संयुक्त निकालपत्र :- (दि.15.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.567 ते 569/07 या तिन्ही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच तिन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.3 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद व दामदुप्पट ठेवींच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 567/07 | 101 | 25000/- | 03.08.1999 | 03.08.2003 | 50000/- | 2. | --’’-- | खाते नं.87 | 12000/- | 20.08.1997 | 06.10.1997 | 12000/- | 3. | --’’-- | 104 | 10000/- | 01.09.1999 | 01.09.2003 | 20000/- | 4. | --’’-- | 360 | 25000/- | 05.01.2001 | 05.01.2005 | 50000/- | 5. | 568/07 | खाते नं.103 | 10000/- | 23.06.1999 | 10.08.2003 | 10000/- | 6. | --’’-- | 103 | 20000/- | 03.08.1999 | 03.08.2003 | 40000/- | 7. | --’’-- | 361 | 25000/- | 05.01.2001 | 05.01.2005 | 50000/- | 8. | 569/07 | 102 | 25000/- | 03.08.1999 | 03.08.2003 | 50000/- |
(4) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराचे माहितीप्रमाणे वरील काळात सामनेवाला क्र.3-शिवाजी आप्पा पोटे हे मॅनेजर म्हणून काम करीत होते. त्याचप्रमाणे जी.बी.जाधव व शंकर पावले हे चेअरमन म्हणून काम करीत होते. ठेव पावतीवर चेअरमन व मॅनेजर यांच्या सहया आहेत. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना दि.29.05.2006 रोजी वरील रक्कमा देणेबाबत वकिलामार्फत नोटीस दिली. सामनेवाला क्र.4 ते 13 हे दि.18.11.2000 च्या सहाय्यक निबंधक, आजरा यांनी घेतलेल्या निवडणुकीनुसार निवडून आलेले सामनेवाला क्र.1 संस्थेचे संचालक असलेने त्यांना आवश्यक म्हणून या कामात पक्षकार केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.3-शिवाजी आप्पा पोटे यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला क्र.1 संस्थेत पूर्वी नोकरीस होते, या कारणास्तव त्यांना पक्षकार केले आहे. प्रस्तुत सामनेवाला यांच्या कालावधीत कोणतयाही रक्कमेचा गैरव्यवहार अथवा अपहार केलेला नाही. दि.20.08.2000 रोजी प्रस्तुत सामनेवाला यांनी राजीनामा देवून सामनेवाला संस्थेच्या दप्तरी कागदपत्रांचा ताबा सामनेवाला क्र.1 चे मॅनेजर, श्री.सदशिव मा.चोगले यांचेकडे संस्थेच्या चेअरमन व संचालक मंडळाचे समक्ष दिलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांचा सामनेवाला संस्थेशी कोणताही संबंध राहिलेला नाही. सबब, प्रस्तुत सामनेवाला यांना कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही व प्रस्तुत तक्रारीमधून त्यांना वगळणेत यावे अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.1, 2, 4 ते 13 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. (8) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. (9) सामनेवाला क्र.6-बंडू नरसू जाधव यांचे नांवात बदल असलेने, सामनेवाला क्र.9-रामचंद्र हरी बेळवेकर व सामनेवाला क्र.10-दत्तात्रय दादू खडके हे मयत असलेने त्यांना नोटीस गैरलागू झालेली आहे. त्यामुळे त्यांची नांवे दि.05.10.2010 रोजीच्या आदेशान्वये प्रस्तुत कामांतून कमी करणेत आलेली आहेत. सबब, सामनेवाला क्र.1, 2 (संस्था), 3 ते 5, 7, 8, 11, 12 व 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 (मॅनेजर) व 3 (मॅनेजर) हे सामनेवाला संस्थेचे अधिकारी असल्याने त्यांना केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांची ठेव रक्कम व्याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रार क्र.567/07 मधील ठेवींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या श्रीपती आनंदा माने यांचे नांवे असल्याचे दिसून येते व सदर श्रीपती आनंदा माने हे दि.14.12.2002 रोजी मयत झाले बाबत तक्रारीत नमूद आहे. तक्रारदार, श्री.दशरथ श्रीपती माने, श्री.सुधीर श्रीपती माने व श्रीमती साक्रुबाई श्रीपती माने हे सदर श्रीपती आनंदा माने यांचे कायदेशीर वारस असल्याचे तक्रारीत कथन केले आहे. तसेच, ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर पावती क्र.101, 104 या दामदुप्पट ठेव व खाते नं.87 ची मुदतबंद ठेव या पावत्यांवर साक्रुबाई श्रीपती माने यांचे वारस म्हणून नांव नोंद आहे. दामदुप्पट पावती क्र.360 वर सुधीर श्रीपती माने यांचे वारस म्हणून नांव नोंद आहे. त्यामुळे सदर पावती क्र.101, 104 व खाते नं.87 ची रक्कम मिळणेस साक्रुबाई श्रीपती माने या तर पावती क्र.360 ची रक्कम मिळणेस सुधीर श्रीपती माने हे पात्र असतील या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्यांपैकी काही पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तसेच, काही ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (13) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांच तक्रारी मंजूर करणेत येतात. (2) सामनेवाला क्र.1, 2 (संस्था), 3 ते 5, 7, 8, 11, 12 व 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 (मॅनेजर) व 3 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 567/07 | खाते नं.87 | 12000/- | 2. | 568/07 | खाते नं.103 | 10000/- |
(3) सामनेवाला क्र.1, 2 (संस्था), 3 ते 5, 7, 8, 11, 12 व 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 (मॅनेजर) व 3 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर दि.04.05.2000 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | देय मुदतपूर्ण रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 567/07 | 101 | 50000/- | 03.08.2003 | 2. | --’’-- | 104 | 20000/- | 01.09.2003 | 3. | --’’-- | 360 | 50000/- | 05.01.2005 | 4. | 568/07 | 103 | 40000/- | 03.08.2003 | 5. | --’’-- | 361 | 50000/- | 05.01.2005 | 6. | 569/07 | 102 | 50000/- | 03.08.2003 |
(4) सामनेवाला क्र.1, 2 (संस्था), 3 ते 5, 7, 8, 11, 12 व 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 (मॅनेजर) व 3 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्या साक्रुबाई श्रीपती माने व सुधीर श्रीपती माने यांना प्रत्येक तक्रारीपोटी मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा. (5) तक्रार क्र.567/07 मधील पावती क्र.101, 104 व खाते नं.87 ची रक्कम साक्रुबाई श्रीपती माने यांना तर पावती क्र.360 ची रक्कम सुधीर श्रीपती माने यांना देणेत यावी.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |