निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 03.12.2009 तक्रार नोदणी दिनांकः- 07.12.2009 तक्रार निकाल दिनांकः- 07.06.2010 कालावधी 6 महिने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. जाहेदा बेगम भ्र.मे.दौला अर्जदार वय 50 वर्षे धंदा घरकाम रा.मोमीनपूरा ( अड. एस.एन.इनामदार ) परभणी. -- विरुध्द 1 मुख्य कार्यकारी अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड ( अड.सचीन देशपांडे ) कार्यालय जिंतूर रोड,परभणी 2 उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, कार्यालय शहरी विभाग जिंतूर रोड, परभणी जि. परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. ) अर्जदाराला रिडींगप्रमाणे विद्युत बीले दिली जात नसल्यामुळे प्रस्तूतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे नावे मिटर क्रमांक 530010292173 अन्वये गैरअर्जदाराकडून वीज कनेक्शन घेतले आहे. सुरुवातीचे जुने मिटर बदलून नवीन इलेक्ट्रॉनिक मिटर बसविल्यानंतर सदर मिटरवरील रिडींगप्रमाणे एकही बील गैरअर्जदाराने दिले नाही. माहे मे 2009 ते नोव्हेंबर 2009 या काळातील प्रत्येक बिलात 44 युनिट चा वीज वापर झाल्याचे अंदाजे बील दिले आहे. एकही बील रिडींगप्रमाणे नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली होती परंतू त्याची दाखल घेतली नाही अर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदाराने अचानकपणे प्रत्यक्ष रिडींगप्रमाणे धकबाकीसह बील दिल्यास एकरक्कमी भरणे मुळीच शक्य होणार नाही जास्तीत जास्त रुपये 300/- ते रुपये 400/- दरमहा भरण्यास त्याची तयारी आहे. गैरअर्जदारास विनंती करुनही त्यानी रिडींगप्रमाणे बीले दिली नसल्यामुळे ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराने रिडींगप्रमाणे बीले देण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत गैरअर्जदारास दिनांक 27.05.2009 रोजी रिडींग प्रमाणे बील देण्याबाबत दिलेल्या तक्रार अर्जाची स्थळप्रत माहे मे 2009 ते ऑक्टोंबर 2009 पर्यतची गैरअर्जदारानी दिलेली सात बीलांच्या छायाप्रती अशी एकूण 9 कागदपत्रे दाखलकेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसपाठविल्यावर नेमलेली दिनांक 11.03.2010 रोजी एकत्रीतपणे लेखी म्हणणे (नि.11) सादर केले आहे. लेखी निवेदनामध्ये तक्रार अर्जातील वीज कनेकशनबाबत मजकूरचा मान्य केला आहे त्यांचे म्हणणे असे की, जुलै ते ऑक्टोंबर 2009 या काळात गैरअर्जदाराचे कर्मचारी ज्या ज्या वेळी अर्जदाराचे टपरीवर मिटरचे रिडींग घेण्यास गेले होते त्या त्या वेळी जागेला कुलूप असल्यामुळे मिटर रिडींग घेता आले नव्हते त्यामुळे सरासरी 44 वीज वापराची युनिटची त्या काळातील बीले दिली आहेत. तक्रार अर्जातील बाकीचा मजकूर त्यानी साफ नाकारला आहे. गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारची सेवा त्रूटी केलेली नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 2 चे शपथपत्र नि. 12 दाखल केले आहे. निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदाराच्या मिटरचे माहे मे 2009 ते ऑक्टोंबर 2009 या काळातील प्रत्यक्ष रिडींग न घेता सरासरी वीज वापराचे बील देवून सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010292173 ( तक्रार अर्जात हा नंबर मिटर नंबर असल्याचे चुकीचे लिहीले आहे ) चे चॅहा टपरी साठी वीज कनेकशन घेतले आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराचे म्हणणे असे की, पूर्वी जुन्या मिटरची रिडींगप्रमाणे बीले दिली जात होती परंतू नवीन इलेक्ट्रॉनिक मिटर बसविल्यानंतर माहे मे 2009 पासून एकही बील प्रत्यक्ष रिडींगप्रमाणे न देता सरासरी युनिटची बीले दिली जात असल्यामुळे ती प्रत्यक्ष रिडींगप्रमाणे मिळावी म्हणून गैरअर्जदाराकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची स्थळप्रत पुराव्यात नि. 4/1 ला दाखल केली आहे. शिवाय नि. 4/3 ते नि.4/9 ला माहे मे 2009 ते ऑक्टोंबर 2009 या काळातील वीज बीलांच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत त्यांचे बारकाइने अवलोकन केले असता माहे जुलै 2009 ते ऑक्टोंबर 2009 या काळातील बीलात वीज वापर सरासरी 44 युनिट असा स्थिर दाखवून बीले दिली असल्याचे स्पष्ट दिसते यावरुन अर्थातच गैरअर्जदाराने रिडींग घेण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला असल्याचे पुराव्यातून सिध्द झाले आहे. लेखी जबाबात रिडींग घेणारा कर्मचारी ज्या ज्या वेळी जागेवर जात होता त्या त्या वेळी जागेला कुलूप असल्यामुळे रिडींग घेता आले नाही असा गैरअर्जदारातर्फे बचाव घेतलेला आहे परंतू तो मुळीच पटण्यासारखा नाही कारण मुळातच अर्जदाराने घेतलेली वीज कनेकशन हे परभणी येथील सरकारी दवाखान्या समोर चॅहाचे टपरीसाठी घेतले आहे आणि सदरचे हॉटेल दररोज सकाळी 6.00 वाजे पासून रात्री 11.00 वाजेपर्यंत चालू असते असे तक्रार अर्जात व शपथपत्रातही शपथेवर सांगितलेले असल्यामुळे मुळीच खोटे मानता येणार नाही गैरअर्जदाराचे कर्मचारी कधीही रिडींग घेण्यासाठी आले नव्हते असे गैरअर्जदारास दिनांक 27.05.2009 रोजी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये नि. 4/1 वर स्पष्टपणे नमूद केले आहे त्यासाठीच मुख्यतः प्रस्तूतची तक्रार असल्यामुळे गैरअर्जदाराने लेखी जबाबातून घेतलेला बचाव मुळीच मान्य करता येणार नाही. सबब अंदाजे व सरासरी रिडींगची ग्राहकाला बीले देवून याबाबतीत गैरअर्जदारानी निश्चीतपणे सेवा त्रूटी केली असल्याचे सिध्द झाले आहे सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. . आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येतो. 2 गैरअर्जदारानी आदेशाची प्रत मिळाल्यानंतर अर्जदाराच्या मिटरचे फोटोसह प्रत्यक्ष रिडींग घेऊन अर्जदारास नवीन बील दयावे बिलामध्ये मागील धकबाकी निघत असल्यास ती अर्जदाराकडून पाच समाईक हप्त्यात वसूल करावी. 3 या खेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 500/- व अर्जाचा खर्च रुपये 500/- अर्जदारास आदेश मुदतीत रोख द्यावा अगर ही रक्कम येणे रकमेत समायोजीत करावी. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |