ.आय.आर. ची कॉपी देखील सोबत जोडलेली आहे. एकंदर रु.350/- व रु.13470/- ही भरलेली बिले या बददल गैरअर्जदार म्हणतात ती आधी भरलेली बिले आहेत, असेंसमेटचे बिल हे वेगळे आहे. गैरअर्जदारांनी अर्जदार यांचेवर गून्हा दाखल केल्यामूळे आता तडजोडीचे बिलाचा वाद राहीला नाही. दि.3.6.2010 रोजी जे बिल दिलेले आहे ते रु.75,730/- चे आता रु.53,000/- म्हणजे अर्जदाराने तक्रार केल्याचे नंतर गैरअर्जदाराने ते कमी करुन रु.53,320/- दिलेले आहे. एकंदर घडलेला प्रकार हा सूलानाम्याचे बाहेर गेलेला आहे व विज चोरीचा गून्हा ही दाखल केलेला आहे, अशा परिस्थितीत दूसरा पर्याय नाही. अर्जदाराच्या वकिलांनी जो आक्षेप घेतला आहे त्यानुसार विचार करता घरगुती विजेचा वापर आहे व असेंसमेट बिल देताना गेल्या सहा महिन्याचे बिल व दंड देता येतो. कंम्पाऊडींग बिल देताना दर 2.61 किलोवॅट वापर लक्षात घेतला असल्यास 3 किलोवॅट असा वापर दिसतो. म्हणजे रु.12,000/- तडजोडीचे दिलेले बिल बरोबर आहे असे दिसून येते. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांचे कारवाईत कोणतीही चूक आहे असे वाटत नाही. सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 1. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. 3. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |