जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 45/2012 तक्रार दाखल तारीख – 19/03/2012
निकाल तारीख - 27/03/2015
कालावधी - 03 वर्ष , 08 दिवस.
नामदेव एकनाथ सुमठाणे,
वय – 70 वर्षे, धंदा – शेती,
रा. आष्टा, ता. चाकुर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) चेअरमन,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी,
आष्टा, ता. चाकुर जि. लातुर.
2) शाखा व्यवस्थापक,
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
शाखा आष्टा, ता. चाकुर जि. लातुर.
3) मुख्य व्यवस्थापक,
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
मुख्य कार्यालय सात मजली इमारत,
मेन रोड, लातुर.
4) व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि.,
देशमुख हॉस्पीटल जवळ,
मेन रोड, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य.
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.के.पटेल.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे :- अॅड.शोभा गोमारे.
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- अॅड. अनुराधा झाम्पले.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा मौजे आष्टा ता. चाकुर जि. लातुर येथील रहिवाशी असून, शेती करुन आपली उपजिवीका भागवितो. तक्रारदाराचा दि. 07/06/2011 रोजी अपघात होवून डोक्याला मार लागुन डोळयाची दृष्टी पुर्णपणे गेलेली आहे. सदरची तक्रार पोलीस स्टेशन, शिवाजी नगर गु.र.नं 116/11 कलम 279, 337 भा.दं. वि प्रमाणे नोंदविण्यात आला. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र. 1 चा सभासद 2011 साली होता. त्याचा यादीमध्ये क्र. लेजर नं. 3/100 आहे. म्हणून तो गैरअर्जदार क्र. 1 ते 4 चा ग्राहक आहे. त्याने सोसायटीचा सभासद होण्यासाठी विमा हप्ता भरलेला आहे. दि.13/10/2011 रोजी ठराव घेवून तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दाखल करण्यात आला. गैरअर्जदार क्र. 2 यानी 3 कडे पाठवला, 3 यांनी 4 कडे पाठवला. सामनेवाले क्र. 4 यांनी दि. 09/01/2012 रोजी असे कळविले की, तक्रारदाराचा अवयव फ्रॅक्चर झाला नसल्यामुळे किंवा निकामी झाला नसल्यामुळे क्लेम मंजुर होवू शकत नाही. तक्रारदाराचा अवयव फ्रॅक्चर न होता त्याच्या डोळयाची अपघातामध्ये दृष्टी गेलेली आहे. गैरअर्जदार क्र. 4 यांनी ज्या कारणास्तव अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला ते कारण चुकीचे व हास्यापद आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून तक्रारदारास रु. 50,000/- अपघात झालेल्या तारखेपासुन 12 टक्के व्याजाने देण्यात यावेत. मानसिक व शारीरीक रु 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 5,000/- मागणी करण्यात आली आहे. अर्जदाराने स्वत:च्या शपथपत्राव्यतिरीक्त डॉ.योगेश जुगलकिशोर तोष्णीवाल नेत्रतज्ञ यांचे शपथपत्र दिलेले आहे. व तो पुरावा म्हणून वाचण्यात यावा अशी विनंती युक्तीवादामध्ये अर्जदाराच्या वकीलांनी केलेली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, जखमेचे प्रमाणपत्र, डिसेब्लिटी सर्टीफिकेट, रहीवाशी प्रमाणपत्र, सातबारा, सभासद प्रमाणपत्र, ठरावाची सत्यप्रत, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, क्रेडिट कार्ड, युनायटेड इंडिया इन्शुरंन्स पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्र. 4 ही इन्शुरंन्स कंपनी, गैरअर्जदार क्र. 1 ही विविध कार्यकारी सोसायटी असून, ती सभासदाची यादी तयार करुन त्यांचा विमा हप्ता गैरअर्जदार क्र. 4 कडे पाठविते. त्यामुळे तिने आपले मध्यस्थीचे काम विनामुल्य केले आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराची सर्व कागदपत्रे आल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2, 3 4 ला पाठविलेली आहेत.
गैरअर्जदार क्र. 4 च्या म्हणण्यानुसार अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असला तरी त्याला दि. 07/06/11 रोजी झालेल्या अपघातात उजव्या डोळयाला मार लागलेला आहे व तो आपले रोजचे काम व्यवस्थित करु शकतो 30 टक्के अंधत्व हे विमा पॉलीसीच्या कोणत्याही नियम व अटी मध्ये बसत नसल्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या लेखी कथनामध्ये आलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 चा सभासद आहे, हे नाकारले नाही. तसेच तो सभासद असल्याबद्दलचा कागदोपत्री पुरावा न्यायमंचात दिलेला आहे. व त्याचा लेजर क्र. 3/100 असा आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदार दि. 06/06/11 रोजी मी माझे शेतातील आंबे व डाळींब विक्री करण्यासाठी औसा रोड शेजारी शासकीय मुलींचे वस्तीगृहासमोर दुकान लावून फळे विक्री केली. मी शिल्लक राहिलेली फळे लावून त्याच्या जवळ झोपले होतो. दि. 07/06/11 रोजी रात्री मी झोपेत असताना माझे अंगावरुन गाडी गेल्याने कमरेला व उजव्या पायाला मार लागून जखम झालो. मला त्रास होत असल्याने मी ओरडले असता जीप मधील 5-6 माणसे खाली उतरुन पळुन गेली. मला एका अनोळखी अॅटो चालकाने अॅटोत घालून सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर अर्जदार हा आपल्या डोळयाच्या इलाजासाठी डॉ. योगेश जुगलकिशोर तोष्णीवाल यांच्या दवाखान्यात दाखल झाला. तेथील इलाजानंतर डॉक्टरांनी त्याला 30 टक्के अपंगत्व असे लिहून दिले. अर्जदाराने सरकारी दवाखान्यातील कागद दाखल केलेला आहे त्यावर 1) CLW simple injury 2) Contusion Right Thigh simple injury 3) C.T Report-/Right eye show Traumatic cataract with vitreous detachment Griveous injury. सदर अर्जदाराच्या अर्जावरुन त्याच्या उजव्या डोळयाला 30 टक्के अपंगत्व आलेले आहे 30 टक्के अपंगत्व, 50 टक्के अंधत्व म्हणून समजावे असे न्यायनिवाडे आहेत. सदर डॉक्टरच्या जबाबावरुन अर्जदाराचा उजवा डोळा हा 30 टक्के कायमचा अपंग झाल्या बद्दलचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अर्जदार हा वयोवृध्द असल्यामुळे त्याचे वय 72 वर्षे असल्याचे केस पेपर वरुन दिसुन येते. सरकारी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळेस त्याच्या उजव्या मांडीला मार लागलेला होता. व त्याच्या उजव्या डोळयाला जे 30 टक्के अपंगत्व आलेले आहे, ते वैदयकीय प्रमाणपत्रावरुन 50 टक्के दृष्टी हिनतेचे अंधत्व आलेले आहे, असे समजण्यात यावे. गैरअर्जदाराने अर्जदाराला फ्रॅक्चर व अवयव निकामी झाले नाही. म्हणून त्याचा अर्ज नामंजुर केला ही बाब अर्जदाराच्या सेवेतील त्रुटी निष्पन्न होते. प्रत्येक इंन्शुरन्स कंपनी खंडात असे नमुद आहे की, एक डोळा गेल्यास 50 टक्के अपंगत्व म्हणजेच 50 टक्के अंधत्व व दोन डोळे गेल्यास 100 टक्के अपंगत्व किंवा अंधत्व असे प्रत्येक विमा पॉलीसीमध्ये नमुद केले आहे. ही बाब गैरअर्जदाराच्या वकीलांनी स्पष्ट केलेली नाही व केवळ अवयव निकामी झाला नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळलेला आहे. गैरअर्जदाराने स्वत:चीच पॉलीसी योग्य पध्दतीने पाहिलेली दिसुन येत नाही. म्हणून हे न्यायमंच अर्जदारचा अर्ज मंजुर करत आहे. अर्जदारास गैरअर्जदार क्र. 4 यांनी रु. 50,000/- दयावेत. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 1,000/- व दाव्याचा खर्च रु. 1,000/- देण्यात यावा. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 50,000/-(अक्षरी
पन्नास हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात
यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 1,000/-(अक्षरी एक हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
1,000/-(अक्षरी एक हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.