जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २६४/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०६/०९/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ०६/०६/२०१३
१) श्री. भरत मुरलीधर बडगुजर
उ.वय – ५२, धंदा – व्यावसाय,
२) सौ. शोभाबाई भरत बडगुजर,
उ.वय – ४५, धंदा – घरकाम
३) कु. निकीता महेंद्र काटवे
उ.व.-०३, धंदा – शिक्षण
चे अपाक नं.१
सर्व रा.-‘’यशोदा’’ मिरची मसाला कांडप केंद्र ,प्लॉट नं.१९,
आनंद नगर, गणपती पुलाजवळ, नकाने रोड,
देवपुर ता.जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१) श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्यादित धुळे.
कार्या – हॉटेल दिपाली च्या बाजुला, आकाश कांच दुकाना शेजारी, मुंबई
आग्रारोड, जि. धुळे.
२) श्री. नरेंद्र भास्कर शिंदे - चेअरमन सो.
उ.व.-४४, धंदा – नोकरी (ग.स. बॅंक, शाखा ३ धुळे)
रा. प्लॉट नं.१२, संतोषी माता कॉलनी, नकाने रोड,
देवपुर, धुळे.
३) श्री. संभाजी शिवाजी पाटील – व्हाइस चेअरमन सो.
उ.व.-३८, धंदा – नोकरी
रा.मु.पो. पिंपळा देवी नगर, (मोहाडी उपनगर), ता.जि.. धुळे.
४) श्री. जयवंत शंकरराव चव्हाण – सेक्रेटरी सो.
उ.व.-४२, धंदा – नोकरी (ग.स. बॅंक, मालेगाव.)
५) श्री. भारत सुरेश शर्मा - मॅनेजर
उ.व.-३८, धंदा – नोकरी
रा.अग्रवाल नगर, शनीमंदिरा जवळ, मालेगाव रोड, ता.जि. धुळे.
६) सौ. मिनाक्षी नरेंद्र शिंदे - संचालिका
उ.व.-३५, धंदा – नोकरी
रा.प्लॉट नं.१२, संतोषी माता कॉलनी, नकाने रोड, देवपुर, धुळे.
७) श्री. बाळु लक्ष्मण वाघ - संचालक
उ.व.-४५, धंदा – नोकरी
रा.मु.पो. मोहाडी उपनगर (वर्षावाडी), ता.जि. धुळे.
८) श्री. दिपक गोंवींदा देसले - संचालक
उ.व.-३२, धंदा – नोकरी
रा.मु.पो. बालचंद्र नगर (मोहाडी उपनगर), ता.जि. धुळे.
९) श्री. देवेंद्र साहेबराव पाटील (वसुली अधिकारी)
रा. प्लॉट नं.१२, संतोषी माता कॉलनी, नकाने रोड, देवपुर, धुळे.
१०) श्री. भागवत राघो देवरे - संचालक उ.व.-३८, धंदा – नोकरी
रा. राजेंद्र नगर (बळू आबा नगर), मु.पो. मोहाडी, ता.जि. धुळे.
११) सौ. पुष्पा सुरश शिंदे - संचालिका उ.व.-४२, धंदा – नोकरी
रा.मु.पो. सोनार वाडा, मोहाडी ता.जि. धुळे.
१२) श्री. संजय घनशाम पाटील - संचालक
उ.व.- सज्ञान, धंदा – नोकरी
रा.मु.पो. पिंपळा देवी नगर, (मोहाडी उपनगर), ता.जि.धुळे.
१३) श्री. नंदकिशोर भिला ओतारी - संचालक
उ.व.- ३८, धंदा – नोकरी (रिक्षा चालक)
रा.मु.पो. पिंपळा देवी नगर, (मोहाडी उपनगर),
बेघर वस्ती, धुळे. .............. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. एस.जे. वैदय)
(सामनेवाला क्रं.९ तर्फे – अॅड.एस.ए. पंडीत)
(सामनेवाला क्रं.१,२,३,५,६,११ तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्यादित धुळे’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अंतर्गत रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ
नं |
नाव |
पावती नंबर |
ठेवठेवल्याचा दिनांक |
ठेव रक्कम |
मुदत दिवस |
व्याज दर |
१ |
श्री.भरतमुरलीधर बडगुजर |
१७७ |
२३/०१/०८ |
१०,०००/- |
४६ |
९% |
२ |
श्री.भरतमुरलीधर बडगुजर |
१७८ |
०७/०२/०८ |
१०,०००/- |
४६ |
९% |
३ |
श्री.भरतमुरलीधर बडगुजर |
१८७ |
१०/०३/०८ |
१५,०००/- |
४६ |
९% |
४ |
सौ.शोभाबाई भरत बडगुजर |
३५ |
१८/०४/०६ |
५०,०००/- |
४६ |
११% |
५ |
सौ.शोभाबाई भरत बडगुजर |
१५८ |
०१/०९/०७ |
४०,०००/- |
४६ |
१०% |
६ |
सौ.शोभाबाई भरत बडगुजर |
१६५ |
१६/१०/०७ |
५०,०००/- |
४६ |
१०% |
७ |
सौ.शोभाबाई भरत बडगुजर |
१८५ |
२३/०२/०८ |
१०,०००/- |
४६ |
९% |
८ |
कु. निकीता महेंद्र काटवे |
२०७ |
२५/०४/०८ |
१०,०००/- |
४६ |
९% |
९ |
श्री.सुरेश मुरलीधर बडगुजर |
२१५ |
२५/०४/०८ |
१०,०००/- |
४६ |
९% |
वरील मुदत ठेवींची एकूण रक्कम रू.२,०५,०००/- (अक्षरी रूपये दोन लाख पाच हजार)
२. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावतींमधील एकूण रक्कम रू.२,०५,०००/- वर द.सा.द.शे. ११% प्रमाणे व्याजासह मिळावी. तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी रू.१०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.६/१ ते ६/८ व ६/१३ वर मुदत ठेव पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
३. सामनेवाला नं.९ यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रारीतील मागणी खोटी आहे. सामनेवाला नं.९ हे सदर पतसंस्थेत संचालक अथवा मॅनेजर नव्हते. ते फक्त वसुली अधिकारी म्हणून नोकरीला होते. तसेच त्यांनी दि.३०.०४.२००७ रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. असे म्हटले आहे. कलम १६४ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदयानुसार तक्रार दाखल करणेपूवर्वी दोन महिने अगोदर नोटीस बंधनकारक आहे. सदर कायदेशीर बाबींची पुर्तता केलेली नाही.
सामनेवाला नं.४,७,८,१०,१२,१३ यांना नोटीस बजावणी होत नसल्याने तक्रारदारांच्या विनंतीवरून त्यांचे नावे वगळण्यात आली.
सामनेवाला नं.१,२,३,५,६,११ यांना मे. मंचाची नोटीस मिळूनही मुदतीत हजर झाले नाही. म्हणून सामनेवाला नं.१,२,३,५,६,११ यांचे विरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
४. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाला यांचा खुलासा पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
विवेचन
५. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्यांच्या छायांकित प्रती नि.६/१ ते ६/८ व ६/१३ वर दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावत्यांमधील रक्कमा नाकारलेल्या नाही. मुदत ठेव पावत्यांमधील असलेली रक्कम याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
६. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेव पावत्यांमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘चेअरमन/ व्हाईस चेअरमन/ संचालक/ मॅनेजर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्यादित धुळे.’ यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाला नं.२,३,५,६,९,११ यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्यादित धुळे.’ यांचेकडून मुदत ठेव पावत्यांमधील एकूण रक्कम रू.२,०५,०००/- वर मुदत अखेर पावतीतील नमुद देय व्याजदराप्रमाणे एकत्रीत रक्कम सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्यांमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला नं.१ श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्यादित धुळे यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.५- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला नं.१ श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्यादित धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतींमध्ये असलेली एकूण देय रक्कम रू.२,०५,०००/- (अक्षरी दोन लाख पाच हजार मात्र) वर मुदत अखेर पावतीतील नमुद देय व्याजदराप्रमाणे एकत्रीत रक्कम व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.