(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून दि.28/11/2006 रोजीचे कराराप्रमाणे गाळा नं.4 चा कब्जा मिळावा व खरेदीपत्र होवून मिळावे तसेच अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना गाळयाच्या किमतीचा भरणा रु.1 लाख वेळोवेळी केलेला आहे, त्याबाबत पावत्या मिळाव्यात, सामनेवाला यांना जास्तीचा दंड व शिक्षा करावी, खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांना नोटीसेस पाठवल्यानंतर अर्जदार यांनी पान क्र.32 लगत दि.14/07/2011 रोजी लेखी पुरसीस देवून सामनेवाला क्र.2 ते 10 यांची नावे या तक्रार अर्जातून वगळण्यात यावीत अशी मागणी केली यामुळे सामनेवाला क्र.2 ते 10 यांची नावे या तक्रार अर्जातून दि.14/07/2011 रोजी वगळण्यात आलेली आहेत.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.24 लगत लेखी म्हणणे व पान क्र.25 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून करारपत्रानुसार गाळा नं.4 चा कबजा व खरेदीपत्र होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे.
विवेचन
अर्जदार यांचे वतीने अँड.के.बी.सोनवणे यांनी व अर्जदार अँड.के.के.हिरे यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांचेवतीने पान क्र.40 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे. तसेच अर्जदार यांनी सुध्दा पान क्र.29 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचेबरोबर कोणताही जागा खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला नाही. अर्जदार म्हणतात तसे कोणतेही बांधकाम सामनेवाला यांनी केलेले नाही. अर्जदार यांनी कै.मोतीलाल डाकोरभाई तांबट यांचेशी संपर्क साधून सिटी सर्वे नं.706अ बाबत करार करुन घेतलेला आहे. गाळयाचे वर्णन व्यवस्थीत लिहून घेतलेले नाही. दि.12/11/2007 रोजी अर्जदार यांनी त्यांचा असलेला भाडेकरु हक्क मोबदला मुळ मालकाच्या लाभात दस्त करुन दि.03/12/2006 रोजी सोडून दिलेला आहे. अर्जदार राहात होते ती मिळकत जुनी झाल्यामुळे महापालिकेने स्वतः पाडून टाकली आहे. त्यावेळी अर्जदार यांचे भाडेकरु हक्क संपुष्टात आलेले आहे. पैशाचा गैरवापर करुन अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून खोटे दस्तऐवज करुन घेतले आहेत. त्यामुळे अर्ज रद्द करावा.” असे म्हटलेले आहे.
परंतु याकामी अर्जदार यांनी पान क्र.7 लगत अर्जदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.28/11/2006 रोजी झालेले वाद मिळकतीबाबतचे करारनाम्याची प्रत हजर केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी मुळ मालक विश्वनाथ डाकोरभाई तांबट यांचे मयत वारस दिपक विश्वनाथ तांबट वगैरे 3 यांचेबरोबर वाद मिळकतीबाबत दि.29/10/2004 रोजी जो विकसन करारनामा लिहून दिलेला आहे त्याची प्रत अर्जदार यांनी पान क्र.8 लगत दाखल केलेली आहे. जरी सामनेवाला यांनी पान क्र.7 व 8 चे कागदपत्र नाकारले असले तरी या दोन्ही कागदपत्रावरील सहया सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेल्या नाहीत.
पान क्र.7 चे करारनाम्यावरील कलम 3 अ प्रमाणे गाळा नं.4 या मिळकतीचे बांधकामाचा दर प्रती चौरस मिटर रु.500/- असा मोबदला ठरलेला आहे हे स्पष्ट होत आहे. तसेच मिळकतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर त्वरीत कबजा देणे आहे असेही ठरलेले आहे. पान क्र.7 व 8 चे कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना अर्जदार यांचेकडून बांधकामाचे किंमतीपोटी काही रक्कम येणे होत आहे असा कोठेही उल्लेख केलेला नाही तसेच किती रक्कम येणे आहे याचाही उल्लेख सामनेवाला यांनी केलेला नाही.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र कलम 7 मध्ये “दरम्यान अर्जदार यांनी दि.12/11/2007 रोजी त्यांचा असलेला भाडेकरु हक्क मोबदला घेवून मुळ मालकाचे लाभात सोडून दिलेला आहे अश्याप्रकारे दि.03/12/2006 रोजीचा करारनामा रद्द झालेला आहे.” असा उल्लेख केलेला आहे. याबाबत सामनेवाला यांनी पान क्र.35 लगत दि.12/11/2007 रोजीची स्टॅम्प रिसीट म्हणजेच हक्कसोडपत्र दाखल केलेले आहे. परंतु अर्जदार यांनी पान क्र.38 लगत प्रतिज्ञापत्र देवून पान क्र.35 चे हक्कसोडपत्र स्पष्टपणे नाकारलेले आहे. तसेच “पान क्र.35 चे हक्कसोडपत्रात अर्जदार यांची सहीच नाही, सहीखाली नाव नाही, साक्षीदार म्हणून ज्या व्यक्तींचा उल्लेख आहे त्या व्यक्ती परीचयाच्या नाहीत, दस्तात उल्लेख केलेली रु.50,000/- ही रक्कम तांबट यांनी मला दिलेली नाही. गाळा नं.4 चा खरेदी करारनामा मी रद्द केलेला नाही.” असाही उल्लेख अर्जदार यांनी पान क्र.38 चे प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला आहे.
अर्जदार यांनी पान क्र.7 मध्ये अर्जदार व सामनेवाला यांचेमधील दि.28/11/2006 रोजीचा नोटरीसमोरील रु.100/- चे स्टॅम्पपेपरवरील जो करारनामा झेरॉक्स प्रमाणीत प्रत हजर केलेली आहे. या करारनाम्यावरती अर्जदार व सामनेवाला यांची सही आहे. तसेच मिळकतीचे मुळ मालक म्हणून मोतीलाल डाकोरभाई तांबट वगैरे दहा लोकांच्या सहया आहेत
वरीलप्रमाणे गाळा क्र.4 चा खरेदीविक्रीचा करार सामनेवाला यांनी अर्जदार यांचेबरोबर मुळ मालकांच्यासहीत नोटरीसमोर करुन केलेला आहे. परंतु सामनेवाला यांनी पान क्र.35 जे हक्कसोडपत्र लिहून दिलेले आहे त्यावरती फक्त मोतीलाल डाकोरभाई तांबट यांची एकटयाचीच सही आहे. या पान क्र.35 चे हक्कसोडपत्रावर सामनेवाला यांचा तसेच मोतीलाल डाकोरभाई तांबट याची व अन्य वारसाची सही नाही तसेच पान क्र.7 चे करारपत्रावर मुळ मालक म्हणून तांबट कुटुंबियामधील ज्या एकूण 9 सदस्यांनी सहया केलेल्या आहेत त्यापैकी कोणाचीही सही पान क्र.35 चे हक्कसोडपत्रावर नाही.
पान क्र.35 चे हक्कसोडपत्र अर्जदार यांनी स्पष्टपणे नाकारलेले असल्यामुळे ते शाबीत करण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही जादा लेखी पुरावा, साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे दाखल केलेली नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार होता पान क्र.35 चे कागदपत्र पुराव्याचे कामी वाचता येत नाहीत.
पान क्र.7 चे करारपत्राप्रमाणे सामनेवाला यांनी अर्जदार यांना गाळा नं.4 या गाळयाचा कबजा व खरेदीपत्र अद्यापही लिहून दिलेले नाही याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.7 चे करारपत्रानुसार अर्जदार हे त्यांचे स्वतःचे खर्चाने सामनेवाला यांचेकडून वादातील गाळा नं.4 या मिळकतीचा कबजा व अंतीम खरेदीपत्र होवून मिळण्यास पात्र आहेत. खरेदीपत्राचा संपुर्ण खर्च पान क्र.7 मधील करारपत्रामधील अट क्र.3 ड नुसार अर्जदार करावयाचा आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी अर्जदार यांना योग्य त्या मुदतीत वाद मिळकतीचे बांधकाम पुर्ण करुन गाळा नं.4 चे खरेदीपत्र व कबजा दिलेला नाही, याचा विचार होता निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.7500/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1500/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना दि.28/11/2006 रोजीचे करारपत्रामध्ये लिहील्याप्रमाणे मौजे नाशिक येथील महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नं.706अ या जागेवर बांधलेल्या इमारतीतील बांधीव दुकान गाळा नं.4 यांचे क्षेत्रफळ 200 चौरस फुट या दुकान जागेचे अंतीम खरेदीपत्र नोंदवून द्यावे व दुकान गाळयाचा कबजा द्यावा.
3) खरेदीपत्राचा संपुर्ण खर्च अर्जदार यांनी करावयाचा आहे.
4) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.7500/- द्यावेत.
5) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1500/- द्यावेत.