Maharashtra

Dhule

CC/12/5

Anita Ragendra Patil At Post vadgai Dhule - Complainant(s)

Versus

Chatarapatai agrasen pat - Opp.Party(s)

S B patil

30 Nov 2012

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/5
 
1. Anita Ragendra Patil At Post vadgai Dhule
...........Complainant(s)
Versus
1. Chatarapatai agrasen pat
2. Narendr Baskar shinde
Deopur dhule
3. sambaji shivaji patil
deopur dhule
4. jayant shankar chavan
deopur dhule
5. Bahrat suresh sharma
deopur dhule
6. minashi narendra shinda
mohadi dhule
7. balu laxaman wagh
deopur dhul
8. dipak govinda desale
mohadi dhule
9. Bhagawat Raghoa deore
dhule
10. pushpa suresh shinde
sonar wada dhule
11. sanjay gansham patil
dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:S B patil, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                                             ग्राहक तक्रार क्रमांक –    ०५/२०१२


 

                                             तक्रार दाखल दिनांक – २३/०१/२०१२


 

                                             तक्रार निकाली दिनांक – ३०/११/२०१२


 

 


 

१. कु.अनिता राजेंद्र पाटील                                      ............ तक्रारदार


 

    उ.वय-२१ वर्षे, धंदा – शिक्षण  


 

    रा. वडजाई, ता.जि. धुळे.           


 

            विरुध्‍द


 

१.      श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था                .........विरुध्‍द पक्ष  


 

मर्या. धुळे.


 

२.      नरेंद्र भास्‍कर शिंदे – चेअरमन


 

३.      श्री. संभाजी शिवाजी पाटील – व्‍हाईस चेअरमन


 

रा.मु.पो. पिंपळादेवी नगर, (मोहाडी उपनगर),


 

ता.जि. धुळे.


 

४.      श्री.जयवंत शंकरराव चव्‍हाण – सेक्रेटरी


 

५.      श्री.भारत सुरेश शर्मा – मॅनेजर


 

रा.अग्रवाल नगर, शनिमंदीराजवळ,


 

मालेगाव रोड, ता.जि. धुळे.


 

६.      सौ.मिनाक्षी नरेंद्र शिंदे – संचालिका


 

७.      श्री. बाळू लक्ष्‍मण वाघ – संचालक


 

रा.मु.पो. मोहाडी उपनगर (वर्षावाडी),


 

ता.जि. धुळे.


 

८.      श्री. दिपक गोवींदा देसले,


 

रा.मु.पो. वालचंद्र नगर, (मोहाडी उपनगर),


 

ता.जि. धुळे.


 

९.      श्री.भागवत राघो देवरे – संचालक


 

रा.राजेंद्र नगर, (बळु आबा नगर),


 

ता.जि.धुळे.


 

१०.  सौ.पुष्‍पा सुरेश शिंदे – संचालक


 

 रा.मु.पो. सोनार वाडा, मोहाडी, ता.जि.धुळे.  


 

११.  श्री. संजय घनशाम पाटील,     - संचालक


 

 रा.मु.पो. पिंपळादेवी नगर, (मोहाडी उपनगर),


 

 ता.जि. धुळे.


 

१२.  श्री. नंदकिशोर भिला ओतारी, - संचालक


 

 रा.मु.पो. पिंपळादेवी नगर, (मोहाडी उपनगर)


 

 बेघर वस्‍ती, ता.जि. धुळे.


 

१३.  श्री. दिनेश रामचंद्र पवार - संचालक


 

१४.   श्री. राजेंद्र रघुनाथ सोनवणे – संचालक


 

१५.   श्री. सचिन जगन्‍नाथ पोतेकर – संचालक


 

१६.  श्री. भटु बुधा पवार – संचालक


 

जा.दे.नं.१,२,४,६,१३ ते १६ रा. प्‍लॉट नं.१२,


 

संतोषी माता कॉलनी, नकाणे रोड, देवपुर, धुळे.


 

 


 

कोरम


 

(मा.अध्‍यक्ष – श्री.डी.डी.मडके)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.बी. पाटील)


 

(विरुध्‍दपक्ष  – गैरहजर)


 

 


 

निकालपत्र


 

 


 

सौ.एस.एस.जैन, सदस्‍याः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था मर्या. धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 























अ.क्र.

नाव

रक्‍कम रू.

पावती क्र.

ठेव तारीख

मुदत

व्‍याज

टक्‍के

देय रू.

पुढील व्‍याज


अनिल राजेंद्र पाटील

५०,०००/-

१०२

०२/११/२००६

०२/११/२००६

   ते

०२/०१/२००८

११

५०,६८७/-

द.सा.

द.शे.

१४


 

३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्‍या रकमेची मुदतीअंती मागणी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावतीची व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.


 

      सदर कामी तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले असून, पुराव्‍यासाठी मुदतठेव पावतीची छायांकीत प्रत दाखल केली आहे.


 

 


 

४.    विरुध्‍द पक्ष क्र.१,२,३,४,६,७,८,१३,१४,१५ व १६ यांना या न्‍यायमंचाची नोटिस मिळाली असून त्‍यांच्‍या पोहच पावत्‍या प्रकरणात दाखल आहेत. तसेच विरूध्‍द पक्ष क्र.९ व १० यांना पाठविलेले या   न्‍यायमंचाचे नोटिसीचे  पाकीट ‘सदर पार्टी घेत नाही’ अशा   कुरिअरच्‍या     शे-यासह परत आले आहे.  त्‍यामुळे सदर विरूध्‍द पक्ष यांना या न्‍यायमंचाच्‍या नोटिसीचे ज्ञान झाले आहे असे समजण्‍यात येत आहे. परंतु नोटिसीचे ज्ञान होऊनही सदर विरूध्‍द पक्ष हे  प्रकरणात स्‍वतः अ‍थवा अधिकृत प्रतिनिधी द्वारे हजर झाले नाहीत. तसेच त्‍यांनी स्‍वतःचे बचावपत्रही प्रकरणात दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरूध्‍द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्‍यात आला आहे.


 

 


 

    विरुध्‍द पक्ष क्र.५,११ व १२ यांना या न्‍यायमंचाचे नोटिसीचे पाकीट ‘पत्‍ता चुकीचा’ अशा कुरिअरच्‍या शे-यासह परत आले आहे. तसेच या विरुध्‍द पक्षास नोटीस लागणे कठीण आहे त्‍यामुळे त्‍यांची नांवे प्रकरणातून वगळण्‍यात यावीत असा विनंती अर्ज तक्रारदारांनी दाखल केला आहे व तो न्‍यायमंचाने मंजूर केला आहे.    त्‍यामुळे सदर प्रकरणातून विरुध्‍द पक्ष क्र.५,११ व १२ यांना वगळण्‍यात आले आहे.


 

 


 

६.    तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता तसेच त्‍यांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकले नंतर न्‍यायमंचासमोर तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.



 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

१. तक्रारदार हे विरूध्‍द पक्ष पतसंस्‍थेचे ग्राहक आहेत काय?                        होय.


 

२. विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेने तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी


 

   केली आहे काय?                                                       होय.


 

३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?                अंतिम आदेशा प्रमाणे.


 

४. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.


 

 


 

विवेचन


 

 


 

६.    मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीची छायांकीत प्रत सादर केली आहे.  त्‍यावरुन तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

७.    मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती मध्‍ये रक्‍कम गुंतवली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव पावतीत गुंतवलेली रक्‍कम मुदतीअंती परत करणे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही विरुध्‍द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

 


 

८.    मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी, दाखल केलेली मुदत ठेव पावतींची व्‍याजासह होणारी रक्‍कम श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था मर्या.धुळे., व विरूध्‍द पक्ष क्र.२ ते १६ संचालक मंडळ यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदारांची मुदत ठेव पावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह देण्‍यास विरूध्‍द पक्ष क्र.१ पतसंस्‍था जबाबदार आहे. असे या न्‍यायालयाचे मत आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

            As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra              Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.


 

 


 

 


 

      वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. संचालक मंडळाला वैयक्तिक जबाबदार ठरविता येणार नाही. त्‍यामुळे तक्रारदार श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था मर्या.धुळे., यांच्‍याकडुन रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे.  तसेच रक्‍कम परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था मर्या.धुळे.,यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी  सह.  पतसंस्‍था मर्या. धुळे.,यांच्‍या  कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.


 

     


 

९.    मुद्दा क्र.४ - सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

आ दे श


 

१.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.    श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था मर्या.धुळे. यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्‍या मुदत ठेव पावती मधील मुदतअंती देय रक्‍कम ठरलेल्‍या व्‍याजदरानुसार व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.   मुदत ठेव पावतींचा व बचत खात्‍यांचा तपशील खालील प्रमाणे.


 























अ.क्र.

नाव

रक्‍कम रू.

पावती क्र.

ठेव तारीख

मुदत

व्‍याज

टक्‍के

देय रू.

पुढील व्‍याज


अनिल राजेंद्र पाटील

५०,०००/-

१०२

०२/११/२००६

०२/११/२००६

   ते

०२/०१/२००८

११

५०,६८७/-

द.सा.

द.शे.

१४


 

 


 

 


 

३.    श्री. छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह. पतसंस्‍था मर्या.धुळे.,यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.


 

 


 

४.    वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.


 

 


 

 


 

 


 

 


 

                  (सौ.एस.एस. जैन)                    (डी.डी.मडके)


 

                      सदस्‍या                            अध्‍यक्ष              


 

                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.