तक्रार क्रमांक– 66/2008 तक्रार दाखल दिनांक–04/02/2008 निकालपत्र दिनांक–30/08/2008 कालावधीः-00 वर्ष06 महिने26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
श्री.घनश्याम बाबुभाई सीसांगीया , प्रांची अपार्टमेंट,ए/4 मसोली, डहाणू जि. ठाणे .. तक्रारदार विरूध्द चंद्रकांत हरी बढे संस्थापक चेअरमन, , सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., वरणगाव , ता. भुसावळ , जि. जळगाव .. सामनेवाला (एकतर्फा)
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः - तक्रारदारः- स्वतः हजर वि.पः-गैरहजर (एकतर्फा) एकतर्फा निकालप'त्र ( पारित दिः 30/08 /2008 ) मा. सौ.शशिकला श. पाटील यांचे आदेशानुसार 1. सदर तक्रार तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे त्यांचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- तक्रारकर्ता यांनी विरूध्दपक्ष संस्थापक चेअरमन सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., वरणगाव, तालुका - भुसावळ, जिल्हा जळगाव, शाखा मसोली डहाणू रोड, जिल्हा ठाणे या संस्थेत 2/- सेव्हींगखाते/मुदतबंद ठेव खाते उघडल्याने तक्रारकर्ता हे विरूध्द पक्षाचे ग्राहक आहेत. श्री. चंद्रकांत हरी बढे हे संस्थापक असल्याने त्यांचे विरूध्द तक्रार दाखल केली आहे. सदर को.ऑप. सोसायटी जिल्हा - ठाणे येथील पुर्णपणे बंद आहे. फक्त मुख्य कार्यालय जळगाव येथील सोसायटी सुरू आहे. जिल्हा ठाणे येथील संस्था बंद होण्यापुर्वी व्यवहार केलेली असून तक्रारकर्त्यांचे प्रथम वि.पक्षाकडे पुर्नगुंतवणूक ठेव (दाम दुप्पट) रु.25,000/-दि.2/3/2004 पावती क्र.087454 ''मुदत ठेव' 25,500/-रुपये दि.11/8/2006 पावती क्र.056516 व पावती क्र.056517 25,500/- रुपये बचत खाते क्र.216 मध्ये रु.60,226/-/- (रुपये साठ हजार दोनशे सव्वीस फक्त) शिल्लक होती.तक्रारकर्ता यांना रक्कमेची अत्यंत आवश्यकता भासल्याने रक्कम काढणेस गेले असता तेव्हा हमी म्हणुन स्टॅम्पवर रक्कम मिळेल म्हणून लिहून दिले. परंतु अखेरपर्यंत वेळोवेळी रक्कम मागणी करुनही परत न केल्याने सदर तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे. म्हणुन विनंती मागणी की- 1. तक्रारकर्ता यांचे बचतखातेवर असलेली सर्व रक्कम 60,226/- व्याजासह परत मिळावी. 2. मुदत ठेवीची मुदत ही संपली असल्याने ''मुदत ठेव'' व पुर्नगुंतवणूक ठेवीप्रमाणे ठेवली ती सर्व रक्कम रुपये 60,226/- (रुपये साठ हजार दोनशे सव्वीस फक्त) व्याजासह मिळावी. 3. मानसिक शारिरीक त्रास व नुकसान सहन करावे लागलेमुळे रुपये. 6,000/- नुकसान भरपाई अशी रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. सदर तक्रार मुदतीत असून, पुराव्या करिता प्रतिज्ञालेख, कागदपत्रे दाखल केली आहेत. विरूध्द पक्षास मंचामार्फत रजि. एडीने पाविलेले नोटीस स्विकारली आहे. विरूध्द पक्षास संधी देवून ही नेमल्या तारखेस मंचात हजर राहून लेखी जबाब दाखल केलेला नाही व सतत हजर रहाणे टाळले आहे. म्हणुन '' म्हणणे नाही '' (एकतर्फा आदेश) असा आदेश्ा पारित करणेत 3/- येवून, एकतर्फी सुनावणीस ठेवण्यात आले. सुनावणीच्या तारखेसही हजर राहत नसल्याने जाणून बुजून टाळाटाळ केली आहे हे सिध्द झालेने अखेर एकतर्फी सुनावणी पुर्ण करण्यात आली व पुढील आदेश करणेत आली. - आदेश - 1. तक्रारकर्ता यांचा तक्रार अर्ज एकतर्फी अंशतः मंजूर करणेत आला आहे.
2. विरूध्दपक्षकार यांनी तक्रारकर्त्यांची सोसायटीमध्ये ''बचत खाते'' 'मुदत ठेव' पुर्नगुंतवणूक ठेव खात्यामध्ये जमा असलेली रुपये एकूण 60,226/-(रुपये साठ हजार दोनशे सव्वीस फक्त) अशी रक्कम ठरल्या व्याजा प्रमाणे त्वरित परत करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे म्हणुन अशी सर्व रक्कम ठरल्या व्याजासह परत करावी.
3. 'मुदत ठेव' परिपक्व झाली असल्याने परिपक्वतेच्या तारखे नंतरही संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत मुदत ठेवीवर 'द.सा.द.शे 9% व्याज दराने रक्कम फिटेपर्यंत व्याजासह रक्कम दयावी. 4. सदर अर्जाचा खर्च रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्त) व मानसिक त्रासासाठी रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्त) तक्रार कर्त्यास द्यावे. अशा आदेशाचे पालन विरूध्दपक्ष यांनी आदेशांची सही शिक्क्याची प्रत मिळणे पासून 30 दिवसात पुर्णपणे एकरक्कमी परस्पर (डायरेक्ट) देय करण्याचे आहे.
असे विहीत मुदतीत न घडल्यास मुदती नंतर रक्कम
फिटेपर्यंत सर्व रक्कमेवर द.सा.द.शे 2% व्याज दराने दंडात्मक व्याज (पिनल इंट्रेस्ट) म्हणुन रक्कम देण्यास पात्र व जबाबदार कायदेशिररीत्या आहेत.
6.उभयतांना आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात
4/- यावी.
7.तक्रारकर्ता यांनी मा. सदस्य यांचे करिता दाखल केलेले 2 सेट त्वरित परत घेवून जावेत. म्हणुन केले आदेश.
दिनांक –30 /08/2008 ठिकाण- ठाणे
( श्री. पी.एन.शिरसाट ) ( सौ.शशिकला श. पाटील ) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|