जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ११०/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २५/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/१०/२०१२
बाबुराव धर्मा ठाकुर .............. तक्रारदार
उ.वय-७० वर्षे, धंदा – नाही
रा. अत्कर्ष कॉलनी, गोळीबार टेकडी,धुळे.
विरुध्द
औदुंबर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धुळे. ........विरुध्द पक्ष सौ. कल्पना अशोक बहाळकर,
रा. प्लॉट नं.९, मर्चंट बॅंक कॉलनी,
उन्नती नगर जवळ, देवपुर, धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)
(विरुध्दपक्ष तर्फे – स्वतः)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी नि.७ वर अर्ज देऊन त्यांचा विरोधी पक्ष यांच्या सोबत आपसात समझोता झालेला आहे व ही रक्कम मिळालेली आहे त्यामुळे त्यांना सदरची केस चालविणे नाही असे म्हटले आहे. तक्रारदार यांचे म्हणणे पाहता सदर तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.