-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-03 एप्रिल, 2017)
01. उभय तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर या सहकारी संस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-(1) चंद्रभान रघुनाथ आपतूरकर हे तिचे अध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-(2) सदर पतसंस्थेचे संचालक मंडळ असून विरुध्दपक्ष क्रं-(3) सदर पतसंस्थेचे प्रशासक आहेत.
उभय तक्रारदारानीं सदर पतसंस्थे मध्ये मुदतीठेव पावती व्दारे “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे पुढील प्रमाणे रक्कम गुंतवली-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | तक्रारदाराचे नाव | मुदती ठेव पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | परिपक्वता तिथी रोजी देय रक्कम |
1 | 3 | 4 | 5 | 6 | | 7 |
1 | Sau.Sunita Bhende | 2453 | 27/05/2005 | 25,000/- | 27/11/2010 | 50,000/- |
अक्रं | तक्रारदाराचे नाव | मुदती ठेव पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | परिपक्वता तिथी रोजी देय रक्कम |
1 | 3 | 4 | 5 | 6 | | 7 |
2 | Yashwant Deorao Girdkar | 6670 | 25/02/2008 | 5000/- | 25/02/2014 | 10,000/- |
या व्यतिरिक्त तक्रारकर्ता श्री यशवंत देवराव गिरडकर यांनी आवर्ती ठेव खात्या मध्ये काही रकमा जमा केलेल्या आहेत, त्यांनी दाखल केलेल्या खात्यांच्या प्रतींवरुन जमा केलेल्या रकमांचा हिशोब परिशिष्ट-ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे देण्यात येतो. तक्रारकर्त्याने मुदती अंती मिळणा-या संपूर्ण देय रकमेचा दावा जरी तक्रारीत केलेला आहे तरी आवर्ती खात्या मध्ये जमा केलेल्या नोंदी नुसार तक्रारकर्ता श्री गिरडकर यांनी नियमित खात्या मध्ये रकमा जमा केलेल्या नसल्याचे दिसून येते.
“परिशिष्ट-ब”
अक्रं | तक्रारदाराचे नाव | आवर्ती ठेव खाते क्रंमाक | आवर्ती ठेव खाते उता-या नुसार अखेरची रक्कम जमा केल्याचा दिनांक | जमा अखेर दिनांक रोजी आवर्ती खात्यात एकूण जमा रक्कम | शेरा |
1 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | Yashwant Deorao Girdkar | 4547 | 18/02/2009 | 39,000/- | आवर्ती खात्यात जमा असलेली एकूण रक्कम जमा अखेरच्या दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. |
अक्रं | तक्रारदाराचे नाव | आवर्ती ठेव खाते क्रंमाक | आवर्ती ठेव खाते उता-या नुसार अखेरची रक्कम जमा केल्याचा दिनांक | जमा अखेर दिनांक रोजी आवर्ती खात्यात एकूण जमा रक्कम | शेरा |
1 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
2 | Yashwant Deorao Girdkar | 4235 | 18/02/2009 | 8200/- | आवर्ती खात्यात जमा असलेली एकूण रक्कम जमा अखेरच्या दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. |
3 | Yashwant Deorao Girdkar | 4992 | 06/02/2009 | 5000/- | आवर्ती खात्यात जमा असलेली एकूण रक्कम जमा अखेरच्या दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. |
तक्रारदारानीं पुढे असे नमुद केले की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना रजिस्टर पोस्टाने वकीलांचे मार्फतीने दिनांक-18.05.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु प्रशासकाची नोटीस नो क्लेम म्हणून परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्ष संस्थेनी विहित मुदतीत जमा रक्कमा त्यातील देयलाभांसह न देऊन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली, त्यामुळे त्यांना शारिरीक , मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून उभय तक्रारदारानीं सदर तक्रार दाखल करुन विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी उभय तक्रारदारानीं विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये जमा केलेल्या रकमा व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
(02) तक्रारदारानां झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) चंद्रभान रघुनाथ आपतूरकर, अध्यक्ष तसेच विरुध्दपक्ष क्रं-(2) संचालक मंडळ असून विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासक यांचे नावे मंचाचे मार्फतीने दिनांक-11 ऑगस्ट, 2016 रोजीच्या लोकशाही वार्ता वृत्तपत्रात जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली परंतु विरुध्दपक्ष गैरहजर राहिलेत म्हणून तिन्ही विरुध्दपक्षां विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-15.10.2016 रोजी मंचा तर्फे पारीत करण्यात आला.
04. उभय तक्रारदारानीं तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये मुदतीठेव पावतीची प्रत, बचत खाते उतारा प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे .
05. उभय तक्रारदारांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, तसेच दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती आणि तक्रारदारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. (“विरुध्दपक्ष” म्हणजे चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड ही पतसंस्था आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष व विरुध्दपक्ष क्रं-(2) संचालक मंडळ असे समजण्यात यावे) उभय तक्रारदारानीं निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष पतसंस्थेत मुदतीठेवी मध्ये रकमा गुंतविलेल्या आहेत, त्याप्रमाणे विहित मुदती नंतर परिपक्वता तिथीस देय असलेली रक्कम त्यांना विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे परत करण्यात आलेली नाही. या व्यतिरिक्त निकालपत्रातील “परिशिष्ट- ब” मध्ये नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-2) यशवंत देवराव गिरडकर याने विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या आवर्ती खात्या मध्ये काही आंशिक रकमा जमा केलेल्या आहेत, आवर्ती खात्याच्या उता-यावरुन त्याने नियमित रकमा जमा केल्याचे दिसून येत नाही परंतु तक्रारकर्ता श्री गिरडकर याने आवर्ती खाते क्रं-4547 आणि क्रं-4235 अन्वये एकूण अनुक्रमे रुपये-1,26,750/- आणि रुपये-16,940/- अशा रकमा मिळण्या बाबतची मागणी केलेली आहे. वर उल्लेखित केल्या प्रमाणे त्याने सदर आवर्ती खात्यात नियमित रकमा जमा केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे आवर्ती खात्या मध्ये मुदती संपल्या नंतरच्या देय रकमा मिळण्यास तो पात्र नाही परंतु आवर्ती खात्या मध्ये जमा केलेली एकूण रक्कम शेवटची रक्कम जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ता क्रं-2) श्री गिरडकर पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं 3) हे मंचा समक्ष उपस्थित झालेले नाहीत व त्यांनी तक्रारदारांनी केलेले आरोप खोडूनही काढलेले नाहीत. उभय तक्रारदारांची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे.
07. तक्रारदारानीं मागणी करुनही विरुध्दपक्ष पतसंस्थेनी त्यांना मुदतठेवीची रक्कम त्यातील देयलाभांसह तसेच बचत खात्यातील जमा रक्कम परत केलेली नाही ही त्यांची दोषपूर्ण सेवा आहे आणि यामुळे त्यांना निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
08. या ठिकाणी आणखी एक महत्वाची बाब नमुद कराविशी वाटते की, या तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष क्रं-(3) म्हणून पतसंस्थेचे प्रशासक यांना प्रतिपक्ष केलेले आहे परंतु पतसंस्थेच्या अनियमित आर्थिक कारभारा बाबत प्रशासकाला जबाबदार धरता येणार नाही मात्र अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंच, नागपूर यांनी दिलेल्या निकालपत्रातील आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून होईल यासाठी तक्रारदार व ग्राहक मंचाला सहकार्य करणे एवढयाच मुद्दासाठी आम्ही विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशासक यांचेवर जबाबदारी टाकीत आहोत.
09. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारी मध्ये मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) उभय तक्रारदार सौ.सुनिता लक्ष्मीनारायण भेंडे आणि यशवंत देवराव गिरडकर यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-(1) चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर तर्फे अध्यक्ष चंद्रभान रघुनाथ आपतुरकर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी नागपूर तर्फे संचालक मंडळ यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे उभय तक्रारदारानीं मुदत ठेव मध्ये गुंतविलेली आणि नमुद परिपक्वता तिथी रोजी देय होणारी रक्कम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत उभय तक्रारदारानां परत करावी.
(03) विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-ब” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-2) यशवंत देवराव गिरडकर याने आवर्ती खात्यामध्ये जमा केलेली एकूण रक्कम अखरेची रक्कम जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्ता श्री यशवंत देवराव गिरडकर याला परत करावी.
(04) उभय तक्रारदारानां झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-3000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-1500/- (अक्षरी प्रत्येकी रुपये एक हजार पाचशे फक्त) विरुध्दपक्ष पत संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) व विरुध्दपक्ष क्रं-(2) यांनी उभय तक्रारदारानां द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष पत संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) व विरुध्दपक्ष क्रं-(2) यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासकीय हे पद विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये शासना तर्फे नियंत्रकाचे असल्याने व ते पद संस्थेच्या पदाधिकारी सज्ञेत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासकाला या तक्रारी मधून मुक्त करण्यात येते. मात्र प्रशासकाने अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंच, नागपूर यांनी दिलेल्या आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) कडून होईल याकडे लक्ष द्दावे.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.