Maharashtra

Chandrapur

CC/15/151

Akil Uddin Saiyyad Ahamad At Chandrapur - Complainant(s)

Versus

Chandrapur Mahanagarpalika Chandrapur - Opp.Party(s)

Adv. Niwale

07 Nov 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/151
 
1. Akil Uddin Saiyyad Ahamad At Chandrapur
Pathanpura Ward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chandrapur Mahanagarpalika Chandrapur
Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. M/s Ujjwal Constraction Co.Ltd Chandrapur
Chandrapur
Chandrapur
Maharashtra
3. B.R.DETHE through maharashtra Jiwan Pradhikarn Chandrapur
Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

निशाणी क्रं. ०१ वर आदेश

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- ०७/११/२०१५ )

 

      अर्जदाराचे तक्रारीची थोडक्‍यात हकीकत अशी आहे कि, अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. ०१ हे स्‍थानिक प्रशासन आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. ०२ व ०३ कडून नविन नळ कनेक्‍शन बाबत शुल्‍क भरुन नविन नळ कनेक्‍शन लावून घेतले आहे. तरी सुध्‍दा पाईप लाईन कनेक्‍शन मधून पाणि पुरवठा सुरु झाला नाही त्‍याबाबत अर्जदाराने गैरअर्जदारांना दि. १५.०१.२०१५ रोजी लेखीपञ देवून नविन नळ कनेक्‍शन देण्‍याची विनंती केली. अर्जदाराने नळ कनेक्‍शन घेवून सुध्‍दा त्‍याच्‍यामध्‍ये पाणि पुरवठा झाला नाही म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्‍युनतम सेवा दिली आहे त्‍यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराला नविन नळ कनेक्‍शन बांधून दयावे व त्‍यात पाणि पुरवठा सुरु करुन दयावे. अर्जदारातर्फै वकीलांनी तक्रारीत प्राथमिक युक्‍तीवाद केले व त्‍यात अर्जदाराने मा. राज्‍य ग्राहक आयोग नवी दिल्‍ली यांनी दिलेले पी. के. कनुजा विरुध्‍द मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिल्‍ली बोर्ड च्‍या न्‍यायनिवाडा दाखल केला सदर न्‍यायनिवाडयाची पडताळणी करतांना असे दिसले कि अर्जदाराने जर पाणी पुरवठा करीता कनेक्‍शन आणि पाणी शुल्‍क भरला असेल तर अर्जदार ग्राहकाच्‍या संज्ञेत मोडत आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत नि. क्रं. ०५ वर दस्‍त क्रं. अ- २ वर कराची पावती लावलेली आहे त्‍यात गैरअर्जदार क्रं.०१ कडून कोणतेही पाणी पुरवठाकरीता शुल्‍क घेतलेले नाही. सबब अर्जदाराने दाखल न्‍यायनिवडयात असलेले तथ्‍य सदर प्रकरणात लागु पडत नाही.  त्‍यामुळे अर्जदार व गैरअर्जदार क्रं. ०१ मध्‍ये कोणताही ग्राहक व विक्रताचा संबंध स्‍थापीत होत नाही अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. ०१ चा ग्राहक नाही असे प्राथमिक दृष्टिने सिध्‍द होते. अर्जदाराने नि. क्रं. ०५ वर दस्‍तजजक्र.अ- ०१ ची पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदाराने गैरअर्जदार  क्रं. ०२ व ०३ कडून बसविलेली पाईप लाईन  संबंधीत कोणताही वाद नाही फक्‍त त्‍या पाईप लाईनमधून अर्जदाराला गैरअर्जदार क्रं. ०१ कडून पाणी सोडण्‍यात आलेलें नाही. म्‍हणून असे निष्‍पन्‍न होते कि, अर्जदार  व  गैरअर्जदार क्रं. ०२ व ०३ मध्‍ये पाईप लाईन संबंधीत कोणताही ग्राहक वाद नाही. वरील नमुद कारणास मंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येते

अंतीम आदेश

१.  अर्जदाराची तक्रार अस्विकुत करुन खारीज करण्‍यात येत आहे.

      २.  अर्जदाराने आपला खर्च सहन करावा.

      ३.  अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

      ४. सदर आदेशाची प्रत संकेत स्‍थळावर टाकण्‍यात यावी.

      

 

 

चंद्रपूर

दिनांक -   ०७/११/२०१५

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.