Maharashtra

Nagpur

CC/10/315

Ku. Vasudha Anil Nimje - Complainant(s)

Versus

Chaitanyawadi Urban Credit co-op. Society Ltd. - Opp.Party(s)

Adv. Sanjay Kasture

14 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/315
1. Ku. Vasudha Anil NimjeNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Chaitanyawadi Urban Credit co-op. Society Ltd.Nagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 14 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

 श्री. मिलींद केदार, सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये.
                        आ दे श -
                 (पारित दिनांक : 14/02/2011)
 
1.     प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल मंचासमोर दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा आहे की, गैरअर्जदार संस्‍था ही मुदत ठेवी स्विकारुन परिपक्‍वता दिनांकास परिपक्‍वता रक्‍कम देण्‍याचे व बचत ठेवीवर आकर्षक व्‍याज देण्‍याचे लोकांना अभिवचन देत असल्‍याने त्‍याने गैरअर्जदाराच्‍या संस्‍थेत विविध ठेवी अंतर्गत काही रकमा गुंतविल्‍या होत्‍या.
 

अ.क्र.
ठेवीचा प्रकार
ठेव रक्‍कम
रक्‍कम गुंतविल्‍याचा दि.
रक्‍कम परीपक्‍वता दि.
परीपक्‍वता रक्‍कम
1.
मुदत ठेव
रु.15,000/-
28.11.2003
28.05.2009
रु.30,000/-
2.
मुदत ठेव
रु.67,000/-
05.01.2004
05.07.2009
रु.1,34,000/-
3.
मुदत ठेव
रु.80,000/-
05.01.2004
05.07.2009
रु.1,60,000/-

 
 
परंतू तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या गरजेच्‍या वेळेस व ठेवी परीपक्‍व झाल्‍यावर त्‍यांची मागणी केली असता गैरअर्जदार संस्‍थेने सदर रकमा परत केल्‍या नाहीत. तसेच गैरअर्जदार संस्‍था आर्थिक अडचणीत आल्‍याचे कळल्‍याने तक्रारकर्त्‍याने रकमेची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने रक्‍कम अदा केली नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या मते गैरअर्जदाराने अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे व रक्‍कम अदा न केल्‍याने शेवटी मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन परीपक्‍वता रकमेची मागणी व्‍याजासह केलेली आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
 
2.    सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचेवर बजावण्‍यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीस संयुक्‍तपणे आपले लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 यांना मंचाचा नोटीस मिळूनही तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर हजरही झाले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.01.10.2010 रोजी पारित केला.
 
 
3.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांनी सदर तक्रारीला उत्‍तर दाखल करुन नमूद केले आहे की, सदर तक्रार ही मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याला त्‍याची रक्‍कम ही नियोजित व्‍याजासह परत करण्‍याबाबत सुचना दिली होती. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्‍याचे म्‍हटले आहे.
 
 
4.    सदर प्रकरण मंचासमोर दि.05.02.2011 रोजी युक्‍तीवादाकरीता आले असता मंचाने उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवज, शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
 
5.    तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 ते 2 कडे ठेवी म्‍हणून रक्‍कम ठेवली होती ही बाब तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे कथनावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
6.    तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार संस्‍थेकडे विविध ठेवी अंतर्गत रकमा गुंतविल्‍या होत्‍या व त्‍याबाबत रु.3,24,000/- तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदाराने त्‍यांनी मागणी करुनही दिलेले नाही ही बाब तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने सदर रकमेची मागणी केल्‍यावरही गैरअर्जदारांनी ती परत केलेली नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 ह्यांनी लेखी कथनात ते तक्रारकर्त्‍याची रक्‍कम देण्‍यास तयार असून तशी तोंडी सुचना तक्रारकर्त्‍याला दिल्‍याचे म्‍हटले आहे. मंचाचे मते ठेवीचा कालावधी संपल्‍यानंतर ठेव रक्‍कम ही ग्राहकास/तक्रारकर्त्‍यास न देणे ही सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा त्‍याची रक्‍कम रु.3,24,000/- दि. 05.07.2009 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजाने संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत मिळण्‍यास पात्र ठरतो.
 
7.    तक्रारकर्त्‍याने शारिरीक व मानसिक नुकसानाकरीता रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्‍तव असल्‍याने तक्रारकर्ता मानसिक व शारिरीक त्रासाच्‍या भरपाईकरीता रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
 
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रु.3,24,000/- दि. 05.07.2009 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजाने संपूर्ण  रक्‍कम अदा होईपर्यंत द्यावे.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक त्रासाच्‍या भरपाईकरीता रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
4)    गैअर्जदार क्र. 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
5)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30      दिवसाच्‍या आत करावे.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT