Maharashtra

Nagpur

CC/232/2016

SHRI. MUHILVANNA DEVARAJAN - Complainant(s)

Versus

CHENNAI PACKERS & MOVERS - Opp.Party(s)

SMT. AMAL ROHILA

16 May 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/232/2016
 
1. SHRI. MUHILVANNA DEVARAJAN
R/O. 56, FRIENDS COLONY, KATOL ROAD, NAGPUR-13
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. CHENNAI PACKERS & MOVERS
25/1, JPR PALACE, 200 FEET INNER RING ROAD, DR. AMBEDKAR NAGAR, KOLATHUR, CHENNAI-99
KOLATHUR
CHENNAI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 16 May 2017
Final Order / Judgement

 

(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला रुपये 30,000/- मधे घरगुती सामान चेन्नई वरुन नागपूर येथे पाठविण्‍याकरिता दिले होते. सदर रक्कम मिळाल्यानंतर विरुध्‍द पक्षाने रुपये 15000/- अतिरिक्त मागणी केली परंतु तक्रारकर्त्याने रुपये 5,000/- अतिरिक्त रक्कम भरणा केली. विरुध्‍द पक्षाने सदर घरगुती सामानाची बांधांबांध केल्यानंतर नागपूर पर्यत पाठविण्‍याकरिता 4-5 दिवस लागेल असे सांगीतले होते.  विरुध्‍द पक्षाकडुन सदर सामानाची बांधबांध करुन ट्रक मधे दिनांक 22.6.2015 ला चेन्नई येथुन पाठविण्‍यात आले होते ते नागपूर मधे दिनांक 9.7.2015 ला तक्रारकर्त्याला सदर सामान प्राप्त झाले. त्यातही  आयटम क्रं.-38,सुटकेस मिळाली नव्हती व त्यामधे तक्रारकर्त्याचे व त्यांच्या पत्नीचे लग्‍नाचे कपडे होते व त्यांची एकुण किंमत रुपये 65,000/- होती. तसेच आयटम क्रं.3 मिक्‍सर ग्राईंडर, कंम्प्युटर टेबल, इलेक्टीक राईस कुकर तुटलेल्या अवस्थेत मिळालेला होता त्यामुळे तक्रारकर्त्याचे रुपये 12,000/-चे नुकसान झाले व अशाप्रकारे तक्रारकर्त्याचे एकुण रुपये 77,000/- चे नुकसान झाले म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला व नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नोटीसची कोणतीही दखल घेतली नाही व चुकीचे उत्तर पाठविले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यास न्युनतम सेवा दिली असल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.  
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानीची भरपाई विरुध्‍द पक्षाने द्यावी. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे.
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन वि.प. ला नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष नोटीस मिळूनही तक्रारीत हजर झाले नाही म्हणनु दिनांक 6.10.2016 रोजी नि.क्रं.1 वर त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्याची तक्रार,शपथपत्र, तोंडी युक्तीवादावरुन मंचाचे निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो.

निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला त्यांचे घरगुती सामान चेन्नई ते नागपूर येथे पाठविण्‍याकरिता नोंदणी केली होती. व त्याकरिता तक्रारकर्त्याने एकुण रुपये 35,000/- रक्कमेचा भरणा केलेला होता ही बाब तक्रारकर्त्याने नि.क्रं.4 वर दाखल दस्त क्रं. 1 वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्त्याला आईटम क्रं.38 मिळालेला नव्हता ही बाब तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला पाठविलेल्या नोटीस व विरुध्‍द पक्षाचे दिलेल्या उत्तरावरुन सिध्‍द होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे असे सिध्‍द होते. तक्रारकर्त्याला आईटम क्रं.3 मधे असलेल्या मिक्‍सर ग्राईंडर, कंम्प्युटर टेबल, इलेक्टीक राईस कुकर तुटलेल्या अवस्थेत होता ही बाब तक्रारकर्त्याने नि.क्रं.11 वर दाखल छायाचित्रावरुन सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला आईटम क्रं.38 न देणे व आईटम क्रं.3 मधे असलेले समान तुटलेल्या अवस्थेत देणे ही बाब विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्याचे प्रती न्युनतम सेवा दिलेली असल्याने तक्रारकर्त्याचे रुपये 77,000/- चे नुकसान झाले आहे ही बाब नि.क्रं.4 वर दाखल दस्तवेजावरुन सिध्‍द होते सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो. 

अंतीम   दे   -

            1.  तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते. 

2.   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे झालेल्या नुकसानीपोटी रुपये 77,000/- दिनांक      

   9.6.2015 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह देण्‍यात यावी.  

3.   विरुध्‍द पक्षाने तक्रारर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासाबाबत   नुकसान भरपाई

   दाखल  रु.20,000/-(रुपये वीस हजार फक्त) व तक्रारीच्‍याखर्चापोटी रु.5,000/- 

   ( रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.

4.   वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30   

     दिवसांचे आंत करावी.

5.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.

6.    तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.