Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/11/638

Shri Harichand Modkuji Vaidya - Complainant(s)

Versus

Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd., Nagpur Through President/Secretary Shri Chandrabhan - Opp.Party(s)

Adv. V.B.Mahant

26 Aug 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/11/638
 
1. Shri Harichand Modkuji Vaidya
Plot No. 69, Dimond Nagar,
Nagpur
Mahrashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chaitanyawadi Urban Credit Co-op. Society Ltd., Nagpur Through President/Secretary Shri Chandrabhan R. Apturkar
Regd.No. N.G.P./C.T.Y./R.S.R./C.R./343/86-87, 6, A, Indraprastha, Ramana Maroti Nagar,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 Aug 2016
Final Order / Judgement

                             -निकालपत्र

           (पारित व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्‍या.)

                  ( पारित दिनांक-26 ऑगस्‍ट, 2016)

 

01.   तक्रारकर्त्‍याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली  विरुध्‍दपक्ष क्रं-1) सहकारी संस्‍थे मध्‍ये मुदती ठेवी मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यांसाठी दाखल केली आहे.

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-    

       विरुध्‍दपक्ष क्रं-1) ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्‍था असून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थेमध्‍ये मुदतीठेवी मध्‍येपरिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे रकमा गुंतविल्‍यात-

 

परिशिष्‍ट-अ

अक्रं

पावती क्रंमाक

पावती दिनांक

मुदत ठेवी मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम

परिपक्‍वता तिथी

परिपक्‍वता तिथीस देय रक्‍कम

व्‍याजाचा वार्षिक दर

1

2

3

4

5

6

7

1

4081

05.04.2007

16,800/-

05.04.2010

22,667/-

10.5%

2

4082

05.04.2007

16,800/

05.04.2010

22,667/

10.5%

3

4083

05.04.2007

16,800/

05.04.2010

22,667/

10.5%

4

4084

07.04.2007

16,800/

07.04.2010

22,667/

10.5%

 

 

 

67,200/-

 

90,668/-

 

 

 

 

 

 

 

 

       तक्रारकर्त्‍याची मुख्‍य तक्रार अशी आहे की, परिपक्‍वता तिथी उलटल्‍या नंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये मुदतीठेवी मध्‍ये गुंतविलेल्‍या रकमा त्‍यातील देयलाभांसह परत मिळण्‍यासाठी वारंवार मागणी करुनही त्‍या रकमा परत करण्‍यात आल्‍या नाहीत. तक्रारकर्ता हा हार्टपेशंट असून त्‍याला सर्जरी व औषधोपचारा करीता पैशाची गरज असल्‍यामुळे त्‍याने दिनांक-29/08/2009 रोजी विरुध्‍दपक्ष संस्‍थेमध्‍ये अर्ज केला परंतु उत्‍तर देण्‍यात आले नाही.  त्‍यानंतरही त्‍याने विरुध्‍दपक्ष संस्‍थेमध्‍ये रक्‍कम परत मिळण्‍यासाठी दिनांक-23.08.2010, दिनांक-12.04.2010, दिनांक-12.08.2010, दिनांक-28.04.2011 अशा  दिनांकानां अर्ज केलेत व त्‍याच्‍या प्रती सहकार विभागाच्‍या अधिका-यांकडे पाठविण्‍यात आल्‍यात. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्‍था, नागपूर यांनी  दिनांक-28/04/2011 रोजीच्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या विनंती अर्जावर योग्‍य ती कार्यवाही व्‍हावी असे दिनांक-11.05.2011 रोजीचे पत्र जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, नागपूर यांना पाठविले परंतु कोणतीही कार्यवाही त्‍या अर्जावर झालेली नाही. त्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याने दिनांक-22.06.2011 रोजी उपनिबंधक, सहकारी संस्‍था, नागपूर यांचेकडे पत्र पाठविले परंतु रककम मिळाली नाही. शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला दिनांक-29.07.2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली असता तो नोटीसचा लिफाफा परत आला. तक्रारकर्त्‍याला हार्टचा त्रास असून सर्जरी व औषधोपचारासाठी पैशाची आवश्‍यकता असूनही विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे त्‍याला त्‍याची मुदतठेवींमध्‍ये  गुंतविलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथी उलटूनही मिळालेली नाही, त्‍यामुळे त्‍यास शारिरीक,मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

     म्‍हणून तक्रारकर्त्‍याने ही तक्रार दाखल करुन विनंती केली की, विरुध्‍दपक्ष संस्‍थेला आदेश देण्‍यात यावे की, त्‍याला परिपक्‍वता तिथी नंतर मिळणारी मुदतठेवीची रक्‍कम रुपये-90,668/- द.सा.द.शे.-21% दराने व्‍याजासह परत करावी तसेच शारिरीक, मानसिक त्रास आणि  आर्थिक नुकसानीपोटी व तक्रारखर्च म्‍हणून रुपये-2,00,000/- द.सा.द.शे.-24% दराने व्‍याजासह देण्‍याचे विरुध्‍दपक्ष संस्‍थेला आदेशित व्‍हावे.                                

 

 

03.     विरुध्‍दपक्ष क्रं-1) संस्‍थेला मंचाचे मार्फतीने नोटीस पाठविली असता संस्‍थे तर्फे सचिव चंद्रभान रघुनाथ आपतूरकर मंचा समक्ष उपस्थित झाले अणि त्‍यांनी संस्‍थेवर प्रशासकाची नियुक्‍ती झाल्‍याचे मंचास कळविले, त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याने प्रशासकानां तक्रारीत समाविष्‍ठ करण्‍यासाठी अर्ज केला, सदर अर्ज मंचाने मंजूर केला त्‍यावरुन प्रशासकाला विरुध्‍दपक्ष क्रं-2) म्‍हणून तक्रारीत समाविष्‍ठ केले व प्रशासकाचे नावे मंचा मार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं-2) प्रशासकाला मिळाल्‍याची पोच नि.क्रं-13 वर दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतरही प्रशासक उपस्थित न झाल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने दिनांक-19.03.2016 रोजी पारीत केला.

 

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) संस्‍थेला तिचे म्‍हणणे दाखल करण्‍यासाठी पुरेशी संधी दिल्‍या नंतरही त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर मंचा समक्ष दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1) संस्‍थे विरुध्‍द तक्रार बिना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश मंचाने प्रकरणात दिनांक-05.07.21016 रोजी पारीत केला.

 

 

05. तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, दाखल दस्‍तऐवजाच्‍या प्रती आणि तक्रारकर्त्‍याचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

::निष्‍कर्ष ::

 

06.     विरुध्‍दपक्ष ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्‍था आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थेत एकूण-03 वर्षा करीता वार्षिक 10.5% दराने परिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे प्रत्‍येकी रुपये-16,800/- प्रमाणे एकूण 04 मुदतीपावत्‍यांव्‍दारे एकूण रक्‍कम रुपये-67,200/- एवढी रक्‍कम दिनांक-05.04.2007 रोजी गुंतवल्‍या बद्दल पुराव्‍या दाखल एकूण 04 मुदतीठेवी पावत्‍यांच्‍या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्‍या आहेत, सदर पावत्‍या या विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे निर्गमित केलेल्‍या असून पावत्‍यांवर विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्‍याचे त्‍यावरील संस्‍थेच्‍या नोंदणी क्रमांका वरुन सिध्‍द होते. सदर एकूण-04 मुदत ठेवींच्‍या पावत्‍यांवरुन परिपक्‍वता दिनांकास (Maturity Date) म्‍हणजे दिनांक-05.04.2010 रोजी व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास एकूण रक्‍कम रुपये-90,668/- देण्‍याचे अभिवचन विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे देण्‍यात आले होते.

 

 

07.  परिपक्‍वता तिथी (Maturity Date) उलटून गेल्‍या नंतर त्‍याने                      दिनांक-23.08.2010,दिनांक-21.04.2010, दिनांक-12.08.2010, दिनांक-28.04.2011 अशा दिनांकानां मुदतठेवींमध्‍ये गुंतवलेली रक्‍कम परत मिळण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष संस्‍थेत अर्ज केलेत व त्‍याच्‍या प्रती सहकार विभागाच्‍या अधिका-यांकडे पाठविण्‍यात आल्‍यात, या सर्व पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती तक्रारकर्त्‍याने पुराव्‍या दाखल अभिलेखावर दाखल  केलेल्‍या  आहेत  आणि  या  पत्रव्‍यवहाराच्‍या  प्रती  विरुध्‍दपक्ष  संस्‍थेस प्राप्‍त

 

 

झाल्‍या बद्दल संस्‍थेची पोच म्‍हणून त्‍यावर शिक्‍का व सही आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्‍था, नागपूर यांनी जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था यांना दिलेल्‍या दिनांक-18/08/2010 रोजी दिलेल्‍या पत्र नुसार तक्रारकर्त्‍याचे विनंती अर्जा नुसार मुदत ठेवीची रक्‍कम परत करण्‍या बाबत योग्‍य ती कार्यवाही व्‍हावी असे नमुद केलेले आहे परंतु तरीही तक्रारकर्त्‍यास त्‍याची मुदतठेवीमध्‍ये गुंतविलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथी उलटून गेल्‍या नंतरही मिळालेली नाही.

 

 

08.   तक्रारकर्त्‍याने दिनांक-29.07.2011 रोजी विरुध्‍दपक्ष संस्‍थेस कायदेशीर नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविल्‍या बाबत नोटीसची प्रत, रजिस्‍टर पोस्‍टाची पावती प्रत आणि विरुध्‍दपक्ष संस्‍थेने नोटीस स्विकारली नसल्‍याने परत आलेल्‍या लिफाफ्याची प्रत पुराव्‍या दाखल अभिलेखावर दाखल केली.

 

 

09.   अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने वारंवार लेखी पत्रव्‍यवहार करुनही विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे कोणताही प्रतिसाद त्‍याला मिळाला नाही, ही बाब दाखल पुराव्‍यां वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍यास त्‍याने विरुध्‍दपक्ष संस्‍थेत मुदती ठेवीमध्‍ये गुंतविलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथी उलटून गेल्‍या नंतरही तसेच वारंवार मागणी करुनही मिळालेली नाही, तक्रारकर्ता हा ह्दयरुग्‍ण असून त्‍याला वैद्दकीय उपचारासाठी रकमेची नितांत गरज असताना विरुध्‍दपक्ष संस्‍थेने त्‍यास रक्‍कम परत केलेली नाही ही त्‍यांची दोषपूर्ण सेवा आहे आणि यामुळे तक्रारकर्त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

10.   मंचात तक्रार दाखल केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष संस्‍थेस नोटीस पाठविल्‍या नंतर संस्‍थे तर्फे सचिव चंद्रभान र.आपतुरकर यांनी मंचा समक्ष लेखी अर्ज करुन संस्‍थेवर प्रशासकाची नियुक्‍ती झाली असल्‍याचे नमुद केले, त्‍याप्रमाणे प्रशासकाला मंचा तर्फे नोटीस पाठवूनही ते अनुपस्थित राहिल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍यात आली. विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे संधी देऊनही तक्रारकर्त्‍याचे तक्रारीला कोणतेही उत्‍तर दाखल करण्‍यात आले नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे.

 

 

11.   सर्वसाधारणपणे सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्‍थेच्‍या व्‍यवहारात काही अनिय‍मितता आढळल्‍यास राज्‍य शासनाचे वतीने प्रशासकाची नियुक्‍ती संस्‍थेचा दैनंदिन कारभार पाहण्‍यासाठी केल्‍या जाते परंतु संस्‍थेच्‍या अनियमितते बद्दल वा गैरव्‍यवहारा बद्दल प्रशासकाची जबाबदारी येते असे होत नाही. संस्‍थेवर प्रशासक नेमला म्‍हणून संस्‍थेची दायीत्‍वाची जबाबदारी संपली असे म्‍हणता येणार नाही, संस्‍थेच्‍या दायीत्‍वाची जबाबदारी ही संस्‍था आणि तिचे पदाधिकारी यांचेवरच आहे.  आम्‍ही मंचाचे आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष संस्‍थे कडून होण्‍यासाठी प्रशासकाने योग्‍य ते सहकार्य करावे एवढया पुरतीच प्रशासकाची जबाबदारी निश्‍चीत करतो असे आदेशित करतो. मंचाचे आदेशाचे अनुपालनाची सर्वस्‍वी जबाबदारी ही विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍था आणि तिचे तर्फे तिचे कार्यरत पदाधिकारी यांचीच येते.

 

 

12.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                               ::आदेश::

(01)    तक्रारकर्त्‍याची, विरुध्‍दपक्ष क्रं-(1) चैतन्‍यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी मर्यादित नागपूर शहर (नोंदणी क्रं-NGP/C.T.Y./R.S.R,/C.R./343/

       86-87) ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे कार्यरत पदाधिकारी अध्‍यक्ष/सचिव यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष क्रं-(2) प्रशासक, सहकार अधिकारी श्रेणी-2, उपनिबंधक सहकारी संस्‍था, शहर-3, भांडे प्‍लॉट नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार ही औपचारीकरित्‍या (Formal)म्‍हणजे विरुध्‍दपक्ष क्रं-(1) सहकारी संस्‍थे कडून मंचाचे आदेशाचे अनुपालन, विरुध्‍दपक्ष क्रं-(2) चे मार्फतीने होईल एवढया मुद्दा पुरती मंजूर करण्‍यात येते.

(02)   विरुध्‍दपक्ष क्रं-(1) चैतन्‍यवाडी अर्बन को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी आणि तिचे तर्फे कार्यरत पदाधिकारी अध्‍यक्ष/सचिव यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी या निकालपत्रातील परिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने एकूण 04 मुदतठेवी व्‍दारे गुंतवणूक केलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथीस (Maturity Date) त्‍यातील देयलाभासह मिळणारी एकूण रक्‍कम रुपये-90,668/-(अक्षरी रुपये नव्‍वद हजर सहाशे अडूसष्‍ठ फक्‍त) परिपक्‍वता तिथी                             दिनांक-05/04/2010 चे एक महिन्‍या नंतर (कार्यवाहीचा कालावधी सोडून) म्‍हणजे दिनांक-05/05/2010 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम  प्रस्‍तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍यास परत करावी. विहित मुदतीत रक्‍कम तक्रारकर्त्‍यास न दिल्‍यास विरुध्‍दपक्ष संस्‍था मुदत ठेवींची देय रक्‍कम द.सा.द.शे. 9% दरा ऐवजी द.सा.द.शे.12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास देण्‍यास जबाबदार राहिल.

 

 

 

 

(03)   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष  क्रं-(1) संस्‍था व तिचे मार्फतीने पदाधिकारी अध्‍यक्ष/सचिव यांनी तक्रारकर्त्‍यास द्दावेत.

(04)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष चैतन्‍यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी मर्यादित नागपूर शहर आणि तिच्‍या तर्फे कार्यरत पदाधिकारी अध्‍यक्ष/सचिव यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्‍दपक्ष क्रं-(2) प्रशासकाने मंचाचे आदेशाचे अनुपालन त्‍यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं-1) सहकारी संस्‍थे कडून होईल असे पहावे.

(05)   प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.