(मंचाचा निर्णय : श्री. प्रदीप पाटील - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 18/03/2014)
- तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे थोडक्यात कथन असे की, ...
विरुध्द पक्ष ही सहकारी संस्था असुन त्यांचेकडे तक्रारकर्तीचे बचत खाते क्र.3430 असुन त्यात रु.45,282/- जमा आहे. तक्रारकर्तीस घरगुती अत्यंत आवश्यक कामाकरीता सदर रकमेची आवश्यकता असल्यामुळे ते विरुध्द पक्षाकडे रक्कम काढण्याकरीता गेले असता विरुध्द पक्षांनी त्यांना कुठलेही कारण न सांगता रक्कम देण्यांस टाळाटाळ केली. त्यानंतर पुन्हा तक्रारकर्ती दि.03.10.2011 रोजी विरुध्द पक्ष संस्थेत रक्कम मागण्याकरीता गेली असता तिला संस्थेच्या सचिवांनी अपशब्द बोलून सदरची रक्कम देण्यांस नकार दिला.
2. त्यानंतर तक्रारकर्तीने दि.24.10.2011 रोजी वकीलांमार्फत विरुध्द पक्षास नोटीस पाठविली असता सदर नोटीस ‘घेण्यांस नकार’, या पोष्टाच्या शे-यासह परत आला. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला द्यावयाचे सेवेत कसूर करुन त्यांची फसवणूक केल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन त्यात रु.45,282/- परत मिळावे, नोटीसचा खर्च रु.1,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्याबाबत मंचास विनंती केली आहे.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत नोटीस पाठविली असता विरुध्द पक्ष क्र.1 ला पाठविलेली नोटीस ‘घेण्यांस नकार’, या शे-यासह परत आला असुन त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 17.03.2012 रोजी पारित केला. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 हे त्यांना नोटीस मिळूनही हजर झाले नाही. म्हणून मंचाने दि.30.03.2012 रोजी ‘सुचना दिली’, या शे-यासह परत आल्याने प्रकरण विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द ‘विना लेखी जबाब’, चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला.
4. अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, दि.22.06.2010 रोजी विरुध्द पक्ष संस्थेत तक्रारकर्तीचे बचत खात्यात एकूण रु.45,282/- इतकी रक्कम जमा होती याबाबत पासबुक अभिलेखावर दाखल आहे.
5. परंतु तक्रारकर्तीस अचानकपणे घरगुती अडचण आल्यामुळे ती विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेकडे रक्कम परत मागण्यांस गेली असता त्यांना ती परत मिळाली नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 संस्थेच्या सचिवांनी तक्रारकर्तीस अपशब्द बोलून सदरची रक्कम देण्यांस नकार दिला. म्हणून तक्रारकर्तीने व्यथित होऊन दि.24.10.2011 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविला परंतु तो सुध्दा विरुध्द पक्ष संस्थेने परत केला. तसेच आजपावेतो तक्रारकर्तीस विरुध्द पक्ष संस्थेने त्यांचे बचत खात्यात असलेले पैसे परत केलेले नाही. म्हणून तक्रारकर्तीला नाईलाजाने मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली. तसेच तक्रारकर्तीने प्रस्तुतची रक्कम रु.45,282/- ही व्याजासहीत परत मिळावी, त्यांना झालेल्या आर्थीक, शारीरिक मानसिक त्रासाची भरपाई मिळण्यांत यावी अशी प्रार्थना केलेली आहे. तसेच अभिलेखावर दाखल दस्तावेजांचे संपूर्णपणे अवलोकन करुन मंचाचे निष्कर्षार्थ मुद्दे खालिलप्रमाणे..
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ‘ग्राहक’ आहे काय ? होय.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय.
3) तक्रारकर्ती रक्कम परत मिळण्यांस तसेच झालेल्या
मानसिक शारीरिक त्रासाची भरपाई घेण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः
4) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
6. मुद्दा क्र.1 नुसार विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेने तक्रारकर्तीचे बचत खात्यातील रक्कम परत द्यावयास पाहिजे होती, परंतु त्यांना प्रस्तुतची रक्कम आजपावेतो परत केलेली नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 सचिव ह्यांनी तक्रारकर्तीला अपशब्द बोलून प्रस्तुतची रक्कम परत करण्यांस नकार दिलेला आहे. म्हणून मंच ह्या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेने अनुचित व्यापारी प्रथेचा व सेवेचा अवलंब केलेला आहे आणि त्यामुळे मुद्दा क्र. 2 नुसार तक्रारकर्ती प्रस्तुत रक्कम व्याजासह परत मिळण्यांस तसेच झालेल्या आर्थीक, शारीरिक मानसिक त्रासाची भरपाई संस्थेकडून मिळण्यांस पात्र आहे, ह्याचे कारण ‘वर्षा –विरुध्द’ राजन, ए.आय.आर.2011 बॉम्बे 58, या न्याय निवाडयानुसार नोंदणीकृत संस्था हीच खातेदारांची रक्कम परत करण्यांस जबाबदार आहे. म्हणून संस्थेत आज कार्यरत असलेल्या पदाधिका-यांनी म्हणजेच संस्थेने खातेदारांची रक्कम परत करावयास पाहिजे. तसेच प्रस्तुतची विरुध्द पक्ष क्र.1 ही संस्था नोंदणीकृत असुन आजही कार्यरत आहे. करीता मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // आदेश //-
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ला निर्देश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्तीला त्यांचे संस्थेकडे जमा असलेली रक्कम रु.45,282/- ही दि.22.06.2010 पासून प्रत्यक्ष अदायगीच्या दिनांकापर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासहीत परत करावी.
3) विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासाबाबत रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावा.
4) विरुध्द पक्ष क्र.1 ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्याचे तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावी.
5) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6) तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.