Maharashtra

Ahmednagar

CC/17/182

Mahesh Shriniwas Kabra - Complainant(s)

Versus

Chairman, Tata Motor's Ltd. - Opp.Party(s)

Self M.S.KABARA

03 May 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/182
( Date of Filing : 03 Jul 2017 )
 
1. Mahesh Shriniwas Kabra
House No- 3458,Christ Galli,Near Karanja
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Chairman, Tata Motor's Ltd.
Reg.Office- Bombay House,24,Homy Modi Street
Mumbai
Maharashtra
2. Director, Grahak Seva,Tata Motor's Ltd
Head Office- One Indiabulls Centre, Tower 2A , 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (west)
Mumbai
Maharashtra
3. Director, Sterling Motors
Nagar-Pune Highway Road, In-front Don Bosco ,Kedgaon
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Self M.S.KABARA, Advocate
For the Opp. Party: Gaikwad & Ghule, Advocate
Dated : 03 May 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने टाटा टियागो कार खरेदी करण्‍यापुर्वी सामनेवाले कंपनीचे विक्रेते मे.हुंडेकरी मोटर्स व स्‍टर्लिंग मोटर्स यांचेकडे डिसेंबर 2016 मध्‍ये चौकशी केली असतांना नमुद वाहनास वेटींग लिस्‍ट असुन बुकींग रक्‍कम भरल्‍यास किमान 8 ते 12 आठवडे डिलेव्‍हरी मिळण्‍यासाठी थांबावे लागेल असे सांगितले. सध्‍या वर्षअखेर कारणामुळे उत्‍पादक वाहने पाठवित नाहीत, कारण सर्व ग्राहकांना नविन वर्षे मॉडेल हवे असते. त्‍यामुळे वाहने उपलब्‍ध नाहीत असे दोन्‍ही विक्रेते यांनी सांगितले. जानेवारी 2017 चे सुमारास मे.स्‍टर्लिंग मोटर्स चे मुख्‍य व्‍यवस्‍थापक श्री.लोणकर साहेब यांनी यांनी तक्रारकर्ताकडे संपर्क साधला. आणि जानेवारी 2017 अखेर किंमतीत वाढ होणार आहे. नविन टाटा टियागो कार (सफेद-पेट्रोल-एक्‍स एम मॉडेल) नाशिक येथे आलेली आहे, तुम्‍ही डिेझेल करीता ज्‍यादा एक लाख रुपये का भरता?  त्‍यापेक्षा पेट्रोल मॉडेल खरेदी करा, तुमचे एक लाख रुपये वाचतील, जानेवारी 2017 चे वाहन वाढीव किंमत ऐवजी जुन्‍या किंमतीत लगेच डिलेव्‍हरी मिळु शकेल असे कळविले. त्‍याप्रमाणे दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी संपुर्ण रक्‍कम भरणा करुन वाहन डिलेव्‍हरी तक्रारकर्तास दिली. मात्र वाहन विक्री कागदपत्रे तक्रारकर्तास जाणीवपुर्वक उपलब्‍ध केलेली नव्‍हती व तक्रारकर्तापासून लपविण्‍यात आलेली होती. तक्रारकर्ताने वाहन नोंदणीबाबत पुर्तता मागणी केली असता चालढकल करण्‍यात आली आणि दिनांक 10 जानेवारी 2017 रोजी ऊशिराने नोंदणी पुर्तता करण्‍यात आली. मात्र वाहन संबंधीत कागदपत्रे तक्रारकर्तास दिली नाहीत. व नमुद कागदपत्रे विशेषतः उत्‍पादन माहिती इ. जाणिवपुर्वक तक्रारकर्तास वेळेत मिळणार नाहीत अशी योजना करण्‍यात आली. वाहनाची रितसर नोंदणी झाल्‍यानंतर तक्रारकर्ताने वाहनाचे सिटकव्‍हर व मुझिक प्‍लेअर इ.बसविले असताना वाहनाचे पुढील भागातील (चालक शेजारील) आसनांचे खाली कांचाचे तुकडे आढळले. त्‍याबाबत नमुद वाहनास अपघात/नुकसानी झाली आहे का.? अशी विचारणा सामनेवाला नं.3 यांचेकडे केली असता उत्‍पादन कंपनीने जसे दिले तसे तुम्‍हास विकलेले आहे असे उत्‍तर तक्रारकर्तास मिळाले. नमुद वाहनांचे अॅवरेज कमी का.? अशी विचारण सुध्‍दा तक्रारकर्ताने केली असता सामनेवालेकडून समाधानकारक उत्‍तर मिळाले नाही. सामनेवाले यांचे कळविल्‍यानुसार डिसेंबर अखेर वाहने शिल्‍लक नव्‍हती तर तक्रारकर्तास माहे ऑक्‍टोंबर 2016 उत्‍पादित वाहन जानेवारी 2017 मध्‍ये कसे व का विकण्‍यात आले.? याबाबत माहिती घेतली असता नमुद वाहनास अपघात/वाहातुकीत नुकसानी झाल्‍यामुळे त्‍याची दुरुस्‍ती करुन नमुद वाहनाची नविन म्‍हणुन विक्री तक्रारकर्तास केलेली आहे असे खात्रीलायक समजले. सामनेवालाने तक्रारकर्ताकडून एकुण 4,80,000/- रुपये घेतले असून सामनेवालाने विक्री केलेले नमुद वाहनात दोष असुन तक्रारकर्तास वाहन विक्री सेवा देण्‍यातसुध्‍दा सामनेवाले यांनी निष्‍काळजीपणा केलेला आहे. म्‍हणून तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3.   तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी ग्राहकास धोकादायक व बेकायदेशिर पध्‍दतीचा वाहन विक्री व्‍यवहार तातडीने थांबवावा व अनिष्‍ठ व्‍यापार प्रथा बंद करावी. दोषीत व जुने वाहन परत घेऊन विक्रीपोटी वाहनाची भरणा रक्‍कम तक्रारकर्तास परत करावी. तक्रारकर्तास  झालेल्‍या मानसिक व शारीरीक तसेच आर्थिक नुकसानी भरपाई देणेचा आदेश सामनेवाला यांचे विरुध्‍द व्‍हावा अशी विनंती करण्‍यात आली आहे.

4.   तक्रारकर्ता यांची तक्रार प्राथमिक युक्‍तीवाद ऐकुन तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करण्‍यात आली व सामनेवाला यांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी निशाणी 32 वर त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरात असे कथन केले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला नं.1 व 2 यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला क्र.1 व 2 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला क्र.1 व 2 ने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता हे सामनेवालाचे ग्राहक नाहीत. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाला क्र.1 व 2 हे वाहनाची पुर्णपणे निर्मिती करीत नाही. उदा. टायर्स, टयुब, बॅटरीज इत्‍यादी. निर्मीती करतात. तसेच सामनेवाला क्र.3 व सामनेवाला क्र.1 व 2 यांचे Principal to Principal basis होत आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारकर्ताला देण्‍यात आलेल्‍या सेवेत त्रुटीची जबाबदारी सामनेवाला क्र.1 व 2 यांची नाही. तक्रारकर्ता यांनी तक्रारीत तज्ञ अहवाल म्‍हणून पुरावा दिलेला नसल्‍याने तसेच सदर वाहनामध्‍ये निर्मीती दोष आहे हे सिध्‍द करु शकले नाही. म्‍हणून सदर तक्रार सामनेवाला क्र.1 व 2 यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

5.   सामनेवाला क्र.3 हे प्रकणात हजर झाले व त्‍यांनी निशाणी 21 वर त्‍यांची लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.3 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे तक्रारीत सामनेवाला क्र.3 यांचे‍ विरुध्‍द लावलेले आरोप हे सामनेवाला क्र.3 यांना नाकबुल आहेत. सामनेवाला नं.3 ने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्ताने सामनेवाला यांचेकडून वादातील वाहन दिनांक 31.01.2017 रोजी खरेदी केले असून त्‍यांची किंमत 4,19,344/- रुपये आहे. परंतू तक्रारकर्ता यांचे विनंतीवरुन तक्रारकर्ताला 4,14,574/- मध्‍ये वाहनाची रक्‍क्‍म भरण्‍यात आली आहे. त्‍यात तक्रारकर्ताला योग्‍य डिसकाऊंट देण्‍यात आले आहे. तक्रारकर्ताचे वाहनाचे नोंदणीकरीता आर.टी.ओ. नाशिक मध्‍ये ऑनलाईन पध्‍दत सुरु झाली असल्‍याने ते ऑनलाईन सावकाश नोंदणी होत असल्‍याने तक्रारकर्ताला तात्‍पुरता नोंदणी प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे. तक्रारकर्ता यांनी वाहनाचा ताबा घेण्‍याचे वेळी स्‍वतः वाहनाची तपासणी केली व सदर वाहन योग्‍य आहे. तक्रारकर्ता यांना कोणतेही जुने वाहनाची विक्री करण्‍यात आलेली नाही. तसेच सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारकर्ताची तक्रार कैफियतीत नाकबुल केलेली आहे. वादातील वाहनाकरीता तक्रारकर्ताने डिसेंबर 2016 मध्‍ये सामनेवाला क्र.3 यांना संपर्क साधला आहे. कोणताही ठोस पुरावा नसतांना तक्रारकर्ताने चुकीची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

6. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, सामनेवालांनी दाखल केलेली कैफियत /जबाब, दस्‍तावेज, उभय पक्षकारांचे पुराव्‍याचे शपथपत्र, तक्रारकर्तातर्फे दाखल लेखी युक्‍तीवाद, सामनेवालाचा लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे “ग्राहक” आहेत काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना केली आहे काय.?

 

... नाही.

3.

सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना केली आहे काय.?

 

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

7.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ता यांनी सामनेवाला क्र.1 व 2 कंपनीची निर्मीती असलेले वाहन जानेवारी 2017 टाटा टियागो कार (सफेद-पेट्रोल-एक्‍स एम मॉडेल) सामनेवाला क्र.3 यांचेकडून खरेदी केले ही बाब उभय पक्षकार यांना मान्‍य असून तक्रारकर्ता हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.2 – सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वादातील वाहनाचे उत्‍पादन केले या विषयी कोणताही वाद नाही. परंतु तक्रारकर्ताने सदर प्रकरणात वादातील वाहनामध्‍ये निर्मीती दोष आहे किंवा सदर वाहन अॅव्‍हरेज कमी देत आहे या विषयी कोणताही तज्ञ विशेषकाचा अहवाल प्रकरणात दाखल केलेला नाही. मा. राष्‍ट्रीय आयोग नवी दिल्‍ली. यांनी पारीत केलेल्‍या न्‍याय निर्णय Em Pee Motors Ltd., V/s Ramesh Kumar Bamal & Anr. II (2015) CPJ 32 (NC) यात दिलेल्या न्‍याय निर्णयात असे नमुद केलेले आहे की,

“ Wherein the Hon’ble National Commission held that-the mileage givin by a vehicle is the result of a number of factors including(a) the road on which the vehicle is driven, (b) the traffic on the road at the time it is driven, (c) the quality of the fuel used in the vehicle, (d) the speed at which the vehicle is driven, (e) the number of times brake is applied to stop the vehicle, (f) Load carried in the vehicle, (g) air pressure in the tires/tubes, (h) condition of the tires and (i) the overall condition of the vehicle, etc. Therefore, a vehicle which gives a particular mileage under standard test conditions will never be able to deliver the same mileage when it is driven on a city road and that too, under conditions different from the conditions under which it was test driven. ”

वरील नमुद न्‍याय निवाडयाचा आधार घेतांना मंचाचे असे मत ठरले आहे की, वाहनाचे अॅव्‍हरेज ब-याच इतर घटकावर अवलंबून असते. उदा. रोडवर वाहन कसे चालवतो, रोडवरील ट्रॅफिक, पेट्रोल भेसळ, वाहन चालवितांना ट्रॅफिकमध्‍ये वाहन किती वेळा उभे करावे लागते, वाहनाचे टायरमध्‍ये असलेली हवा दाब व इतर गोष्‍टीवर वाहनाचे अॅव्‍हरेज कमी देत असते, यात तज्ञ विशेषकाच्‍या अहवालाशिवाय निर्मीती दोष आहे असे प्रकरणात सिध्‍द झालेले नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

9.   मुद्दा क्र.3 – तक्रारकर्ताने निशाणी क्र.3 वरील दस्‍त क्र.4 वर इन्‍शुरन्‍स पॉलीसीचे सर्टीफिकेट दाखल केलेले आहे. त्‍यात तक्रारकर्ताचे वाहनात निर्मीती वर्ष 2017 असे दर्शविण्‍यात आलेले आहे. तक्रारकर्ता याला सामनेवाला क्र.3 यांनी दिलेल्‍या माहितीनुसार तक्रारकर्ता यांचे वाहनाचा इन्‍शुरन्‍स काढण्‍यात आला आहे. व त्‍यात त्‍याचे निर्मीती वर्ष 2017 असे दर्शविण्‍यात आलेले आहे. तक्रारकर्ताने निशाणी क्र.28 वर ऑनलाईन फॉर्म 21 आर.टी.ओ.नाशिक यांचे वादातील वाहनाचे सेल सर्टीफिकेटची सत्‍य प्रत दाखल केलेली असून सदर सत्‍य प्रतित वादातील वाहनाचे निर्मीती वर्ष ऑक्‍टोंबर 2016 असे दर्शविलेले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारकर्ताला 2017 वादातील वाहनाचे निर्मीती झाली असून व असे दर्शवून तक्रारकर्ताला सदर वाहन विकले. सदर वाहन जेव्‍हा की, ऑक्‍टोंबर 2016 चे आहे. सामनेवाला क्र.3 ची तक्रारकर्ताप्रति निश्‍चीतच अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना ठरते. तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.3 यांना वारंवार ई-मेल व तोंडी कळवूनसुध्‍दा त्‍यावर सामनेवाला क्र.3 यांनी कोणतीही दखल घेतली नाही. व सामनेवालाने तक्रारकर्ताला सन 2017 चे निर्मीती असलेले वाहन दर्शवून सन 2016 चे वाहनाची विक्री केले ही सामनेवाला क्र.3 यांची तक्रारकर्ताप्रति न्‍युनत्‍तम सेवा व अनुचित व्‍यवहार प्रथा दर्शविते व सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी दर्शविण्‍यात येते.

10.  सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ताला वाहनाचे विक्री करता कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. व जुने उत्‍पादीत असलेले वाहन नविन दर्शवून विक्री करण्‍यात आले यात कोणताही सहभाग नसल्‍याने तसेच उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या इतर न्‍याय निवाडयाचे तथ्‍य या प्रकरणात तंतोतंत लागू पडत नाही. म्‍हणून त्‍याविषयी अंतिम आदेशात उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही.

11.  मुद्दा क्र.4 – सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारकर्ता यांना वाहनाचे निर्मीती वर्ष 2017 चे सांगून जुने वाहन ऑक्‍टोंबर 2016 चे वाहनाची विक्री केली व त्‍याकरीता तक्रारकर्ताला वाहनाची संपुर्ण रक्‍कम घेतली आहे ही बाब ग्राहय धरुन तसेच मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार सामनेवाला क्र.3 चे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.3 यांना वादातील वाहन परत करावे. सदर वाहन परत केल्‍यानंतर सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारकर्ताला टाटा टियागो कार (सफेद-पेट्रोल-एक्‍स एम मॉडेल) हे जुने वाहन परत घेऊन त्‍याच मॉडेलचे नविन वाहन तक्रारकर्ताला द्यावे.

3.   सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारकर्ताला झालेल्‍या मानसिक, शारीरीक त्रासापोटी रक्‍कम रुपये 20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) तक्रारकर्ता यांना द्यावे.

4.   सामनेवाला क्र.1 व 2 यांचे विरुध्‍द कोणताही आदेश पारीत नाही.

5.   वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला क्र.3 यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

6.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

7.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.