जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 162/2010 तक्रार दाखल तारीख- 28/02/2011
लिंबा पि. पंढरी आनवणे,
वय – 60 वर्ष, धंदा – शेती
रा.चाकरीवाडी ता.जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवसथापक,
चंपावती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.बीड
2. मार्फत मा.अध्यक्ष अवसायक मंडळ,
चंपावती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.बीड
मुख्य कार्यालय, बशीरंगज
बीड, ता.जि.बीड (प्रशासक) ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – एन.ए.बारगजे,
सामनेवालेतर्फे – एकतर्फा आदेश,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा रा.चाकरवाडी ता.जि.बीड येथील रहिवाशी असुन त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे व त्यावर त्यांचा व त्यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तक्रारदार हा त्याच्या बागायत शेतीमध्ये ऊस, भूईमुंग, कापूस, ज्वारी इ.पीके घेतो. शासनाने 1980 साली वाघेबाभूळगांव ता.जि.बीड येथील तलावासाठी जमीन संपादीत करण्यासाठी तक्रारदाराची 3 एकर जमिन संपादीत केली गेली. त्यामुळे तक्रारदारास शासनाने दिलेल्या मावेजा रक्कम व तक्रारदाराचे शेती उत्पन्नातुन शिल्लक असणारी रक्कम तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे मुदत ठेव स्वरुपात ठेवली.
तक्रारदाराचे सामनेवाले यांचेकडे एक बचत खाते व एक मुदत ठेव कर्ज खाते आहे. त्याचा खाते क्रमांक अनुक्रमे 35/9542 व 176/2944 असा आहे. तक्रारदार हा पूर्णपणे अशिक्षित असुन त्याने खाते उघडताना स्वत:च्या सहीच्या जागी निशाणी अंगठा दिलेला आहे. याचा गैरफायदा घेवून सामनेवाले यांचे संबंधीत कर्मचा-यांने दि.30.3.2007 रोजी तक्रारदाराचे मुदत ठेव पावत्या खाते क्र.176/2944 यावर वर्ग केल्या. व दि.09.04.2007 रोजी सदर खात्यातुन रक्कम तक्रारदाराचे सही शिवाय लिपिक व पासिंग अधिकारी यांचे संगनमताने काढून घेतली. अशा प्रकारे सामनेवाले यांचे कर्मचा-यांने रु.17,00,000/- एवढा अपहार केला आहे. त्यामुळे तक्रारदारास शेती व्यवसाय करण्यासाठी लागणारी रक्कम तक्रारदार वेळेत मिळूशकली नाही त्यामुळे तक्रारदाराचा शेती हा व्यवसाय अडचणीत आला व तक्रारदारास उपासमारीची वेळ आली असे म्हंटले आहे.
दि.7.7.2006 रोजी 18 महिने मुदतीसाठी रक्कम रु.4,32,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजदाराने पावती क्र.35/24240 याद्वारे गुंणतवले होते. तक्रारदार हा दि.10.12.2007 रोजी सामनेवाले यांचेकडे गेला असता सदर रक्कम हि खाते क्र.35/9542 यावर वर्ग केल्याचे दाखविण्यात आले. परंतु तक्रारदाराने स्लिप क्र.26078 याने रक्कम उचलल्याचे दाखवले. सदर स्लिपवर खातेदाराचा अंगठा लावला त्यात दस्तुद केला नाही. व ती रक्कम तक्रारदाराने उचलली नाही असे म्हंटले असुन सदर रक्कम ही खाते क्रमांक
खाते क्रमांक खातेदाराचे नाव रक्कम रुपये
1. 174/91 सिध्दार्थ सायकलमार्ट बीड 1,16,000/-
2. 174/216 श्री.साई मेडिकल 16,000/-
3. 23/5002 श्री.गणेश अर्जुनराव सांळुके 3,00,000/-
एकुण 4,32,000/-
वरील रक्कम तक्रारदारास अदा न करता सामनेवाले यांनी वरील खाते क्रमांकाच्या नांवाने वर्ग केली आहे. दि.17.1.2008 रोजी रक्कम रु.12,00,000/- रक्कम काढण्याची पावती क्र.34846 यावर अंगठा लावून दस्तुर न घेता कॅशपेड शिक्का मारुन पैसे काढल्याची नोंद केली आहे. पैसे काढल्याच्या पावतीच्या मागे एफडीआर-7, (165)-3, रोख-2 असे एकुण 12 लिहून सदर पावतीचा हिशोब पूर्ण दाखवला गेला आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.17.1.2008 रोजी सातलाख रुपयाचे एकुण प्रत्यकी एकलाखाच्या सात पावत्या प्रत्यकी दहा महिने मुदतीच्या 13 आणि 15 टक्के द.सा.द.शे व्याज देय असणा-या मुदत ठेव पावत्या दिल्या
अक्र. मुदत ठेव पावती क्रमांक रक्कम व्याजदर मुदत ठेव
1. 35/30649 1,00,000 13 % 10 महिने
2. 35/30649 1,00,000 15 % 10 महिने
3. 35/30650 1,00,000 15 % 10 महिने
4. 35/30651 1,00,000 13 % 10 महिने
5. 35/30652 1,00,000 13 % 10 महिने
6. 35/30653 1,00,000 13 % 10 महिने
7. 35/30654 1,00,000 13 % 10 महिने
एकुण रुपये 7,00,000/-
उपरोक्त मुदत ठेव पावती हया कॅश रिसिव्हड शिक्का मारुन दिल्या. उर्वरीत रुपये दोन लाख सामनेवाले यांचे कर्मचा-यांनी रोख दिले म्हणून खालील प्रमाणे दाखविले.
अ.क्र. रक्कम उचल करणा-याचे नांव चेक नंबर दिनांक रक्कम.
1. शिवाजी सांळूके 54341 17.1.08 70,800/-
2. मोहमद इलीयास 54342 17.1.08 1,65,000/-
3. मच्छिंद्र जाधव 54343 17.1.08 64,500/-
एकूण 3,00,300/-
याप्रमाणे सामनेवाले यांनी रोखीची उचल दाखवली असुन जी की, तक्रारदारास अप्राप्त आहे. व उर्वरीत दोन लाख रुपये बचत खाते क्र.5002 यावरुन रोखीने श्री चव्हाण यांना आदा केलेली दाखवली आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची जमा असलेले पैसे न देवून सेवेत त्रूटी केली आहे, असे तक्रारदारांने म्हंटले आहे.
तक्रारदाराने खाते क्रमांक 35/9542 वरील रक्कम व इतर मुदत ठेव पावत्या असे एकुण 16,88,000/- मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.2,000/- असे एकुण 17,00,000/-ची द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्ठयार्थ एकुण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले क्र.1 यांना मंचाची नोटीस दि.22.3.2011 रोजी देवू केली असता त्यानी घेण्यास इंनकार केल्याचा दिसून येत आहे. सामनेवाले क्र.2 यांनी मंचाची नोटीस दि.22.3.2011 रोजी प्राप्त झाली असुन ते न्यायमंचात हजर नाहीत अथवा त्यांचे लेखी म्हणणे दाखल नाही. म्हणुन न्यायमंचाने त्याचे विरुध्द एकतर्फा आदेश दि.7.5.011 रोजी केला आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, त्यांचा तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने आवलोकन केले असता तक्रारदाराना सामनेवाले क्रं.2 यांनी एक पत्र दि.23.9.2010 अन्वये बीड शहर पोलीस स्टेशन येथे दि.10.6.2009 रोजी गुन्हा क्रं.56/2009 या प्रमाणे संबंधीत कर्मचा-यांवर न्यायप्रविष्ठ केला आहे, असे पत्र दिले आहे. ही बाब सामनेवाले यांचे अंतर्गत स्वरुपाची आहे. त्यामुळे सामनेवाले यांना जबाबदारी टाळता येणार नाही. म्हणजेच सामनेवाले यांनी तक्रारदारास त्याचे बचत खातेवरील रक्कम व मुदत ठेवीतील रक्कम न देवून सेवेत त्रूटी केली आहे, हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराची जमा असलेली रक्कम रु.16,88,000/- (अक्षरी सोळा लाख अठयाऐंशी हजार फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावेत.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्रं.2 चे पालन मुदतीत न केल्यास सदर रक्कमेवर दि.7.7.2006 पासुन द.सा.द.शे.15 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड