जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 109/2011 तक्रार दाखल तारीख- 02/08/2011
1. वामन पि. गेनुराव घोडके,
वय – 65 वर्ष, धंदा – शेती
रा.लोळदगांव ता.जि.बीड
2. सौ. मदोंदरी भ्र. वामन घोडके
वय 60 वर्षे, धंदा – घरकाम रा.सदर
3. ओमप्रकाश पि.वामनराव घोडके
वय 35 वर्षे, धंदा – नौकरी, रा.सदर
4. विजयप्रकाश पि. वामनराव घोडके,
वय 32 वर्षे, धंदा – नौकरी, रा.सदर
5. सोमप्रकाश पि. वामनराव घोडके,
वय 36 वर्षे, धंदा – घरकाम रा.सदर ....... तक्रारदार
विरुध्द
मा. आवसायक साहेब,
चंपावती अर्बन को-ऑप.बँक लि.,
बशीर गंज, बीड ता.जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – एस.पी. लघाने,
सामनेवालेतर्फे – वकील – स्वत:,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे लोळदगांव ता.जि.बीड येथील रहिवाशी असुन तक्रारदार क्रं.2 हे तक्रारदाराची पत्नी आहे व तक्रारदार क्रं.3 ते 5 ही तक्रारदारांची मुले आहेत. तक्रारदार क्रं.1 ते 5 हे एकत्र कुटूंबातील सदस्य आहेत.
तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे दामदुप्पट योजनेअंतर्गत मुदत ठेव रक्कम ठेवली होती. तक्रारदारास सामनेवाले यांचे घोटाळे उघडकीस आल्याचे जानवले व दिवाळखोरीत निघाल्याचे समजल्यावरुन प्रशासक व अवसायक यांची नेमणूक झाले नंतर तक्रारदाराने विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रासह सामनेवाले यांचेकडे मुदत ठेवीच्या रक्कमेची मागणी केली. सदर रक्कम देण्यास सामनेवाले यांनी नकार दिला. म्हणून सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस पाठविले त्याचे उत्तर दिले नाही व मुदत ठेवीची रक्कम दिली नाही. म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने दामदुप्पट योजनेअंतर्गत ठेवलेली रक्कम रु.10,41,072/- मिळण्याची मागणी केली आहे. तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ एकुण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपले लेखी म्हणणे दि.15.09.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराचे मुदत ठेवीवर तारण कर्ज घेतले आहे त्यामुळे ते बेबाकी केल्याशिवाय रक्कम परत करता येत नाही. तसेच बीड येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा क्रं.332/2011 हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे तक्रारदारास तक्रारदाराची मुदत ठेव न देवून कोणतीही सेवेत त्रूटी केली नाही, असे म्हंटले आहे.
सामनेवाले नं.1 ते 2 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पूष्ठयार्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे तक्रारदार यांचा तोंडी युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात तक्रारदाराने मुदत ठेवीवर तारण कर्ज घेतले असल्या बाबत म्हंटले आहे परंतु सामनेवाले यांनी याबाबतचा कोणताही पुरावा या न्यायमंचात दाखल केला नाही.
तक्रारदाराने दि.13.4.2012 रोजी एकूण 9 मुदत ठेव पावत्याच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. त्यांची एकूण रक्कम ही रु.12,48,000/- आहे. तर तक्रारदार हा रु.10,41,072/- ची मागणी करतो आहे. यात रु.2,06,928/- रक्कमेची तक्रारदार हा कमी मागणी करतो आहे. तसेच तक्रारदार हा सामनेवाला यांनी मुदत ठेवीवर कर्ज घेतले आहे. बीड जिल्हा दिवाणी न्यायालय दावा क्र.332/2011 याबाबत काहीच खुलासा करत नाही. म्हणजेच तक्रारदार या दोनही बाबी लपवत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसूर केला आहे हे तक्रारदाराने सिध्द केले नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार रदद करणे योग्य व न्यायाचे होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड