(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 एप्रिल 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार यांनी दि.2.8.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडून ओनीडा कंपनीचा ए.सी. (1.5 टन) सी.नं.30111122302 हा रुपये 19600/- मध्ये खरेदी केला. गैरअर्जदार क्र.1 ने सदर ए.सी.ची दोन वर्षाची वॉरंटी असल्याचे सांगीतले. मार्च 2012 मध्ये अर्जदाराचा ए.सी. बंद पडला, त्याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे तक्रार केली. त्यावर ओनीडा कंपनीचे अधिकृत मेकॅनिक श्री रहमान, रा. चंद्रपूर हे चामोर्शी येथे येऊन अर्जदाराचा ए.सी. तपासला, परंतु त्याला ते दुरुस्त करता आले नाही. श्री रहमान यांनी अर्जदाराला सांगितले की, ए.सी मध्ये दुरुस्त होण्यासारखा दोष नाही, मॅनुफॅक्चरींग डिफेक्ट असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ए.सी. बदलवावा लागेल असे सांगून वरीष्ठांकडे कळविण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 कंपनीचे कोणतेही अधिकारी आले नाही व ए.सी.दुरुस्त करुन दिले नाहीत किंवा बदलवून दिले नाही. अर्जदाराने दि.11.9.2012 रोजी गैरअर्जदारांना वकीलामार्फत नोटीस पाठवून ए.सी.बदलवून देण्याबाबत कळविले. नोटीस तामील होऊन सुध्दा गैरअर्जदारांनी अर्जदाराचा ए.सी.बदलवून दिला नाही किंवा नोटीसाला उत्तरही दिले नाही. त्यामुळे अर्जदाराने ए.सी. नंबर 30111122302 बदलवून द्यावा किंवा त्याची किंमत रुपये 19,600/- व्याजासह अर्जदराला वापस करावे, तसेच शारिरीक, मानसीक ञासापोटी रुपये 5000/- गैरअर्जदारांनी द्यावे अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार लेखी उत्तर दाखल केले. तसेच गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.18 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.18 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरातील विशेष कथनात अर्जदाराची तक्रार मान्य केली. गैरअर्जदार क्र.1 ने माझे दुकानातून ए.सी.खरेदी केल्यामुळे व ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान व्हावे व ग्राहक नाराज होऊ नये या दृष्टीकोनातून अर्जदाराचा ए.सी. दुरुस्त व्हावा. परंतु, ओनिडा कंपनीतर्फे कोणीही आले नाहीत व अर्जदाराचा ए.सी.दुरुस्त किंवा बदलवून दिला नाही. अर्जदाराचे ए.सी. मध्ये मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट असल्यामुळे ते गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराला बदलवून देणे न्यायोचीत असल्याचे उत्तरात नमूद केले. गैरअर्जदार क्र.1 चा यात कोणताही दोष नाही. गैरअर्जदार क्र.1 अर्जदाराला ए.सी. ची किंमत परत करण्यास जबाबदार नाही.
4. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्तरात असे सांगितले की, अर्जदाराने खरेदी केलेली ए.सी. वॉरंटी कार्डमध्ये दिलेल्या शर्ती व अटीनुसार कंपनी किंवा ग्राहकामध्ये असलेला वाद मुंबई दिवाणी न्यायालयात निवारण करता येईल असे नमूद आहे म्हणून या मंचाला सदर वादाचा निवारण करण्याचा कोणताही अधिकारक्षेञ नाही. अर्जदाराने लावलेले सर्व आरोप गैरअर्जदार क्र.2 ला नाकबूल आहे. गैरअर्जदार क्र.2 ने पुढे असे कथन केले आहे की, ए.सी. दुरुस्त करण्याकरीता पाठविलेला इंजीनियरला अर्जदार ए.सी. दुरुस्ती करु देत नाव्हते. म्हणून गैरअर्जदार क्र.2 च्या कंपनीने सेवेत कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. सबब, अर्जदाराची तक्रार रद्द करावी.
5. अर्जदाराने नि.क्र.24 नुसार शपथपञ, नि.क्र.27 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.26 शपथपञ, नि.क्र.29 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) अर्जदाराची तक्रार मंचाचे अधिकारक्षेञात आहे काय ? : होय
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदाराचा दावा मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदार यांनी दि.2.8.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडून ओनीडा कंपनीचा (गैरअर्जदार क्र.2) ए.सी. (1.5 टन) सी.नं.30111122302 हा रुपये 19,600/- मध्ये खरेदी केला, ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने दि.2.8.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 श्री बालाजी एन्टरप्राईजेस, मेन रोड, चामोशी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथून गैरअर्जदार क्र.2 च्या कंपनीचा ए.सी. (1.5 टन) सी.नं.30111122302 हा रुपये 19,600/- मध्ये खरेदी केला, ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य आहे. सदर प्रकरणात ए.सी.(1.5 टन) सी.नं.30111122302 हा रुपये 19600/- मध्ये खरेदी केला. सदर प्रकरणात अर्जदार किंवा गैरअर्जदार क्र. 2 ने वरील खरेदी केलेले ए.सी. संबंधी वॉरटी कार्ड दाखल केलेले नाही. म्हणून गैरअर्जदाराचे असे म्हणणे की, वॉरंटीकार्ड मध्ये असलेल्या शर्ती व अटीनुसार कंपनी व तिच्या ग्राहकामध्ये असलेले कोणतेही वादाचे अधिकारक्षेञ दिवाणी न्यायालय, मुंबई येथे आहे असे म्हणणे न्यायसंगत राहणार नाही. म्हणून मंचाचे मताप्रमाणे अर्जदार व गैरअर्जदारांना झालेला ए.सी. संबंधीत वाद या मंचाच्या अधिकारक्षेञात घडलेला असून या मंचाला सदर वाद निवारण करण्याचा अधिकार आहे. सबब, मुद्दा क्र.2 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. अर्जदाराने वरील उल्लेख केलेला ए.सी. गैरअर्जदार क्र.1 कडून गैरअर्जदार क्र.2 चे कंपनीकडून घेतले होते व त्याचेमध्ये वॉरंटी कालावधीचे आंत ञुटी निमार्ण झाली ही बाब गैरअर्जदार क्र.1 ला मान्य आहे व अर्जदाराने वारंवार गैरअर्जदाराला सदर ञुटीचे निवारण संदर्भात गैरअर्जदारांना संपर्क साधला तरीसुध्दा अर्जदाराची ए.सी. दुरुस्त झाली नाही, म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 ने अर्जदाराप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.3 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
9. मुद्दा क्र.1, 2 व 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराचा ए.सी. आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत दुरुस्त करुन द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने वैयक्तीक व संयुक्तरित्या अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-24/4/2014