Maharashtra

Pune

CC/10/69

Mr. Kunal A Kamble - Complainant(s)

Versus

Chaughale Industries Pvt Ltd. - Opp.Party(s)

Ruturaj S. Chaudhari

30 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/69
 
1. Mr. Kunal A Kamble
F-1,Eight Floor, Vanraj Co-op.Hsg Society,G-Wing,S. No. 123/A,1/1,Kothrud Pune 411029
Pune
Maha
...........Complainant(s)
Versus
1. Chaughale Industries Pvt Ltd.
S.No. 53,Pune Satara Highway, Katraj, Pune-411046
Pune
Maha
2. The Managing Director , Chowgule Industries Private Limited
S.No. 53,Pune -Satara Highway,Katraj,Pune 411046
Pune
Maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

अॅड. ऋतुराज चौधरी तक्रारदारांकरिता

अॅड. आनंद आकुत जाबदेणारांकरिता

द्वारा-  श्री. एस. के. कापसे, मा. सदस्‍य

 

                                     निकालपत्र

                        दिनांक 30 मे 2012

 

तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-

 

1.           तक्रारदारांनी त्‍यांची मारुती स्विफट डिझेल व्‍ही डी आय कार क्र एम एच 12 डी वाय 5977 जाबदेणार सर्व्हिस सेंटर यांच्‍याकडे सर्व्हिसिंग व जॉब वर्क साठी दिनांक 11/11/2009 रोजी दिली. समस्‍या सांगितल्‍या. जाबदेणार यांनी जॉब कार्ड क्र जे सी 09029069 दिले व दिनांक 12/11/2009 रोजी 18.30 वा. गाडी मिळेल असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे चौकशी केली असता काम पूर्ण करण्‍यास एक आठवडा लागेल असे तक्रारदारांना सांगण्‍यात आले. त्‍यानंतर तक्रारदार जाबदेणारांकडे गेले असता आणखी 3-4 दिवस लागतील असे तक्रारदारांना सांगण्‍यात आले. चार दिवसांनंतर तक्रारदार गेले असता काही दिवसांनी येण्‍यास तक्रारदारांना सांगण्‍यात आले. तक्रारदारांनी जाबदेणार यांना गाडी दाखविण्‍यास सांगितले असता गाडी डिसमेंटल केलेली असल्‍याचे, खिडक्‍या उघडया असल्‍यामुळे कार इंटेरिअर धुळीमुळे व झाडांच्‍या पानांमुळे खराब होईल असे तक्रारदारांना वाटले म्‍हणून तक्रारदारांनी गाडी छताखाली ठेवण्‍यात यावी व जॉब तात्‍काळ पुर्ण करण्‍यास सांगितले. त्‍यानंतरही जाबदेणार यांनी काम पुर्ण केले नाही व गाडी चांगल्‍या स्थितीमध्‍ये ठेवली नाही. गाडी अभावी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदार मुंबईला कामाला जात असतांना गाडी वापरत होते, गाडी अभावी तक्रारदारांना रुपये 25,450/-खर्च करावा लागला. म्‍हणून तक्रारदारांनी दिनांक 19/12/2009 रोजी नोटीस पाठवून गाडी परत मागितली व नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- ची मागणी केली. गाडी सर्व्हिसिंग न करण्‍याबद्यल जाबदेणार यांनी खोटी कारणे दिली व विम्‍यासाठी तक्रारदारांची परवानगी न घेता, आवश्‍यकता नसतांना, खर्च केला. जाबदेणारांनी गाडी सर्व्हिसिंगला दिल्‍यानंतर तीन महिन्‍यांनी बदली इंजिनासाठीच्‍या खर्चातील अर्ध्‍या खर्चाची मागणी केली.  म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून नुकसान भरपाईपोटी रुपये 1,00,000/- मागतात, तसेच सर्व्हिसिंग झालेली गाडी, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.

 

2.          जाबदेणारांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रार दाखल करण्‍यास कारण घडलेले नाही. मिसजॉईंडर ऑफ पार्टी मुळे तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 11/11/2009 रोजी 14.51 वा. मारुती ऑन रोड सर्व्हिस नेटवर्क मधून जाबदेणार क्र.1 यांना ब्रेक डाऊन कॉल आला. 15.41 वा. सुमारास जाबदेणार क्र.1 यांच्‍या अधिकृत प्रतिनिधींनी वाहन तक्रारदारांची गाडी जिचा अपघात झाला होता, ती अटेंड केली.  त्‍यावेळी गाडी सुरु होत नसल्‍यामुळे जाबदेणार क्र.1 यांच्‍या वर्कशॉप मध्‍ये ती टो करुन आणण्‍यात आली. तक्रारदारांच्‍या समक्ष जॉब कार्ड जे सी 09029069 तयार करण्‍यात आले. तक्रारदारांच्‍या गाडीच्‍या ऑईल फिल्‍टर, ऑईल चेंबर मध्‍ये पाणी गेल्‍याचे निदर्शनास आले. याबाबत तात्‍काळ तक्रारदारांना माहिती देण्‍यात आली.  त्‍यावेळी इन्‍श्‍युरन्‍स क्‍लेम खाली गाडी दुरुस्‍त करण्‍यास तक्रारदारांनी सांगितले. त्‍यानुसार दिनांक 12/11/2009 रोजी रिपेअर ऑर्डर चे रुपांतर बॉडी रिपेअर ऑर्डर मध्‍ये करण्‍यात आले. आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता करण्‍यात आली. रिपेअर ऑर्डर, ज्‍यावर तक्रारदारांनी सही केलेली होती त्‍यावर तक्रारदारांच्‍या आवश्‍यक एनडॉर्समेंट घेण्‍यात आल्‍या.  तक्रारदारांच्‍या सुचनांनुसार दिनांक 16/11/2011 रोजी दुरुस्‍तीचे प्रायमरी एस्टिमेट तयार करण्‍यात आली व त्‍याबाबतची सुचना विमा कंपनीला देण्‍यात आली. दिनांक 18/11/2009 रोजी तक्रारदारांच्‍या गाडीचा सर्व्‍हे व  असेसमेंट करण्‍यात आले. त्‍याच दिवशी तक्रारदारांच्‍या सुचनांनुसार व त्‍यांच्‍या सहमतीनुसार जाबदेणारांनी इंजिन ऑईल व गिअर ऑईल बदलले, ब्रेक उघडून दुरुस्‍त  केले. दिनांक 19/11/2009 रोजी दुरुस्‍तीचे एस्टिमेट तक्रारदारांना कळविण्‍यात आले, ही रक्‍कम विमा कंपनीने सहन करावयाची होती. क्‍लच ओव्‍हलहॉलिंग  तक्रारदारांच्‍या  सहमतीने करण्‍यात आले. दिनांक 23/11/2009 रोजी तक्रारदारांची गाडी तपासून रस्‍त्‍यावर चाचणी घेण्‍यात आली. त्‍यावेळी गाडी पिक अप घेत नव्‍हती, स्‍मोक एक्‍झॉस्‍ट, इंजिन नॉकिंग संदर्भातील समस्‍या जाबदेणार यांच्‍या निदर्शनास आल्‍या. जाबदेणारांनी त्‍या तक्रारदारांना सांगितल्‍या. दिनांक 24/11/2009 रोजी तक्रारदार जाबदेणार क्र.1 यांच्‍याकडे आले असता, रोड टेस्‍ट मध्‍ये वरील समस्‍या तक्रारदारांच्‍या निदर्शनास आल्‍या. दिनांक 25/11/2009 रोजी इंजिन ओव्‍हरहॉल्‍ड संदर्भात तक्रारदारांच्‍या परवानगीने दिनांक 26/11/2009 रोजी इंजिन डिसमेंटल करण्‍यात आले. गाडी दुरुस्‍ती दरम्‍यान दिनांक 22/12/2009 रोजी तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस जाबदेणार यांना प्राप्‍त झाली. तक्रारदारांना गाडी दुरुस्‍तीच्‍या कामा संदर्भातील संपुर्ण तपशिल तक्रारदारांना देण्‍यात आला. गाडीमध्‍ये ब-याच समस्‍या असल्‍यामुळे दुरुस्‍तीसाठी वेळ लागत होता. त्‍यावेळी तक्रारदारांनी कारवाई करणार नसल्‍याचे व गाडी दुरुस्‍तीचे काम चालू ठेवण्‍याचे जाबदेणारांना तोंडी सांगितले. म्‍हणून काम पुढे चालू ठेवण्‍यात आले. दिनांक 5/1/2010 रोजी सर्व्‍हेअरनी गाडीची पुन: तपासणी केल्‍यानंतर सर्व्‍हेअरचा अहवाल जाबदेणार यांना  प्राप्‍त झाला. त्‍याच दिवशी गाडी तयार असल्‍याचे तक्रारदारांना कळविण्‍यात आले होते. दिनांक 11/1/2011 रोजी तक्रारदारांच्‍या समक्ष गाडीची रोड टेस्‍ट करण्‍यात आली, सर्व्हिसिंग बाबत समाधानी असल्‍याचे तक्रारदारांनी सांगितले परंतु त्‍याच दिवशी गाडी ताब्‍यात न घेता दिनांक 28 जानेवारी रोजी ताब्‍यात घेतली. गाडी दुरुस्‍ती कालावधीत तकारदारांना दुसरी पर्यायी गाडी देण्‍यात आली होती. त्‍यामुळे तक्रारदारांची प्रवास खर्चाबाबतची मागणी नामंजुर करावी अशी विनंती जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नाही म्‍हणून तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणारांनी शपथपत्र, जॉब कार्ड, क्‍लेम इंटिमेशन दिनांक 12/11/2009, सर्व्हिस एस्टिमेट दिनांक 16/11/2009, रि इन्‍सपेक्‍शन रिपोर्ट दिनांक 8/1/2010, सर्व्‍हेअरनी विमा कंपनीस दिलेले पत्र दिनांक 14/1/2010, स्‍टॅन्‍ड बाय कार दिल्‍याची तक्रारदारांच्‍या सहीची पोहोच इ. कागदपत्रे दाखल केली.

 

3.          उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या मोटर क्‍लेम फॉर्मचे अवलोकन केले असता त्‍यावर विमा कालावधी दिनांक 28/5/2009 ते 27/5/2010 असा नमूद करण्‍यात आलेला असून त्‍यावर तक्रारदारांचे नाव, पत्‍ता, गाडीचे वर्णन, अपघाताचा दिनांक 11/11/2009 नमूद करण्‍यात आलेले आहे. तसेच “ Give a short description of accident – Due to heavy Raining there was a water block @ Bavdhan internal road when I tried to pass from it vehicle engine get off” असे नमूद करण्‍यात आलेले आहे. तसेच “ Estimated cost of repairs—As per estimate Chowgule Ind. (P) Ltd.” असे तक्रारदारांनी नमूद केलेले आहे, फॉर्म खाली तक्रारदारांची सही व दिनांक 12/11/2009 नमूद करण्‍यात आलेला आहे. यावरुन तक्रारदारांच्‍या गाडीस विमा कालावधीत मध्‍ये दिनांक 11/11/2009 रोजी अपघात झाला होता व त्‍यासंदर्भात जाबदेणारांनी दिलेल्‍या एस्टिमेट नुसार तक्रारदारांनी विमा कंपनीकडे क्‍लेम केलेला होता ही बाब स्‍पष्‍ट होते. सर्व्‍हेअर, लॉस असेसर व व्‍हॅल्‍युअर श्री. महेश एम रासकर यांचा दिनांक 8/1/2010 चा रिइन्‍सपेक्‍शन अहवाल मंचासमोर दाखल करण्‍यात आलेला आहे. सदर अहवालामध्‍ये सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे केल्‍यानंतर पुढील प्रमाणे नमूद केलेले आहे “ The Insured had replaced the following damaged parts:-  Engine gaskets, Piston assy, Bearings, connecting roady assy., Arm comp rocker, Aduster valves, fuel injector assy., pump assy oil, clutch plate and pressure palate assy.. The salvage of all the damage parts replaced inspected and found in order.” यावरुन जाबदेणार यांनी गाडीमध्‍ये ब-याच दुरुस्‍त्‍या आवश्‍यक होत्‍या, त्‍या जाबदेणार यांनी केलेल्‍या होत्‍या ही बाब स्‍पष्‍ट होते. तसेच श्री. महेश एम. रासकर यांचाच दिनांक 14/1/2010 चे पत्रही मंचासमोर दाखल करण्‍यात आलेला असून त्‍यामध्‍ये तक्रारदारांच्‍या गाडीसंदर्भातील आवश्‍यक दुरुस्‍त्‍या नमूद करण्‍यात आलेल्‍या आहेत. जाबदेणार क्र.1 यांच्‍या दिनांक 11/1/2010 च्‍या दाखल जॉब शिटचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये “Customer came to w/s trial taken and he said he will call me later and inform about when he will come to collect car” असे नमूद करण्‍यात आलेले असून त्‍याखाली स्‍वाक्षरी व दिनांक 11/1/2010 नमूद करण्‍यात आलेला आहे. याचाच अर्थ सर्व्‍हेअर यांच्‍या सर्व्‍हे नंतर, सर्व्‍हे अहवाल दिनांक 8/1/2010 नंतर लगेचच 2-3 दिवसातच जाबदेणार यांनी गाडीमध्‍ये आवश्‍यक दुरुस्‍त्‍या करुन, तक्रारदारांची गाडी रस्‍त्‍यावर चालण्‍यायोग्‍य झालेली होती, तक्रारदारांनी गाडीची टेस्‍ट ड्राईव्‍ह घेतली होती ही बाब स्‍पष्‍ट होते. जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी तक्रारदारांनी सिध्‍द केलेली नाही, कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारदारांनी दिनांक 11/11/2009 रोजी त्‍यांची गाडी जाबदेणारांकडे दुरुस्‍तीसाठी दिल्‍यानंतर जाबदेणारांनी तक्रारदारांना एम एच 12 डी वाय 5977 ही गाडी स्‍टॅन्‍ड बाय म्‍हणून दिली होती हे दाखल Loaneer/Replacement पत्रावरुन स्‍पष्‍ट होते. म्‍हणजेच तक्रारदारांनी जाबदेणारांकडे गाडी दुरुस्‍तीसाठी दिल्‍यानंतर तक्रारदारांना स्‍टॅन्‍ड बाय व्‍हेईकल जाबदेणारांनी उपलब्‍ध करुन दिलेले होते, तसेच तक्रारदारांना कामासाठी मुंबईला जावे लागले, गाडी अभावी तक्रारदारांना रुपये 25,450/- खर्च करावा लागला यासदंर्भातील कागदोपत्री पुराव्‍या अभावी  तक्रारदारांची मागणी मंच नामंजुर करीत आहे.

            जाबदेणार यांनी दाखल केलेला मा. हिमाचल प्रदेश राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, सिमला यांचा श्री. राजू विरुध्‍द गोयल मोटर्स प्रा. लि F.A. No. 61 / 2010 हा निवाडा दिनांक 30/12/2010 प्रस्‍तूत प्रकरणी लागू पडतो असे मंचाचे मत आहे.

 

            वरील विवेचनावरुन, दाखल कागदपत्रांवरुन व मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निवाडयावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                          :- आदेश :-

[1]    तक्रार नामंजुर करण्‍यात येत आहे.

[2]    खर्चाबद्यल आदेश नाही.

आदेशाची प्रत तक्रारदारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 

 

 

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.