Maharashtra

Nagpur

CC/11/24

Shri Indrapalsingh Shivlalsingh Mourya - Complainant(s)

Versus

Chaitanyawadi Urban Credit Co-Op. Society Ltd. - Opp.Party(s)

Adv. K.R. Kakpure

29 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/11/24
1. Shri Indrapalsingh Shivlalsingh Mourya25, Mourya Niwas, Gadge Nagar, Nagpur Through Shri Suresh Indrapalsing MouryaNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Chaitanyawadi Urban Credit Co-Op. Society Ltd.7-A, "Indraprasth", Ramna Maroti Nagar, NagpurNagpurMaharashtra2. Shri Chandrabhan Apturkar, Secretary, 7-A, "Indraprastha" Ramna Maroti Mandir, NagpurNagpurMaharashtra3. Shri Chandrabhan Apturkar, Secretary, Chaitanyawdi Urban Credit Co-op. Society ltd.7-A, "Indraprastha" Ramna Maroti Mandir, NagpurNagpurMaharashtra4. Shri Prakash Lonare, President, Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd.22, 1st floor, Vidarbha Premier Housing Co-op. Society, Haribhau Kolte Apartment, Hasanbag Police Chowki Road, NanadanvanNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 29 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

खुल्‍या मंचातील आदेश श्री.विजयसिंह राणे, अध्‍यक्ष.
 
 
 
 
-आदेश -
(पारित दिनांक – 29/07/2011)
 
 
1.           सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल करण्‍याकरीता तक्रारकर्त्‍यांनी सादर केलेली आहे. तक्रारकर्ता श्री. मौर्य यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 ह्यांचेकडे रु.3,00,000/- रक्‍कम मुदत ठेवीमध्‍ये एक वर्षाकरीता ठेवली होती. त्‍याबाबत प्रमाणपत्र देण्‍यात आले. परीपक्‍वता दि.02.09.2009 रोजी होती. त्‍यानंतर गैरअर्जदारासोबत अनेकदा संपर्क साधला, मात्र गैरअर्जदारांनी शेवटपर्यंत मुदत ठेवीची रक्‍कम परत केली नाही. म्‍हणून शेवटी तक्रार दाखल करुन मुदत ठेवीची रक्‍कम रु.3,35,750/- परत मिळावी. त्‍यांनी मानसिक व आर्थिक भरपाईदाखल रु.50,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
 
 
2.          त्‍यातील गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला नोटीस देण्‍यात आला. त्‍यांनी जवाब दाखल केला नाही. गैरअर्जदार क्र. 3 यांनी आपले उत्‍तर दाखल केले आणि तक्रारकर्ता हा सहकारी संस्‍थेचा सदस्‍य असल्‍यामुळे त्‍याची तक्रार मंचात चालत नाही आणि त्‍याबाबत सहकार न्‍यायालयात जाणे गरजेचे होते असा आक्षेप घेतला आहे. ते संस्‍थेचे अध्‍यक्ष म्‍हणून 05.08.2010 रोजी निवडून आले आणि दि.11.02.2011 रोजी राजीनामा दिला असून, त्‍यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध उरला नसल्‍याने तक्रार खारीज करावी असा उजर घेतला आहे.
 
3.                                                      तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोब‍त मुखत्‍यार पत्र, ठेवीचे प्रमाणपत्र, रक्‍कम मागणीचे पत्र, नोटीस व पोस्‍टाच्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीसोबत मुदत ठेवीची पावती दाखल केलेली आहे, ती. 02.08.2008 रोजीची आहे, तीद्वारे रु.3,00,000/- रक्‍कम जमा केल्‍याचे दिसून येते आणि परीपक्‍वता रक्‍कम रु.3,35,750/- हीसुध्‍दा तीमध्‍ये दर्शविली आहे आणि ती रक्‍कम ही 13 महिन्‍यात देण्‍यात येणार असल्‍याचे नमूद आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास ही रक्‍कम परत केलेली नाही ही बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने याबाबत अर्ज व नोटीस दिलेला आहे. संबंधित तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या डिपॉझिटची रक्‍कम परीपक्‍वतेनंतर मिळावयास पाहिजे व तो त्‍यांचा हक्‍क आहे आणि गैरअर्जदाराने ती द्यावयास पाहिजे होती ती दिलीही नाही आणि हे उघड आहे. ही गैरअर्जदारांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.  
 
 
4.          गैरअर्जदार क्र. 3 चा आक्षेप हा की, सहकारी संस्‍था असल्‍यामुळे त्‍यांना अशी तक्रार दाखल करता येत नाही हा मुद्दा यापूर्वी वरीष्‍ठ न्‍यायालयाने निकाली काढला आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांचे म्‍हणण्‍यानुसार सन 2010 ला या संस्‍थेत निवडून आलेले आहे. त्‍यापूर्वी ही रक्‍कम परिपक्‍व झालेली आहे. तक्रारकर्त्‍याने या रकमेची मागणी केली, ती 27.12.2010 रोजीची आहे आणि गैरअर्जदार क्र. 3 हे 05.08.2010 ला अध्‍यक्ष म्‍हणून रुजू झालेले आहे, म्‍हणजे सदर मागणी गैरअर्जदार क्र. 3 राजीनामा देण्‍यापूर्वीची आहे व 2011 मध्‍ये आपला राजीनामा दिल्‍याचे ते नमूद करतात. मात्र संबंधित कालावधीमध्‍ये त्‍या पदावर होते, त्‍यामुळे सर्व गैरअर्जदारांची रक्‍कम परत करण्‍याची समान जबाबदारी आहे. यास्‍तव खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला रु.3,35,750/- एवढया मुदत ठेवीची रक्‍कम परिपक्‍वता तारखेपासून दि.02.08.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासह      अदायगीपावेतो द्यावी.
3)    गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.1,000/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.
4)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी एक महिन्‍याचे आत करावे, न      पेक्षा 9 टक्‍के ऐवजी 12 टक्‍के व्‍याज देय राहील.
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT