निकालपत्र :- (दि.29.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडून रुपये 5,000/- इतके कर्ज घेतले होते. सामनेवाला संस्थेबरोबर तडजोड व चर्चा होवून रुपये 23,000/- पूर्ण कर्जफेडीपोटी ठरले. त्यापैकी प्रथमत: रक्कम रुपये 13,000/- रोख भरणेचे आणि उर्वरित रक्कम रुपये 10,000/- दरमहा रुपये 500/- प्रमाणे हप्त्याने संस्थेमध्ये भरणेचे ठरले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रुपये 13,000/- संस्थेमध्ये रोख भरले आहेत आणि रक्कम रुपये 8,000/- वेळोवेळी संस्थेमध्ये भरले आहेत. तडजोडीची केवळ रक्कम रुपये 8,000/- सामनेवाला यांना देणे बाकी आहे. वस्तुत: सामनेवाला यांनी तक्रारदारांना वेळोवेळी कर्ज खातेचा उतारा मागणी करुनही दिलेला नाही. सामनेवाला संस्थेने तक्रारदारांकडून रुपये 5,000/- च्या कर्जफेडीपोटी बेकायदेशीरपणे चौपट रक्ककमेपेक्षाही जास्त रक्कम वसुल केली आहे. तक्रारदारांनी मानसिक त्रासापासून सुटका होणेकरिता पूर्ण कर्जफेडीची उर्वरित रक्कम रुपये 2,000/- भरुन घेवून कर्ज खातेचा नो-डयुज दाखला देणेबाबत दि.14.06.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळूनही तक्रारदारांना नो-डयुट दाखला देणेस टाळाटाळ केली आहे. सबब, सामनेवाला यांनी बेकायदेशीर वसुली केल्यामुळे तक्रारदारांना झालेले नुकसान रुपये 50,000/-, नो-डयुज देणेस टाळाटाळ करुन दिलेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/-, खर्च रुपये 5,500/- व नो-डयुज दाखला देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला संस्थेने दि.18.10.1993 रोजी पाठविलेली नोटीस, कर्जफेडी पोटी भरलेल्या रक्कमांच्या पावत्या, सामनेवाला यांनी पाठविलेले जप्ती वॉरंट, तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस दि.14.06.2010, सामनेवाला संस्थेने तक्रारदारांना पाठविलेली उत्तरी नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला संस्थेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, दि.26.11.1990 रोजी तक्रारदारांनी रक्कम रुपये 5,000/- इतके कर्ज उचल केले होते. सदरचे कर्ज थकित असल्याने लवाद क्र.274/96 चे काम चालून सदर कामी झाले आदेशानुसार वसुली कारवाई करत आहेत. वसुलीची कारवाई टाळणेचे अंतस्थ हेतूने तक्रारदारांनी रक्कम रुपये 13,000/- भरुन तदनंतर दि.07.03.2005, दि.31.03.2005, दि.07.05.2005, दि.07.06.2005, दि.05.07.2005, दि.09.08.2005, दि.07.10.2005, दि.13.02.2006 रोजी रक्कम रुपये 500/- प्रमाणे दि.20.01.2006 व दि.31.03.2006 रोजी रक्कम रुपये 1,000/- प्रमाणे रक्कमा भरलेल्या आहेत. त्यांच्या नोंदी खाते उता-यावर घेतलेल्या आहेत. त्याशिवाय इतर कोणतीही रक्कम भरलेली नाही. सदर लवाद नं.274/96 मध्ये झालेल्या आदेशाप्रमाणे सदर कर्जास जामिनदार यांचेवर वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी निश्चित करुन रुपये 13,446/- व रुपये 5,000/- वर दि.01.02.1996 पासून व्याज आकारुन कर्जफेड करुन घेणेबाबत आदेश पारीत केले आहेत. त्याप्रमाणे तक्रारदारांनी रक्कमा भरलेल्या नाहीत. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित रक्कम रुपये 2,000/- बाकी नव्हती, सदर रक्कमेपेक्षा जास्त रक्कम तक्रारदार देणे लागतात. त्याबाबत कायदेशीर नोटीस पाठविली. सब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडून दि.26.11.1990 रोजी रुपये 5,000/- इतके कर्ज घेतले आहे. तक्रारदारांनी दि.26.11.1990 रोजी रुपये 5,000/- इतके कर्ज उचल केली आहे व सदर कर्जफेडीपोटी रुपये 13,000/- भरुन तदनंतर दि.07.03.2005, दि.31.03.2005, दि.07.05.2005, दि.07.06.2005, दि.05.07.2005, दि.09.08.2005, दि.07.10.2005, दि.13.02.2006 रोजी रक्कम रुपये 500/- प्रमाणे दि.20.01.2006 व दि.31.03.2006 रोजी रक्कम रुपये 1,000/- प्रमाणे रक्कमा भरलेल्या आहेत ही वस्तुस्थिती सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात मान्य केली आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत रुपये 2,000/- देणेची तयारी दर्शविली आहे व तशी नोटीसही पाठविली आहे. परंतु, अद्याप सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे दिसून येते. सामनेवाला यांनी एकूण कर्जापैकी किती येणेबाकी आहे याबाबत त्यांच्या म्हणण्यात उल्लेख केलेला नाही व कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. याचा विचार करता तक्रारदारांनी उर्वरित रक्कम रुपये 2,000/- भरणेची तयारी दर्शवून ना-देय प्रमाणपत्र मागणी करुनही त्याप्रमाणे सामनेवाला यांनी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला संस्थेच्या सेवेत त्रुटी झालेचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी झाल्याने तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रतही हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला संस्थेने तक्रारदारांकडून रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) स्विकारुन तक्रारदारांना पूर्ण कर्जफेड झालेबाबतचे ना-देय प्रमाणपत्र द्यावे. 3. सामनेवाला संस्थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला संस्थेने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |