Maharashtra

Jalgaon

CC/09/113

Suhas Gopal Barhate - Complainant(s)

Versus

Chakradhar Merchant co.op society - Opp.Party(s)

Adv.Bhoge

08 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/09/113
 
1. Suhas Gopal Barhate
Deepnagar Tal.Bhusawal
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Chakradhar Merchant co.op society
Bhusawal
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 113/2009
                        तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 23/01/2009
                        सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 20/03/2009
                        तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 08/10/2009
 
1.     श्री.सुहास गोपाळ ब-हाटे,
वय- 45,धंदा-
2.    सौ.रंजना सुहास ब-हाटे,
वय- 40, धंदा-घरकाम,
दोन्‍ही रा.क्‍वॉर्टर नं.-3, टाईप 7/40,
      बी.टी.पी.एस.कॉलनी, दिपनगर, भुसावळ,
ता.भुसावळ, जिल्‍हा जळगाव                   ..........      तक्रारदार
            विरुध्‍द
1.     श्री.चक्रधर मर्चंटस को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.भुसावळ,
विठठ्ल मंदीर वॉर्ड, लहान मारोती जवळ, भुसावळ,
ता.जि.जळगांव ( तर्फे व साठी नोटीस मॅनेजर यांचेवर
बजवीणेत यावी.)
2.    श्री.श्रीकृष्‍ण दामोदर धांडे, चेअरमन,
     रा.दत्‍त कोल डेपो, प्रभाकर हॉल शेजारी,
जुना सातारा, भुसावळ, ता.जि.जळगांव.
3.   श्री.जनार्दन तुकाराम नेमाडे, व्‍हा.चेअरमन,
     रा.टिप टॉप टी व्‍ही सेंटर, अमर स्‍टोअर्स मागे,भुसावळ,
      ता.भुसावळ,जि.जळगांव.
4.    श्री.किरण एकनाथ वाघुळदे, संचालक,
     रा.आनंद नगर, तृप्‍ती डेअरी, जामनेर रोड, भुसावळ,
      ता.भुसावळ, जि.जळगांव.
5.    श्री.बळीराम पंडीत पाटील, संचालक,
      रा.बाजारपेठ पोलीस स्‍टेशन जवळ,
      पाटील वॉईन शॉप शेजारी, सातारा पुला शेजारी,
     भुसावळ, ता.भुसावळ,जि.जळगांव.
6.    श्री.ललित प्रभाकर नेमाडे, संचालक,
      रा.नवमहाराष्‍ट्र स्‍टोअर्स जवळ, मॉर्डन रोड,भुसावळ,
     ता.भुसावळ,जि.जळगांव.
7.    श्री.धनराज प्रभाकर भंगाळे, संचालक,
     रा.विठठ्ल रुखमाई बँकेच्‍या मागे, भुसावळ,
     ता.भुसावळ,जि.जळगांव.
8.    श्री.हाजी मो.इसाक मो.रफीक, संचालक,
      रा.अमरदिप टॉकीज जवळ, जाम मोहल्‍ला,भुसावळ,
      ता.भुसावळ,जि.जळगांव.
9.    श्री.सुभाष शंकर महाजन, संचालक,
      रा.प्रभाकर हॉल मागे, प्रभाकर कॉलनी, भुसावळ,
      ता.भुसावळ,जि.जळगांव.
10.   श्री.धनराज पंढरीनाथ सपकाळे, संचालक,
      रा.गोजोरा, ता.भुसावळ,जि.जळगांव.
11.    श्री.बन्‍सीलाल प्रेमलाल बोहरे, संचालक,
     रा.गुजराती स्‍वीट मार्ट जवळ, भुसावळ.
12.   सौ.कल्‍पना श्रीकृष्‍ण धांडे, संचालक,
     रा.दत्‍त कोल डेपो, प्रभाकर हॉल शेजारी, भुसावळ,
     ता.भुसावळ,जि.जळगांव.
13.   अलका वसंत लांबोळे, संचालक,
      व्‍दाराः अशोक बाबुराव चव्‍हाण,
     शांती नगर, भुसावळ,ता.भुसावळ,जि.जळगांव.
14.   श्री.सी.जे.नेमाडे, संचालक,
      रा.टिप टॉप टि.व्‍ही.सेंटर, अमर स्‍टोअर्स मागे, भुसावळ,
      ता.भुसावळ,जि.जळगांव.
15.   श्री.उल्‍हास पंडीत बोरोले, संचालक,
      रा.मु.पो.निंभोरा बु., दिपनगर जवळील, भुसावळ,
     ता.भुसावळ,जि.जळगांव.                       ..........      सामनेवाला
 
                 
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 08/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच सदस्‍य श्री. चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून )
 
                  तक्रारदार तर्फे  श्री.पी.ई.नेमाडे वकील हजर
सामनेवाला क्र. 9 तर्फे श्री.अशोक टी.पाटील वकील हजर.
     सामनेवाला क्र. 1 ते 8,10 ते 15 एकतर्फा.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्‍त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या व्‍याजावर  ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.  तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-

अ.क्र.
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
0434
31/12/2003
50,000/-
31/03/2009
2
0435
31/12/2003
30,000/-
31/03/2009
3
005729
08/08/2006
23,500/-
09/08/2008
4
006356
14/08/2006
24,000/-
15/11/2007
5
007492
18/06/2007
20,000/-
03/08/2007     
6
005728
08/08/2006
23,000/-
09/08/2008

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली  असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.    
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. त्‍याप्रमाणे सामनेवाला क्रं. 9 यांनी तक्रारीत हजर होऊन त्‍यांनी आपला लेखी खुलासा दाखल केलेला आहे. सामनेवाला क्रं. 1 ते 8, 10 ते 15 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश केला.
            3.    सामनेवाला क्र. 9 यांनी तक्रारदाराचे तक्रारीस म्‍हणणे दिलेले असुन तक्रारदाराच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत.    तक्रारदार यांनी सामनेवाला संस्‍थेत कीती ठेवी ठेवल्‍या व त्‍याचे व्‍याज किती झाले याबाबत सामनेवाला यांना काहीएक माहिती नाही.   सामनेवाला हे संस्‍थेचे सभासद अगर संचालक नसतांनाही त्‍यांचे नांव बेकायदेशीरपणे यादीत टाकलेले आहे.    सामनेवाला यांनी दि.2/12/2005 रोजी संस्‍थेचा राजीनामा दिलेला असुन तो मंजुर झालेला आहे.    सबब प्रस्‍तुत तक्रारीतुन सामनेवाला क्र. 9 यांना वगळण्‍यात यावे अशी विनंती सामनेवाला क्र. 9 यांनी केली आहे.  
            4.    तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र. 9 यांचा खुलासा याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता व  उभयपक्षकार यांचे वकील यांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
                  प्रमाणे ग्राहक आहे काय ?                     .......होय
 
            2.    सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             5.  मुद्या क्रमांक 1  तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावतीचे अवलोकन केले असता असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार यांनी काही रक्‍कम सामनेवाला यांचे पतसंस्‍थेत ठेव म्‍हणून ठेवलेली आहेत. त्‍याबद्दल सामनेवाला यांचा विरोध नाही. सबब  तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
            6.    मुद्या क्रमांक 2   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्‍तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्‍यांचे शपथपत्रा दाखल केल्‍यानंतरही सदरील रक्‍कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्‍या सेवेत कसूर केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्‍हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्‍यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्‍कम मागणेस हक्‍कदार आहे व त्‍यास  सामनेवाला किंवा त्‍यांचे कार्यकारी संचालक मंडळ हे स्‍वतंत्ररित्‍या व संयुक्‍तरित्‍या जबाबदार आहेत.  
सामनेवाला क्र. 9 यांनी सामनेवाला क्र. 1 संस्‍थेच्‍या संचालक पदाचा राजीनामा दिलेबाबत चे पत्र तसेच सदरचा राजीनामा मंजुर झाले बाबत योग्‍य तो कागदोपत्री पुरावा त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यासोबत सादर केलेला आहे.   सबब सामनेवाला क्र. 9 यांचे नांव प्रस्‍तुत तक्रारीतुन वगळण्‍यात येते.   सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे. 
                              आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते 8,10 ते 15 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची उपरोक्‍त आदेश कलम 1 मध्‍ये नमुद असलेल्‍या ठेव पावत्‍या मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9(नऊ)  टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं. 1 ते 8,10 ते 15 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं. 1 ते 8,10 ते 15 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं. 1 ते 8,10 ते 15 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सदरील तक्रारीच्‍या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्‍यास सामनेवाला क्रं. 1 ते 8,10 ते 15 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.  
            ( फ )       सामनेवाला क्र. 9 यांनी सामनेवाला क्र. 1 संस्‍थेच्‍या संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्‍याने व तो मंजुर झालेला असल्‍याने सामनेवाला क्र. 9 यांचे नांव प्रस्‍तुत तक्रारीतुन वगळण्‍यात येते.
            ( घ )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 08/10/2009          
                              (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )         ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.