Maharashtra

Nagpur

CC/10/269

Yadav Dadaji Raut and Geeta Yadva Raut - Complainant(s)

Versus

Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd. - Opp.Party(s)

Adv. L.H. Kothari

24 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/269
 
1. Yadav Dadaji Raut and Geeta Yadva Raut
Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd.
Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री.नरेश बनसोड, मा. सदस्‍य यांचे कथनांन्‍वये. 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 24/11/2011)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून त्‍यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की, त्‍यांनी विविध गैरअर्जदारांच्‍या रकमा जमा करण्‍याच्‍या योजनेंतर्गत गैरअर्जदार संस्‍थेकडे दि.29.09.2008 पासून 19.03.2010 पर्यंत गुंतविले होते.
 

अ.क्र.
परिपक्‍वता रक्‍कम
परिपक्‍वता दिनांक
प्रमाणपत्र क्र.
1.
रु.12,342/-
12.04.2009
6162 
2.
रु.22,264/-
29.09.2008
3540
3.
रु.17,424/-
29.10.2009
3357 
4.
रु.17,424/-
29.10.2009
3356 
5.
रु.32,122/-
03.11.2009
4428 
6.
रु.5596/-
29.10.2009
6883 
7.
रु.31,116/-
27.07.2009
5122 
8.
रु.31,116/-
27.07.2009
5123       
9.
रु.43,639/-
10.03.2010
4819 
10.
रु.50,335/-
19.03.2010
3849

 
 
 
सदर ठेवी या परिपक्‍व झाल्‍यानंतर परीपक्‍वता रक्‍कम ही तक्रारकर्त्‍यांच्‍या बचत खात्‍यात रकमा जमा केली व याबाबत तक्रारकर्त्‍याची परवानगी घेतली नाही. तक्रारकर्त्‍यांना रकमेची गरज असल्‍याने, त्‍यांनी गैरअर्जदार संस्‍थेस मागणी केली. परंतू गैरअर्जदार संस्‍था ही आर्थिक अडचणीत आल्‍याचे व त्‍यावर प्रशासक नियुक्‍त झाल्‍याचे समजले. प्रशासकांनाही तक्रारकर्त्‍यांनी रकमेची मागणी केली असता त्‍यांनीही रक्‍कम परत केली नाही. तक्रारकर्त्‍यांच्‍या मते ही सेवेतील त्रुटी आहे. म्‍हणून त्‍यांनी मंचासमोर तक्रार दाखल करुन, मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. तक्रारीसोबत मुदत ठेवीचे प्रमाणपत्रांच्‍या प्रती, बचत खात्‍यांच्‍या प्रती व गैरअर्जदारांना दिलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे.
 
 
 
2.                सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविण्‍यात आली असता त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करण्‍याकरीता वेळ मागितला. मंचाने संधी देऊनही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नाही. म्‍हणून मंचाने त्‍यांचे उत्‍तराशिवाय कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.19.11.2010 रोजी पारित केला.
 
 
3.                सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर मंचाने तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदारांचे प्रतिनीधी हजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रे व दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
4.                तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 1 ते 10 वरील मुदत ठेवींच्‍या प्रती व बचत खाते पुस्तिकेच्‍या प्रतीवरुन व खाते पृष्‍ठावरुन, तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार संस्‍थेकडे असलेली मुदत ठेवीची रक्‍कम व ही त्‍यांच्‍या बचत खात्‍यामध्‍ये असलेली रक्‍कम जी तक्रारीत नमूद केले आहे ती बाब सत्‍य असल्‍याचे निदर्शनास येते. गैरअर्जदारांनीही सदर बाब लेखी उत्‍तर देऊन किंवा दस्‍तऐवज देऊन नाकारलेली नाही. तसेच तक्रारकर्त्‍यांना रकमेची आवश्‍यकता असल्‍याने, त्‍यांनी गैरअर्जदार संस्‍थेला रक्‍कम परत मागितली, परंतू गैरअर्जदार संस्‍थेने रक्‍कम परत करण्‍याबाबत कोणतीही पावले उचलली नाही, असा उल्‍लेख तक्रारकर्त्‍यांनी केलेला आहे.
 
5.                मंचाचे मते गैरअर्जदार संस्‍थेने तक्रारकर्त्‍यांनी मागणी केल्‍यानंतर त्‍यांची रक्‍कम परत करणे गरजेचे होते. सदर रक्‍कम मागणी करुनही परत न करणे ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्त्‍यांच्‍या बचत खात्‍यात परिपक्‍वता रक्‍कम जमा करतांना तक्रारकर्त्‍यांना काही सुचना न देणे हीसुध्‍दा गैरअर्जदारांची गंभीर सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला मागणी करुनही रक्‍कम परत न करणे हीसुध्‍दा गैरअर्जदाराची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ते सदर प्रकरणी त्‍यांच्‍या बचत खात्‍यात असलेली मुदत ठेवीचे परीपक्‍वता मुल्‍य व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत. सदर तक्रार मंचासमोर प्रलंबित असतांना रु.5,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला दि.17.10.2011 रोजी दिल्‍याचे संयुक्‍त पुरसिसवरुन निदर्शनास येते.
 
6.                गैरअर्जदारांनी मुदत ठेवीची रक्‍कम व बचत खात्‍यातील रक्‍कम स्‍वतःजवळ ठेवून कुंठीत केलेली आहे, मात्र परत करण्‍याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत व व्‍याजही त्‍यावर पुढे दिलेले नाही. तक्रारकर्त्‍यांच्‍या मुदत ठेवी परीपक्‍व झाल्‍यावरही त्‍या परत न मिळाल्‍याने निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला असावा व पर्यायाने मंचासमोर येऊन दाद मागावी लागली, म्‍हणून मंचाचे मते तक्रारकर्ते मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहेत. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना, आदेशाचे परिच्‍छेद क्र. 1 मध्‍ये नमूद       मुदत ठेवीच्‍या परिपक्‍वता रकमा या त्‍यांच्‍या परिपक्‍वता दिनांकापासून रकमेच्‍या       संपूर्ण अदाएगीपावेतो रक्कम द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह द्याव्‍या. सदर रकमेतून  रु.5,000/- कमी करावे.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना, रु.5,000/- मानसिक त्रासाच्‍या     भरपाईपोटी व रु.2,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तपणे किंवा वैयक्‍तीकपणे      आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.