- निकालपञ -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23 मार्च 2016)
अर्जदार यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून 14 एप्रिल 2015 रोजी Platina 100 es ही मोटार सायकल रुपये 53,000/- मध्ये विकत घेतली त्यावेळी एक्सचेंज म्हणून गैरअर्जदारास Splender MH 33 D 9815 या गाडीची किंमत रुपये 15,000/- गैरअर्जदारास देण्यात आली. म्हणजे गैरअर्जदारास Platina 100 es गडीची किंमत रुपये 53,000/- मधून रक्कम व गाडीचे मिळून रुपये 45,000/- देण्यात आली व गाडी अर्जदाराकडे देण्यात आली. उर्वरीत रक्कम दि.20.4.2015 ला पावती क्र.514 प्रमाणे रुपये 8000/- देण्यात आले, अशाप्रकारे गाडीची संपूर्ण किंमत गाडी विक्रेत्याला देण्यात आली. गैरअर्जदाराने गाडीची कागदपञे व गाडीची पासींग दि.17.5.2015 वडसा आरटीओ कॅम्प मध्ये करुन देतो म्हणून सांगीतले, परंतु, गैरअर्जदार दि.17.5.2015 ला कॅम्पमध्ये आला नाही व तेंव्हापासून गाडीचे कागदपञ व पासींग करुन देण्यास सतत टाळाटाळीचे उत्तर देत आहे. गैरअर्जदार शोरुम बंद करुन जवळपास 7 महिने बेपत्ता होता. त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारीरिक ञास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अर्जदाराने प्रार्थना केली की, गाडीचे कागदपञ व पासींग गैरअर्जदाराकडून करुन मिळावी, तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 20,000/- व प्रकरण दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्यात यावा.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने हजर होऊन नि.क्र.5 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.5 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात अर्जदाराची तक्रार खोटी व बनावट असल्यामुळे अमान्य केली आहे. गैरअर्जदाराने लेखीउत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदाराने सन 2006 मध्ये बजाज दुचाकी वाहन विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला होता. सदर व्यवसाय डबघाईस आल्यामुळे सदर दुकान सन 2015 मध्ये बंद केला. अर्जदाराने सन 2015 चे एप्रिल महिण्यात आपले मालकीची जुनी हिरो होंडा सुपर स्प्लेंडर गाडी बदली करुन व गैरअर्जदाराकडून बजाज प्लॅटीना ही नवीन गाडी रुपये 52,350/- व इतर किरकोळ रुपये 650/- चे सामान लावून रुपये 53,000/- ला खरेदी केली व त्याच दिवशी रुपये 30,000/- नगदी व त्यानंतर दिनांक 20.4.2015 ला रुपये 8000/- नगदी स्वरुपात गैरअर्जदारास दिले. परंतु, काही अडचणीस्तव व स्पर्धेच्या काळात गैरअर्जदारास व्यवसाय हा बंद पडला त्यामुळे गैरअर्जदारास प्रमुख एजन्सीला गैरअर्जदाराकडून पैसे देणे असल्यामुळे एजन्सीकडून गाडीचे दस्ताऐवज वेळेवर प्राप्त होऊ शकले नाही, त्यामुळे गैरअर्जदार हा अर्जदाराचे गाडीची पासींग करुन देण्यास असमर्थ ठरला. गैरअर्जदार अर्जदाराचे गाडीचे कागदपञे देण्याची व पासींग करुन देण्याची मागणी मान्य करीत असून अर्जदाराची इतर प्रार्थना खारीज करण्यात यावी.
4. अर्जदार व गैरअर्जदार यांची तक्रार, लेखी बयान, दस्ताऐवज व युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून 14 एप्रिल 2015 रोजी Platina 100 es ही मोटार सायकल रुपये 53,000/- मध्ये विकत घेतली त्यावेळी एक्सचेंज म्हणून गैरअर्जदारास Splender MH 33 D 9815 या गाडीची किंमत रुपये 15,000/- गैरअर्जदारास देण्यात आली. म्हणजे गैरअर्जदारास Platina 100 es गडीची किंमत रुपये 53,000/- मधून रक्कम व गाडीचे मिळून रुपये 45,000/- देण्यात आली व गाडी अर्जदाराकडे देण्यात आली. उर्वरीत रक्कम दि.20.4.2015 ला पावती क्र.514 प्रमाणे रुपये 8000/- देण्यात आले, अशाप्रकारे गाडीची संपूर्ण किंमत गाडी विक्रेत्याला देण्यात आली. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने सन 2015 चे एप्रिल महिण्यात आपले मालकीची जुनी हिरो होंडा सुपर स्प्लेंडर गाडी बदली करुन व गैरअर्जदाराकडून बजाज प्लॅटीना ही नवीन गाडी रुपये 52,350/- व इतर किरकोळ रुपये 650/- चे सामान लावून रुपये 53,000/- ला खरेदी केली व त्याच दिवशी रुपये 30,000/- नगदी व त्यानंतर दिनांक 20.4.2015 ला रुपये 8000/- नगदी स्वरुपात गैरअर्जदारास दिले. परंतु, काही अडचणीस्तव व स्पर्धेच्या काळात गैरअर्जदारास व्यवसाय हा बंद पडला त्यामुळे गैरअर्जदारास प्रमुख एजन्सीला गैरअर्जदाराकडून पैसे देणे असल्यामुळे एजन्सीकडून गाडीचे दस्ताऐवज वेळेवर प्राप्त होऊ शकले नाही, त्यामुळे गैरअर्जदार हा अर्जदाराचे गाडीची पासींग करुन देण्यास असमर्थ ठरला, असे कथन गैरअर्जदाराने त्याचे जबाबात केलेले आहे. गैरअर्जदाराने सदर प्रकरणात कोणतेही शपथपञ दाखल केले नसून फक्त पुरसीस दाखल केलेली आहे. सदरहू पुरसीस गैरअर्जदाराचे साक्षी पुरावा म्हणून गृहीत धरता येत नाही. तसेच गैरअर्जदाराने त्यांच्या बचाव पक्षात मांडलेले कथन व अर्जदाराचे गाडीची पासींग न करुन देण्यास दर्शविलेले कारण मंचाचे वतीने ग्राह्य धरण्यासारखे नाही. गैरअर्जदाराने बचाव पक्षात सांगीतलेले कारण सिध्द करु शकलेले नाही. मंचाचे वतीने गैरअर्जदाराने अर्जदारास विकलेली गाडीची नोंदणी करुन देणे ही गैरअर्जदाराची जबाबदारी होती व त्यांनी ती करुन दिली नाही. सबब, गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतम् सेवा दिली आहे असे सिध्द होते, म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराचे गाडीचे कागदपञ व नोंदणीकरुन अर्जदाराला अर्जदाराचे नावाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करुन द्यावे.
(3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/3/2016