जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 103/2012 तक्रार दाखल तारीख – 27/06/2012
निकाल तारीख - 20/03/2015
कालावधी - 02 वर्ष , 08 म. 23 दिवस.
श्रीमती लक्ष्मी भ्र. रामराव दहिफळे,
वय – 55 वर्ष, धंदा – शेती व घरकाम,
रा.मोळवण ता. अहमदपुर जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) चेअरमन,
मोळवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
मोळवण ता. अहमदपुर जि. लातुर.
2) सचिव,
मोळवण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
मोळवण ता. अहमदपुर जि. लातुर.
3) शाखाधिकारी, (शेती कर्ज विभाग)
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लातुर,
मुख्य कार्यालय लातुर, टिळक नगर,
मेनरोड लातुर 413512.
4) मा. विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरेन्स कं.लि.,
टिळक नगर, गोरक्षण समोर,
मेन रोड लातुर, ता. व जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. आर.एम.रकटे/संगिता ढगे.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- अॅड. के.एच.मुगळीकर.
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- अॅड.एस.एस.शिवपुरकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार लक्ष्मी रामराव दहिफळे रा. मोळवण, ता. अहमदपुर, जि. लातुर येथील रहिवाशी आहे. अर्जदाराचे पतीचे नाव पांडुरंग रामराव दहिफळे आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 चे मयत रामराव दहिफळे हे त्यांचे सभासद आहेत. अर्जदाराचे पती दि. 10/03/1999 पासुन गैरअर्जदार क्र. 1 ते 2 चे सभासद होते. दि. 06/11/2009 रोजी जनता अपघात विम्याची रक्कम रु. 91/- ही गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडे जमा होती. अर्जदाराचे पती रामराव पांडुरंग दहिफळे हे दि. 19/03/2011 रोजी सकाळी 7 वाजता गावाच्या पश्चिम बाजुस असलेल्या पाझर तलावावर दोन बैल धुण्यासाठी गेले होते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यातील एक काळया रंगाचा बैल धुण्यासाठी घेवून गेले व तळयातील पाण्याच्या गाळात बैलासह फसले. व त्यातच त्यांचा बैलासह मृत्यू झाला. सदर घटना सुनिता दहिफळे हिने रामराव दहिफळे यांच्या घरी जावून सांगितले. त्यामळे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा एकनाथ, चुलत भाऊ नारायण व गावातील इतर मंडळी घटनास्थळी आली. एकनाथ व नारायण या दोघांनी तळयात जावून शोधाशोध केली असता, प्रथम काळाबैल सापडला व त्यानंतर रामराव दहिफळे यास तळयाच्या पाण्यातुन बाहेर काढले. परंतु जिवंत असतील असे कोणतेच चिन्ह दिसत नसल्यामुळे पोलीस स्टेशन किनगांव येथे नारायण यांनी फिर्याद क्र.10/11 नोंदविला. पाण्यात बुडुन मृत्यू असे तालुका दंडाधिकारी यांनी जाहिर केले. अशा प्रकारे अपघाती स्वरुपाचा मृत्यू झाला आहे. अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे दि 27/10/2009 रोजी विमा उतरविला होता. व अर्जदाराच्या पतीचा सभासद क्र. 54 आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना सर्व कागदपत्रे गोळा करुन दि. 20/04/2011 रोजी ठराव पारीत करुन देण्यात आला. दि. 31/12/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी पत्र दिले. त्यावर रामराव पांडुरंग दहिफळे यांचे वय मृत्यू तारखेस 71 वर्षाच्या पुढे दिसुन येत असल्यामुळे नो क्लेम केल्याचे कळविले. अर्जदाराच्या पतीचे प्रवेश निर्गम उतारावर दि.16/06/1941 असा जन्म दिनांक आहे. त्यांचा मृत्यू दि. 19/03/2011 आहे. यावरुन मृत्यू समयी अर्जदाराचे पतीचे वय 69 वर्षे 9 महिने 03 दिवस होते. म्हणजेच 70 वर्षोपेक्षा कमी असल्याचे दिसुन येते. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदारास तिच्या पतीचे वय 70 वर्षापेक्षा कमी असूनही अर्जदाराचा विमा दावा फेटाळलाही गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/- 15 टक्के व्याजाने देण्याचा आदेश व्हावा. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत सोसायटीचे सभासद यादी, पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची खबर, आकस्मिक मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, तालुका दंडाधिकारी यांना पोलीस स्टेशन किनगाव यांनी दिलेला अर्ज, ठराव पत्र (सोसायटीचे), रहिवाशी प्रमाणपत्र, सोसायटीचे सभासद प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, जाहीर प्रगटन, विदयार्थी प्रवेश निर्गम प्रमाणे नोंदणी रजिस्टर, इंन्शुरन्स कंपनीचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 4 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे सभासद म्हणून क्र. 54 आहे. ही बाब अर्जदाराने सिध्द करावी तसेच अर्जदाराचा तळयाच्या गाळात अडकुन मृत्यू झाला. ही बाब देखील अर्जदाराने अपघाती मृत्यू झाल्याचे सिध्द करावे. तसेच अर्जदाराने दिलेले टी.सी वरील तारीख ही दि.16/07/1939 अशी असल्यामुळे अर्जदाराचे वय 70 वर्षे 5 महिने मृत्यू समयी होत असल्यामुळे, अर्जदाराचा जनता अपघात विमा फेटाळण्यात आलेला आहे, तो बरोबर असून सदरचा तक्रार अर्ज फेटाळावा.
गैरअर्जदार क्र. 3 यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्र. 3 यांनी सर्व कागदपत्रे पाहून अर्जदाराचे पती रामराव दहिफळे हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे सभासद होते व त्यांचा दि. 27/10/2009 रोजी विमा हप्ता 91 रुपये गेरअर्जदार क्र. 4 कडे भरला होता. व त्यांचा सभासद क्र. 54 आहे, हे बरोबर आहे. तसेच प्रवेश निर्गम उता-यावर लिहिलेली जन्म तारीख दि. 16/06/1939 ही त्याचे वय 79 वर्षे 09 महिने 03 दिवस मृत्यू दि. 19/03/2011 रोजी होत असल्यामुळे तो सदर विमा मिळण्यास पात्र होता. म्हणून तक्रारदाराचा अर्ज सर्व कागदपत्रे पाहून गैरअर्जदार क्र. 3 ने दि. 21/04/2011 ते 26/04/2011 रेाजी गैरअर्जदार क्र. 4 कडे पाठविलेला आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या यादीमध्ये सभासद क्र. 54 हा मयत रामराव पांडुरंग दहिफळे याचा असून, दि. 27/10/2009 त्याने विमा हप्ता 91 रुपये गैरअर्जदार क्र. 4 कडे भरलेला आहे. त्यामुळे तो गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचा ग्राहक होतो. तसेच त्यांचा मृत्यू दि.19/03/2011 रोजी तळयाच्या गाळात सापडुन झाला. हा मृत्यू अपघाती असल्यामुळे, तो जनता अपघात विमा अंतर्गत येणा-या विमा पॉलीसीचे हक्कदार त्याचे वारस होतात.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, गैरअर्जदार क्र. 4 यांनी रामराव दहिफळे दि. 19/03/2011 यांच्या मृत्यूच्या दिनांकास अर्जदाराच्या पतीचे वय 70 वर्षापेक्षा जास्त होते. याच्या उत्तरादाखल गैरअर्जदार क्र. 4 यांनी प्रवेश निर्गम उतारा दाखल केलेला आहे. जि.प.प्रशाला अहमदपुर असे असून त्यावर विदयार्थ्याचे नांव रामराव पांडुरंग डोईफोडे असे आहे. व त्याचा प्रवेश दि. 23/06/1955 असुन जन्मदिनांक 16/07/1939 असा आहे. व प्रवेश समयी वर्ग 8 वी (ब) असून यापुर्वीचे शाळेचे नाव हायस्कुल मोमीनाबाद आहे. हा पुरावा सदर केसच्या संदर्भात दिलेला आहे. विमा कंपनी यांनी दिलेला प्रवेश निर्गम उतारा मयताचा नसुन भलत्याच व्यक्तीचा दिसुन येतो. तसेच तक्रारदाराच्या पतीचा प्रवेश निर्गम उतारा तक्रारादाराच्या वकीलांनी दाखल केलेला असून, त्यावर दि. 16/06/1941 हा जन्म दिनांक आहे. त्यावर विदयार्थ्याचे नाव रामराव दहिफळे आहे. पुर्वी शिकत असलेली शाळा एम. एस अहमदपुर आहे. व प्रवेश अनुक्रमांक 957 आहे. जिल्हा प.मा.शाळा अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड असे आहे. सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यावरुन असे दिसुन येते की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा सभासद होता. त्याने दि. 27/10/2009 रोजी विमा हप्ता भरलेला होता. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दि. 19/03/2011 रोजी पोलीस स्टेशन किनगाव येथे नोंद क्र. 10/2011 कलम 171(अ)फौ.प्र.संहिता नुसार आकस्मीक व अपघाती मृत्यूची नोंद झालेली असून, त्याचा घटनास्थळ पंचनामा झालेला आहे. यावरुन जनता अपघात विम्या अंतर्गत येणारा अपघाती मृत्यू आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात देखील रामराव दहिफळे यांचा मृत्यू death Due to Drowning असा आहे. यावरुन अर्जदाराचा मृत्यू हा अपघाती स्वरुपाचा झालेला आहे. त्याचे सभासदत्व सिध्द झालेले आहे. कागदोपत्री पुराव्यावरुन त्याचे मृत्यू समयी वय 69 वर्षे, 9 महिने, 03 दिवस दि. 16/06/1941 च्या प्रवेश निर्गम उता-यावरुन सिध्द होत असल्यामुळे, अर्जदाराचा अर्ज हे न्यायमंच मंजुर करत आहे. म्हणून अर्जदारास रु. 1,00,000/- देण्यात यावेत. मानसिक व शारीरीक त्रासापोटी 5,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावेत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/-
(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात
यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.