(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 30 जानेवारी 2017)
1. उपरोक्त नमूद सर्व तक्रारी या ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल झालेल्या असून या तक्रारीं जरी वेगवेगळ्या दाखल केलेल्या असल्या तरी यामधील विरुध्दपक्ष हे एक सारखेच आहेत आणि उपरोक्त सर्व तक्रारींमधील तपशिलाचा थोडाफार फरक पाहता, ज्या कायदेविषयक तरतुदींच्या आधारे या तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या सुध्दा सारख्याच आहेत म्हणून आम्हीं या तक्रारींमध्ये एकञितरित्या निकाल पारीत करीत आहोत. उपरोक्त तक्रारींमधील थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की,
2. विरुध्दपक्ष क्र.1 ही एक चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी मर्यादीत, नागपूर असून विरुध्दपक्ष क्र.2 श्री सी.आर.आपतुरकर हे सचिव/अध्यक्ष आहे. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक एनजीपी/(सीटीवाय)/आरएसआर/सीआर 343/86/87 असून तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष सोसायटीत खालील परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे बचत ठेवी ठेवल्या आहेत.
- परिशिष्ठ ‘अ’ –
अ.क्र. | ग्राहक तक्रार क्रमांक | तक्रारकर्त्यांचे नांव | बचत ठेव खात्यात जमा रक्कम रुपये | बचत ठेव दिनांक पासून ते पर्यंत | खाते क्रमांक |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
1 | RBT/CC/11/746 | कु.रुपाली केशव बिजेवार | 20,000/- | 24.06.2010 | 4616 |
2 | RBT/CC/11/747 | कु.प्राजक्ता देविदास भोयर | 20,000/- | 22.06.2010 | 4607 |
3 | RBT/CC/11/748 | कु.रुचिका देविदास भोयर | 20,000/- | 22.06.2010 | 4609 |
4 | RBT/CC/11/749 | कु.पुजा संतोषराव वानखेडे | 45,000/- | 22.06.2010 | 4608 |
5 | RBT/CC/11/750 | कु.शिखा आनंदराव बोरकर | 20,000/- | 24.06.2010 | 4613 |
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, बचत ठेव मुदत संपूनही तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष यांनी ब-याचवेळा रकमेची मागणी केली असता, ती संस्थेकडून तक्रारकर्त्यास प्राप्त झाली नाही. तक्रारकर्त्यांनी रक्कम मिळण्याकरीता वारंवार विनंती करुन सुध्दा न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याच्या ध्यानात आले की, तक्रारकर्त्याची फसवणूक झाली आहे व तक्रारकर्त्याची जमा रक्कम देण्यास विरुध्दपक्ष टाळाटाळ करीत आहे. सदरची कृती ही विरुध्दपक्ष यांची अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेत ञुटी असल्याची असून त्या कारणास्तव तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांनी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविला, परंतु आजपावेतो विरुध्दपक्ष यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही. करीता सरते शेवटी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञास झाल्याने सदरची तक्रार मंचामध्ये दाखल करुन खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात जमा असलेल्या रकमा ‘परिशिष्ठ -अ’ प्रमाणे जमा असलेल्या रकमा 18 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशीत व्हावे.
2) तसेच, तक्रारकर्त्यांना आलेला खर्च रुपये 5,000/- व नोटीसचा खर्च रुपये 1,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
4. सर्व तक्रारकर्त्यांच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी मंचाने पाठविलेला नोटीस ‘घेण्यास नकार’ या शे-यासह परत आल्यामुळे दिनांक 25.9.2014 रोजी मंचाने त्याचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारीला उत्तर सादर न करता पुरसीस दाखल करुन नमूद केले की, चैतन्यवाडी अर्बन को.ऑप. सोसायटी मर्यादीत नगापूर या संस्थेवर सध्यास्थितीत प्रशासक यांची नियुक्ती रद्द करुन मा.उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचे आदेश क्र.3102/15 दिनांक 6.7.2015 प्रमाणे ‘अवसायक’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्याबाबतचा आदेश पुरसीस बरोबर दाखल केला आहे.
5. सदर सर्व प्रकरणात तक्रारकर्त्यांना सतत संधी मिळूनही प्रतिज्ञालेख व लेखी युक्तीवाद दाखल केला नाही, तेसच दोन्ही पक्षांनी मौखीक युक्तीवाद केला नाही. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) सर्व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक होतात काय ? : होय
2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यांना सेवेत ञुटी किंवा अनुचित : होय
व्यापार प्रथेचा अवलंब झाल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. सर्व तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष संस्थेमध्ये बचत ठेव खात्यात रक्कम ठेवली. परंतु, मुदत संपूनही विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याला त्याची व्याजासह रक्कम परत दिली नाही. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात पुरुसीसवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम – 102 अंतर्गंत अंतिम आदेशाची दिनांक 6.7.2015 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष यांच्या संस्थेवर ‘अवसायक’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, सर्व तक्रारकर्ता यांनी ‘परिशिष्ठ-अ’ प्रमाणे बचत ठेवमध्ये ठेवलेल्या रकमा योग्य तो कायदेशिर अर्ज करुन अवसायक यांचेकडे करुन मागणी करावी व आपल्या तक्रारीचे निराकरण करावे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) सर्व तक्रारकर्ते यांनी ‘परिशिष्ठ - अ’ प्रमाणे बचत ठेवमध्ये ठेवलेल्या रकमा योग्य कायदेशिर अर्ज अवसायक यांचेकडे करुन रकमेची मागणी करावी व तक्रारीचे निराकरण करावे.
(3) उभय पक्षकारांनी आप-आपला तक्रारीचा खर्च सहन करावा.
(4) आदेशाचे पालन निकालप्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 30/01/2017