जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 154/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-25/01/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/09/2013.
1. श्री.विनायक तुकाराम चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
2. कु.पुनम विनायक चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः शिक्षण,
दोघे रा.गट नं.95/3, प्लॉट नं.7,
तळेले कॉलनी, जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. प्रशासक, सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर सह.
पतसंस्था, वरणगांव, जि.जळगांव व इतर 4 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्री.चंद्रकांत मो.येशीराव, सदस्यः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी नोव्हेंबर,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 30/09/2013.
(श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.