Maharashtra

Nashik

CC/16/2012

Parsmal Balchand Bhandari - Complainant(s)

Versus

Cheirman,Shri Sud hakar Sampat Ghadawage Krishana Gramin Bigar Sheti Sah.Patsanstha Marya.Wani Tal.D - Opp.Party(s)

R.B.Karwa

24 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/16/2012
 
1. Parsmal Balchand Bhandari
Bazar Veshijawal,Chandwad Tal.Chandwad
Nashik
Maharashtr
...........Complainant(s)
Versus
1. Cheirman,Shri Sud hakar Sampat Ghadawage Krishana Gramin Bigar Sheti Sah.Patsanstha Marya.Wani Tal.Dindori Nashik
Wani,Tal.Dindori,
Nashik
Maharashtra
2. Sanchalak, Jeevan Mohanlal samdadia,
Krishna Gramin Bigar Sheti Sah. Patsanstha Marya., Vani, Tal. Dindori
Nashik
Nashik
3. Sanchalak Bhagawan Jairam Patil,
Krishna Gramin Bigar Sheti Sah.Patsanstha Marya. Vani, Tal. Dindori,
Nashik
Maharashtra
4. Dilip Bansilal Parakh
Krishna Bigar Sheti sah. Patsanstha Marya.,Vani, Tal Dindori
Nashik
Maharashtra
5. Manager, Kiran Chandrabhan Patil
Krishna Gramin Bigar sheti Sah.patsanstha Marya., Vani, Tal.Dindori,
Nashik
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र      

           

      अर्जदार यांना सामनेवाला पतसंस्‍थेकडून रक्‍कम रु.3,69,564/- मिळावी व या रकमेवर आजपावेतो द.सा.द.शे.12% दराने व्‍याज मिळावे. नोटीस खर्च रु.1000/-  मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई पोटी रु.20,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5000/- मिळावेत, या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

सामनेवाला क्र.1 ते 5 नोटीस मिळूनही गैरहजर राहीलेले आहेत त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि.17/03/2012 रोजी एकतर्फा  आदेश करण्‍यात आले.

     अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

 मुद्देः

1.  अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? -- होय.

2.  सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय?-- होय.

    फक्‍त सामनेवाला पतसंस्‍था यांनी सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

3.  अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून ठेवपावतीवरील रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन

    मिळणेस पात्र आहेत काय?-- होय. अर्जदार हे सामनेवाला पतसंस्‍था यांचेकडून

    ठेवपावतीवरील रक्‍कम  व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत.

4.  अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम

    वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला

    पतसंस्‍था यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम वसूल होवून  

    मिळण्‍यास पात्र आहेत.

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला पतसंस्‍थेविरुध्‍द अंशतः

    मंजूर करण्यात येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 4 व  

    मॅनेजर यांचेविरुध्‍द नामंजूर करण्यात येत आहे.

 

विवेचनः

     याकामी अर्जदार  व वकील गैरहजर. युक्‍तीवाद नाही.

अर्जदार यांनी याकामी पान क्र.5 ते पान क्र.13 लगत ठेवपावतींच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत. पान क्र.5 ते पान क्र.13 च्‍या ठेवपावत्‍या सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल करुन स्‍पष्‍टपणे नाकारलेल्‍या नाहीत. पान क्र.5 ते पान क्र.13 लगतच्‍या ठेवपावतींचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

या कामी सामनेवाला यांनी हजर होवून म्‍हणणे दाखल केलेले नसले तरी सामनेवाला क्र.1 ते 4 यांना महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार जबाबदार धरलेले आहे व तसा अहवाल तयार झालेला आहे याबाबत कोणतेही कागदपत्र अर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेले नाहीत. याचा विचार होता मा. उच्‍च न्‍यायालय,  औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील रिट पिटीशन क्र. 5223/2009 निकाल तारीख 22/12/2010 सौ. वर्षा रविंद्र इसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी या निकालपत्रामधील अंतीम आदेश व विवेचनाचा विचार करता प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे कामी सामनेवाला क्र.1 ते 5 यांना संस्‍थेचे कारभाराबाबत व अर्जदार यांचे देय रकमेबाबत वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार धरता येत नाही असे या मंचाचे मत आहे.    

    सामनेवाला क्र.5 ही पतसंस्‍था असून पतसंस्‍थेच्‍या कर्जाऊ रकमेच्‍या येणा-या वसूलीच्‍या रकमेतून ठेवीदारांच्‍या ठेव रकमा देण्‍याची जबाबदारी पतसंस्‍थेची आहे.   वरील सर्व कारणाचा विचार होता सामनेवाला पतसंस्‍था यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे.   

पान क्र.5 ते पान क्र.13 च्‍या  ठेवपावतींचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.5 पतसंस्‍थेकडून पान क्र.5 ते पान क्र.13 च्‍या ठेवपावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला पतसंस्‍थेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

 

                           आ दे श

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 4 यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे. तसेच सामनेवाला क्र.5 मॅनेजर यांचेविरुध्‍दही अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.5 पतसंस्‍था विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

3) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला पतसंस्‍था यांनी पुढीलप्रमाणे रकमा दयाव्‍यातः

i) श्री.पारसमल वालचंद भंडारी वारस संजय पारसमल भंडारी यांची दि.27/04/2010 रोजी देय होणारे ठेवपावती वरील देय रक्‍कम रु.56,000/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.28/04/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

ii) श्री.पारसमल वालचंद भंडारी वारस विकास पारसमल भंडारी यांची दि.27/04/2010 रोजी देय होणारे ठेवपावती वरील देय रक्‍कम रु.47,150/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.28/04/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

                                               तक्रार क्र.16/2012

iii) श्री.पारसमल वालचंद भंडारी वारस संजय पारसमल भंडारी यांची दि.01/05/2010 रोजी देय होणारे ठेवपावती वरील देय रक्‍कम रु.56,000/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.02/05/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

iv) श्री.पारसमल वालचंद भंडारी वारस निलेश पारसमल भंडारी यांची दि.27/4/2010 रोजी देय होणारे ठेवपावती वरील देय रक्‍कम रु.56,000/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.28/04/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

v) श्री.पारसमल वालचंद भंडारी वारस मनोज पारसमल भंडारी यांची दि.01/5/2010 रोजी देय होणारे ठेवपावती वरील देय रक्‍कम रु.58,978/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.02/05/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

vi) श्री.पारसमल वालचंद भंडारी वारस मनोज पारसमल भंडारी यांची दि.16/5/2010 रोजी देय होणारे ठेवपावती वरील देय रक्‍कम रु.48,436/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.17/05/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

vii) श्री.निलेश पारसमल भंडारी वारस पारसमल भंडारी यांची दि.16/11/2011 रोजी देय होणारे ठेवपावती खाते क्र.110 वरील देय रक्‍कम रु.38,000/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.17/11/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

viii) श्री.विकास पारसमल भंडारी वारस पारसमल भंडारी यांची दि.16/11/2011 रोजी देय होणारे ठेवपावती खाते क्र.109 वरील देय रक्‍कम रु.38,000/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.17/11/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

ix) श्री.मनोज पारसमल भंडारी वारस पारसमल भंडारी यांची दि.23/11/2011 रोजी देय होणारे ठेवपावती खाते क्र.112 वरील देय रक्‍कम रु.6000/- दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.24/11/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

4) वर कलम i ते ix मधील ठेवपावतींचे मुद्दल किंवा व्‍याज यापैकी काही रक्‍कम यापुर्वी सामनेवाला यांनी अर्जदार यांना अदा केली असल्‍यास त्‍याची वजावट वर कलम i ते ix मधील रकमेमधून करण्‍यात यावी.

 5) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला क्र.5 पतसंस्‍था यांनी मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-  दयावेत.

6) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला क्र.5 पतसंस्‍था यांनी अर्जाचे खर्चापोटी रु.1000- दयावेत.   

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.